स्टुडिओतुन एके दिवशी फोन आला ,'' काम अर्जंट आहे या''
गेल्यावर कळल कि एक documentry लिहायची आहे, महिला व बाल कल्याण खाते महाराष्ट्र ह्यांच्यासाठी. shoot अगोदर करुन झाल होत आणि झालेल्या १३ तासांचे shooting footage बघुन मला लिहायच होत. screeptwriters ना चौकटीत काम करावच लागत , पण इथे चौकट अजुन छोटी झाली होती.कल्पनेच्या आकाशात इथे विहरता येणार नव्हत.
पण १३ तास
प्रचंड कंटाळ्वाण ,वाट्ल एकदा नाही म्हणाव ,पण नंतर ठरवल बघु विषय भावला तर लिहु ,अस म्हणुन दुसर्या दिवशी सकाळीच dvs बघायला बसले,
dv tape सुरु झाली आणि त्यातल्या चल चित्रणाने मी आतुन हादरुन गेले. मतिमंद , विशेषतः आई वडिल असुनही अनाथ असलेले हे मतिमंद. ''आशाभवन '' नावची एक संस्था अशा मतिमंदाना सांभाळते.त्या मुलांची दिनचर्या , त्यांचे खेळ, त्यांच्या समस्या , त्यांच्या शिक्षकांच्या मुलाखती .त्या १३ तासाच्या फुटेज मध्ये त्या निरागस कोवळ्या जीवांच खुंट्लेल आयुष्य डोळ्यापुढे उभे राहिलं.ते सगळं पाहुन मन आतुन खुप भरुन आल होतं.
लिहायला बसले आणि डोळ्यासमोर आलं बोनसाय , गती खुंट्वलेलं , माणसाने हौसेसाठी निर्माण केलेल, एका गतीशील झाडाची गती तारांनी खुंट्वुन ,त्याला एका छोट्याश्या कुंडीत जायबंदी केलेलं बोनसाय.
मग ही मुलं कोण? परमेश्वरानी निर्माण केलेली बोनसाय . काय मिळाल परमेश्वराला ? त्यांच्या पालकांना काय वाट्त असेल? अश्या असंख्य प्रश्नांनी मनात फेर धरला,आणि मनातली सगळी अस्वस्थता कागदावर उतरली
वेगवेगळे प्रसंग पाहुन एक कविता सुचली. तिला निवेदनाच्या सुरवातीला मध्ये आणि शेवटी टाकली
ही कविता म्हणजे संवाद आहे त्या मुलांचा आणि देवाचा
भेट्ला कधी देव तुला, पाठ्व त्याला माझ्याकडे
विचारायचे आहे ,त्याला उत्तरचं नसलेले कोडे,
काय असा केला गुन्हा ,का दिलास जन्म मला?
शापित ठरवुन देवा, काय मिळाल तुला?
कविता आणि निवेदन पुढे सरकत गेले. कवितेत मुलांचे खुप सुंदर भावपुर्ण प्रसंग आहेत documentry च्या मध्यात एक प्रसंग आहे ,कि एका मतीमंदाला दोन्ही हात नाहीत आणि तिथल्या sisters त्याला खुप प्रेमाने जेवु घालतायेत.
तिथे शब्द सुचले,
कशी होती रे माझी आई? माहित आहे का तुला,
सोड्ण्यापुर्वी एकदातरी, जवळ घेतल होत का मला?
