राष्ट्रभाषा??

Submitted by मुरारी on 25 January, 2011 - 01:31

काल हापिसात आमच्या ग्रुप मध्ये आपली राष्ट्रभाषा कुठली यावरून वाद चालला होता
लहानपणापासून शाळेत आपल्याला हिंदी हि आपली राष्ट्रभाषा आहे असे बिंबवले गेले होते
आत्ता पर्यंत पण माझे हेच मत होते, पण जेव्हा गुगलून पहिले तेव्हा धक्कादायक माहिती बघण्यात आली

भारतीय कायदा आणि घटनेत कुठेही हिंदी हि आपली राष्ट्रभाषा आहे असे म्हटलेले नाही

कायद्यात अशी नोंद मात्र आढळली
( Article 354 specifies that the legislature of a State may by law adopt any one or more of the languages in use in the State or Hindi as the Language or Languages to be used for all or any of the official purposes of that State.[3] Section 8 of The Official Languages Act of 1963 (as amended in 1967) empowers the Union Government to make rules regarding the languages which may be used for the official purposes of the Union, for transaction of business in Parliament, and for communication between the Union Government and the states.[4] Section 3 of G.S.R. 1053, titled "Rules, 1976 (As Amended, 1987)" specifies that communications from a Central (Union) Government office to a State or a Union Territory in shall, save in exceptional cases (Region "A") or shall ordinarily (Region "B"), be in Hindi, and if any communication is issued to any of them in English it shall be accompanied by a Hindi translation thereof.)

हि लिंक सुद्धा बघा

http://en.wikipedia.org/wiki/Languages_with_official_status_in_India

जर असे असेल तर आपण हिंदी ला एवढे महत्व का देतो?
बहुतांश दक्षिण भारतात या भाषेचा गंध हि नाही , मग तिकडचे सरकारी कागदपत्र कुठल्या भाषेत असतात?
गुजरात सरकारने तर हे अधिकृतरीत्या जाहीर केलेलं आहे कि हिंदी हि राष्ट्रभाषा नाही (http://timesofindia.indiatimes.com/india/Theres-no-national-language-in-... ) मग प्रत्येक राज्य असं जाहीर करू शकतं का?
त्यामुळे आता भारत सरकारने हिंदी हि राष्ट्रभाषा अधिकृत रित्या जाहीर करावी का? (किंवा ती केली आहे का ? )

गुलमोहर: 

मग मोदीबुवा हिन्दीतून भाषण कसे करतात? काय आवश्यकता आहे. ? हिन्दी राष्त्रभाषा नाही हे तांत्रिक सत्य आहे. ती राजव्यवहाराची भाषा आहे त्याबाबत मायबोलीवर पुषकळ चर्वण झाले आहे माहीत गारानी ती लिंक इथे द्यावी म्हणजे पुढचा अनर्थ टळेल. नाहीतर नेहमीचेच वाजंत्री आपपली वाद्ये घेऊन इथे येतील आणि ठिय्या मांडतील....

हिन्दी ही भाषा भारतातल्या बर्‍याच भागात बोलली जाते. त्यातही मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश चा बराच भाग. उत्तर प्रदेशातील राजकारण्यांनी हिन्दी ही राष्ट्रभाषा आहे असा प्रचार सुरू केला होता. पण तसे नाही. बा.जो. म्हणतो त्याप्रमाणे इथे या गोष्टीवर बरीच चर्चा झालेली आहे आणि त्याचा सारांश हाच आहे की हिन्दी ही राष्ट्रभाषा नाही.

>>>नाहीतर नेहमीचेच वाजंत्री आपपली वाद्ये घेऊन इथे येतील आणि ठिय्या मांडतील....<<<

हॅ
हॅ
हॅ

खतरनाक प्रतिसाद..
असो, लीन्कांबद्दल धन्यु

व्यवहारात अनेक लोक ती भाषा वापरतात, हिंदी सिनेमे अनेक लोक बघतात, अनेकांनी हिंदी मान्य केली आहे. उदा. महाराष्ट्रातल्या पुण्या मुंबईच्या लोकांनी हिंदी भाषा स्वीकारली. त्यांना काय स्वभाषेचा अभिमान नाही? असेल अभिमान तर राडे करा, दंगली करा, पण भाषणे देताना हिंदीतलीच वाक्ये बोला. असे आपले नेते सांगतात.

म्हणून सगळीकडे हिंदी ऐकू येते. भाषा ही एक संभाषणाची सोय आहे.

राष्ट्रभाषा, राष्ट्रध्वज इ. गोष्टी वेगळ्या. या गोष्टींना प्रतिकापेक्षा जास्त किंमत भारतात नाही. इतर देशात आहे, पण भारतात नाही. तर काय करणार?

राष्ट्रभक्त असते, राष्ट्रध्वजाला किंमत असती, तर सरळ उठून, काश्मीरला जाऊन 'जीव गेला तरी बेहेत्तर, पण माझ्या देशाचा झेंडा उभारीन' असे म्हंटले असते आणि तसे केले असते. पण भारतात तसे होत नाही. होणार नाही. तसे केले तर दंगली होऊन निरपराध लोक मरतील म्हणून शहाणे नेते, जनतेचा कौल घेऊन निर्णय देतात. त्यापेक्षा, जाउ द्या हो, असू द्या हो, असे म्हणावे, नि गप्प बसावे. फार तर क्रिकेट थांबले आहे म्हणून वेळ जायला, थोडेसे राडे करावे, लुटालूट करावी. तेव्हढीच मज्जा.