पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रम

Submitted by स्वाती on 2 February, 2011 - 07:52

येथे पुण्यात होणार्‍या सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती लिहूयात.

कार्यक्रमाचे नाव
तारीख
ठिकाण
फोन नंबर ( असल्यास)
किंवा वेब साईट माहित असल्यास

अशा साधारण स्वरूपात माहिती लिहूयात
हा धागा रैना ने काढलेल्या "मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम" या धाग्यावरुन काढला आहे. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२० ऑगस्ट २०११ रोजी एक प्रसिद्ध कवी आणि आपले मायबोलीकर वैभव जोशी यांच्या गझल आणि कवितांचा कर्यक्रम टिळक स्मारक मंदीर येथे संध्याकाळी ५:०० वाजता होणार आहे. तरी आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरता तिथे उपस्थित रहावे ही विनंती.
तिकिट उपलब्धता आणि कार्यक्रमाच्या इतर माहितीकरता खालील लिंक पहावी.

http://www.maayboli.com/node/27941

अधिक संपर्क - ९८२०८१०६०६

http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-02-06/pune/31029699_1_v...

6th Kirloskar Kirloskar Vasundhara International Film Festival (KVIFF),

Date - Saturday 18th February to Sunday 26th February 2012.

Venues - Balgandharv Rang Mandir, Campus, Pune and Ishanya Mall

Theme - "Sustainable Life Style for all" friends those who r interested please do attend!!

The event will also see four green conferences: 'Be Positive: Pune Green Conference' for collegians, Maharashtra Sahitya Parishad's 'Paryavaran Sahitya Sammelan,' Jalbiradari's 'Maharashtrachi Nadi Panchayat' and College of Engineering, Pune's 'E-waste seminar.'

A delegation of farmers from seven states, who specialise in organic farming, will also make a presentation at the festival.

Entry to the festival is free and distribution of passes will be on a first-come-first-serve basis. Registration for passes will begin from February 5 at Pathfinder bookstore, near Neelayam talkies in Sadashiv Peth.

दि.१६ फेब्रुवारी रोजी होणार्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मतदान जरुर करा!!!

माझी मैत्रीण, अनघा परांजपे-पुरोहीत ही प्रभाग २९ मधुन महिला उमेदवार म्हणुन निवडनुक लढवत आहे. ती व्यवसायाने आर्किटेक्ट आहे, टाउन प्लॅनर आहे. तिची निशाणी कपबशी ही आहे!

तिच्याबद्दल अधिक माहितीसाठी https://www.facebook.com/AnaghaParanjapePurohit ह्या पानाला भेट द्यावी.

पुण्याची प्रगती होणार कशी.... लक्षात ठेवा कपबशी !!!

सुशिक्षित अन सक्षम महिला सक्रिय राजकारणात येत असताना त्यांना खंबीर साथ द्यावी ही विनंती !

कालपासून सुदर्शन हॉल इथे डॉ. अरविंद थत्ते यांचे शास्त्रीय संगीतावर चार दिवसांची कार्यशाळा चालू आहे. ज्यांना शास्त्रीय संगीतात खोलात जाऊन माहिती घ्यायची असेल त्यांनी जरूर यावे. संधाकाळी ६-८. प्रती दिवशी रु. १५०. चारही दिवसांचे रु. ४००
उशीरा सांगितल्याबद्दल क्षमस्व .

दि. १८ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय वारसा दिन (वर्ल्ड हेरिटेज डे) आणि आंतरराष्ट्रीय स्मारक आणि वारसा-स्थळ दिन (इंटरनॅशनल डे फॉर मॉन्यूमेन्ट्स अ‍ॅन्ड साईट्स) साजरा केला जातो. या निमित्त पूर्ण सप्ताहभर पुण्यात विविध कार्यशाळा, व्याख्यानसत्र इ. कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. त्याची माहिती एकत्रितपणे इथे टाकायचा प्रयत्न करतेय

https://www.facebook.com/events/307742025963898/ (व्याख्यानसत्र)
timv.jpghttp://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12695598.cms

virasat.jpg

शनिवार ११ ऑगस्टला आनंदीबाई जोशींवर "स्मरणयात्रा" हा कार्यक्रम होणार आहे. भारत गायन समाजात. संध्याकाळी ५.०० वाजता. अंजली किर्तने यांची मुलाखत आणि त्यांनी आनंदीबाईंवर काढलेला लघुपट दाखवला जाणार आहे. सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. साधारण ८ पर्यंत चालेल.

