KUJBUJ
10 june 2008
नमस्कार वाचकहो,
कुजबुज आजकाल वेळेवर येत नाही. आणि येते तेव्हा आकार अतिशय लहान असतो अश्या तक्रारी काही वाचकांनी आमच्याकडे केल्या आहेत.
वाचकहो, कुजबुज नेहमीच नियमीत पणे प्रकाशीत केले जाते व त्याचा आकार देखील वाचकांना पचेल इतपत मोठा ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो पण हल्ली हितगुज वर पोस्ट केले की काही तांत्रिक कारणामुळे ते गहाळ होण्याचे प्रसंग वाढले आहेत (पहा चालू घडमोडी) त्या कारणामुळेच कुजबुजचे हे नियमित अंक गहाळ झाले असावे व वाचकांना मिळु शकले नसावे याची वाचकांनी नोंद घ्यावी.
हितगुजवर दर्जा विषयी लोक कायम जागरूक असतात. मग ते लेखन असो वा आंबे. मायबोलीवरील काही आंबा विक्रेते खराब झालेले आंबे ग्राहकांनी तक्रार करताच बदलून देतात. परंतू कुजबुज वाचकांना आम्ही सुरूवातीलाच सांगु इच्छितो की प्रस्तूत कुजबुज ताजी असतांनाच वाचून संपवावी, तसेच संपुर्ण कुजबुज अथवा कुजबुज मधील एखादा लिखाणाचा तुकडा सडका वाटला तरी त्या जागी दुसरा तुकडा अजिबात बदलून मिळणार नाही.
****************************************
(विंदांची क्षमा मागून)
स्थळ : महाजालातील हितगुज वाडा
वेळ : रात्रीचे बारा
किर्र रात्री सुन्न रानी, हितगुजची भुतावळ गाते गाणी
भुतांचे पाऊल उलटे पडे, कुणी भेसूर आवाजात रडे
आला आला मास्तुरे याच्या मनात काळेबेरे
पूनम दिसताच धावत येतो कथा वाचून शाप देतो
सदा सर्वदा खाऊन खार, एकट्या बाईच्या मागे फार
रागवायला येताच Admin साहेब, मात्र होतो लगेच गायब.
आला आला टोणगा जिकडे तिकडे करतो दंगा
कुणी त्याला म्हणे द्वाड, तर कुणी करे हाड हाड
चर्चेची त्याला चढते झिंग, लगेच टाकतो मताची पिन्क
जात्याच वाटतो मोठा हूड कोण असेल याचे गूढ.
आला आला गडावरून एक लिम्बू भांडण करून
मधे मधे बोलायची खाज, याला नाही कसलीच लाज
म्हशींची पकडतो शेपटी आणि म्हणतो शेवटी
अगं अगं म्हशी मला कुठे नेशी.
आली आली हवाबाई, कुजबुजत सगळीकडे पाही
हितगुजभर घालते फेरी, पार्ल्यात जाऊन करते न्हेरी,
कुजबुज नावाचे करते किर्तन, संशयास्पद हिचे वर्तन.
तेच किर्तन ऐकण्यासाठी ही सगळी भुते आली
कुणी लागले चुकचुक करू, किर्तन आता झाले सुरू.
****************************************
ठळक बातम्या
हितगुजवर आजकाल न कळतील अशी टायटल्स कथेला, लेखाला द्यायची पद्धत रुजू होते आहे. शेवट पर्यन्त त्या संबन्धीचे गूढ लेखक्-लेखिका उलगडून सांगायची दखल घेत नाहीत. बागूल कथेत ईतर न उलगडलेल्या गूढ गोष्टींसोबत बागूल हे नाव का याचेही गूढ उकलत नाही. खटाटोप असे नाव असलेला फोटो निव्वळ फुलांचा निघतो. वर मोबाईलने फोटो काढला म्हणून खटाटोप असे काहीच्या काही सांगितले जाते. मिकी माऊस, उनो आणि एक संध्याकाळ या वृत्तांत लेखनात लेखिका मृण्मयी यांनी एका संध्याकाळी उनो या ठिकाणी GTG केल्याचा वृत्तांत लिहिला आहे. पण मिकी माऊस तिथे भेटलेल्या कुणाला उद्देशून म्हटले आहे हे त्या शेवट पर्यंत सांगत नाहीत. हितगुजवरील मोकळ्या वातावरणाशी हे गूढ वातावरण विसंगत आहे तेव्हा मॉडरेटर यांच्या कडून योग्य ती कारवाई अपेक्षीत आहे.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने सध्य फुलांची टंचाई निर्माण झाल्याने छायाचित्रकारांनी आपला मोर्चा आता सुर्योदय आणि सुर्यास्ताकडे वळवला आहे. दररोज इतकी सुर्यास्ताची चित्रे बघून त्या विभागात जायचा हितगुजकरांचा उत्साह ' मावळू ' लागेल याची संबन्धीत छायाचित्रकार दखल घेतील काय?
