- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
वाचू आनंदे
सदस्य प्रवेश |
पुस्तक पारायण...वाचन ही एक चांगली सवय आहे. मी वाचन करतो हे जर कुणाला सांगितले तर जनमानसात आपला सन्मान वाढतो. आपलेच कौतूक आपण करू नये म्हणतात पण ह्या बीबीला ही गोष्ट काही मानवणार नाही. ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांच्याकडे काही पुस्तकं संग्रही असतात. अधुनमधुन आपण ही पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचतो, निदान काही भाग तरी विरंगुळा म्हणून वाचतोच वाचतो. कधी कधी असे होते की आपण एखादे पुस्तक अनेकदा वाचून देखील आपले पोट भरत नाही. सुदैवाने खूप पाने खायची सवय मला जडली नाही. पण अलिकडे मी एका पुस्तकाचे २१ वेळा पारायण केले तेंव्हा माझे हे पुस्तक चोरीला गेले. जळी स्थळी काष्ठी पाषाणी हे पुस्तक माझ्या सोबत असायचे कारण ते छोटेखानी होते. वर त्या पुस्तकाचे अनेक पदर माझ्या लक्षात सातत्याने येत गेले. मग गोडी वाढत गेली. कधीकधी मीटींगला देखील ते पुस्तक डायरीच्या आत ठेवून मी वाचले आहे. अनेकदा एकच एक पुस्तक वाचून त्या पुस्तकाची धार जाते म्हणतात. पण माझ्याबाबतीत उलटच होत गेले. चोरीला गेलेले पुस्तक सापडले खरे पण ते पुस्तक एका कोकणी व्यक्तीने तिच्या घरी ठेवून दिले आहे. आता अगदी वर्षभरानंतरच परत मिळणार आहे म्हणाली. ते पुस्तक आहे 'आहे हे असे आहे'. लेखक कोण हे इथे सांगणे न लगे. सगळेच त्यांचे पंखे आहेत. मला ह्या पुस्तकाने प्रचंड वेड लावले. काही पुस्तके मी दोन किंवा फ़ार फ़ार तर तिन वेळा पारायण केलेली असतील पण २१ वेळा खूप झाले की नाही आज मराठी भाषा दिवस आहे. साहित्य हे भाषा टिकवण्याचे, तिला वृद्धींगत करण्याचे एक उत्तम साधन मानले जाते. ह्या दिनानिमित्त आणि चिरंजीव तुषार ह्यांना खूष करण्यासाठी मी हा बीबी उघडला आहे. (मिस नंदीनीला राग येणार नाही अशी अपेक्षा.) तर मंडळी, तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचे तुम्ही किती वेळा पारायण केले ते आधी लिहा, आणि का आवडले हे जर सांगता येत असेल तर तेही नक्की सांगा. कदाचित आम्ही देखील ते पुस्तक वाचून बघू. |
|
"Yes Minister" चवथ्यांदा वाचतेय. प्रत्येक वेळी तेव्हडीच मजा येते वाचताना!
भारतात ह्यावर आधारित "जी मंत्रिज़ी" सुरु झालीय असं ऐकलं. बघायची उत्सुकता आहे. पॉल एडिंग्टन आणि नायजेल हॉथ्रोन ची कामं कोण करतंय?
दुर्गा भागवतांचे 'व्यासपर्व'!
यातला कृष्ण ज़बरदस्त आवडतो!
छान माहीती. साधारण किती वर्षाच्या मुलांना उपयोगी आहेत ही पुस्तके (बालगट - १ )?
लिट्ल विमेन या पुस्तकाचं शांता शेळके यानी केलेलं भाषांतर "चौघीजणी"-- अक्षरशः पारायणं केलेली आहेत या पुस्तकाची. पहिल्यांदा हातात पडले तेव्हा साधारण ११वीत वगैरे होते. नंतर कॉलेजमधे पूर्ण ग्रूपमधे ते फिरले. तेव्हा आम्ही सगळ्याजणी( हो तेव्हा मुलामुलींचे मिक्स ग्रूप फारसे नसायचे.)एका वेगळ्याच विश्वात होते. या पुस्तकावर आम्ही एक कल्पनिक पिक्चरही काढला होता. त्यातली पात्रं अर्थातच आजूबाजूला वावरणारी मुलं मुली आणि कॉलेज मधले प्रोफेसर ही सुटले नव्हते . आजचे थोर समिक्षक आणि लेखक आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते. त्यांना आम्ही एक फार महत्वाची भूमिका दिलेली होती!!!!!!!!!.
अजूनही घरातल्या वाढ्त्या वयाच्या सर्व मुलांना मी हे पुस्तक वाचायला सांगते.
mmm333, मी ही तुमच्याशी सहमत. 'चौघीजणी' कधीही वाचावे असे आहे. (विशेषतः मुड वाईट असेल तर )
फारच सुंदर... माझ्या पहील्या पगारातुन मी हे पुस्तक घेतले होते माझ्या साठी!
