Submitted by विशाल कुलकर्णी on 4 January, 2011 - 06:55
हसावे तू .., तुझ्यासाठी रडावे वाटले होते
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते
पुन्हा हा आठवांचा घोळ मी घालायचा नाही
मलाही तू जरासे आठवावे वाटले होते
कशाला तीच खोटी कारणे (?) भांबावलो आहे
तुझ्या रागावण्यासाठी रुसावे वाटले होते
जगाला काय सांगावे नवे आभास दु:खांचे
तुझ्या हास्यात मी गुंतून जावे, वाटले होते
जगाचे बोलणे आता मला ऐकायचे नाही
तुझ्या ओठावरी तेव्हा ठसावे वाटले होते
अताशा वेड हे माझे मलाही पेलणे नाही
विशाला, का तुला तेव्हा हसावे वाटले होते?
डॉ. कैलास यांनी दिलेल्या "कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते" या ओळीवरून खरडलेल्या काही ओळी.
गुरुजनांच्या मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत...
विशाल...
शब्दखुणा:
Taxonomy upgrade extras:
शेअर करा
तुझ्या रागावण्यासाठी रुसावे
तुझ्या रागावण्यासाठी रुसावे वाटले होते>>>> मस्तच!
जगाला काय सांगावे नवे आभास दु:खांचे
तुझ्या हास्यात मी गुंतून जावे, वाटले होते >>> ओळी स्वतंत्ररीत्या मस्तच!
जगाचे बोलणे आता मला ऐकायचे नाही
तुझ्या ओठावरी तेव्हा ठसावे वाटले होते>>> हाही शेर तसाच, ओळी स्वतंत्ररीत्या उत्तम!
गझल सफाईदार झाली आहे, शुभेच्छा व अभिनंदन!
-'बेफिकीर'!
धन्यवाद बेफ़िकीरजी
धन्यवाद बेफ़िकीरजी !
आपल्यासारख्यांच्या प्रोत्साहनाने आणि मार्गदर्शनाने अजुन सफ़ाईदारपणा येत राहील अशी अपेक्षा
वा वा.. गझल अगदी गोटीबंद झाली
वा वा.. गझल अगदी गोटीबंद झाली आहे..... काही सुट्या ओळी लाजवाब झाल्या आहेत.
मतला,
जगाला काय सांगावे नवे आभास दु:खांचे
तुझ्या हास्यात मी गुंतून जावे, वाटले होते
आणि मक्ता फार आवडला.
मस्त. आवडली.
मस्त. आवडली.
धन्यवाद गुरुजी आणि अलका
धन्यवाद गुरुजी आणि अलका तुमचेही आभार
मस्त
मस्त
गझल Sundar झाली आहे, शुभेच्छा
गझल Sundar झाली आहे, शुभेच्छा व अभिनंदन!
मस्त. तुझ्या ओठावरी तेव्हा
मस्त.
तुझ्या ओठावरी तेव्हा ठसावे वाटले होते>>>
येथे ठसावे ऐवजी थोडे वेगळे, नाजूक अजून गोड वाटले असते का?
विशल्या, पहिलाच शेर सव्वाशेर
विशल्या, पहिलाच शेर सव्वाशेर आहे रे
संपुर्ण गझल आवडली.
छान जमलिये गझल, आशय आवडला..
छान जमलिये गझल,
आशय आवडला..
छान आहे...वृत्त हाताळणी आणि
छान आहे...वृत्त हाताळणी आणि काही सुटे मिसरे आवडले. विशेषतः "जगाला काय सांगावे नवे आभास दु:खांचे", "जगाचे बोलणे आता मला ऐकायचे नाही" इ.
खुप खुप आभार मंडळी
खुप खुप आभार मंडळी
मस्त ! आवडली.
मस्त ! आवडली.
विशाल आता गजलकार झालाय! छान
विशाल आता गजलकार झालाय!
छान जमलीय!
रुणुझुणू, शरददादा धन्यवाद
रुणुझुणू, शरददादा धन्यवाद

दादा, आत्ताच निर्णय देवु नका, अजुन जस्ट शिकायला सुरुवात केलीय. जेव्हा होइन तेव्हा खरे
कशाला तीच खोटी कारणे (?)
कशाला तीच खोटी कारणे (?) भांबावलो आहे
तुझ्या रागावण्यासाठी रुसावे वाटले होते>>>मस्तच खयाल
पुन्हा हा आठवांचा घोळ मी
पुन्हा हा आठवांचा घोळ मी घालायचा नाही
मलाही तू जरासे आठवावे वाटले होते...
वावा...
मस्त गझल आहे रे विशाल...!!
मस्त गझल आहे रे विशाल...!!
धन्यवाद आनंदयात्री, उपाखपा
धन्यवाद आनंदयात्री, उपाखपा
मस्त गझल....
मस्त गझल....
वा! वा!! विशाल, चांगली
वा! वा!! विशाल,
चांगली गझल.
तंत्रदृष्ट्या सफाईदार गझल.
मात्र,
पुन्हा हा आठवांचा घोळ मी घालायचा नाही
मलाही तू जरासे आठवावे वाटले होते
इथे 'घालायचा' असे का आहे?
मस्त रे विशाल.
मस्त रे विशाल.
मस्त रे विशाल्या.
मस्त रे विशाल्या.