भरवला होता का तिने मला ही काउचा घास
सांग ना जाउन तिला,नाही देणार मी पुन्हा त्रास
शेवट मात्र आशादायी केला, कारण ही सगळी मुल तिथे खुप आनंदात आहे
एक अपंग मतीमंद मुलगा wheelchair वरुन खाली पड्तो आणि दुसरा मतीमंद धावत जाउन त्याला आधार देउन उठ्वतो हे चित्रच इतक आशादायी वाटल कि तिथे शब्द आले,
देवा जवळ ये हळुच , सांगतो तुझ्या कानात
सुखी आहे मी इथे हे आल का तुझ्या ध्यानात
नाही आता खंत एकट असण्याची
मिळाली नवी आशा सुंदर जीवन जगण्याची
पंखात आल बळ मिळाल नवं आकाश
क्षितीज आता दुर नाही वाट्तो हा विश्वास
हसरे चेहरे आणि डोळ्यातील आशा ह्या सोबत फिल्म संपली पण खुप प्रश्न अनुत्तरित राहिले मनात , पुढे ह्या मुलांचे भविष्य काय? फिल्म लिहुन माझ कर्तव्य संपत नाही पण ह्या फिल्म च्या निमीत्ताने समाजातील ह्या निरागस जीवांच दु:ख समाजापुढे आल तरी , गेली अनेक वर्षे मी सोशल वर्क करते, समाजातला हा घटक मात्र खुप दुर्लक्षित राहिलाय हे खरय,
आणि म्हणुनच मी ठरवलय ह्या निरागस जीवाच्या चेहर्यावर हसु फुलवायच ,उत्तरचं नसलेल्या ह्या कोड्याच उत्तर शोधायच .
''उत्तरच नसलेले कोडे''
Submitted by सखी राधा on 1 February, 2011 - 08:31
गुलमोहर:
शेअर करा
या मुलांना पाश्चात्य देशात
या मुलांना पाश्चात्य देशात "gifted children" म्हणतात. देवांनी आपली सेवा करउन घेण्यासाठी दिलेली "gifts" ही संकल्पना आहे.
असे पण आहे की ही मुले निसर्गाची प्रयोगशाळातुन निघालेली असतात. एखादा मानसिक आजार समजा
ADHD मुलाला दुसर्यांबरोबर mix होण्यास त्रास देइल पण पुढे जर समाजाला एकएकटे रहाण्याची वेळ आली तर हाच आजार गुण ठरेल. यामुळे देखिल ही मुले निसर्गाची मानवजातीला gifts असतात.
संजय गांधीच्या काळात अपंगांना टेलिफोन बुथ वगैरे काढुन देण्याची योजना आठवते. आता पण अशांना वा त्यांच्या पालकांना काही उद्योगात मदत केली पाहिजे ज्यायोगे त्यांआ अभिमानाने जगता येइल.
Thanks Sakhi Radha for giving
Thanks Sakhi Radha for giving me permission to share this article with my family and friends.
I think we are so busy running to get unwanted things,getting depressed for not getting those and comparing with each other on materialistic things, we forget what we have.
This article is an eye opener for all of us, Get out of hollywood-bollywood world and live real life
Thanks again
काय छान, रेखाटल्या आहेस ग
काय छान, रेखाटल्या आहेस ग मुलांच्या भावना. मला माहित आहे ही संस्था. ही संस्था खरच खूप मोठ्ठी सेवा करते आहे समाजाची.
>>एका डोळ्यात वाईट वाटलं
>>एका डोळ्यात वाईट वाटलं त्याचा अश्रू अन दुसर्यात तुझ्या सारख्या संवेदनशील व्यक्ती समाजात आहेत या समाधानातून आलेला आश्रू
अवलला आणि डॉक्टरांना अनुमोदन. हे सगळं वाचून आपण किती सुखी आहोत याची जाणीव होते आणि मग काही त्रास जाणवेनासे होतात.
तुझी लिहीण्याची शैली ओघवती आहे. कृत्रिमता अजिबात जाणवत नाही.
निलिमा तुझा "gifted children"
निलिमा तुझा "gifted children" हा शब्द खुप भावला !!!
सखी खुप टचिंग लिहिलयत अवल
सखी खुप टचिंग लिहिलयत
अवल आणि दिनेशदा ना अनुमोदन....
तुम्हाला मनापासुन शुभेच्छा.
शुभेच्छा.. सखी!!!
शुभेच्छा.. सखी!!!
सुरेख लिहिलं आहेस.