तसेच, Alister Mclin (स्पेलींग कदाचीत चुकले असेल ) चे fear is the key सुद्धा असेच आवडते पुस्तक आहे.
नाथमाधव नावाचे एक लेखक होते (माझ्या आईच्या लहानपणी )त्यांचे 'वीरधवल' तसेच 'सोनेरी टोळी' देखील मस्त! (harry potter चे आपण कौतुक करतो fantacy साठी, वीरधवल तसेच पण खुप पुर्वी लिहीलेले आहे. सोनेरी टोळी वर एक मराठी चित्रपट ही निघाला होता त्यात अशोक सराफ होता )
जेफ्री आर्चर यांचे not a penny more, not a penny less हे ही मस्त आहे. (त्यावर एक horrible मराठी सिनेमा होता )
Robin Cook यांचे स्फिंक्स पण छान आहे.
gone with the wind आणि चार्ल्स डिकन्स च्या पिकविक पेपर्स चे मराठी भाषांतर उपलब्ध आहे का ?
..........................................................................
Money spent on books is never wasted, but it is invested !
मेघना १
गंमत म्हणून सांगते चौघीजणीतली ज्योची भूमिका निर्विवादपणे माझ्याकडे आली होती.(कल्पनिक पिक्चरमध्ये).
आम्ही मराठी मीडियमवाले असल्याने शालेय जीवनात उत्तम साहित्त्याची भाषांतरे खूप वाचली.
राम पटवर्धनांचे पाडस वाचले का? (द यर्लिन्ग चं भाषांतर) ...अप्रतीम!!!!!!!नंतर मात्र इंग्लिश खूप वाचले. आत्ता झुंपा लाहिरीचं अनकस्ट्म्ड अर्थ वाचतीये. छान आहे. पण फार डिप्रेसिन्ग वाटते. तिची आधीची --इंटरप्रिटर ऑफ मलाडीज आणि नेमसेक जास्ती आवडली !!
डिकन्स----ची अगणित पारायणे!!! पण गॉन विथ्....व पिकविकच्या भाषांतराबद्दल ऐकले नाही. ती इंग्लिशच वाचली आहेत.
भेटू.
माधुरी (mmm), तुम्ही little women चित्रपट पाहीलात का? मला unfortunately, पहिलाच भाग बघायला मिळाला.
पाडस वाचले नाहीये. वाचीन.
..........................................................................
You are not what you think you are; but what you think,you are.
'आहे हे असे आहे' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
***
असेच काही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा
देता घेता त्यात मिसळला
गंध मनातील त्याहून हिरवा
- इंदिरा
slarti,
'आहे हे असे आहे' हा गौरी देशपांडे यांचा कथासंग्रह आहे.
मेघना१
आजच लिट्ल विमेन पाहिला ...झी स्टुडिओवर
अप्रतीम सुंदर.
>>>>>आजचे थोर समिक्षक आणि लेखक आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते. त्यांना आम्ही एक फार महत्वाची भूमिका दिलेली होती!!!!!!!!!.
एमएमएम३३३, चौघीजणींवरील त्या काल्पनिक सिनेमात तुमचे मुख्याध्यापक म्हणजे म.द. का?
बाप रे शंतनू........कसला तर्क आहे तुझा!
धन्य आहेस!
तो काळच असा होता की प्रोफेसर वगैरे मंडळी हीरो असायचा....... आम्ही खरंच मिस्टर लॉरेन्स यांची भूमिका त्यांना दिली होती.
मी परत परत वाचू शकते असं अजून एक पुस्तक म्हणजे रविंद्रनाथ टागोरांच्या सगळ्या लेखनाचा एक मोठ्ठा ठोकळा आहे (नाव नक्की आठवत नाही, बहुतेक 'Selected' किंवा 'Best of' अशी काहीतरी सीरीज आहे ), तर त्यात गीतांजली मधल्या कविता, इतर कविता, लघुकथा असे बरेच काही आहे. त्यात काही उतारे सुद्धा आहेत. सगळेच वाचनीय आहे.
अशी खूप पुस्तकं पारायणं करून झाली आहेत. शिवाजी सावंतांचं "मृत्युंजय" तर सहावी ते graduation दर सुट्टीत (मे आणि दिवाळी)वाचून व्हायचं!! पण अजूनही ते पुस्तक हातातून ठेववत नाही.तीच गोष्ट "स्वामी" ची!! या दोन्ही पुस्तकातल्या शेवट्च्या प्रसंगांत माझ्या अश्रूंमुळे पाने भिजून गेली आहेत इतकं ते लिखाण ह्रदयस्पर्शी कारूण्यपूर्ण आहे. कदाचित इतक्या वेळा वाचल्यामुळे असेल की आजही जेव्हा "महाभारत" चर्चेत येतं तेव्हा माझं मन नकळत कर्णाच्या बाजूने ठामपणे उभं राहतं. कदाचित या दोन्ही कादंबर्यातील नायकांच्या समान परिस्थितीने असेल पण मृत्युंजय कर्ण आणि श्रीमंत माधवराव पेशवे यांच्यात कुठेतरी मला एक साम्य दिसतं. दोघांमधेही महान पराक्रम आणि विलक्षण बुध्दीचातुर्य असूनही केवळ आप्तस्वकीयांच्याच द्वेष आणि कपटामुळे तसेच ऐनवेळी नशिबाने सोडलेल्या साथीमुळेच दारूण अंत आला. तसे नसते तर आज इतिहास काही वेगळाच असता!!
