५ महिन्याच्या बाळाचा आहार आणि झोप

Submitted by तनू on 31 January, 2011 - 02:15

मी मायबोली ची नवीन सदस्य आहे, माझा मुलगा आता ५ महिन्याचा आहे. तो नीट झोपत नाही. म्हनजे १०-१२ तास झोपतो फक्त. त्याला व्यवस्थित झोपन्यासाटी काय करु??

मि त्याला खालिल प्रमाने आहार देते
९ am- १ मारि बिस्किट दुधाबरोबर
११.३० am- नाचणी सत्व
झोपून उटल्यवर दूध (१ किवा २ वेळा)
६ pm- १ मारि बिस्किट दुधाबरोबर
८ pm- गुटी + breastfeeding
१० pm - तादूळ अणी मुगाच्या डाळीची खिमटी
रात्रि तो उटेल तेव्हा breastfeeding

व्यवस्थित झोपन्यासाटी आहारात काहि बदल करायला हवेत का? किवा ईतर काहि उपाय असेल तर सांगा please

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिन्मयी अहो गिल्ट वाटून नका. ;बाळाची वाढ नीट होत असेल तर घाबरण्यासारखे काहीही नाही.

खिमट : १ वाटी तांदूळ १/२ वाटी मूग डाळ एकत्र करून स्वच्छ धुवून घ्या . मग मऊ कपड्यावर वाळवून गया , मी सावलीत वाळवत होते.
मिक्सरवर त्याची गरबारीत पावडर करून घ्या. पावडर एका स्वच्छता कोरड्या डब्यात भरून ठेवा. जेंव्हा खिमट करायची तेंव्हा कढईत सजूक तूप अगदी चमचाभर (छोटा) गरम करा त्यात हि पावडर टाकून परतून घ्या ,पावडर २-३ चमचे या प्रमाणात हवी. मग पाणी, हळद मीठ साखर (हवी असल्यास)
टाका आणि शिजवून घ्या.
हे दुपारी जेवण्याच्या वेळेस बाळाला देता येतील . बाळाला हे कधी सुरूर करायचे तर हे सर्व बाळाच्या भूकेवर अवलेबून आहे . कुणी ५ व्या कुणी ६व्या महिन्यात करतात.
माझे स्वतःचे बाटली द्यायला विरोध होता, मग नंतर वाटी चमचा किंवा फुलपात्राने दिले. माझ्या अनुभव असा बाळ दिवसा २-३ तास आणि रात्री १०-१२ तास शांत झोपत असेल तर त्याचे पोट निट भरलं आहे.
माझ्या बाळाचा रुटीन असे होते
१. सकाळी ९ ला दूध ब्रेअस्टफीड आणि १ वाटी वरचे
२. १०. ३० एक फळ यात पपई , सफरचंद, बिट,चिकू,केळे वगैरे
३. ११ . ते ११. ४५ अंघोळी नंतर झोप , बाळा गजर लावल्यासारखे ११. ४५ उठायचे.
४. दुपारी १ ला खिमट
५. २ ते ३. ३० झोप
६. चारच्या आसपास खीर ( रवा नाचणी, खारीक/बदाम., खसखस रोज एक )
७. ६ ला ब्रेसफीड तसेच अधून मधून गरज असल्यास
८. ८ला वरण भात ( तूर,मूग, मसूर, रोज डाळ या प्रमाणे )
९. ९ घुटी ( आयुर्वेदिक डॉक बहिणीने शिकवली , तीच देत गेले. त्यामुळे बाळ कधीही विशेष आजारी पडले नाही)
१०. ९. ३० झोपवणे तीच सवय आजून आहे
११. अधून मधून ओव्याचे पाणी, बाळ सुरुवातीला कॉलिक होते

वर कुणीतरी सांगितल्याप्रमाणे आम्ही डॉक नाही थोडे पाहुन,थोडे, विचारून केले. रिशांन ला मालिशवाली बाई चा हात सहन होत नव्हता ( बाईचा हात हलका नसेल तर मुले खूप रडतात ) , मग डॉक कडून मसाज शिकले , टाळू भरायला शिकले (डॉक . अश्विनी गान्धी , दादर , उर्जिता जैनची मुलगी आहे, ).
कुठल्याही प्रकारचे सेरेलॅक, किंवा इतर फूड वापरले नाही. इव्हन मुलाला अजूनही बिस्कीट , मॅगी , फास्ट फूड याची सवय नाही. सर्व भाज्या कार्ले सोडून खातो, अजिबात कुरकुर नाही

चौथ्या महिन्यात ओळख द्यायची म्हणून मी रमाला भाताची पेज सुरू केली होती, फार नाही एखादी छोटी वाटी.
ती १-२ चमचे पीत असे, बाकी फुरर...
हळू हळू प्रमाण वाढत ३ छोट्या वाट्यापर्यंत गेलं, तेव्हा ती साडेपाच महिन्यांची होती.
पेज म्हणजे भात शिजवताना वरती पाणी असतं ते, भात पातेल्यात शिजवायचा त्यासाठी.
वावे म्हणते तसं खिमट साडेपाच महिन्यानंतर सूरु केलं.
ते तिला आवडलं फुरर न करता खाल्लं तिने.