****************************************
रेडिओ मिरची (नाकाला झोंबणारी)
सकाळी ७ वाजता पासून दुपारी १२ पर्यंत आंबा स्पेशल कार्यक्रम
सकाळी ७ वाजता : सर्वप्रथम समस्त हितगुजकरान कडून अंबाबाईची
आरती.
सकाळी ८ वाजता : लालूताई राजकारणे यांचे गायन
कविता :
आंबा (अती) पिकतो
रस गळतो,
ईलीनॉयचा राजा
झिम्मा खेळतो.
सकाळी ९ वाजता : गायनाला जोडून चर्चा : हापूस आंबा सडण्याचे root cause analysis .
सकाळी १० वाजता : प्रसिद्ध वृक्ष प्रेमी दिनेशदा हे magnifera indica म्हणजेच आंब्याच्या झाडा बद्दल रसाळ माहिती देतील.
सकाळी ११ वाजता : आंब्याच्या विवीध देशी पाककृतींचा कार्यक्रम सादरकर्ते आहेत " श्रीयुत. बी " . आंबील, आंबट वरण आणि आंबेमोहोराचा पुलाव ह्या पाककृतींची ते यात माहिती देतील.
आंबा स्पेशल कार्यक्रम समाप्त.
पुढील कार्यक्रम
दुपारी १२ वाजता : अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रम : हितगुजवरील लिंबुटिंबू महाराज यांनी नुकतेच जाहीर केले कि (अज्जुका यांची कथा वाचून) अंगात देवी आल्याचा आपल्याला साक्षात्कार झाला आहे. लिंबुटिंबू महाराज यांची अखंड बडबड देवी अंगात आल्यामुळे नसल्याचे सिद्ध करतील एसजीरोड वरील एक " श्रद्धाळू " मायबोलीकर.
दुपारी २ वाजता : कलादर्शन अंतर्गत गोधडी शिवण्याचा कार्यक्रम. निरनिराळी छायाचित्रे घेऊन त्याची तुकड्या तुकड्यांची डिज़ीटल गोधडी शिवून दाखवतील श्री. परागकण.
दुपरी ४ वाजता : अज्जुका यांच्या माझा मर्यादित शब्दकोश या कवितेची समिक्षा करतील हितगुजवरील थोर टिकाकार झक्की नागपुरी. अज्जुका यांच्या शब्दकोशात उथळ पांचट आणि घृणा इतके तीनच शब्द आहेत हे आपण वर्षानुवर्षे सांगत होतो आणि आता अज्जुका यांनी स्वतहाच ते कवितेच्या माध्यमातून कबूल केले आहे अशी टिका त्यांनी (फक्त कवितेचे नाव वाचून) केल्याचे समजते. (आता बहुदा अज्जुका आपल्या कथां प्रमाणेच कवितांचे नाव सुद्धा कविता पोस्ट केल्या नंतर देतील असे वाटते)
संध्या ७ वाजता : आमची माती आमची माणसे : झाडांवर कलमे करून झाडांवर पुस्तके उगवता येऊ शकतील काय या आपल्या बहुमोल संशोधना बद्दल माहिती देतिल प्रख्यात विदुशी शोनूताई वाचासुंदर. तसेच आपले बागकाम कौशल्य वापरून पार्ले परिसराचे रुपान्तर बागराज्यात कसे केले याची माहिती देतील शोनूताई, असामी आणि बी.
रात्री ९ वाजता : समूह गुण्-गान : मायबोलीवरील सगळ्या कथा व कवितांविषयी गोड गोड शब्दात गुण गायचे काम करतील गुलमोहर वरील प्रतिक्रिया समितीचे सदस्य.
****************************************
" संवाद "
गेल्या काही दिवसात हितगुजवर घडलेले हे काही संवाद. तांत्रिक बिघाडामुळे हे संवाद देखील गहाळ झाल्याने हितगुजकरांना वाचायला मिळाले नाहीत त्यामुळे आम्ही ते कुजबुज मधे प्रकाशीत करीत आहोत.