------
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...
आशु, तुझ्या आख्ख्या प्रतिसादाला सहमत! अगदी सहावी पासून ग्रॅज्युएशनच्या सुट्ट्यांमधे मृत्युंजय अगदी ठरलेलं! स्वामी पण तसंच.. आणि कर्णाबद्द्ल ठाम उभं राहणं देखील!!
अगदी अगदी..व्यक्ती आणि वल्ली, स्वामी, शिवचरित्र, राधेय, बनगरवाडी प्रत्येक सुट्टीत
कधी कधी झुंजारमाला पण
जोडीला ग्रंथालायातुन आणुन स्मृती चित्रे, आहे मनोहर तरि आणि काय काय....
तशी मी निरगाठी ची पारायणं केली होती. मी १०वी-१२वी त असताना कधीतरी निरगाठी प्रसिद्ध झाली होती एका दिवाळी अंकात. त्यातले ते व्यक्तिरेखांचे तपशील, बारीक बारीक गोष्टीतली प्रत्येकाची वागण्याची वेगळी वेगळी पद्धत. सगळं इतकं जिवंत होतं की बस्स... आणि तेव्हापासून गौरीप्रेम आहेच.
सध्या पारायण करू शकते ते म्हणजे स्टुडिओ च. कधीही कुठलंही पान काढून वाचावं आणि मस्त तंद्री लावून बसावं आपल्याच कल्पनाविश्वात.
इतिहासाचा, इंडॉलॉजीचा अभ्यास करायला लागल्यापासून सगळ्या ऐतिहासिक/ पौराणिक कादंबर्यांमधल्या रोमँटिसिझम चा फुगा फुटला आणि त्यांचा प्रभाव संपला माझ्यासाठी.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
इतिहासाचा अभ्यास करायला लागल्यापासून सगळ्या ऐतिहासिक/ पौराणिक कादंबर्यांमधल्या रोमँटिसिझम चा फुगा फुटला आणि त्यांचा प्रभाव संपला माझ्यासाठी. >>
डीट्टो हिअर. त्या कांदबर्या हिस्ट्री असायच्या ऐवजी his stroy असतात. (हिज = रायटर) आणि नेहमी एकांगी. "खरा" ईतिहास सुरु केल्यावर तर माझे फिक्शन वाचने पण संपले होते अनेक वर्ष. नॉन फिक्शन आणि फिलॉसॉफीनेच वेड लावले.
आशुला सहमत,
मृत्युंजय, राधेय, स्वामी या पुस्तकांची खुप पारायण केली.
मी 'सेकंड लेडी' हे अनुवादित पुस्तकपण २ वेळा वाचले होते कॉलेजमध्ये असताना. 'नॉट विदाउट माय डॉटर' पण खुप छान आहे पण मी तरी ते परत वाचु शकेन असे वाटत नाही. इथली सगळी चर्चा वाचुन मी 'लिटील वुमेन' वाचले हातातुन खाली ठेववतच नव्हते. धन्यवाद एवठे छान पुस्तक सुचवल्याबद्द्ल.
पुलंच्या अनेक पुस्तकांची पारायणं झाली.
"एक शून्य मी" मात्र अंतर्मुख करायला लावतं.त्यातला प्रत्येक लेख आपल्याला विचार करायला लावतो.
"towards the silver crests of Himalayas" हेपण असंच एक मस्त पुस्तक.त्याचा अनुवाद म्हणजे "साद देती हिमशिखरे".भारतीय तत्त्वज्ञान हा विषय जर आवडत असेल तर जरूर वाचा.
शिवय वर तुम्ही सगळ्यांनी ज्या खूप सुन्दर पुस्तकांचे उल्लेख केलेत त्यातलीही पुस्तकं "always favourite"मध्ये आहेतच.वेळ असला तर कुठल्याही पुस्तकातलं कुठलंही पान उघडून वाचायला सुरुवात!!!!!