वरील कार्यक्रमाबरोबरच अंजली किर्तने यांचा रविवारी खालील कार्यक्रम होणार आहे.

2 copy_0.jpg

दोन्ही कार्यक्रम सर्वांना खुले आहेत. जरूर या Happy

अकिरा कुरोसावा चित्रपट महोत्सव पुण्यात.
स्थळ आहे पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावरील आर्काईव्ह थिएटर. हा महोत्सव 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

http://www.esakal.com/esakal/20121204/5277374116588185204.htm

‘Akshar Wangmay’ is a quarterly literary periodical with articles in Marathi and select articles in English. The July – March 2012/13 is a Drama Special Issue focusing on ‘Experimental Drama : Indian and International.’

‘Akshar Wangmay’ Drama Special Issue will be released at the Hands of Dr. Mohan Agashe.

Dr. Nagnath Kottapalle is the Chief Guest for the function.

Renowned Playwrights, Directors, Critics from India and abroad have contributed their articles written specifically for this Drama Special Issue.

There are nine interviews in this issue. There are three interviews of Indian theatre people and six interviews from other countries.

The Guest Editor for Drama Special Issue is Dr. Arun Prabhune, San Jose, U.S.A. Dr. Prabhune is from Udgir, who now works as Visiting Scholar at University of Stanford, USA.

The issue is of approximately 425 pages and would be available at the venue.

The annual subscription of Akshar Wangmay is Rs. 500/- for Indian citizens. For more information, please write to suryawanshinanasaheb67@gmail.com OR arun_prabhune@yahoo.co.in

List of Contributors in Drama Special Issue:

Contributors from India:

1) Devendraraj Ankur
Former Director,
National School of Drama, New Delhi

2) Arun Kakde (Interview)
Founder Member and President of
Avishkaar Theatre

3) Achut Vaze (Interview)
Dean, FLAME School of Communication, Pune
Playwright

4) Pratima Kulkarni (Interview)
Director, Author and Actress

5) Ramdas Bhatkal
Publisher, Popular Prakashan.

6) Chadrakant Prabhakar Deshpande
Playwright.

7) Dr. Arun Chintaman Prabhune
Author and Critic.

8) Dr, Ajay Joshi
Theatre Critic and Visiting Professor of Theatre Criticism

9) Prof. Prasad Vanarase
Dean, FLAME School of Performing Arts
Theatre Designer and Director

10) Geetanjali Kulkarni
Actress

11) Neeraja Patwardhan
Costume Designer

12) Prabhakar Bhave
Make Up Artist

13) Vasudha Sahasrabudhhe
Hindi Drama Critic

14) Prof. D. S. Chougule
Kannada Playwright, Drama Critic,
Translator

Contributors from Abroad:

15) Dr. Elaine Aston, U.K.
Professor of Contemporary Performance,
Writer, Drama Critic, and Senior Editor of
Theatre Research International

16) Dr. Farley P. Richmond, U.S.A.
Professor of Theater, Director, Author, and Drama Critic

17) Dr. Sharon G. Feldman, U.S.A.
Professor of Spanish and Catalan Studies, and Drama Critic

18) Kimberly Jannarone, U.S.A.
Doctor of Fine Arts, Professor of Theatre,
Author, Drama Critic, Actor, and Director

19) Dr. Juliana Okoh, Nigeria.
Professor of Theatre Arts, Playwright, Literary
Critic, Educator, and Social Activist

20) Kathy A. Perkins, U.S.A.
Professor of Theater, Lighting Designer and Editor of Books

21) Prof. Erik Exe Christoffersen, Denmark
Associate Professor Dramaturgy, Drama Critic and
Editor of Peripeti Research Journal

22) Prof. Annelis Kuhlmann, Denmark.
Associate Professor Dramaturgy and Drama Critic

23) Antero Alli, U.S.A. (Interview)
Founder of Para Theatrical Research Centre,
Actor, Director, and Writer

24) Yuriko Doi, U.S.A. (Interview)
Founder of Theater of Yugen, Actor, and
Director.

