प्रीती सखे मलाही का परवडू नये...?

Submitted by विशाल कुलकर्णी on 18 February, 2011 - 12:12

हसण्यात काय मोठे, का रे रडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये..

जगण्यात अर्थ नाही सखये तुझ्याविना,
सहवास मात्र माझा तुज आवडू नये..(?)

आहे तुझाच वेडा, बदनाम जाहलो
प्रीती सखे मलाही का परवडू नये...?

उठती मनात नाना लहरी नव्याजुन्या
सवयी मनास आता जहरी जडू नये..

नादान भावनांचे गुंते पुरे सखे...
घायाळ काळजाला अन कुरतडू नये

स्वप्नात आज येती रुसवे तुझे सखे
प्रेमात हृदय माझे, का धडधडू नये?

विशाल

गुलमोहर: 

जगण्यात अर्थ नाही प्रीये तुझ्याविना,
सहवास मात्र माझा तुज आवडू नये..(?)

आहे तुझाच वेडा, बदनाम जाहलो
प्रीती सखे मलाही का परवडू नये...?

क्लास!! Happy मतला तर अप्रतिम आहे.

उठती मनात नाना लहरी नव्याजुन्या
सवयी मनास आता जहरी जडू नये...व्वा...

कीप इट अप विशाल. Happy

उठती मनात नाना लहरी नव्याजुन्या
सवयी मनास आता जहरी जडू नये..

नादान भावनांचे गुंते पुरे सखे...
घायाळ काळजाला अन कुरतडू नये

स्वप्नात आज येती रुसवे तुझे सखे
प्रेमात हृदय माझे, का धडधडू नये?

>>>>>

सही भौ........

जगण्यात अर्थ नाही सखये तुझ्याविना,
सहवास मात्र माझा तुज आवडू नये..(?)-मस्त.

आहे तुझाच वेडा, बदनाम जाहलो
प्रीती सखे मलाही का परवडू नये...?- दुसरी ओळ खूप छान जमलीय.

उठती मनात नाना लहरी नव्याजुन्या
सवयी मनास आता जहरी जडू नये..- आवडला.

नादान भावनांचे गुंते पुरे सखे...सुंदर
घायाळ काळजाला अन कुरतडू नये- इथे अन कशाला आहे?
म्हणजे त्याऐवजी दुसरा कोणता शब्द वापरता येईल का?

मस्त गझल.

उठती मनात नाना लहरी नव्याजुन्या
सवयी मनास आता जहरी जडू नये..>>

हा शेर आवडला

दुसर्‍या द्विपदीत प्रीये ची जास्त ओढाताण न करता सजणी,सखये असं करावंसं वाटतं.>>>

साती मुळ शेर असा होता...

जगण्यात अर्थ नाही मृत्यो तुझ्याविना,
सहवास मात्र माझा तुज आवडू नये..(?)

पण बाकीचे शेर जरा वेगळ्याच ( Wink ) विषयाचे झाल्याने मृत्यो च्या जागी प्रीया आली. असो, अपेक्षित बदल केला आहेच Happy

हसण्यात काय मोठे, का रे रडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये..

जगण्यात अर्थ नाही सखये तुझ्याविना,
सहवास मात्र माझा तुज आवडू नये..(?)

आवडले..!

ओ हो... अभिजीत भाऊंचा प्रतिसाद चक्क, मस्त वाटले Happy
परवा मस्त मैफल रंगली होती म्हणे डोंबिवलीत. आम्ही मिस केलं देवा.

कणखरजी, बेफिकीरजी, मुक्ता तसेच इतर सर्वांचे मनःपूर्वक आभार Happy

जगण्यात अर्थ नाही मृत्यो तुझ्याविना,
सहवास मात्र माझा तुज आवडू नये..(?)

वादात या कुणीही सहसा पडू नये.. हे मान्य आहे... पण हा वर नमूद केलेला शेर ... शेर नाही उपसलेली समशेर वाटतो आहे.

खूप छानच झालीये बाकी गझल...तरी पण ये गझल इस तरफ ..और ..ये शेर उस तरफ...खुप आफाट कल्पना अगदी समर्पक शब्दात ..चपखल मांडलीत...आभिनंदन...