..प्रज्ञा
अजून एक असंच कुठलंही पान उघडून वाचत जावं.. दर वेळेला खूप वेगळे वेगळं जाणवत रहातं असं पुस्तक म्हणजे
युगान्त - इरावती कर्वे
माझ्याकडची प्रत ही माझ्या आजोबांनी कोणे एके काळी विकत घेतलेली आहे ज्यांना जाउनच आता २९ वर्ष झाली. अशी त्यांनी जमवून ठेवलेली अनेक पुस्तकं मला आजही तेवढीच महत्वाची होतात... खरंच पैशाने जेवढ्यास तेवढं असलं तरी वाचनाची आणि पुस्तकांची श्रीमंती जी घरात मिळाली ना मला ती नसती मिळाली तर आज मी जी काय थोडीफार बरी आहे तशी असूच शकले नसते.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
युगान्त... कुठूनही सुरू करुन थोडी(च) पानं वाचावीत आणि नंतर वाचलेलं सावकाश सावकाश पचवत रहावं असं पुस्तक आहे हे. पहिल्यांदा वाचलं तेव्हा तर एक तासभर शांत बसून राहिलो होतो ते पुस्तक डोक्यात फक्त घोळवत... मग हळूहळू विचार करायला सुरुवात केली... अजूनही करतो आणि अज्जुका म्हणते तेच जाणवतं... प्रत्येक वेळी हे मनन काहीतरी नवीनच जाणीव करून देतं.
***
Insane : When you're crazy and it bothers you.
Crazy : When you're insane and you like it.
>>पुलंच्या अनेक पुस्तकांची पारायणं झाली.
"एक शून्य मी" मात्र अंतर्मुख करायला लावतं.
हो खरच ! अगदी....प्रतेकाने वाचावे असे.
तुषार
युगान्त - इरावती कर्वे >>>> हो, हे ही आहेच कि "लिस्ट" मधे

.
आमच्या घरीही वाचनाची परंपरा आजोबांपासुन चालत आली (कदाचीत त्याही आधीच्या पिढीपासुन). त्यांनी अगदी रुपया-पैशांमधे घेतलेली "अमुल्य" पुस्तके अजुनही आहेत. तरी त्यातली कितीतरी त्यांनी कोणा-कोणाला वाचायला म्हणुन दिली ती परत आलीच नाहीत
तात्या टोपेंबद्दल लिहीलेली काही चांगली पुस्तकं आहेत का? त्यांची नावं काय?
केदार ऐतिहासिक non-fiction / fiction पुस्तकांची नावं लिही की जरा... कुठली चांगली आहेत ते.
~~~~~~~~~

~~~~~~~~~
व.पुंची जवळजवळ २२ पुस्तके वाचून झाली..एक अनेकवेळा अशी २२.
आपल्या आजूबाजूला त्या घटना घडतायत अशा प्रवाही कथा! म्हणूनच त्यांना काळाचे बंधन नाही. त्या आजही तशाच आणि तितक्याच खर्या वाटतात, पटतात. माणसं अशी असू शकतात? या प्रश्नापासून माणसं अशी 'च' असतात या निर्णया पर्यंत मला व.पुंनीच आणलं! एखादी कथा वाचत असताना आपण त्यात गुंतत जावं, शेवट काय असेल याचे साधेसुधे आडाखे बांधावे आणि शेवट एक अशी जबरदस्त कलाटणी मिळते की आपल्या विचारांचे चक्र पुन्हा उलटं फिरायला सुरूवात!! पण नंतर या प्रकारची मजा यायला लागली आणि मी जास्त सखोल आणि दुसर्याच्या बाजूने त्याच्या भूमिकेत शिरून विचार करायला शिकले! कोणताच माणूस कधीही संपूर्ण चांगला अथवा संपूर्ण वाईट कधीच नसतो. तो जे वागतो ते त्या वेळी त्याच्यावर जी परिस्थिती असते त्यानुसार तो वागतो. हे आता माझ्या मनात ठाम बसले आहे. सगळे श्रेय माझ्या लाडक्या व.पुंना!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
अगदी अगदी आशु......
पु.लं.चं कुठलंही पुस्तक ... कितीही वाचलं तरी समाधानच होत नाही.
'हसवणार्या' पुलंपेक्षा विचारवंत पुलं समजून घ्यायचे असतील तर ह्या तीन पुस्तकांना पर्याय नाही !
त्यांची 'मित्र हो', 'रसिक हो' आणि 'श्रोते हो' ही ट्रायोलॉजी तर खासच
-----
सुहास शिरवळकरांचं 'दुनियादारी' !!
(आणि किती तरी)
-----
शिरीष कणेकरांचं 'क्रिकेट वेध' आणि 'माझी फिल्लमबाजी'
-----
'मृत्युंजय' -- कधीही, कितीही वेळा !!
------
गोनीदांचं 'आम्ही भगीरथाचे पुत्र' आणि प्रभाकर पेंढारकरांचं 'रारंग ढांग' !!