सुरेख लिहिलं आहेस.
छानच लिहिलय सखी. नक्कीच आतून
छानच लिहिलय सखी. नक्कीच आतून हललीयेस... अन वाचणार्यालाही भिडतय.
नशिब केबीन मधे आहे. नाहीतर
नशिब केबीन मधे आहे. नाहीतर सगळे गोळा झाले असते का रडतेस म्हणुन. अप्रतिम लेख आणि तुझे संवेदनशील मन.
मोना धन्स !
मोना धन्स !
नि:शब्द केलंस लेखाने.. खरंच
नि:शब्द केलंस लेखाने..
खरंच खूप स्पर्शून गेला मनाला..
फारच हृदयस्पर्शी! पडलेले कोडे
फारच हृदयस्पर्शी! पडलेले कोडे हेच उत्तर आहे.
अश्रु आणले डोळ्यात.... खास
अश्रु आणले डोळ्यात....
खास करुन मधल्या ओळी तर फारच सूंदर...... ह्र्द्याला स्पर्शुन गेल्यात.
छान लिहिलं आहेत. तुमच्या
छान लिहिलं आहेत. तुमच्या कामासाठी शुभेच्छा!
विषय गंभीर आणि लेखन सुरेख
विषय गंभीर आणि लेखन सुरेख अगदी काळजात थेट उतरणारं. मन खिन्न करुन टाकणारं. काय लिहू ? शब्द जिथे मुके होतात तिथे मूकेपण बोलके होते हेच खरं.
अश्रु आणले
अश्रु आणले डोळ्यात...................! शेवटि आपन सगळे त्या परमेश्वराच्या हातातिल बाहुल्या आहोत, तो ज्याला जसे नाचवायचे तसे नाचवत आसतो फक्त आणि आपण नाचत आसतो त्याच्या तालावर.
खरोखर परमेश्वर या मुलांवर
खरोखर परमेश्वर या मुलांवर अन्यायच करतो असे वाटते.
हृदयस्पर्शी लेख.
हृदयस्पर्शी लेख अन कविता..
हृदयस्पर्शी लेख अन कविता.. खूप भरून आले वाचताना..
स्वप्ना ,सुनिल ,सुशान्त
स्वप्ना ,सुनिल ,सुशान्त पाषाणभेद, चेतना माझ्या भावना तुमच्या पर्यन्त पोहचल्या ह्याच समाधान वाटल
सखी राधा... तू लिहित राहा..!
सखी राधा... तू लिहित राहा..! यापूढे मी तूझे लेख आवर्जून वाचणार..best luck!
देवाघरचे ज्ञात कुणाला ? पण या
देवाघरचे ज्ञात कुणाला ?
पण या मुलांनाही सांभाळणारे कुणी आहेत हे किती विशेष......
तुझी संवेदनशीलता, आशादायी जाणीवा प्रकर्षाने जाणवताहेत...
अगदी आत आत हलवून टाकलं...
तू एक सामाजिक काम करते आहेस हे वाचून धन्यताच दाटून आली मनात.
सखी खुप सुरेख लिहिलं आहेस.
सखी खुप सुरेख लिहिलं आहेस. डोळे भरुन आले, खास करुन कवितेच्या त्या मधल्या ओळी अगदी मनाला आत स्पर्शुन गेल्यात.
सुंदर लेख सखी... पण खरं सांगू
सुंदर लेख सखी... पण खरं सांगू का, मतिमंद मुले जेवढा त्रास सहन करत असतात ना, त्यापेक्षा जास्त यातना त्यांचे पालक सहन करत असतात. विशेषतः आई... तिचं संपूर्ण आयुष्यच शाप बनून जाते.. असं नुसतं पाहून नाही समजत ग अशा मुलांचं आणि त्यांच्या आईचं दुःख... परमेश्वराने शत्रूवर सुद्धा अशी वेळ आणू नये.. ज्याचं जळतं त्यालाच कळतं..
Pages