वरच्या पोस्ट सगळ्या उपयुक्त आहेत.
प्रत्येक बाळ वेगळा response देतं.

<<< ९. ९ घुटी ( आयुर्वेदिक डॉक बहिणीने शिकवली , तीच देत गेले. त्यामुळे बाळ कधीही विशेष आजारी पडले नाही) >>> हा नक्की काय प्रकार असतो? कसे बनवतात घुटी? ईथे सांगीतले तर सर्वाना ऊपयोगी पडेल.

चिन्मयी, काय नाव ठेवलेस पिल्लुचे

आणि बाळांना आवडलं नाही किंवा जास्त झालं तर ती ओकतात.शक्यतो डोकं किंचित वर ठेवता आलं तर उलटी नाकातोंडात जाण्याचे चान्सेस कमी होतील(घाबरवत नाहीये)
बाळं ओकली तरी थोडंफार पोषण पोटात गेलेलं असतं.घाबरू नये,आणि साफ करून थोडा मूड बदलून थोड्या वेळाने काहीतरी वेगळं खाणं आवडतंय का बघावं
(आजूबाजूला ज्ये ना असले तर ओकण्या वरून गिल्ट देतात.तो न घेता कमळाच्या फुलावरील दवबिंदू सारखा आजूबाजूला ओघळू घ्यावा Happy )

बाळ खाल्लेलं ओकत असेल तर त्याला ओकरं बाळसं म्हणतात आमच्याकडे Lol
रमा 3ऱ्या महिन्यात पालथी पडू लागली , तेव्हा तिला सतत दुधाच्या ओकाऱ्या होत असत, हा शब्द तेव्हा साबा कडून कळला.
नंतर कमी झाल्या

तिसऱ्या महिन्यात पालथी पडायला लागली म्हणजे सुपरफास्ट प्रगती आहे! आम्ही वाटबघून बघून थकल्यावर आमची मुलं पालथी पडायला लागली होती Proud

घुटी विषयी थोडे , पण लिहिण्या अगोदर हा विषय वादग्रस्त आहे, मी दिली बाळाला फायदा दिसला म्हणून देत राहिले. नवरयाच विरोध होता. बरेच डॉक especially ऍलोपॅथी रेकमेंड करत नाहीत , पण या गोष्टी जरा ट्रॅडीशनल आहेत. घुटीमध्ये २ प्रकार आहेत
१. गोळी : हि आयुर्विदिक दुकानामध्ये मिळाले , कंपनी आठवत नाही . माझे मत असे आहे कि हि शक्यतो वापरू नये कारण त्यात नेमके काय घटक याची माहिती नसते . (जरी त्या गोळीच्या कव्हर घटक लिहिले असेल तरीही, माझी एक मैत्रीण हि वापयरची ) .

२. घुटीचे घटक : मी नासिक हुन मुंबईला जाताना नासिक च्या दगडुतेली कडून (हे आयुर्वेदिक वस्तू मिळतात , नासिककारांना माहिती असेल, पुण्यात असाल तर खाली वाले वैद्य ) २ पाकीट घेतलेल्या यात एकूण १४ ते १७ सुटे घटक असतात . ( जेष्टमध, पिंपळी, वावडिंग, जायफळ अजून बरेच).
३. सर्वात प्रथम मी आणलेले घटक थोडे तव्यावर गरम करून घेतले किंवा भाजून घेतले कारण मी मुंबई पावसाळ्यात गेले आणि तिथे लगेच बुरशी चढते म्हणून . आता मी एक नवीन कोरी सहाण घेतली,आधी ती स्वछ धुवून घेतली ( इथे साबण वापरला) मग , २ वाट्या आणि १ चमचा हे सर्व धुवून घेतले.
४. एक मोठ्या पातेल्यात २ लिटर पाणी गरम कारण्यास ठेवले. पाणी खळखळ उकळू लागल्यावर गॅस मंद करून वाट्या चमचा सहाण , उकवळून घेतेले ३० मिनिटे. गॅस बंध करून थंड होऊ दिले, माझे हात ५ मि साबणे स्वच धुतले. पाव वाटी दूध घेतले ( तापवून गार झालेले)