-------
नुकतंच 'शांताराम' हे इंग्लिश पुस्तक अर्ध वाचून झालंय. 'सत्य हे कल्पनेहून अदभुत असतं' हेच खरं
-------
इंग्लिश पुस्तकांच्या ऑडिओ बुक्स -- विशेषतः हॅरी पॉटर सिरीजमधलं कुठलंही किंवा 'दा विन्ची कोड' -- 'पुस्तक वाचून दाखवणं' हा प्रकार काय भन्नाट असतो हे समजण्यासाठी ही पुस्तकं नक्की 'ऐकावीत!'
आज लालुशी बोलताना आठवले- नेगल
.
आणि अंकलची पोस्ट बघुन आठवले- शिरिष कणेकरांचं गोतावळा (हेच ना ? त्यांच्या मित्रपरिवाराविषयी ?)
माझीही पारायण बरीच झालीत.... पण वयाच्या त्या त्या टप्प्यावर पुस्तक बदलत गेली:
शाळकरी वयात झाडुन सगळ्या ऐतिहासिक/काल्पनिक कादंबर्या जसे स्वामी, मृत्युंजय आणि ययाति
नंतर पुल आणि वपु
कॉलेजच्या दिवसात शोभा डे ची पुस्तक , दुनियादारी आणि कोसला
अगदि अलीकडे शाळा आणि रारंगढांग
धन्स स्वरूप ..
काल सांगायचं राहून गेलं -- काही महिन्यांपूर्वी 'कोसला' वाचलं.
--------
कोसला, दुनियादारी आणि शाळा प्रत्येकाने जरूर वाचावी.
-------
साधारण १२+ वर्षांच्या मुलांनी आवर्जून वाचावं ते म्हणजे -- 'एक होता कार्व्हर'
सिंड्रेला, नेगल म्हणजे प्रकाश आमटेंचे ना?
'एक होता कार्व्हर' - हो हो हे खरच वाचण्यासारखं आणि त्यातुन खुप काही शिकण्यासरखं पुस्तक आहे. मला आरतीने सुचवले होते वाचायला.
.
सिंड्रेला, नेगल म्हणजे प्रकाश आमटेंचे ना? >>> हो. नेगलच्या खोड्या वाचताना एव्हढी धमाल येते.
'नेगल' प्रकाश आमटे यांनी लिहीलेलं नाही. विलास मनोहर यांनी लिहिलं आहे. त्याचा दुसरा भाग २ वर्षांपूर्वी प्रकाशित झाला.
काही पुस्तकं माझ्याकडूनही. श्री. ना. पेंडसेंचं "लव्हाळी" . फार सुंदर. स्वातंत्र्यपूर्व काळातली एक डायरी आहे ही. खरंच रंजक आहे. साधूंचं "मुंबई दिनांक", व.पूं. च "पार्टनर" पारायणं करावी तितकी कमी आहेत. वर कुणी तरी सांगितल्या प्रमाणे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पुस्तकं बदलतात. शिरवळकर, मतकरी वाचायचं पण एक वय असतं. श्रीमान योगी तर चौथीच्या सुट्टीत झपाटल्या सारखं वाचून काढलं होतं स्वामी, म्रुत्युंजय, राधेय, राजा शिव छत्रपती असेच वेडावून गेले. चि. वी. ,पु.ल. तर एव्हरग्रीन.
"महोत्सव" पण व पुं च ना ? मी त्याची प्रत्येक सुट्टीत एकदा अशी अनेकदा पारायणं केली आहेत. पुस्तक खुप आवडले म्हणुन नाही तर माझ्या मावशीकडे तेव्हढं एकच वाचनीय पुस्तक होतं (नी मी जवळ-२ प्रत्येक सुट्टीत तिच्याकडे जायचे). बाकी सगळी पुराणावर, अद्ध्यात्मावर आधारीत होती. मी दहावीच्या सुट्टीत गेले तेव्हा मावस बहिणीने आणि मी वाचनालय join केले. तेव्हा "डेझर्टर" वाचले.
एकेकाळी वपुंचे लिखाण प्रचंड आवडायचे. त्यांची कथा गुंफण्याची हातोटी खुप आवडायची. पण गेल्या काही वर्षात अनिल अवचटांसारख्या लेखकांचे सरळ सोप्या भाषेतील वास्तववादी लिखाण वाचुन फार भावुक, फिलॉसॉफिकल, अलंकारीत लि़खाण अजिबात आवडेनासे झाले आहे. कदाचित ही एक फेजही असु शकते.
आपल्यापैकी कोणाचे असे झाले आहे का?
>> आपल्यापैकी कोणाचे असे झाले आहे का?
सहमत नात्या !
--
आधी मलाही वपु खूप आवडायचे.. विशेषतः त्यांचं 'पार्टनर' ...
नंतर नंतर डोक्याचं फारच भजं व्हायला लागलं !!!
-----------
सिंडरेला .. 'डेझर्टर्'चा अनुवाद विजय देवधरांनी केलाय तेच ना?
