Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
धन्यवाद रॉबीनहूड आणि इब्लिस.
धन्यवाद रॉबीनहूड आणि इब्लिस.
शिंक आली तरी<<< सदाशिवपेठेत
शिंक आली तरी<<<
सदाशिवपेठेत मशिदी<<<
एकेकाळी सदाशिव पेठेत फक्त भाज्यांचे स्टॉल्स, देवळे, वाण्याची दुकाने आणि नारळ, परकर, लंगोट व रद्दी असे व्यवहार एकाच छत्राखाली आणणारी दुकाने असायची. आज सर्वाधिक मटनाच्या खानावळी कुमठेकर रोडवर आहेत.
शिधये तालमीच्या बोळाजवळच्या
शिधये तालमीच्या बोळाजवळच्या दोन मांसाहारी खानावळी मी किमान १९८० पासून बघितल्या आहेत. शिवाय सपेत एक चांभारआळी अजूनही आहे. पेठेचा ब्राह्मणी चेहेरा जास्त उठून दिसत असला तरी ब्राह्मणेतरांची लोकसंख्या तिथे अगदी पहिल्यापासून ब्राम्हणांपेक्षा जास्त असावी (सर्व्हे केलेला नाही) असं वाटतं. अगदी दर आठवड्याला हमखास मांसाहारी जेवण असणारी कित्येक मध्यमवर्गीय घरं पेठेत रहाताना आसपास बघितली आहेत. पेठेत भरपूर मारवाडी लोकसंख्याही बघत आले आहे.
किंकर म्हणजे दास/सेवक.
किंकर म्हणजे दास/सेवक.
bed-rest साठी मराठी शब्द काय
bed-rest साठी मराठी शब्द काय असेल?
सक्त विश्रांती? किंवा
सक्त विश्रांती? किंवा अंथरुणास खिळून राहाणे असा?
सक्तीची विश्रांती / अंथरूण
सक्तीची विश्रांती / अंथरूण विश्रांती असा मी पण विचार करत होतेच. आणखी काही मिळाल्यास बघावे म्हणून इथे टाकले. धन्स योकु
brew / brewing ला काय
brew / brewing ला काय प्रतिशब्द असेल मराठीत?
योकु, brewing = कढवणे
योकु,
brewing = कढवणे ?
काढा, कढी या शब्दांवरून बांधलेला अंदाज.
आ.न.,
-गा.पै.
bedrest = "शैय्याविश्राम"
bedrest = "शैय्याविश्राम" चालेल ????
राजेश के, आपण प्रतिशब्द शोधत
राजेश के,
आपण प्रतिशब्द शोधत नाही आहोत. तेव्हा शैय्या विश्राम इ. गैरलागू आहे.
बेड रेस्ट हा शब्दप्रयोग विशिष्ट संदर्भात वापरतात अन त्याचा 'अर्थ' सक्तीची विश्रांती, ज्यात पलंगाखाली उतरण्याची परवानगी नाही, असा होतो. 'स्ट्रिक्ट बेड रेस्ट' याचा अर्थ, अगदी शी,शू इत्यादी शरीरक्रिया करण्यापुरतेदेखिल पलंग सोडू नये, असा वैद्यकिय सल्ला, असा होतो.
गापै, कृती पाहीली तर brew
गापै, कृती पाहीली तर brew करणे म्हणजे उकळणे, कढवणे नाही.
उकळत्या द्रावात काहीतरी वस्तू घालून आच घालवणे + वर झाकण घालून तेवढ्याच उष्णतेवर पदार्थाचा अर्क मिळवणे अशी साधारण कृती... नेमका शब्द नाही सापडला मलाही.
योगेश, अरे तूच दिला आहेस की
योगेश, अरे तूच दिला आहेस की अर्थ. brew = अर्क काढणे.
'generalisation' ला मराठीत
'generalisation' ला मराठीत काहीजण 'सामान्यीकरण' म्ह णतात.. मला ते जरा खटकते. त्या ऐवजी 'सरसकटीकरण' कसे वाटते? किंवा अधिक चान्गला शब्द काय?
भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे
भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे ’आखीव पत्रिका’ नावाची एक डॉक्युमेंट देण्यात येते. तिला इंग्रजीत काय म्हणतात?
सार्वत्रिकीकरण
सार्वत्रिकीकरण
'सालीम' जमीन म्हणजे काय?
'सालीम' जमीन म्हणजे काय?
आखीव पत्रीका= प्रॉपर्टी
आखीव पत्रीका= प्रॉपर्टी कार्ड.
वर्षा संदर्भ दे
वर्षा संदर्भ दे
सालीम जमीन हा उल्लेख एका
सालीम जमीन हा उल्लेख एका मृत्यूपत्रात आहे.
संदर्भाचे वाक्यः ..प्लॉट नंबर ..... क्षेत्रफळ .... चौरस मीटरची सालीम जागा (जमीन) त्यावर मी घर बांधलेले आहे आणि ती संपूर्ण इमारत ही माझी स्वकष्टार्जित मालमत्ता आहे....वगैरे वगैरे.
