सदस्य प्रवेश |
मराठेशाही - धामधुमीचा काळ - महाराणी ताराबाई"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी | कवि गोविंद मी ताराबाईबर लिहीन्याची गरज आहे का? वरच्या कवितेत तत्कालिन कवि गोविंद यांनी ताराबाईचे जे वर्णन केले आहे ते बढवुन चढवुन नाही तर त्यातील शब्दनशब्द खरा आहे. केवळ २४ ते २५ वर्षाची एक विधवा बाई, औरंगजेबासारख्या मुत्सदी सम्राटाशी लढा देन्यास उभी राहते आणि सलग साडेसात वर्षे त्याचाशी लढा देते व त्या लढ्यात स्वतः पराजित होत नाही ही घटनाच तिच्या कर्तूत्वाबद्दल सगळे काही सांगुन जाते. मराठी स्वराज्याचे शिवाजी महाराजांनंतर तिन स्वतंत्र कालखंड आहेत. प्रत्येक कालखंडाला एक विशिष्ट महत्व आहे. येनारा प्रत्येक राजा वा राणी हे एका वेगळ्याच लढ्यातुन गेलेले आहेत. त्यांचा लढ्यातुन महाराष्ट्र तावुन सुलाखुन निघाला. प्रत्येक पुढार्याने ( संभाजी, राजाराम, ताराबाई ) अनेक कर्त्तत्ववान पुरुषांना निर्मान केले आहे. हा काळच मोठ्या धामधुमीचा होता. छत्रपती संभाजींनी औरंगजेबाला थोपवुन धरले त्यामुळे संभाजीच्या काळात औरंगजेबाला मराठा राज्य सोडुन विजापुर व गोवळकोंडा राज्य घ्यावे लागले. राजारामचा कालावधी आपण गेल्या लेखात पाहीला. आज ह्या भद्रकालीचा कालखंड पाहु. मराठेशाही सन १७०० ते १७०७ भद्रकाली खरी कोपली होती ती राजाराम ह्ययात असतानाच. पति जिंवत असतना ही बाई स्वतंत्र मोहीमा चालवायची व मोगलांना सळो की पळो करुन सोडायची. मोगली सरदार खाफीखानाने औरगंजेबाला एक पत्र लिहीले आहे. त्याचा थोडक्यात गोषवारा असा " ताराबाई ही राजारामाची थोरली बायको आहे. ती बुध्दीमान आणि शहानी आहे. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवर्याच्या ह्ययातीतच तिचा लौकीक झाला आहे." राजाराम जायच्या आधीच मोगलांनी सातार्याला वेढा घातला होता. सात्यार्यासोबत पन्हाळा, विशाळगड, पावनगड अश्या अनेक गडांवर वेढे पडले होते. ताराराणी सर्व वेढ्यांना एकाच वेळेस तोंड देत होती. ज्यांना सातारा, विशाळगड, परळी, पन्हाळा हा महाराष्ट्रातला भाग फिरुन माहीती आहे त्यांना कळेल की अवघ्या १५० किलोमिटर मध्ये हे सर्व प्रदेश येतात व स्वत ओरंगजेबासोबत १५०००० सैन्य या भागात वावरत होते. सर जदुनाथ सरकार लिहीतात " किल्ल्याला संपुर्णपणे वेढा घालनेही मोगलांना जमले नाही. शेवटपर्यंत मराठे त्यांना हवे तेव्हा आत बाहेर करु शकत होते. ऊलट मोगलाचेंच सैन्य कोंडल्या सारखे झाले, मराठी सैन्य बाहेरुन घिरट्या घालत व मोगलांची रसद तोडत. येन्याजान्याचे सर्व मार्ग मराठ्यांनी व्यापले होते. कुणालाच संरक्षनासाठी मोठ्या तुकडी शिवाय बाहेर पडता येने अशक्य झाले होते." बघा म्हणजे मराठ्यांनीच मोगलांना घेरले अशी परिस्तिथी निर्मान झाली. हे धैर्य, ही जिद्द कुठन पैदा झाली? तिकडे धनाजी जाधव आपल्या १५००० खड्या फौजेस घेऊन गुजरातेत गेला व त्यांने बादशहाच्या हंगामी सुभेदारास (अब्दुल हमीद) कैद केले. भले शाब्बस. मोगली सैन्याची दाणादाण उडवुन प्रंचड लुट घेऊन तो स्वराज्यात वापस आला. (१७०६) १५०००० फौज, तोफा, हत्ती, घोडे काय वाट्टेल ते सोबत असुनही औरंगजेबास हार पत्कारावी लागत होती. ह्या सर्व गोष्टीमुळे तो अंत्यत निराश झाला होता. अल्लाकडे जास्त मदत होता पण अल्ला सध्या भद्रकालीच्या बाजुने होता त्यामुळे त्याला यश हाती येत न्हवते. मोगली लश्करातील एक आख्खी पिढी ( २५ वर्षे) त्याने दक्षिनेत राबविली पण कोरडाच राहीला. निराश होऊन तो २० फेब १७०७ रोजी वारला. तो वारल्या