Submitted by जया एम on 21 January, 2011 - 00:34
डहाळी कोवळ्या पानाला केवळ
देठाच्या पुरता जिव्हाळा देणार
हिरवा कल्लोळ कितीही उसळो
मोहोर यायचा तेव्हाच येणार
कोणते पाखरू कोणत्या फांदीला
येऊन भेटेल कुणाला कळते?
पंखांनी वा-याशी संधान बांधता
झाडही मनात तिकडे वळते
पाखरू सांगते सुरांचे अन्वय
सातव्या फांदीच्या पाचव्या पानाला
दिशात संवादी झंकार उठता
निरोप पोचतो क्षणात रानाला
मुळाला भेटतो पहिला ओंकार
तेव्हाच मातीला साकडे घालावे
अनादि सुखाचे अश्राप अंकुर
शोधत पथिक रानात चालावे
गुलमोहर:
शेअर करा
"हिरवा कल्लोळ कितीही
"हिरवा कल्लोळ कितीही उसळो
मोहोर यायचा तेव्हाच येणार"
....छान
आवडली. फार छान लिहिता तुम्ही.
आवडली. फार छान लिहिता तुम्ही.
खूपच सुंदर.
खूपच सुंदर.
खूप आवडली.
खूप आवडली.
खुप सुंदर, मस्तच
खुप सुंदर, मस्तच
व्वा..
व्वा..
छान
छान
(No subject)
आवडली.
आवडली.
(No subject)
सुंदर! सुंदर!!
सुंदर! सुंदर!!
S.U.N.D.A.R
S.U.N.D.A.R
मस्त कविता.
मस्त कविता.
एक चिकोरी आमचीही
एक चिकोरी आमचीही
जबरदस्त! ओळींचा अर्थ फारसा
जबरदस्त! ओळींचा अर्थ फारसा कळाला नाही तरी केवळ शब्दरचनेतील सौंदर्यच पुन्हा पुन्हा वाचायला लावते. विशेषतः चौथ्या ओळी कवितेला लयबद्धतेच्या दृष्टीने वेगळ्याच उंचीवर नेतात.
स्तब्ध
स्तब्ध
डहाळी कोवळ्या पानाला
डहाळी कोवळ्या पानाला केवळ
देठाच्या पुरता जिव्हाळा देणार
हिरवा कल्लोळ कितीही उसळो
मोहोर यायचा तेव्हाच येणार
अप्रतिम...केवळ अप्रतिम..!!
ओळींचा अर्थ फारसा कळाला नाही
ओळींचा अर्थ फारसा कळाला नाही तरी केवळ शब्दरचनेतील सौंदर्यच पुन्हा पुन्हा वाचायला लावते. >>> +१
लय सुरेखच ....
(No subject)