Submitted by विशाल कुलकर्णी on 18 February, 2011 - 12:12
हसण्यात काय मोठे, का रे रडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये..
जगण्यात अर्थ नाही सखये तुझ्याविना,
सहवास मात्र माझा तुज आवडू नये..(?)
आहे तुझाच वेडा, बदनाम जाहलो
प्रीती सखे मलाही का परवडू नये...?
उठती मनात नाना लहरी नव्याजुन्या
सवयी मनास आता जहरी जडू नये..
नादान भावनांचे गुंते पुरे सखे...
घायाळ काळजाला अन कुरतडू नये
स्वप्नात आज येती रुसवे तुझे सखे
प्रेमात हृदय माझे, का धडधडू नये?
विशाल
गुलमोहर:
शेअर करा
जगण्यात अर्थ नाही प्रीये
जगण्यात अर्थ नाही प्रीये तुझ्याविना,
सहवास मात्र माझा तुज आवडू नये..(?)
आहे तुझाच वेडा, बदनाम जाहलो
प्रीती सखे मलाही का परवडू नये...?
क्लास!! मतला तर अप्रतिम आहे.
लहरी आवडलं. दुसर्या द्विपदीत
लहरी आवडलं.
दुसर्या द्विपदीत प्रीये ची जास्त ओढाताण न करता सजणी,सखये असं करावंसं वाटतं.
उठती मनात नाना लहरी
उठती मनात नाना लहरी नव्याजुन्या
सवयी मनास आता जहरी जडू नये...व्वा...
कीप इट अप विशाल.
उठती मनात नाना लहरी
उठती मनात नाना लहरी नव्याजुन्या
सवयी मनास आता जहरी जडू नये..
नादान भावनांचे गुंते पुरे सखे...
घायाळ काळजाला अन कुरतडू नये
स्वप्नात आज येती रुसवे तुझे सखे
प्रेमात हृदय माझे, का धडधडू नये?
>>>>>
सही भौ........
सही रे सही! मस्तच जमलीय गझल.
सही रे सही! मस्तच जमलीय गझल.
धन्यु समद्यास्नी
धन्यु समद्यास्नी
जगण्यात अर्थ नाही सखये
जगण्यात अर्थ नाही सखये तुझ्याविना,
सहवास मात्र माझा तुज आवडू नये..(?)-मस्त.
आहे तुझाच वेडा, बदनाम जाहलो
प्रीती सखे मलाही का परवडू नये...?- दुसरी ओळ खूप छान जमलीय.
उठती मनात नाना लहरी नव्याजुन्या
सवयी मनास आता जहरी जडू नये..- आवडला.
नादान भावनांचे गुंते पुरे सखे...सुंदर
घायाळ काळजाला अन कुरतडू नये- इथे अन कशाला आहे?
म्हणजे त्याऐवजी दुसरा कोणता शब्द वापरता येईल का?
मस्त गझल.
उठती मनात नाना लहरी
उठती मनात नाना लहरी नव्याजुन्या
सवयी मनास आता जहरी जडू नये..>>
हा शेर आवडला
अलकाजी, कणखरजी मनःपूर्वक आभार
अलकाजी, कणखरजी मनःपूर्वक आभार
दुसर्या द्विपदीत प्रीये ची
दुसर्या द्विपदीत प्रीये ची जास्त ओढाताण न करता सजणी,सखये असं करावंसं वाटतं.>>>
साती मुळ शेर असा होता...
जगण्यात अर्थ नाही मृत्यो तुझ्याविना,
सहवास मात्र माझा तुज आवडू नये..(?)
पण बाकीचे शेर जरा वेगळ्याच ( ) विषयाचे झाल्याने मृत्यो च्या जागी प्रीया आली. असो, अपेक्षित बदल केला आहेच
जगण्यात अर्थ नाही मृत्यो
जगण्यात अर्थ नाही मृत्यो तुझ्याविना,
सहवास मात्र माझा तुज आवडू नये.>>> व्वा! सुरेख!
मृत्यो जबरी झाला होता
मृत्यो जबरी झाला होता विशाल....
मॄत्यो भारी आहे..
मॄत्यो भारी आहे..
हसण्यात काय मोठे, का रे रडू
हसण्यात काय मोठे, का रे रडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये..
जगण्यात अर्थ नाही सखये तुझ्याविना,
सहवास मात्र माझा तुज आवडू नये..(?)
आवडले..!
ओ हो... अभिजीत भाऊंचा
ओ हो... अभिजीत भाऊंचा प्रतिसाद चक्क, मस्त वाटले
परवा मस्त मैफल रंगली होती म्हणे डोंबिवलीत. आम्ही मिस केलं देवा.
कणखरजी, बेफिकीरजी, मुक्ता तसेच इतर सर्वांचे मनःपूर्वक आभार
मस्त मस्त
मस्त मस्त
जगण्यात अर्थ नाही मृत्यो
जगण्यात अर्थ नाही मृत्यो तुझ्याविना,
सहवास मात्र माझा तुज आवडू नये..(?)
वादात या कुणीही सहसा पडू नये.. हे मान्य आहे... पण हा वर नमूद केलेला शेर ... शेर नाही उपसलेली समशेर वाटतो आहे.
खूप छानच झालीये बाकी गझल...तरी पण ये गझल इस तरफ ..और ..ये शेर उस तरफ...खुप आफाट कल्पना अगदी समर्पक शब्दात ..चपखल मांडलीत...आभिनंदन...
जयुताई मा. गी. मनःपूर्वक आभार
जयुताई मा. गी. मनःपूर्वक आभार
चांगली रचना!!!
चांगली रचना!!!
व्वा! विशाल छानच .
व्वा! विशाल छानच .