संवाद क्रमांक १
" परवा किनई सुपरमार्केट मधे कुसकुस मेली कुठे दिसलीच नाही. ग़्रेन्स मधे शोध शोध शोधली पण कुठ्ठे म्हणून कुठ्ठे नाहीच!
इश्श्य! कुसकुस म्हन्जे पास्त्याच्या प्रकारात बघायचे की सहज मिळाले अस्ते!!
छे! कुसकुस म्हणजे cracked wheat बरं. ग़्रेन्स मधेच बघायला हवे. पास्ता म्हणजे का कुठे धान्य अस्ते.
कायत्तर्रीच!! कुसकुस म्हणजे पास्ताच. आणि पास्ता धान्य असते असे कुठे म्हटलय मी? उगीच उचलली जीभ अन् लावली टाळ्याला!
आहारे, दिसली हो तुझ्या टाळूत भर्लेली अक्कल... कुसकुस म्हन्जे क्रॅक्ड व्हीटच!! चोराच्या मनात चांदणं!!
टाळू आणि टाळ्याचा का ही संबन्ध नाही बर्का!! आणि चुकिच्या म्हणी वापरून फ़ुशारुन जायला हा काहि PP चा BB नाही म्हटलं!कुसकुस म्हणजे पास्ताच. ही पहा लिन्क.....
हूं! रोज फक्तं तेव्हडा एकच पास्ता खातेस वाटतं म्हणून अग्दी टेचात सांगते आहेस ते.
मी रोज काय काय खाते ते बघायची एवढी हौस असेल तर पार्ल्यात येऊन पहा एक्दा म्हण्जे कळेल काय मेन्यु असतात एकाहून एक!!
माहीत आहे तुमचं पार्लं. मेन्यु कमी आणि तोन्डी लावायला नकला जास्त! खर्र्या सकस गोष्टी पहायच्या असतील तर आमच्या पाककलेच्या ठिकाणी येत जा.
काही नको! तुझ्या सारखे सुगरण लोक असतील तिकडे तर कल्याणच व्हायचे माझे! त्या पेक्षा मी बरी आणि माझा पास्ता बरा!!
किती मेले ते पास्त्याचे कौतूक! आम्च्या कोकणात माझी आज्जी नुस्त्या शेवयांचे शंभर पदार्थ करत असे. तुझ्या पास्त्याला काय सर येणार त्याची!!
करत असेल आजी...तुला येतय का पण?!
हो येतात की.. करतानाचे फोटो दाखवीन हवे तर!
बघितले हो बघितले ते फोटो...केस मोकळे सोडून स्वैपाक कर्तान्नाचे.. स्वैपाक कर्तान्ना केस बांधुन वर टोपी घातली पाहिजे हा दिनेशदांचा उपदेश नसेलच माहिती तुला.
आहेत केस लांब म्हणून दाखवते!! तुला नाहियेत म्हनुन जळतेस होय.
हो का बघु बघु ते लांब केस (झिंज्या धरुन ओढते)
अयाई गं... मेले मेले! "
****************************************
संवाद क्रमांक २
तुम्हाला म्हणून सांगते हो वैनी अहो पिम्पल्स येणार नाहीत तर काय होणार. मेली इतकी टेन्शन्स सतत डोक्याला! रूममेट्स नेहमीच वैतागवाण्या भेटतात. ऑफिसात कलीग्स अज्जिब्बात कोऑपरेट करत नाहीत. सगळी कामं मेली मीच मर्मर राबून करतेय, कुणी ऐकेल तर शप्पथ! ती मंजू म्हणत होती जायफळ लाव म्हणून, पण म्हटलं नको उगीच जळजळायचं...मग कुणि सुचवलं हळद लाव पण म्हटलं नको उगीच हुळहुळायचं...मग आणखी एकीने सुचवलं फळांचा गर लाव...ते नुसतं ऐकूनच गरगरायला झालं हो. म्हणून तिला विचारायला गेले की तुला काही उपाय माहित असतील तर सांग...तर म्हणे " लोणची खात असशील ती कमी कर.. VLCC मधे जा! " कुणाचे खाणे असे काढतात का कधी वैनी तुम्हीच सांगा? आणि VLCC मधे जाण्या एव्हडी जाड झालेय का मी? ऊगीच मेला सर्वां समोर उठ सुठ अपमान करायचा!!