----------
कुणी अनिल बर्वेंचं 'अकरा कोटी गॅलन पाणी' वाचलंय का?
(अमिताभच्या 'काला पत्थर' सिनेमाची आठवण करून देतं किवा सिनेमा पुस्तकाची आठवण करून देतो !! )
सिंडरेला .. 'डेझर्टर्'चा अनुवाद विजय देवधरांनी केलाय तेच ना? >>> हो. इथे पहा.
<<आपल्यापैकी कोणाचे असे झाले आहे का?>>
हो.. शाळेत असताना वपुंची पुस्तकं वाचून काढली होती. आता तर अजिबात वाचवत नाहीत. पुलंचीसुद्धा काही पुस्तकं नंतर आवडेनाशी झाली. चौथीच्या सुट्टीत 'श्रीमान योगी' वाचलं होतं. नंतर तमाम ऐतिहासिक कादंबर्या वाचून काढल्या. त्याही काही वर्षांपूर्वी माझ्या आवडत्या पुस्तकांच्या यादीतून बाद झाल्या. ती भाषा अतिशय नाटकी, कृत्रिम वाटू लागली.
दहावीत सॉमरसेट मॉम आणि वुडहाऊसशी दोस्ती झाली, आणि मग मराठी जरा मागेच पडलं. Marquez, Hari Kunzru,KIngsley Amis,Iris Murdoch, Graham Greene, Kazuo Ishiguro, Naipaul,Anita Desai, Nadine Gordimer, Amitav Ghosh, Rohinton Mistry यांच्या कादंबर्या किंवा Roald Dahl यांच्या कथा वाचल्यावर खरंच काही चांगलं वाचल्याचं समाधान मिळतं. शांता गोखलेंचं 'रिटा वेलणकर' आणि सचिन कुंडलकरचं 'कोबाल्ट ब्लू' सोडलं तर अनेक वर्षांत बरी मराठी कादंबरी हाती नाही आली. आणि आता fiction एकंदरीत कंटाळवाणं वाटतं.
Dervla Murphy, William Dalrymple, Bill Bryson, Leila Hadley, Martha Gellhorn, Pankaj Mishra यांची प्रवासवर्णनं वाचली की लोकांना मीना प्रभू का आवडतात हा प्रश्न पडतो. केसरी/सचिन ट्रॅव्हल्सच्या जाहिराती आणि प्रभूंची पुस्तकं यात फारसा फरक नसतो. आणि प्रत्येक पुस्तकाचा तोच फॉर्मॅट.
ना.सी. फडके, ना.सं.इनामदार, गंगाधर गाडगीळ यांच्या आत्मचरित्रांनी वैतागच अधिक दिला होता. मॉमचं 'The summing up' वाचल्यावर आत्मचरित्रं माणसाला कसं जगायचं हे शिकवू शकतात, हे कळलं.
कधीही उघडून पुनःपुन्हा वाचू शकेन अशी मराठी पुस्तकं फार कमी.
सुनिताबाईंची सगळी, विशेषतः 'प्रिय जी. ए'
प्रकाश नारायण संतांची सगळी, म्हणजे चारही पुस्तकं
सुभाष अवचटांचं 'स्टुडियो'
आनंद नाडकर्णींचं 'गद्धेपंचविशी'
पद्मजा फाटकांची सगळी
कुसुमाग्रजांचा शांता शेळके यांनी संपादित केलेला कथासंग्रह (कुसुमाग्रज हे किती बिनीचे कथाकार, आणि विनोदकार होते, हे हा कथासंग्रह वाचल्यावर कळतं)
आनंद विनायक जातेगावकरांचं 'आनंदीबाईंची बखर'
पुलंचं 'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास', 'खिल्ली' आणि प्रवासवर्णनं
चि.वी. जोशींची सगळी
रामनगरी, आयदान, बंध-अनुबंध, पंचतारांकीत, स्मृतिचित्रे
तेरुओ, उत्खनन
नेगल
दुर्गाबाईंची सगळी..
>>आपल्यापैकी कोणाचे असे झाले आहे का?
खर म्हणजे थोड्या फार फरकानं सगळ्यांचच अस झाल असेल .... वपु वाचनाच वेड लावतात... अनघड वयातल्या अल्लड प्रेमाच जस आपल्याला मोठेपणी हसू येत तसच आहे ते.... पण त्या वयात त्या अल्लड प्रेमाने आपल जगण भारलेले असतं
वपु वाचनाच वेड लावतात...अनघड वयातल्या अल्लड प्रेमाच जस आपल्याला मोठेपणी हसू येत तसच आहे ते.... पण त्या वयात त्या अल्लड प्रेमाने आपल जगण भारलेले असतं >> अगदी अगदी!!
....
आणि आता मलाही त्या ऐतिहासिक पौराणिक कादंबर्या नको वाटतात.
....
