महीन्यातला तो weekend..

Submitted by तनु... on 25 January, 2011 - 07:53

* रंगीबेरंगी मधील आई वरच लिखाण वाचल आणि मला ही काही लिहावस वाटल जे मी अनुभवतीय.
मी सध्या नोकरी साठी पुण्यात आहे पण मी पहील्यानदाच आई-बाबाना सोडुन एकट राहतिय ... त्या (आई नावाचं अजब रसायन) लेखातील काही ओळी repeat होतील , पण तो लेख हीच माझी प्रेरणा आहे त्यामुळे hope की पुनम जी मला माफ करतील.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुण्याहुन मध्यरात्री निघालं की मिरजेला पहाटे ४- ४:३० ला गाडी पोहोचते, पण एवढी पहाट असुनही मी मात्र निवान्त असते , कारण स्टॉपवर बाबा न्यायला हजर असणार याची खात्री. घरी गेल्यावर आईच दार उघडणार हेहि माहीतिच.
घरी गेल्या गेल्या तीचा ठरलेला प्रश्न 'झोप नीट लागली का ग गाडीत?' . दरवेळी घरी गेलं की ती मला वरुन खाल पर्यंत नीट बघते आणि मग तीचं चालु होतं अग केस कसे झालेत बघ , कीती दिवस झाले तेल लावलं नाहिस ??
अग बाई काळे कपडे कशाला घालतेस,१०० दा सांगते तुला..खात पित नाहीस ना नीट? किती वाळ्ळीयस ते ...(जगाच्या द्रुष्टीने मी गुट्गुटीत असले तरी) अशी ४-५ अंगवळीची वाक्यं कानावर पडली की तिला गप्प करायला मी तिच्या गळ्यात पडत म्हणते ," काय ग हे अम्मो ,जाउदेना " .. यावर तीचा आणि १ वार तयार असतो " हे अम्मो बीम्मो म्हणत जाउ नको बै , त्या उतरन मधली रडकुटी अम्मो आठवते " :D:D
पहाटे पहाटे बाबांच्या हातचा कपातुन बशीत सांडणारा चहा आणि ही अशी आलेल्या दिवसाची सुरवात झाली की कसं झक्कास वाट्टं. मग १-२ तासाची झोप काढुन मी त्या saturdayला good morning म्हणते.
सकाळ्च्या पारी माझ्या आणि आईच्या गप्पा चालु होतात. आईकडुन मिरजेच्या , नातेवाईकांन्च्या सगळ्यांच्या खबरबाती मी घेत असते. ती सुध्दा खुप interest नं मला सगळं सांगत असते. अश्यावेळी आम्ही मस्त frds बनुन long gossiping सुध्दा करतो Lol .
मी घरी आले की त्या दिवशीचं मेन्यु कार्ड काहि औरच. आदल्या दिवशी रात्रीच ईड्ली - वडाचं पीठ भिजवलेल आणि काहीतरी गोडाची डीश , त्यामुळे माझ्यापेक्शा माझे बाबाचं जास्त खुश असतात.
बाबा २ दिवस tv चं remote हसिखुशी माझ्या हवाली करतात आणि मी लावलेली कुठलीहि channels नावं ठेवत का होइना पण बघतात. घरी आणलेले bag भरुन कपडे मशिनला लावायच काम ते आपणहुनच स्वतःला assign करतात. माझी महीनाभर रखडलेली कामं कशी चुट्की सरशी पुर्ण होतात , mobile recharge करणे वगैरे वगैरे....
आई -बाबांच्या सोबतीत पुर्ण दिवस कसा संपतो तेच कळत नाहि. आणि मग मी ज्या वेळेची गेला महीनाभर वाट बघत अस्ते ती रात्र येते , आणि मला माझ्या आईच्या कुशीत झोपायला मिळतं. माझ्या ताया, बाबा सगळेच मला खुप हसतात , पण तिच्या कुशीतली ऊब अनुभवण्यासाठी मी महीनाभर कित्ती वाट बघते हे त्यान्ना काय माहित. आई म्हणते की मला लहानपणी तीचं पोट धरुन झोपल्याशिवाय झोप लागायची नाही , पण तिला हे माहितच नाही कि मी आजही मला तीच्या कुशीत imagine करते तेव्हाकुठे मला शांत झोप लागते.
रविवारची संध्याकाळ होउ लागते आणि मग माझा जीव खुप अस्वस्थ व्ह्यायला लागतो , काय हे आता फक्त काहीच तास राहीले , रात्री आपल्याला निघाव लागणार हे आठ्वुन जीव खुप कासावीस होतो. कसलेहि विचार मनात येतात , का जातोय आपण परत ,कशाला करायचाय तो जॉब , काय ठेवलय तिकडे ..... आणि मग आईची शिकवण , मला engineer करण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी केलेली धडपड सगळ आठवतं आणि परत जाण्याचं बळ येतं. मग मी मनाशी ठरवते कि आपण आपल्या कामात इतकं पुढं जायचं , इतकं काम करायचं की तिला आपला अभिमान वाटला पाहिजे.
रात्रीच्या गाडीने निघताना आई-बाबा दोघहि मला स्टेशन वर सोडायला येतात आणि गाडी सुटे पर्यंत आईची tape परत चालु होते . नीट खात जा , पैश्याची काळजी नको करु , रात्री लवकर रूम वर येत जा, उगाच कुठेहि भटकु नकोस , रोज फोन कर रूमवर आलीस कि, वगैरे वगैरे ...... प्रत्येक वाक्यागणिक मला तिची काळजी स्पष्ट दिसत असते मग आईचा हात हातात घेउन २ क्षण मी मुक नजरेने तीच्याकडे बघते ,त्याक्षणी तिचं मन अश्वस्त झाल्याचं जाणवतं. दोघीन्च्या डोळ्यांन्च्या कडा पाणावलेल्या असतात , पण चेहय्रावर हसु ठेवण्याचा अंमळ प्रयत्न चालु असतो. train चालु व्ह्यायच्या जेमतेम २ मिनिटे आधी बाबा धावपळ करत १ कप कॉफि आणुन देतात आणि कप हातात घेत १ घोट घेत असतानाच गाडी हललेली जाणवते. train च्या खिडकीतुन अजुनही आईचा १ हात हातातच असतो. मग कसाबसा हात सोडवत ती दोघे दिसेनासे होइ पर्यंत मी खिडकीतुन डोकाउन पाहत असते ..... कारण याच पुंजीवर मला आणि त्यांन्ना पुढचा महिना काढायचा असतो ...............