बरोबर राणीने अनेक चढाया मारत अवघ्या तिन महिन्यात सिंहगड, पुरंदर, पन्हाळा, सातारा, परळी हे व असे अनेक किल्ले जिंकुन घेतले व स्वराज्यात आणले. ताराबाईने महाराष्ट्रातील सर्वांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले. कवि विठ्ठलदास लिहीतो ह्या लढाईत फार मोठी बाजु गनिमी काव्याने लढविली आहे. मराठे यायचे, हल्ला चढवायचे व पळुन जायचे, मोगल सरदार खुश होऊन बादशहाला कळवायचे के मराठे हारले. एका पत्रात मराठ्यांनी काय करावे हे लिहीले आहे व त्यानी काय केल आहे हे मल्हाररावाने मांडले त्या पत्रातील काही भाग देतो. स्वतः ताराराणीने अनेक चढाया मारलेल्या आहेत. सैन्याची व्यवस्था, राज्यकारभाराची व्यवस्था, पैसा, गुजरात व माळव्यातील स्वारीची आखनी, किल्ले लढविने ह्या सर्व गोष्टींचा तिने निट मेळ घातला. वैध्यव्याचा नावाखाली रडत बसन्यापेक्षा तिने मराठी सैन्याच्या रक्तात जान फुकांयचे काम केले. १७०० ते १७०७ ह्या कालावधीत तिने स्वतंत्रपणे राज्यकारभार पाहीला व धामधुमीच्या काळात मराठा राज्याची निट व्यवस्था लावली. औरंगजेब मेल्यावर स्वस्त बसतील ते मोगल कसले. माळव्याच्या सुभेदारीवर आलेल्या आज्जम शहाने स्वतःला बादशहा घोषीत केले पण तिकडे शहा आलमचा विरोध मोडन्यासाठी तो लगबगीने उत्तरेत गेला. त्याने व झुल्फीकार खानाने ( जो गेली २० वर्षे दक्षिनेत होता) सल्लामसलत करुन शाहूला कैदेतुन मुक्त केले. ( ८ मे १७०७). शाहूला मुक्त करन्यामागे मराठेशाहीत फूट पडनार हे दिर्ध राजकारण त्या दोघांनी खेळले. शाहु हा संभाजीचा पुत्र असल्यामुळे तो दक्षिनेत जाऊन राज्य वापस मागेल व त्याला जिवत सोडल्याच्या उपकाराला जागुन तो मोगलांचा सांगन्यात राहील हे झुल्फीकाराला वाटले. ऑगस्ट २००७ ला शाहु अहमदनगर ला आला व त्याने तोच राज्याच्या खरा वारस असल्याचे घोषीत केले. मराठी राज्यात ठिनगी पडली. नेमाजी शिंदे, हैबतराव निंबाळकर, परसोजी भोसला , रुस्तुमराव जाधव असे मातब्बर सरदार शाहुला येऊन मिळाले. ताराबाईला हे मान्य न्हवते. तिचे असे म्हणने होते की संभाजीच्या काळातील स्वराज्य आता नाही, ते आधी राजारामने राखले व सात वर्षे आपले छोटेस राज्य तिने स्वतः औरंगजेबाशी झुंज देऊन राखले. आज्जमशहाने टाकलेला डाव यशस्वी झाला. बरेच सरदार शाहु कडुन तर धनाजी जाधवांसारखे मातब्बर सरसेनापती ताराबाई कडुन झाले. शाहुच्या म्हणन्यानुसार राजारामास राज्य राखन्या साठी दिले होते व राज्य राखने ऐवढेच त्याचे काम होत. स्वत राजाराम देखील तसेच माणत होता. पण जे राज्य ताराबाईने पुन्हा निर्मान केले त्यावर ताराबाई हक्क सोडायला तयार न्हवती. दोन्ही बाजुने प्रश्न सुटेना. सामोपचाराचा मार्गाने शाहुला आपल्याला राज्य मिळेल असे वाटले नाही व त्याने युध्दाची सुरुवात केली. धनाजी जाधव जो पर्यंत शाहुच्या पक्षात येनार नाही तो पर्यंत आपली जित नाही हे शाहूला उमजले. त्याने बाळाजी विश्वनाथला (पहीला पेशवा) धनाजीस आपल्या बाजुस वळवायला पाठविले. बाळाजी ते कार्य सफल केले. धनाजी शाहुला मिळाला. खेडला उर्वरित सैन्यात चकमक ऊडाली पण त्यात शाहू विजयी झाला. या विजयामूळे त्याचे धैर्य वाढले. सेना ही वाढली. इकडे ही धामधुम चालत असताना तिकडे उत्तरेत आज्जमशाहा व शहा आलमचे युध्द झाले त्यात शहा आलम विजयी झाला. त्याने बहादुरशहा ही पदवी धारण करुन तो पातशाह बनला. पण कामबक्षाला तो बादशहा म्हणुन मान्य न्हवते, त्याला स्वतःला बादशहा व्हायचे होते. बहादुरशहाने कामबक्षा विरुध्द शाहूची मदत मागीतली. नेमाजी