थोडा जिवाला विरन्गुळा मिळावा म्हणून हितगुज क्लब जॉईन केला मी तर जिथे तिथे नियमांची भेन्डोळी फेकते की बया. जणु काही सेन्सॉर बोर्डाची अध्यक्षाच लागून गेली आहे!
पर्वा मी नुस्तं म्हटलं, बस मधे एक जण शेजारी येऊन बसतो त्याच्या अंगाला फार वास येतो.. मी काय करू? तर सर्वांनी कीव करत मला एकेक सल्ले दिले. कुणी म्हणे त्याला डिओ दे कुणी म्हणे सीट बदल. त्या आरती आवटी म्हणाल्या तो जवळ आला की प्राणायाम सुरू कर. मेला त्यांना जिकडे तिकडे तो प्राणायामच दिसतो. कधिही काही विचारलं तरी प्राणायामच करायला सुचवतात. पण ते जाऊदे तर काय सांगत होते... हां इतकं सर्वांनी काय काय सुचवलं पण हिला विचारताच माझ्याच अंगाला वास येत असल्या सारखी केव्ढ्यांदा ईईईईई करत ओरडली मेली. सगळे वळून वळून माझ्याकडे बघायला लागले. आता तुम्हीच सांगा शोभतं का हे असं वागणं? जुन्या मेम्बेर्सनी कसे वागावे याच्या नियमावलीची माहिती नाही वाटतं बयेला!
****************************************
संवाद क्रमांक ३
" हे काय आज तुमच्या भागात अगदीच शुकशुकाट दिसतोय.
हो वीकेन्ड ला ए वे ए ठि झाले ना इकडच्यांचे.
तेच तर आम्ही कधीची वृत्तांताची वाट बघतोय. खाउन खाउन इतके सुस्तावले का की आता उठवत पण नाहीये.
तर काय. इतके पदार्थ होते खायला..
खी खी खी म्हणजे पोटे बिघडली म्हणायची, म्हणून कुणी इकडे फिरकत नाहीये.
काही नाही हो! पोटे बिघडायला काय झाले तुमचीच पोटे दुखत असतील आमच्या इतक्या सुन्दर ए वे ए ठि च्या गप्पा वाचून.
शीऽऽऽ... कायतरी बाई गोड गैरसमज. तुमच्या त्या GTG वरच्या गप्पा म्हणजे गुलमोहरातले साहित्य वाटले का, की लोक चवीने वाचतील. असंबद्ध बडबड नुस्ती आणि आमच्या कशाला पोटात दुखेल आमची तर सतत सुरू असतात GTG . आता लवकरच दरवर्षी प्रमाणे वर्षा विहार सुद्धा करू.
हो हो माहीत आहे तो वर्षा विहार. किती ते शिस्तबद्ध कार्यक्रम आणि नुस्ते विविध कला गुणदर्शन!!
पोट फुटेस्तवर हादाडून नुस्त्या ईतरांच्या कुचाळक्या करण्यापेक्षा बरे.
असेल असेल.. पण निदान आमच्या GTG मधे भांडणे तरी नाही होत तुमच्या इथल्या सारखी... ही ही ही.
उगीच मागचे उकरून काढू नकोस हां सांगून ठेवतेय!!
वा गं वा!! महाराणी लागून गेली मोठी. काय घाबरत नाही मी तुला. खरं तेच बोलतेय.
तोन्ड सांभाळून बोल भवाने... नाहीतर...
नाहीतर काय?...काय करशील गं टवळे??
काय करीन म्हणून विचारतेस? केलं म्हणजे समजेल.
हो का पण करशील काय ते तर सांग...
चांगले चार धट्टे कट्टे मित्र बोलवीन माझे.... आणि...
आणि काय?
आणि अनुल्लेख करायला लागीन तुझा!!! "
*****************************************
हा हा...
हा हा... हवे... लोल...
unedited version
unedited version पेक्षा हे जास्ती जमलेय ग
हवे, आता ये
हवे, आता ये तू पार्ल्यात मेनू टाकायला, मग बघतेच तुला ! अनुल्लेखेश्वर! अनुल्लेखेश्वर!!
ही ही ही ...
ही ही ही ...
ठळक
***
असेच काही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा
देता घेता त्यात मिसळला
गंध मनातील त्याहून हिरवा
- इंदिरा
>>समूह
>>समूह गुण्-गान

>>खटाटोप असे नाव असलेला फोटो निव्वळ फुलांचा निघतो.