25) Paige Rogers, U.S.A. (Interview)
Cofounder of The Cutting Ball Theatre and
Associate Artistic Director

26) Kenny Perkins, U.S.A. (Interview)
Well-Known Native American Drummer and Performer

27) Mansaku Nomura, Japan (Interview)
National Living Treasure of Japan
Actor, Director

28) Rob Melrose, U.S.A. (Interview)
Cofounder of The Cutting Ball Theatre, Director.

547639_514996728532637_762166504_n.jpg

यासंदर्भातली मटाची लिंक
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17864057.cms#write

कार्यक्रमाचे नाव - पं. हरीप्रसाद चौरसीया यांची मुलाखत आणि आधारीत गाण्यांचा कार्यक्रम
विशेष उपस्थिती: प्यारेलाल शर्मा.
मुलाखत घेणार आहेत - सुधीर गाडगीळ
तारीख - ५ ऑक्टोबर २०१३ - सं:५:३०
ठिकाण: टिळक स्मारक मंदिर

दिवाळी दरम्यान पुण्या-मुम्बईत cultural (सन्गीत / नाटके / मुलाखती / दिवाळी पहाट सारखे) कार्यक्रम कुठे होणार असतील हे माहित आहेत का? (रच्याकने एखाद्या अक्षरावर अनुस्वार कसा द्यायचा?)

सुचित्रा,

पुण्यात बरेच कार्यक्रम होतात. सकाळ पहात रहा.

अनुस्वार द्यायला कॅपिटल एम वापरायचा उदा, अंबर - aMbar

- निवेदन -

‘आयाम ग्रुप’ व वेस्टर्न कोर्ट सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सलग पाचव्या वर्षी हे शिबीर आयोजित करताना आम्हाला अत्यंत आनंद व आजवरच्या रक्तदात्याविषयी कृतज्ञता वाटते.

स्थळ - वेस्टर्न कोर्ट सोसायटी, नवी पेठ, पुणे ३० (लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील काका हलवाई दुकानाच्या मागील बाजूस)
दिनांक - 20 ऑक्टोबर २०१३ रोजी
वेळ - सकाळी ९:३० ते १:०० वाजे पर्यंत
अधिक माहीती करता संपर्क साधा - हर्षद पेंडसे ९८८११५२८८४

तसेच एक गोष्ट नमूद करण्यास आनंद वाटतो की मागच्या वेळेस चेहेरेपुस्तकावरील आवाहन वाचून दोन संपुर्णतः अनोळखी व्यक्तींनी आवर्जून येउन रक्तदान केले होते.

तसे पाहता, मायबोलीच्या माध्यमातून आपण एकमेकांना ओळखतो. त्यामुळे या वेळेस मायबोलीच्या माध्यमातूनही अनेक रक्तदाते येतील तर मायबोली हे माध्यम अशा तर्‍हेच्या विधायक कामाकरता वापरता आल्याचा आनंद काही औरच असेल.

शिबीर स्थळ हे पुणे शहराच्या अगदी मध्यभागात पण फार गर्दीच्या ठिकाणी नसलेले आहे. पार्किंगची सोयही व्यवस्थित आहे, तरी आपण पुण्यात असाल तर येण्याचे करावे हे अगत्यपूर्वक निमंत्रण...

हस्तकलेच्या वस्तूंचे एक विशेष प्रदर्शन..

"मैत्री"च्या मेळघाट प्रकल्पाच्या मदतीसाठी पुण्यातील काही हौशी कलाकार एकत्र आले आहेत. त्यांनी तयार केलेल्या कलात्मक वस्तू पहा आणि खरेदी करा!

कलाकारांनी स्वत:च्या हातानी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू उपलब्ध.

"मैत्री"च्या कामाला मदत करण्यासाठी, कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अजून कुठेही मिळाणार नाहीत अशा भेटवस्तू घेण्यासाठी भरपूर वेळ काढून "मैत्री" जत्रेला भेट द्या!

"मैत्री" जत्रा शनिवार २६ आणि रविवार २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते रात्री ९ दरम्यान सर्वांसाठी खुली असेल...

स्थळ - नटराज सोसायटी सभागृह, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वे नगर, पुणे.
कुठेही मिळणार नाहीत अशा दिवाळीसाठीच्या भेटवस्तू खरेदी करण्यासाठी नक्की या!