शिंदे बहादुरशहाकडुन लढला. ही मदत देन्यामागे शाहूला असे वाटत होते की आज्जम शहा ने जे कागदपत्र त्याला दिले त्यावर ह्या नविन बादशहाची मोहर लावता येईल. १७०९ मध्ये बहादुरशहाने कामबक्षाला पकडुन ठार मारले. अहमदनगच्या मुक्कामात त्याला मरठ्यांकडुन गदादर प्रल्हाद भेटायला गेला व त्याने बादशहास दक्षिनेची चौथाई मागीतली. झुल्फीकारखाणाने ही मागनी उचलून धरली. त्याला परत युध्द नको होते. याच सुमारात कोल्हापुरहून ताराबाईची लोक बादशहाला भेटायला आली व त्यांनीही चौथ मागीतली. ही मागणी झुल्फीकारखाणाचा प्रतिस्पर्धी पण बादशहाचा वजीर मुनीमखान याने उचलुन धरली. बादशाहाने निर्णय दिला की आधी वारसा हक्काचा निकाल लावा मग मी सनदा देतो. सनदांचे कार्य अपुरेच राहीले. शाहू आणि ताराबाई यांनी आपसात युध्दाला सुरु केली. १७०९ साली तो वापस दिल्लीला गेला व २६ वर्षांनंतर थोडीफार शांतता मराठी राज्यास लाभली. सत्ता शाहूकडे न जाता ताराबाईकडे राहीली असती तर वेगळे काही घडले असते का ह्याचे उत्तर मात्र मिळनार नाही कारण ईतिहास फक्त घडलेल्या घटनांचाच विचार करतो. जर, तर ची मात्रा ईथे उपयोगी नाही. शाहूने शक्यतो सांभाळुन राहन्याचा प्रयत्न केला. तो एक व्यक्ती म्हणून निश्चीतच फार मोठा होता. त्याने कोल्हापुर व सातारा ह्या दोन्ही गाद्या एकत्र आणन्याचा विफल प्रयत्न केला पण ते जमले नाही. |
|
वा! माहिती नव्हतं हे खरचं. केदार सुंदर लिहितो आहेस इतिहास.
एकदम सुरेख लिहिलय केदार... ताराबाई इतकी कर्तबगार होती, तरी वारसाबाद्दल इतकी संकुचित वृत्ती तिने ठेवली नसती तर, आणि मराठे शाहीच्या २ वेगळ्या गाद्या झाल्या नसत्या, तर कदचित काही अधिक चांगले चित्र दिसले असते का??
सुरेख लिहितो आहेस रे.
ह्या ताराबाई म्हणजेच प्रतापराव गुजर यांची मुलगी ना??
इतिहासात कुठे कोणाच्या स्वैराचाराबद्दल लिहिल नाहिये विशेष पण राजाराम महाराज हे व्य्सनी होते अस काहि ठिकाणी वाचलय मी. अर्थात ती खरिखुरी ऐतिहासिक पुस्तके नव्हेत.
पण ह्याच कारणाने ताराराणी यानी राजकारणात लक्ष घातले अस प्रथम दर्शनी वाटते.
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**
आपापसात लढण्याचा मराठी लोकान्चा स्वभाव कधी बदलणार??
वा! फारच छान माहिती!
मस्त रे!!!सुंदर लेख लिहिलाय!!!
केदार,
सुरेख माहितीपुर्ण लेख.
झक्कास हो तीच. (त्यामुळे तिचा लग्नाचा ओझरता उल्लेख राजारामाच्या लेखात केला)
मराठे शाहीच्या २ वेगळ्या गाद्या झाल्या नसत्या, तर कदचित काही अधिक चांगले चित्र दिसले असते का?? >>
सांगन फार अवघड आहे कारण यात जर तर चा भाग येतो. पण एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. एकतर राणी किंवा शाहू दोंघापैकी एकाला माघार घ्यावी लागली असती. शाहू तलवार बहाद्दुर कधीही न्हवता तर उलट राणी तलवार व राज्यववस्था या दोन्हीचा अनुभव तिला होता. कधी कधी मला राणीची बाजु जास्त न्याय वाटते कारण तिने व तिच्या नवर्यानेच १६८९ ते १७०७ पर्यंत राज्य लढविले, वाचविले. शाहूने तिला मान्यता दिली असती तर नंतरच्या काळात ती जे वाईट वागली हे झाले नसते. पण ती शेवटी एक स्त्री होती त्यामुळे त्याकाळात फक्त ती रिमोट कंट्रोल म्हणुनच ती राहु शकत होती, राजा म्हणुन नाही. नंतरच्या काळात तर तिचा राजा (संभाजी) देखील तिचे ऐकत न्हवता. शाहूचे तिने जर ऐकले असते व राज्य त्याचा हवाली करुन सत्ता आपल्या हातात ठेवली असती तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. पण शाहूने तसे कदाचित केले नसते.