>>पण मिकी माऊस तिथे भेटलेल्या कुणाला उद्देशून म्हटले आहे हे त्या शेवट पर्यंत सांगत नाहीत.
हवाबाई, हितगुजवाडा असाच गाजत राहु दे!
हह,
हह, मस्त!
आता पुढचे अंक गहाळ न होता नियमितपणे येऊ देत.
हवे, एकदम
हवे, एकदम जबरी कुजबुज...
ठळक बातम्यांमध्ये केलेल्या आरोपाची दखल ह्या छायचित्रकाराने घेतलेली आहे....
==================
मन उधाण वार्याचे
:
:D:
ह. ह. ,हसून
ह. ह. ,हसून हसून मरायला टेकले गं!
रात्री ९
रात्री ९ वाजता : समूह गुण्-गान : मायबोलीवरील सगळ्या कथा व कवितांविषयी गोड गोड शब्दात गुण गायचे काम करतील गुलमोहर वरील प्रतिक्रिया समितीचे सदस्य.
हे तर जबरीच शालजोडीतले हाणलेय...
(No subject)
खरे तर
खरे तर दुर्लक्षच करणार होते कारण अश्या हीन लिखाणाला कुठलाही प्रतीसाद द्यायची इच्छा नाही. पण काय आहे ना काळ सोकावतो हा प्रकार असल्याने लिहितेय.
ह्यावेळची ही कुजबुज वाचून पण अतीशय पात्रता नसलेले लिखाण विनोद म्हणून खपवून कशाला घ्या?
हा जो प्रकार आहे ना 'कुजबुज' म्हणजे अतीशय हीन प्रकाराचे लिखाण असून ते विनोदी म्हणून खपवणे असेच आहे.
विनोद-निर्मीती करताना ओढाताण कशी होते जेव्हा 'ती विनोदनिर्मीती' मुळात कमीच असते ना त्याचे उदाहरण आहे हे. सुरवातीच्या बर्या असायच्या पण आता तर चक्क हीडीस वळण आहे आणि ते लोकांनी विनोदी म्हणून चालवून घ्या ही अपेक्षा नाहीतर तुम्हाला विनोद कमीच कळतो असा ओरडाओरड.
कोणाची तारीफ करा असे कोणी म्हणत नाही किंवा केली नाही म्हणून ही post नाही पण अगदी त्याच त्याच व्यक्तीना नेहमी नेहमी हेरून आपली अक्कल दाखवणे बंद केले तर बरे होईल. नाहीतर सदानकदा टवाळी करणारी ही हवाहवाई id नको ते अधिकार दीले गेले असल्याने त्याचा गैर वापरच करत आहे. कोणी अधीकार दिले शेवटी तुम्हाला? निव्वळ admin समीती मध्ये आहे नी चार टाळकी वा वा करणारी आहेत म्हणून काहीही लिहायचे असेच का?
ते कसे पूनम ह्या id ने कथा लिहिली की कोणी एक मस्तुरे आपली जळजळ दाखवून देतो नी भडास काढतो तसेच इथे दिसते. एवढीच जर गरज असेल ना तर समोर येवून वार करावे तेव्हाच त्या त्या postला. अश्या 'कुजबुज बुजबुज च्या नावाखाली कशाला लिहा? नाहीतर 'अनुल्लेख series' म्हणून द्या नाव. तेवढच लिहिणार्याच्या जीवाला शांती नी आवड पुर्ण होइल अन्नुलेखाने लिहिण्याची.
लिहायचे असेलच ना चांगले नी निखळ विनोदनिर्मीती हवी असेल तर जरा विचार करावा लिहिण्याआधी. स्वत गरळ ओकायची नी वाद सुरु करायचा काहीही कारण नसताना नी रंगीबेरंगी वर पानेच्या पाने लिहायचे की मायबोलीवरील वातावरण दुषित झाले आहे नी निखळ राहीले नाही पुर्वीसारखे असे ओरडायचे.