मायकेल क्रायटन चे डिस्क्लोजर कुणी वाचलंय का?? अक्षयकुमारचा "ऐतराज" त्यावरच आहे. पण कुठे नामोल्लेख करण्याचे सौजन्य दाखवले नसेल!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
आशू, तो पुस्तकावर बेतण्याएवढे ही श्रम घेतले नसतील त्यांनी, कारण त्याच नावाचा चित्रपट ही आहे. डिस्क्लोजर.
चिनूक्स, वूडहाउस ची पारायणे मी ही केली. त्याची ओळख मात्र पुलंच्या एका पुस्तकातील लेखामुळे झाली. पण वुडहाउस च्या अमुक एका पुस्तकाचे पारायण केले काय आणि कोणतेही पुस्तक वाचले काय मला सारखेच वाटते (चांगल्या अर्थाने).
बाकी मात्र बर्याच नवीन पुस्तकांची येथे माहिती झाली. आता आणतो.
नीरजा, स्लार्टी, सिंड्रेला, युगान्त खरचं फार छान पुस्तक आहे. कधीही वाचावं कुठुनही सुरुवात करावी... एरावतींचं परिपूर्ती ही खुप सुंदर आहे. त्यातला पुरीच्या बलराम, कृष्ण आणि सुभद्राचे मुखवटे बदलण्याच्या प्रथेवर आधारित लेख खुप छान आहे.
श्रीनांची सगळीच पुस्तकं अशीच खिळवून ठेवतात. विषेषतः तुंबाडचे खोत..
संताची चारी पुस्तकं अप्रतिम. मन ताजंतवानं करणारी.
गौरी देशपांड्यांची उत्खनन, गोफ, सानियाचं आवर्तन.. प्रत्येक वेळेस एक वेगळा पैलू डोळ्यासमोर येतो.
वपुंची जुनी पुस्तकं - पार्टनर, ठिकरी, सखी, तप्तपदी छान आहेत. पण नंतर नंतर वपुंचा एक पॅटर्न होउन गेला. मग त्याचा कंटाळा आला. पुलंचही काहीवेळा तसं झालं. पण एकुण पुलंचा कंटाळा कधी आला नाही.
वर् दिलेली कित्येक पुस्तके मीपण वाचली आहेत आणि काही तर परत परत...
वपुंबाबत खरंच झाले असे, एक पॅटर्न ठरुन गेला त्यामुळे कंटाळा आला. पण पुलंबाबत अजुनही नाही. मी १२ व्या वर्षापासुन वाचतेय, तीच तीच पुस्तके परत परत वाचली पण कधिच कंटाळा आला नाही. ऐतिहासिक पुस्तके मात्र वाचवत नाहित आता. आधी वेड्यासारखी वाचायचे.
(रंगीबेरंगीत दिनेश नि लिहिलेलं पिवळा ताप प्रकरण वाचुन परत एकदा पुल बाहेर काढले आणी त्यांचेही लसिकरण परत वाचले
)
पुलंनि वुडहाउस वर लिहिलेला लेख वाचुन वुडहाउस वाचायला घेतला. सुरवातीची एक-दोन पुस्तके वाचुन वाटले, काय उथळ आहे.... पण त्या माणसाने कधी ताबा घेतला माझा कळलंच नाही. त्याचे गोल्फ वरचे क्लिकींग ऑफ क्थ्बर्ट कितीदा वाचले त्याची गणतीच नाही. (अचानक गोल्फ आवडायला लागले मला ते फक्त वुडहाउसमुळेच). बाकिचची पुस्तके पण परत परत वाचलित. पुलंनि लिहिलेय कुठेतरी की त्यांच्यावर वुडहाउस चा प्रभाव आहे. मला दोघांची जातकुळी एकच वाटली... भाषीक विनोद अतिशय सुरेख आहेत दोघांचेही.
शेळक्यांचे चारचौघी हा अनुवाद पण वाचला. पण मला अगदी खुप आवडला असे झाले नाही.
प्रभाकर पेंढारकरांचे रारंग ढांग वाचले. खुप आवडले. गंमत म्हणजे एका दिवाळी अंकात मी त्या पुस्तक लिहिण्यामागची प्रक्रिया वाचली मग ते पुस्तक मिळवुन वाचले. पेंढारकरांनी आधी डॉकुमेंटरी बनवली मग त्यावर पुस्तक लिहिले तेही ब-याच वर्षांनी.
युगांतही खुप आवडले. हल्लीच पवनीकर यांचे महाभारतातील व्यक्तीरेखा वाचले, विषय तोच, अभ्यासही दांडगा दिसुन येतो पवनीकरांचा, पण जशी युगांत घेते तशी मनाची पकड घेतली नाही पुस्तकाने . परिपुर्ती वाचायचेय अजुन..
कालच जिएंच "एक अरबी कहाणि" वाचली... अल्केमिस्टची आठवण झाली वाचताना...
