लेखनचोरांची ऐशीतैशी........

Submitted by भुंगा on 4 February, 2011 - 02:59

मितानचा "माझे लेख चोरले गेलेत" हे वाचून असा धागा काढायची इच्छा झाली. यापूर्वीही अश्याप्रकारच्या लेखनचोर्‍या इथे उघड झालेल्या आहेत. मायबोलीकरांपुरते हे थांबवायचे असेल तर असा काही तरी उपक्रम राबवायलाच हवाय. कारण बर्‍याचदा आपल्या विरोधात आरडाओरड झाल्यावर सरसकट दुसर्‍याचा लेख चोरणारा तो लेख डिलिट करून नामानिराळा रहायचा प्रयत्न करतो. पुढे मूळ लेखकाला मनस्ताप झाला तरी काहीच करता येत नाही.

निदान मायबोलीवरचे असे लेख दुसर्‍याने कोणी आपल्या नावाने खपवायचे नसतील तर, इथे त्या माणसाची लेखनचोरी जाहिरपणे मांडुयात........ म्हणजे जरी त्याने ते लेख डिलिट केले तरी इथे त्याबद्दलची माहिती कायम स्वरुपात नावासकट आणि लिंकसकट राहील. आणि सदर व्यक्तीने इथे जाहिर दिलगिरी व्यक्त केल्याशिवाय इथले त्याचे नाव डिलिट केले जाणार नाही.

कारण जाणते - अजाणतेपणी झाले तरी हे करणार्‍याला पुरेपूर माहित असते की आपण दुसर्‍याचाच लेख किंवा कविता स्वतःच्या नावावर खपवतोय...... ही वृत्ती अतिशय चुकीचीच आहे. निदान मायबोलीवरच्या लेखांची अशी उचलेगिरी थांबवायला हे आपण करू शकतो.....

आणि शक्य तिथे आपण उघड्पणे या धाग्याची लिंक देउया म्हणजे कुठे कुठे इथले लेख उचलले गेलेत याची रितसर नोंद राहील आणि या उचलेगिरीला आळा बसेल......

मितान, अकु..... मला वाटते तुमच्यापासूनच सुरुवात होऊ द्या.
लेख कुठे आणि कोणाच्या नावाने छापला गेला ते उघडपणे लिहा...... त्यानंतर जरी तो लेख्/कविता डिलिट केली असेल तरीही तशी नोंद इथे करा की आता लेख्/कविता डिलिट केलेली आहे.... पण मूळ लिंक आणि व्यक्तीचे नाव मात्र तसेच राहू देत, जोपर्यंत सदर व्यक्ती इथे किंवा मेलने मूळ लेखकाची माफी मागत नाही......

सहज मनात आले म्हणून उपद्व्याप करतोय... कोणाला कितपत पटतायत... तुमच्यावरच सोडतो....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काँग्रॅट्स अकु... चला... सर्वांचे प्रयत्न सफल ठरले म्हणायचे. पण माहीती देत राहा... हा खरंच उपयुक्त धागा आहे...!!! ज्याला जसे उपाय सुचतील त्याने तसे इथे द्यावेत... मी सोशल मेडियासाठी काम करते त्यामुळे नक्कीच अपडेटस मिळत राहतीलच!!! Happy

आणखी एक चोर

अमित. यांचा ब्लॉग बघा
http://kolaantudya.blogspot.com/2011/07/blog-post_21.html

आणि त्याची ही पहा साहीत्यचोरी:
http://x.993347.n3.nabble.com/-td3188557.html

अमित, ह्यात आणखी प्रकाश पाड....अन्य माबोकरांचेही लेखन दिसते आहे इथे...........

अमितच्या चोरलेल्या कथेखाली मी ती मायबोली आणि अमितच्या ब्लॉगवर याआधी प्रकाशित झाली आहे, तेव्हा तिथून प्रकाशित करा असा प्रतिसाद दिला.
त्यानंतर वरचा मंदार जोशी यांनी दिलेला धागा उडवण्यात आलेला दिसतोय.
आणि http://x.993347.n3.nabble.com/-td3371680.html या धाग्यावर अमितच्या नावाने ती कथा नव्याने प्रकाशित केली आहे.

Pages