अश्याच एका idला(गरज पडली तर idचे नाव सांगेनच नाहीतर वरती लिहिलेल्या प्रतीक्रीयेमधून कळेलच कोण ती id) वात्रट चाळा लागला होता/आहे की माझी कुठलीही post दिसली की काहीही कारण नसताना वात्रट लिहायचे ने एकदा काय वाटले म्हणून तेवढ्याच निर्लज्जपणे माफी मागायचा प्रयत्न केला होता ते ही private email करून्,एवढेच होते तर जाहीरच माफी मागायची ना. पण फरक तर काहीच नाही वागण्यात्; पुन्हा ते उगीच दात विचकणे, हेरून माझ्या post पकडून वात्रटपणे लिहिणे. म्हणोन म्हटले मी ही जरा एकदा तसेच वागून बघावे ह्या id शी तर बरीच मिरची झोंबलेली दिसते.
मला माहीती आहे की ह्या post लेखीकेला निव्वळ खाद्य मिळेल किंवा इतर वात्रट idना पण त्याच्याकडून दुसरी काय अपेक्षा केली जावू शकते?
त्यामुळे कुठलीही प्रतीक्रीया आली तरी मला काहीही फरक पडत नाही.
lastly माझी ही post ह्या वरील लिखाणास आहे नी त्या लेखकास तेव्हा उगीच कोणी मध्येच घूसून नको तो वाद सुरु करु नये.
तूफान हसलो
तूफान हसलो (कुजबूज वाचून)
अंक गहाळ होणे, फुलांची टंचाई, विंदांच्या कवितेची "हितगुज" आवृत्ती (मूळ कविता मी वाचलेली नाही तरीही), टायटल्स वगैरे सर्व धमाल! सर्वच कळाले नाही पण निदान मी जे जे बीबी बर्याच वेळा वाचले त्यावर असलेल्या लेटेस्ट गोष्टी जबरी पकडल्या आहेत.
>>तूफान
>>तूफान हसलो (कुजबूज वाचून)
फारेन्ड.
छानच
छानच लिहीलय
हा अंक
हा अंक हितगुजवर चाललेल्या अनेक "चालू घटनांबद्दल" आहे... त्यातल्या बर्याच गोष्टी माहीत नसल्याने मला रिलेट करता येत नाहीये. हा.. एक नक्की... 'समुह गुण-गान'शी करता येतय. मी कदाचित त्यातली एक म्हणायचं असेल (किंवा नसेलही)
टण्या म्हणतोय तसा हा 'शालजोडीतला' असेल, तर नक्की पावला
हवा-हवाई, विनोदाची स्टाईल आवडलीच आणि अंकाची मांडणीही. (पुन्हा समुह-गुणगान!.... आदतसे मजबूर आहे. एखादी गोष्टं आवडली तर आवर्जून दाद जाते. न आवडलेल्या गोष्टीबद्दल सांगताना 'का आवडलं नाहीये' याचा विचार करावा लागतो... तितका वेळ नसल्यास, सांगत नाही! इतकं सोप्पं!)
ह. ह. चांगला
ह. ह. चांगला जमलाय. विशेषतः आंबे विशेषांक. फारेड
मस्तच..
मस्तच.. एकदम ठणठणपाळ ईष्टाईल..
हा हा हा हा
हा हा हा हा हा! मस्तच!!
सहीये!
सहीये!
>>>तूफान
>>>तूफान हसलो (कुजबूज वाचून)... :हाहा::D हा खल्लास तलम होता !!
***
असेच काही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा
देता घेता त्यात मिसळला
गंध मनातील त्याहून हिरवा
- इंदिरा
रेडीओ
रेडीओ मिरची ठसक्यात एकदम ..... आंबा विशेष कार्यक्रमही जबरी एकदम!!
तूफान हसलो
तूफान हसलो (कुजबूज वाचून) >> Sorry हवे, But this takes the cake !!!
>>>तूफान
>>>तूफान हसलो (कुजबूज वाचून).

आयला, फारेंडा.. सरकारी ट्युब, उशीरा पेटली.. जबर्या...
एकदमच
एकदमच खुसखुशीत लिहिले आहे. गम्मत आली वाचुन. तेव्हढं अवटी चे आवटी करा
प्रतिक्रि
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद मंडळी.
मनुस्विनीला स्पेशल धन्यवाद. वेगळी आणि स्पष्ट प्रतिक्रिया दिल्याबद्दल.
>>> चांगले
>>> चांगले चार धट्टे कट्टे मित्र बोलवीन माझे.... आणि...

आणि काय?
आणि अनुल्लेख करायला लागीन तुझा!!! "
.
फारेंड,
मजा आली ,
मजा आली , बेश.
खिखिखिखि ...
खिखिखिखि ... जबरदस्त...
फारेंड
-प्रिन्सेस...
Pages