गुलमोहर: 

Happy

मस्त लिहिलय ! मलाही माझे इंजी. चे दिवस आठवले. त्यावेळी गावाकडे जाणारी एस टी जरी दिसली तरी डोळे ओले व्हायचे.

तनु.. अगदि छान लिहिलयस........
अगदी ख्ररंखुरं......आतून....
माझे hostel चे सुरूवातीचे दिवस आठवले.......
अर्थात आता ७ वर्षं मी hostel ला आहे पण घरी जाणं ही गोष्ट नेहमीच पर्वणी असते........being @ home is HEAVEN!!! Happy

रविवारची संध्याकाळ होउ लागते आणि मग माझा जीव खुप अस्वस्थ व्ह्यायला लागतो , काय हे आता फक्त काहीच तास राहीले , रात्री आपल्याला निघाव लागणार हे आठ्वुन जीव खुप कासावीस होतो. कसलेहि विचार मनात येतात , का जातोय आपण परत ,कशाला करायचाय तो जॉब , काय ठेवलय तिकडे ..... >>>>>>>> अगदी अगदी..... Happy

छान लिहीले आहे पुलेशु. काल २६ जानेवारीला माझ्या मुलीला शाळा होती तर मला दिवसभर करमले नाही.
तुम्ही मुलंच घराची रौनक.

धन्यवाद वर्षा_म , saakshi , अश्विनीमामी , juyee .... जे आहे ते जस च्या तस लिहिलं , नाहितर मला कुठलं सुचतय Happy

छान लिहिले आहे. १९७९ची आठवण ताजी केलीत माझी. अजुन एक.. घरात आपल्या हक्काच्या जागा असतात त्यांचा ताबा आता भावंडानी घेतलेला असतो उदा, कपाटाचा कप्पा,पुस्तके तेव्हा हरवल्या सारखं वाटतं.

**

एकदम आतून आलेलं... सहज अन म्हणूनच सुंदर. आपल्यातल्या अनेकांचा हा अनुभव आहे... कदाचित नेहमीचाच. म्हणूनच मनाच्या आतल्या खोलीत कुठेतरीच बसलेला...
तरीही असा शब्दांत मांडल्यावर किती सहज, चटकन रिलेट होतोय आपण...
तनू, आवडलाच लेख.
(तनू, अजूनही हा लेख तू निर्दोष करू शकतेस. अजून काही परिच्छेद, इंग्रजी चं मराठीत वगैरे... कंटाळवाणं काम आहे... पण इतका छान लेख अगदी इतक्या क्षुल्लक डागाळलेला कशाला, म्हणते मी?)

मी इंजिनियरिंग संपल्यावर अगदी पहिल्यांदा ट्रेनिंगला गेलेले, ते दिवस आठवले. वडील ट्रेन्/बस चालु झाली कि चार पाच पावलं ,चालत पुढं यायचे. इतका वेळ आवरुन ठेवलेले डोळे ओघळायला लागायचेच मगं. कशाला ते शिक्षण घेतल अस वाटायच . Sad असो. आपल्याला मुलं झाली कि च आईवडीलांची खरी किंमत कळायला लागते हे आडो ने लिहिलय ते अगदी खर आहे.

आशुतोष०७११ ,सुनिल जोग ,बकासुर ,दाद ,सीमा ,रुणुझुणू धन्यवाद सगळ्यांना....
@सुनिल जोग : मला तरी असा अनुभव नाहिये , कारण घरातलं धाकटं अपत्य आम्हीच Happy
@ दाद : अगं तुझी (अगं तुगं चालेल ना?) दाद मिळाल्यामुळे मी हवेतच आहे , लेख निर्दोष करण्याचा प्रयत्न करते..