माझे सुदैव म्हणजे माझ्या मुलीलाही वाचनाची अतिशय आवड आहे.. अजुन लहान आहे ती पण पुस्तकी किड्यासारखी सतत वाचत असते. मग दोघी मिळुन चर्चा करत बसतो वाचलेल्या पुस्तकाची...
खालील दुवा पहा. मी बरिच पुस्तके डाउन्लोड केलित इथुन.
http://www.gutenberg.org/wiki/Main_Page
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!
तू खरच सुदैवी आहेस हं साधना. की ह्या टीव्हीच्या कचट्यातून मुलीला सोडवू शकलीस. अन्यथा सध्या टीव्ही अगदी दुश्मन झालाय वाचनाचा. अर्थात पुढच्या पिढीत वाचनाची आवड असलेले मीही खुप जण पाहिलेत. म्हणून मी आवर्जुन नात्यातल्या सगळ्या छोट्यांना पुस्तकं देते. मात्र आपण योग्य संस्कार न करता त्यांना चांगल्या आवडी नाहीत म्हणणे हेच आज बर्याच ठिकाणी दिसते.
वुडहाउसचं मी एकच पुस्तक वाचलं. नाव आठवत नाही. एक शिकारी आणि सिंह ह्यांचा मजेशीर किस्सा आहे त्यात. आता नक्की वाचेन त्याची आणखी पुस्तकं.
रारंगढंग पुर्वी वाचले आहे आणि आवडले ही होते. आमच्या गावच्या कलापिनी ह्या संस्थेने मागच्या वर्षी त्याच्यावर आधारित नाटक केले. पेंढारकरांनाही ते आवडले होते.
कविता महाजनची ब्र आणि भिन्न दोन्ही छान आहेत. भिन्नने तर मी सुन्न होऊन गेले.
सध्या पुण्यात प्रिय जीए हा मोहत्सव चालू आहे. पण सगळे कार्यक्रम ६लाच सुरु होतात. त्यामुळे जाता येणार नाही..
चिनूक्स
प्रवास वर्णनांमधे थेरो राहिला ना? मीना प्रभूंची पुस्तकं मला लोनली हार्ट किंवा तत्सम गाईडस सारखी वाटतात. इथे लिहिणार्या कोणाच्याही आईने, सासूने प्रवास केला तर त्या अशीच वर्णनं लिहितील. त्यांच्या पुस्तकातून ग्रीस, चीन, तुर्कस्थान दिसण्या पेक्षा त्याच जास्त दिसतात. परदेशातील प्रवासवर्णन करणारी पुस्तकं कमीच आहेत मराठीत - त्यामुळे आहे त्या पुस्तकांमधे त्यांच्या पुस्तकांचा बोलबाला जास्त आहे.
गौरी देशपांडेंची एक दोनच पुस्तकं वाचली आहेत मी. आता बाकीची मिळवून वाचीन म्हणते. (असामी, लालू, स्वाती बघताय ना इथे? )
shonoo,
<प्रवास वर्णनांमधे थेरो राहिला ना<>
माफ करा, मला संदर्भ नाही कळला..
मीना प्रभू lonely planet पुढ्यात ठेवून पुस्तकं लिहितात असंच वाटतं. उगीच ओढून ताणून आणलेली ऐतिहासिक माहिती, आणि साधारण स्वरूप सगळ्या पुस्तकांचं सारखंच. मराठीत बरी प्रवासवर्णनं नाहीत, म्हणून त्यांचा बोलबाला आहे..
पण पद्मजा फाटकांचं 'आवजो', आणि मृणालिनी जोगळेकरांचं 'प्रवासिनी', आणि 'रंग अमेरिकेचे' मस्त आहे..
तसंच शोभा चित्रेंचे अनुभवकथनांचे ३ भाग, आणि शोभा बोंद्रे यांचं 'लेगोसचे दिवस'..
अरुणा ढेरे यांनी पण काही प्रवासवर्णनपर लेख लिहिले आहेत..खूप छान आहेत ते.. पुस्तकाचं नाव विसरलो.
शोनू, अगदी मी हेच लिहिणार होतो.. पॉल थेरॉ राहिला की प्रवासवर्णनांच्या यादीत.. तसेच इंग्रजी मध्ये भन्नाट प्रवास केलेल्यांच्या अनुभवांवरची पुस्तके पण भरपूर आहेत.. जसे मार्क शँड..
ओके, paul theraux.. त्याचं dark star safari वाचलं होतं.. आणि एक anthology..
टण्या,
mark shand चं travels on my elephant मी वाचलं आहे..
samit sawhneyचं all the world is a spittoon एकदम भन्नाट आहे..
kaveri nambisanचं the pilgrimage पण मस्त.. dervla murphy, martha gellhorn यांची सगळी पुस्तकं वाचली आहेत..
आणि हो, विक्रम सेठचं From heavens lake...