आपापसात लढण्याचा मराठी लोकान्चा स्वभाव कधी बदलणार?? >>>>. कधीही नाही अशी माझी खात्री झालेली आहे.
सर्वांना परत एकदा मनापासुन धन्यवाद.
केदार, छान माहिती दिलीस.
धन्यवाद.
काय जबरदस्त बाई होती ही.
>>> तिच्या सोबतच भोसले घरान्यातील मर्द लोक संपले असे खेदाने मला नमुद करावे वाटते..... अगदी अगदी.
***
असेच काही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा
देता घेता त्यात मिसळला
गंध मनातील त्याहून हिरवा
- इंदिरा
केदार फारच सुरेख आणि माहितीपूर्ण लिहिले आहे.
माझ्या मते प्रतापराव गुजरांची मुलगी जानकी ही राजारामाची पहिली पत्नी. ही ताराबाई मोहित्यांच्या घरातली होती. That explains..सेनापती हंबीरराव मोहित्यांचं झुंजार रक्त तिच्या धमन्यांमधून वाहात होतं.
अश्विनी तुझ बरोबर आहे. खरेतर मी आधीच्या लेखात जानकी (कुडतोजी गुजरांची मुलगी) म्हणून उल्लेख केला, पण ईथे प्रतिक्रिया देताना सेनापतीच्या नावात माझा घोळ झाला.
खरेतर सेनापती हंबीरराववर एखादे चांगले पुस्तक यायला पाहीजे. पण तितके संशोधन अजुन् झालेले दिसत नाही. शिवाजी महाराज, नंतर संभाजी महाराज ( सख्खा भाचा नसताना देखील ते संभाजीच्या पक्षात होते) यांचा पराक्रमात हंबीररावांची फार मोठी साथ आहे. प्रतापगडावर भवानीच्या मंदीरात हंबीररांवांची तलवार ठेवली आहे.
>>> ( सख्खा भाचा नसताना देखील ते संभाजीच्या पक्षात होते)...
हां, मी हेच विचारणार होतो तुला. सोयराबाईला साथ न देता हा माणूस संभाजीच्या पक्षात होता. म्हणजे 'स्वत:ची निष्ठा कुठे असावी' याबाबत त्याचा विचार केवढा स्पष्ट असेल !!
***
असेच काही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा
देता घेता त्यात मिसळला
गंध मनातील त्याहून हिरवा
- इंदिरा
केदार .. मस्त लिहिले आहेत सगळे लेख.
बर्याच दिवसांनी ऐतिहासिक काही चांगलं वाचायला मिळालं.
केदार, अगदि इतिहास डोळ्यासमोर उभा केलास. अतिशय अभ्यासपुर्ण लेख. तेवढिच ओघवती लेखणशैली.
वरती लिखाणात एक संदर्भ दिलाय कि ऑगस्ट २००७ ला शाहु अहमदनगरला आला. तेवढ जरा दुरुस्त कर ना.
केदार तुम्ही छान लिहिताय यात वाद्च नाहि पन माझ्या मते तुम्हि हे लिखाण रंगीबेरंगी वर न करता एखादा वेगळा बिबि करुन करा म्हणजे कधीही वाचायचे झाल्यास सोप्पे पडेल आणि कोणालाहि लवकर सापडेल आणि वाहुन जाणार नाही.
जी काहि माहिती तुमच्या लिखाणातुन मिळत आहे त्याबद्द्ल धन्यवाद.
केदार.. खुपच सुरेख लेख मालिका.... सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर 'रणभाग्य ' नावाचे सचिन कानिटकरांचे पुस्तक आहे. या हंबिररावांचे मुळ नाव हंसाजी ते कर्हाड जवळील तळबिड या गावचे देशमुख.. या घरातील तीन मुली भोसले घराण्याच्या सुना झाल्या.. पहिली तुकाबाई , ही हंबीररावांची आत्या जिचे शहाजीराजांशी लग्न झाले होते.( व्यंकोजी राजांच्या आई)... दुसर्या सोयराबाई आणी तिसर्या ताराबाई....