५ . आता सहाणेवर थेंबाभर दूध टाकून क्लॉक wise एक वेढा ( राऊंड ) , असे १४ घटकां चे १४ राऊंड्स प्रत्येक राऊंड मागे १ थेम्ब दूध टाकले, कोणी इथे पाणी पण घेतात. यात बदाम आणि खारीक महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे त्याचे जास्त वेढे , खारकेचे पण . बदाम आणि खारीक हे मी पाकिटातले न वापरता वेगळे घेतले ( बदाम अमेरिकन अल्मोन्ड आणि खारीक काळी आणि कडक )
६. हे १४ घटक एकावर एक उगाळायचे . मग वाटीत काढून मंद गॅस वर १ मि गरम करायचे. मग थंड करून बाळाला द्यायचे .
७. हे सर्व बाळाला ४० दिवसाने चालू करू शकतात. पहिल्यादा १/२वेढे - १ आठवडा , १ वेढा २ आठवडे , असे करून वाढवू शकता . हे घुटी ६ महिने पर्यंत २ वेळा ( सकाळी अंघोळ झाल्यावर, आणि रात्री झोपण्या आधी, ज्यात जायफळ वेढे थोडे जास्त म्हणजे १ ऐवजी २ वेढे द्यायचे).

८. ६ महिन्याने १ वेळ द्यायचे . मग एक वर्ष्या पर्यंत फक्त खारीक आणि बदाम.

९. उन्हाला असेल तर पिंपळी वगैरे द्यायचे नाही उष्ण पडते.

हुश्श ... मी सर्व करत होते २ वर्षे पर्यंत . बरीच पेंडी ने घाबरवले कि बाळाला जुलाब होतील वगैरे पण मी ठाम होते. आजून एक नखे मात्र वाढुवु नयेत आईची . घुटी दिल्यावर परत सर्व घटक फॅन खाली सुकवले मग डब्यात भरून फ्रिजात ठेवले

घुटी लहान बाळाला देतात कारण पोट नीट रहावे. आहार पचावा. एकुणच आजुबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेता यावे.

मी महिनाभर दिली तिला, नंतर गॅसेस चा त्रास होऊ लागला. गुटी बंद करताच तो त्रास बंद झाला
मग दिली नाही

टीप: hygine व्यवस्थित पाळले होते

अश्विनी, विनिता ताई थँक्स

इकडे विचारल्यावर मम्माला पण विचारले तर तिने सांगितले की इकडे जे आयुर्वेदिक औषधांचे दुकान आहे त्यांच्याकडे घुटीचे सगळे साहित्य मिळते, तिने आधीच विचारून ठेवले आहे

वर सगळ्यांनी छान लिहिले आहे. मी फळं सुद्धा लवकर सुरू केली होती.
केळं, चिकू, पपई कुस्करून, सफरचंद आणि पेरू मिक्सरमधून काढून.
आता सगळं मऊ, पातळ द्या. ९-१० महिन्यानंतर इडली, डोस, धिरडी, पोळ्या वगैरे दिलं की मुलं आपोआप चावायला शिकतात.
तसंच आमच्या पेडीनी शक्या असेल तर बाळांसाठीची खुर्ची/ कार सीट /कॅरी चेअर घ्यायला संगीतले होते. ते शक्य नसेल तर बाळाला खायला घालताना बसवून / थोडे तिरके करून भरवा असे सांगितले होते. मी ही खुर्ची घेतली.
https://fstcry.in/PwfSYv4eWYCHJRNa8
माझं बाळ लवकर मान धरायला लागलं त्यामुळे मी यात बसवायचे. वरचं अन्न सुरू झाल्यावर या खुर्चीचा फार फायदा झाला.

गुटी नसेल तर ओव्याचा शेक पण छान काम करतो
तव्यावर रुमालात ओवा पुरचुंडी करून तापवून सुरुवातीला आपल्या तळहातावर थोडं गार कायुन मग बाळाच्या बेंबीजवळ शेक.

हे वर बाळाची मान धरणे वाचून आठवले, बाळाने मान लवकर धरण्यासाठी आईने बकऱ्याची मुंडी, पाय शिजवून खायचे, त्यांचा सूप प्यायचा, म्हणजे आईच्या दुधातून बाळाला आवश्यक ती सत्वे मिळतात.