सनवर्ल्ड फॉर सिनीयर्स पुणे आणि गोल्डन एनर्जायजस मुंबई आयोजित

'गुणवत्तापूर्ण उत्तरायुष्य' प्रथम राज्यव्यापी परिषद

१४ ते १६ डिसेंबर (शनि-सोम) २०१३.

स्थळ : पुण्याई सभागृह, १२७/१ अ, पौड रोड, पुणे
उद्घाटन : १४ डिसें सायं ५ ते ८.
परिषदेची वेळ : १५ व १६ डिसें सकाळी ९ ते सायंकाळी ५.

उद्घाटक : डॉ. के एच संचेती
मुख्य वक्ते : डॉ. अरुण निगवेकर

चर्चासत्राचे विषय :

  • ज्येष्ठांचे प्रश्न - ज्येष्ठ नागरिक संघाची भूमिका
  • वृद्धनिवासाचे बदलते स्वरूप
  • वृद्धांची काळजी घेण्यार्‍यांच्या अडचणी व उपाय
  • वृद्धांवरचे अन्याय - एक वास्तव
  • निधी कसा उभारावा?
  • स्वयंसेवक - ज्येष्ठांसाठी ज्येष्ठांनी उभी केलेली यंत्रणा
  • ज्येष्ठांचे कायदे, धोरण अंमल बजावणीतले अडथळे
  • देशोदेशींच्या ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणातून आपण काय घेऊ शकतो?
  • पिढ्यांमध्ये सुसंवाद निर्माण करायची गरज
  • मेंदूचा वापर आणि मानसिक आरोग्य
  • आम्हाला काही सांगायचे आहे! खुले सत्र
  • शेवटचा दिवस गोड व्हावा - लिव्हिंग विल, नेत्रदान, अवयवदान इ.

वर्ग १ : केवळ उपस्थिती : विनामूल्य - परंतु नोंदणी आवश्यक.
वर्ग २ : चहा, नाश्ता, भोजन + स्मरणिका इतर साहित्य (प्रत्येकी ६०० /- रु.)
वर्ग ३ : चहा, नाश्ता, जेवण, स्मरणिका, आणि १४ व १५ डिसें. निवास (प्रत्येकी १००० /- रु.)

नोंदणी संपर्क :

पुण्याई सभागृह, १२७/१ अ, पौड रोड, पुणे ३८.
अश्विनी : ८८०६१८००११, आशा : ९८५०५७०७७३.

चतुरंग प्रतिष्ठान आयोजित मुक्तसंध्या

एकाच मंचावर सहा रंगकर्मींशी संवाद साधायची संधी

प्रवेश विनामूल्य

सगळ्या नाट्यप्रेमीना हार्दीक निमंत्रण
muktasandhya.jpg

इथे कोणी 'मिळून सार्‍याजणी' च्या सखी मंडळाच्या कार्यक्रमाला जाते / गेलेले आहे का?
दर महिन्याच्या २र्या शनिवारी (पुण्यात) कर्वेरोडवरील स्वप्ननगरीमधे डॉ. भूषण शुक्ला यांच्या मोकळया फ्लॅटमध्ये (पहिला मजला) दुपारी ठीक ४.०० वाजता सखी मंडळाचा कार्यक्रम असतो.
यावेळेपासून जायचा माझा विचार आहे.

२५ ऑक्टोबर २०१५ रोजी नवी पेठ, पुणे येथे रक्तदान शिबीर

स्थळ - वेस्टर्न कोर्ट सोसायटी, नवी पेठ, पुणे ३०
शास्त्री रस्त्यावरील काका हलवाई शेजारील गल्लीतून आत आणि मग डावीकडे वळल्यावर ६ मजली इमारतीच्या सोसायटीचे फाटक दिसेल. तिथेच Happy

दिनांक - २५ ऑक्टोबर २०१५
वेळ - सकाळी ९:३० ते दुपारी १:३० पर्यंत
अधिक माहीती करता संपर्क साधा - हर्षद पेंडसे ९८८११५२८८४

शिबीर स्थळ हे पुणे शहराच्या अगदी मध्यभागात पण फार गर्दीच्या ठिकाणी नसलेले आहे. पार्किंगची सोयही व्यवस्थित आहे, तरी आपण पुण्यात असाल तर येण्याचे करावे हे अगत्यपूर्वक निमंत्रण...

Pages