शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ तुम्ही ते झक्कींचे फार गाम्भीर्यपूर्वक घेऊ नका. झक्कीही घेत नसतात. ते तिकडे मजेत आहेत. तुम्ही आपले 'चिंता करतो विश्वाची' सोडून आम्हाला वेगवेगळ्या विषयावरची सोपपत्तिक माहिती देत चला बघू Proud

.

'लाळेरे' साठी इंग्रजी शब्द कोणी सांगेल का? शब्दकोड्यात अडला आहे. मला boa वाटतोय पण त्याचा इंग्लिश कोशात तसा थेट अर्थ नाही.

बिब म्हणतात लाळेर्‍याला.
रच्याकने, अगदी लहान बाळांना पाजून झाल्यावर पाठीवर हलके थोपटून ढेकर द्यायला लावतात. असे करताना कधी कधी थोडे दूध पण उलटून येते. ते मोठ्या माणसांच्या कपड्यांना लागू नये म्हणून, खांद्यावर घालायचं एक छोटंसं कापड अस्तं त्याला बर्प क्लॉथ म्हणतात.

'निसरसांड' असा शब्द वाचनात आला. ( मी निश्चल, निसरसांड बसून होतो.) या शब्दाचा कोशातला अर्थ विस्मरण असा आहे. मला नीट समजला नाही हा शब्द. कोणी त्याची व्युत्पत्ती सांगेल का?

'प्रिती' हे लेखन सर्वथा चूक आहे. 'प्रीति' किंवा 'प्रीती' असे लेखन योग्य आहे. संस्कृतात मूळ शब्द 'प्रीति' आहे ('प्री - प्रीणाति' या 'आनंदवणे, संतोषवणे, खुश करणे' या अर्थाच्या संस्कृत धातूपासून बनलेले भाववाचक नाम). मराठी शुद्धलेखन नियमांप्रमाणे मूळ संस्कृतातील र्‍हस्वान्त (इकारान्त, उकारान्त) शब्दांचे लेखन मराठीत लिहितेवेळी सहसा दीर्घान्त करण्याची पद्धत आहे; त्यामुळे मराठीत 'प्रीती' असे लेखन रूढ आहे. अर्थात, 'प्रीति' असे मूळ संस्कृतातील लेखनही ग्राह्य धरले जाते.

Alimentary canal & Oesophagus (or esophagus)मध्ये काय फरक आहे? दोन्हीला मराठीत अन्ननलिका म्हणतात का?

नव्हे.
Oesophagus म्हणजे अन्ननलिका. घशापासून जठरापर्यंत.
Oesophagus हा Alimentary canal चा सुरुवातीचा एक भाग.
Alimentary canal तोंडापासून गुदद्वारापर्यंतचा पूर्ण मार्ग. त्याला काय म्हणतात मराठीत?

संदर्भ इथे पहा. http://en.wikipedia.org/wiki/Human_gastrointestinal_tract

अजून एक शंका.
तोंड येणे, छाले यांना जसं 'माउथ अल्सर्स' म्हणतात, तसं त्याचबरोबर चरचरणार्‍या जिभेला काय म्हणतात इंग्रजीत?

त्याला काय म्हणतात मराठीत?
पचन संस्था अथवा अन्नमार्ग... तसा अ‍ॅलिमेन्टरी कॅनाल सारखा स्पेशल शब्द मराठी शरीरशास्त्रात दिसला नाही कोठे.

प्रीति, मराठीच्या सध्याच्या प्रचलित वापरानुसार व नियमांनुसार प्रीती, कीर्ती ही रूपे योग्य आहेत. हे व असे शब्द म्हणजे संस्कृतातून घेतलेल्या मूळ शब्दाच्या एका अक्षराचे तत्सम रूप व दुसर्‍या अक्षराचे तद्भव रूप यांची सरमिसळ केल्याचे उदाहरण आहे. (म्हणजे या काही शब्दांसाठी संस्कृतातून घेतलेल्या शब्दांसाठी जे पूर्वापार प्रचलित नियम आहेत त्यांनाही कालपरत्वे अपवाद मान्य केलेले आहेत! अधिक संदर्भासाठी सुहासिनी लद्दूंचा मराठीच्या व्याकरणावरील शोधनिबंध वाचावा.)

आर्फी, रॉबिनहूड धन्यवाद. Happy
नवनीत advanced dictionaryमध्ये दिल्यानुसार:
Alimentary canal: Alimentary means पोषणविषयक, canal:अन्नमार्ग.
थोडक्यात Alimentary canalला (शरीराच्या) पोषणासाठीचा अन्नमार्ग वगैरे म्हणता येईल असं वाटतं. पण हे फारच लांबलचक वाटतं आहे. Happy
Esophagus: अन्ननलिका.

मला माझं नावही 'दिपाली' लिहायचं की 'दीपाली' लिहायचं हे समजत नाही.... Sad
कुणी सांगेल का?

मला माझं नावही 'दिपाली' लिहायचं की 'दीपाली' लिहायचं हे समजत नाही>>> मला असे वाटते की दीप शब्दाने सुरू होणारे सर्व शब्द दी दीर्घ काढूनच लिहीतात "दीपाली", "दीपावली" वगैरे. पण दिवा ने सुरू होणारे र्‍हस्व काढून, जसे "दिवाळी".

एस्केप व्हेलोसिटी हा कन्सेप्टच कॉलेजच्या अभ्यासक्रमात पहिल्यान्दा भेटला. निदान मला तरी. तो इंग्रजीत. तोवर मराठी माध्यम होते. त्यामुळे एन सी ई आर टी ने तयार केल्लेया हायस्कुलांच्या मराठी पुस्तकात हा आढळला नाही. त्यामुळे शुद्ध तांत्रिक पारिभाषिक शब्द काही गेला नाही कधी. तसे मग वर्णात्मक भाषान्तर करता येईल काहीतरी.

अब्द म्हणजे संख्येनी जास्त.. खूप काही .. लाखाच्या घरात असाही होतो. आठवा मर्ढेकरांची कविता ...

किती पायी लागूं तुझ्या
किती आठवूं गा तूंते;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनी येते.
.
.
कधी लागेल गा नख
तुझें माझिया गळ्याला,
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला !

गौरी, तो अब्द आहे हा अब्र आहे ? संदर्भ आये कुछ अब्र कुछ खयाल आये....
कारण आब म्हणजे पाणी. उदा.: पंजाब = पाच (नद्यांचे) पाणी असलेला प्रदेश.

बी, तुमचा अब्द हा अब्ज चे लोकरुप का ? प्रामाणिक शंका.

Pages