सालीम म्हणजे पडीक्/लागवडीखाली नसलेली जमीन असा अर्थ असू शकेल का? कारण या पत्रात या माणसाची दुसरी 'सालीम' जमीन आहे जी त्याने त्याच्या वारसाला विकायला सांगितली आहे (जमीनीचे वहिती करणे शक्य नसल्यामुळे)
सलग/सतल असं काहीतरी असू शकेल
सलग/सतल असं काहीतरी असू शकेल असं उर्दू सालिमचा अर्थ बघता वाटतंय.
बार्टर सिस्टिम ला नेमका मराठी
बार्टर सिस्टिम ला नेमका मराठी शब्द काय ?
ईतिहासात होते आता विसरले
बार्टर सिस्टिम...... =
बार्टर सिस्टिम...... = वस्तुविनिमय पद्धती
(असा अर्थ शासन व्यवहार कोशात दिला आहे, तो पाहून सांगत आहे.)
इथे बघा
इथे बघा
सालीम म्हणजे सेफ. सुरक्षित .
सालीम म्हणजे सेफ. सुरक्षित . कायद्याच्या भाषेत ज्याला गुड टायटल म्हनतात म्हणजे निर्विवाद हक्क असलेली अथवा अन्य कोणाचा हितसंबंध नसलेली.... त्यामुळे भविष्यात कोणीतरी काही हक्क सांगणार नाही अशी. free from all encumbarances
लोकहो, नारायण या शब्दाची फोड
लोकहो,
नारायण या शब्दाची फोड कशी करावी? तसेच त्यातून काय अर्थ अभिप्रेत आहे?
नर + अयन असा धरल्यास तो नरायण होतो. नरायण चे विशेषण नारायण्य असे होईल.
तर नारायण म्हणजे काय? नार + अयन धरावे का? नार म्हणजे काय? नरापासून उपज झालेले का?
आ.न.,
-गा.पै.
सहसा मोनियर विल्यम्स वगैरे
सहसा मोनियर विल्यम्स वगैरे शब्दकोशात नरापासून नारायण अशीच व्युत्पत्ती देतात. आम्हाला शिक्षकांनी वेगळा अर्थ सांगितला होता.
नारा म्हणजे वेदामधे पाणी, खरंतर आदिम जल (प्रायमॉर्डिअल वॉटर्स) ज्यात ब्रह्म 'रहाते'... (आठवा भारत एक खोज चं शीर्षक गीत - उस पल तो अगम अतल जल भी कहां था) त्या जलाचा अधिष्ठाता तो नारायण (लॉर्ड ऑफ द प्रायमॉर्डिअल वॉटर्स). उपनिषदांमधे नारायण विष्णूशी जोडलेला नाही, असेलच तर त्याचं ब्रह्मन्, प्रजापतिशी नातं आहे.
पौराणिक काळात जेव्हा विष्णू एक महत्वाचा देव झाला, सृष्टी धारणकर्ता (सस्टेनर) झाला तेव्हा प्रजापतिचा पैलू त्यात मिसळला आणि नारायण हेही विष्णूचंच एक नाव झालं. त्याचा आदिम पाण्याशी संबंध म्हणून तो क्षीरसागरात रहातो.
हे सगळं मी स्मृतीतून लिहिलं आहे. एकदा धूळ झटकून मूळ संदर्भ तपासून लिहेन जर काही चूकभूल असेल तर..
(जाता जाता - विष्णू हा ऋग्वेदात सौरदेव आहे - सूर्याचं सकाळ ते मध्यान्ह असं रूप आहे - तिथे त्याचं एक नाव सुपर्ण असं येतं, गरुडाशी/मोठ्या पक्ष्याशी तुलना करणारं. म्हणून मग पौराणिक काळात त्या पैलूत थोडा बदल होऊन गरुड विष्णूचं वाहन म्हणून दिसतो)
धन्यवाद वरदा! नारा म्हणजे
धन्यवाद वरदा!
नारा म्हणजे आदिम जल धरलं तर नारा आणि अयन यांचा एकमेकांशी काय प्रकारचा संबंध अभिप्रेत आहे? नाराचं अयन, की नारातून अयन, की नारामार्गे अयन? इथे अयन म्हणजे भ्रमण वा प्रवास असा अर्थ घेतलेला आहे. हेही बरोबर का?
आ.न.,
-गा.पै.
मला नक्की माहित नसल्याने
मला नक्की माहित नसल्याने काहीच लिहित नाही आत्ता. पण हे कुणा वैदिक संस्कृतच्या तज्ज्ञाला विचारायला हवंय. उद्यापरवा विचारून इथे लिहेन
वरदा, पर्फेक्ट. अन हे ज्या
वरदा,
पर्फेक्ट.
अन हे ज्या शिक्षकांनी सांगितले त्यांना नमस्कार साम्गा.
Pages