खरंच खूप खूप thanks सगळ्यांना. सगळेच सल्ले अनुभवातून आलेले आहेत त्यामुळे जास्त उपयुक्त आहेत. व्हराईटी आहे. त्यात आमचं पिल्लू कुठे बसतंय बघते. तिची भुक जास्त आहे. परवा दसर्याच्या मुहुर्तावर उष्टावळ केली. मोजून ५ चमचे भाताची पेज(पूर्ण पाणी) दिली. पचली. काही त्रास झाला नाही. म्हणून ट्राय करायचं म्हणतेय लवकर.

बाळाचं नाव 'शुभ्रा' आहे बरं का. (बबड्यावाली नव्हे हं)

मुली खाऊ घातलेले सगळे पचवतात, मुले त्रास देतात असे ऐकलेले.
आईने पापड वगैरे खाल्ले की बाळाचे पोट दुखते म्हणे, पण माझ्या मुलाने कधीच त्रास दिला नाही.

बाळासाठी आरारुटची पेज/कांजी कशी करावी? लूज मोशन्स लागलेत तिला. Admit करावं लागलंय. सलाइन चालू आहे. पण इतर काही खात असेल तर द्या असं डॉक्टर म्हणालेत. तांदळाची भरडी आहेच पण सोबत आरारुटची कांजी द्या, पचायला हलकी असते म्हटलेत. कशी बनवायची माहिती नाही. Plz help.

मी कधी केली नाहीये पण
https://youtu.be/DWfxrNfSZCA
इथे एक रेसिपी दिसतेय चिन्मयी.

चमचाभर आरारूट पावडर तीनचार चमचे पाण्यात मिसळून घेतली आहे. मग ग्लासभर पाणी उकळून त्यात चिमूटभर साखर आणि मीठ (हे खास डायरियासाठी आहे असं म्हटलं आहे) घालून आरारूट पावडर मिसळलेलं पाणी घालून नीट ढवळून पाच मिनिटं उकळलंय.

आरारूटची पावडरच मिळते जर भारतात असाल तर. परदेशात माहित नाही. ती तुम्ही भरड जशी शिजवता तशीच शिजवून देतात. बाळाला शुभेच्छा. लवकर बरे वाटो. Happy

आरारुटची कांजी रेसिपी नाही माहिती. दुसरे काही चालणार असेल तर --
डाळिंबाचा रस, बेलाचे सरबत / बेलफळ मुरांबा पाण्यात विरघळवून, लिंबू सरबत
कफ सर्दी प्रवृती नसेल तर संत्र्याचा रस, ताजे आंबट नसलेले ताक पातळ करून
मूगडाळ शिजवून त्याचे फक्त वरचे पाणी साखर मीठ चिमूटभर बारीक जिरेपूड घालून उकळायचे. ते निवल्यावर.

कुठे विचारावे कळेना म्हणून या धाग्यावर विचारते.

माझे बाळ दोन महिन्याचे आहे अन गेल्या दोन तीन दिवसांत त्याने दोनदा उलटी केली. असे आधी कधीच झाले नाही, दोन्ही वेळेला दूध पिताना उलटी केली अन थोडी शी सुद्धा . दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदा उलटी केली ती खूप मोठी होती अन दह्यासारखी होती तर काल मध्यरात्री केली ती सुद्धा बऱ्यापैकी मोठी होती अन पातळ दुधासारखी होती.
सध्या आम्ही गावी आहोत इकडे बाळांचे डॉक्टर जवळपास नाहीयेत अन सासू सासऱ्यांचे मते हे नॉर्मल आहे . पण मला भिती वाटते उगाच काही त्रास असेल त्याला तर दुर्लक्ष होऊ नये वाटते. दोन्ही उलट्यानंतर तो रडला नाही , नॉर्मल असतो. सा बा च्या मते आता त्याला अश्या उलट्या करायची सवय लागेल असेच होते म्हणे.
मलाच कळत नाही काय करावे? बाळाला काही त्रास असेल का? कुणाला असा काही अनुभव आहे का? असेल तर प्लिज सांगा.

अजून एक म्हणजे, एक महिन्याचा झाल्यापासून तो झोपेत शी सु करत नाही. उठल्यावर, पूर्ण जागे झाल्यावर करतो पण गेले दोन दिवस तो झोपेत शी करतोय.

नौटंकी, अपचन नाही म्हणतात घरचे कारण तो रडत नाही

अमा, ऑनलाईन कन्सलटेशन शक्य नाही कारण इकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे, माझ्या रूममध्ये येत नाही एक पेज डाउनलोड व्हायला दहा मिनिटे लागतात अन वरच्या मजल्यावर साबा जाऊ देत नाहीत म्हणे सीझर झाल्यावर किमान तीन चार महिने जिना चढायचा नाही

Pages