दिडकीची भांग...

Submitted by टवाळ - एकमेव on 24 December, 2010 - 00:25

काल सहज एक नित्य टवाळी म्हणून मी कट्ट्यावर खालील जाहिरात टाकली होती:

QUOTE
====
खुषखबर ! खुषखबर ! खुषखबर !

साहित्य-संमेलनाच्या गदारोळात मी माझा पहिला-वहिला काव्य आणि चिंतनपर लेखांचा संग्रह प्रकाशित करणार आहे ! त्याचं नाव आहे -

बिभत्स मी ! अश्लाघ्य मी !

या मधे मी विविध थोर कवींना माझ्या काही कवितांपासून कशी प्रेरणा मिळाली ते थोडक्यात विषद करणार आहे. उदा. साने गुरुजींना "बलसागर भारत होवो" ची प्रेरणा माझ्याच

"नवसागर भारत सेवो, विश्वात झोकूनी राहो"

या जगप्रसिद्ध कवितेवरुन मिळाली. ई. ई.

या ओघात मी मा.बो. वरच्या काही लोक-प्रिय कविंचाही पोल्-खोल करणार आहे. तेव्हा संबंधितांनी सांभाळून रहावे !

आपला नम्र,
टवाळ

UNQUOTE
======

हा अर्थातच माझ्या कडून आणि माझ्या पद्धतीचा निषेध होता (मी दुसरं काय करतो म्हणा). ज्यांना तो कळला त्यांच्यासाठी आणि नाही कळला त्यांच्यासाठीही मी हा महान लेख लिहीतो आहे. मला निषेध करायचा आहे तो सध्या मायबोलीवर बोकाळलेल्या विडंबनांचा आणि अ-कारण दिलेल्या काव्य्-झब्बूंचा.

लो. टिळकांनी (म्हणे) एका भाषणात (किंवा अग्रलेखात) असं म्हटलं होतं की

"दिडकीची भांग घेतली की वाट्टेल त्या कवि-कल्पना सुचतात"

या त्यांच्या वाक्याला संदर्भ नक्कीच त्यांच्या आक्रमक विचारांना विरोध करणार्‍यांचा किंवा त्यांना न पटणार्‍या एखाद्याच्या मुर्ख विचारांचा असणार. पण त्यांच्या पश्चात असंख्य वक्त्यांनी आणि लेखकांनी या वाक्याचा उपयोग कविंची हेटाळणी करण्यासाठीच केला. वास्तविक पहाता लो. टिळक हे काव्यप्रांतातील औरंगजेब नक्कीच नव्हते हे त्यांनी लिहीलेल्या "गिता-रहस्या" वरुन लक्षात येते. काव्याप्रती हेटाळणीचे विचार असणारा माणूस गितेसारख्या महाकाव्याकडे वळूच शकत नाही. तसंच आचार्य अत्र्यांनी विडंबनं केली म्हणून कुणीही सोम्या-गोम्या उठून रोज विडंबनं पाडायला लागला तर ते हास्यास्पद ठरतं. मुळात अत्र्यांच्या विडंबनाना त्यांच्या राजकिय आणि सामजिक कार्याचा आधार होता. "आम्ही कोण" थोडे सारखे अपवाद वगळता त्यांच्या बाकी विडंबनांना फार काही साहित्यीक मुल्य होतं हे स्वतः अत्रे ही मान्य करत नसत. काव्य करणं ही जर कृती असेल तर चांगल्या काव्याचं विडंबन करणं ही विकृती मानली पाहीजे. (सध्या "विकृतीनाम संवत्सर" चालू असल्याने बहुधा या प्रकाराला जास्त ऊत आलाय).

जगात कुंभार थोडे आणि गाढवे फार - असं पु.लं. म्हणाले. ते अगदीच खोटं नाही. कुसुमाग्रजांच्या अजरामर "म्यानातुन उसळे तरवारीची पात" या काव्याचं माझ्यासारखा (गाढव) जर -

"बाटलीतुन उसळे मदिरेची ती लाट
तर्राट मराठे विर झिंगले आठ"

असलं विडंबन करु लागला तर लोकं कुसुमाग्रजांची नाही, माझ्या बुद्धीची किंव करतील. नव्हे ती तशी केलीच पाहिजे. तिच गोष्ट काव्य-झब्बुंची. काव्य-झब्बु जर वेगळं लेखन म्हणून लिहीला गेला तर कदाचित ते मान्य होईल. कारण एकाच प्रकारची कल्पना एकाच वेळी वेगवेगळ्या लोकांच्या मनात येणं किंवा एखाद्याने आपल्या काव्यात मांडलेल्या कल्पनेवरुन दुसर्‍याला प्रेरणा मिळणे स्वाभाविक आहे. पण त्याच काव्याखाली दुसर्‍या एखाद्याने (स्वतःची महानता / ओरिजिनॅलीटी सिद्ध करण्यासाठी) आणखी काही खरडून मुळ कल्पनेकडे लोकांचे दुर्लक्ष होईल असा प्रयत्न करणं म्हणजे विडंबन होय.

मायबोलीवर दर्जेदार नव-कुंभारांच्या प्रतिक्षेत -

आपला नम्र,
टवाळ Proud

गुलमोहर: 

टवाळा, मी आताशा नवीन लेखन च्या ऐवजी माझ्यासाठी नवीन, वरच टिचक्या मारत राहतो, यातच सगळे आले.

मास्तर, मला आताशा नवीन कल्पना सुचत नाहीत असं मी तूम्हाला पर्वाच बोललोवतो.

त्यावर तूम्ही हा उपाय सुचवाल असं वाटलं नव्हतं Wink

बघतो ट्राय करुन Proud

लय भारी लिवलय! Happy अगदी ठसठसती जखम

झब्बू मोड ऑनः
>>>> बाटलीतुन उसळे मदिरेची ती लाट
>>>> तर्राट मराठे विर झिंगले आठ

ह्याच्यात आठच का घेतले? साठ घेतले अस्ते तरी यमक (अन वास्तवही) जुळ्ळे अस्तेच की!
झब्बू मोड ऑफ.

पेटलायस भावा Happy
अर्थात विडंबन आणि विटंबन यातला फ़रक ज्यांना कळला आहे त्यांनाच या आवाहनामागची सच्ची आणि निरपेक्ष भावना कळेल Wink
१०००००० मोदक तूला Happy

आपण सर्व हे का विसरतो की मायबोली नवोदित लेखक / कवी यांना प्रोत्साहन देण्यासाठी पण आहे.

नितीनदा काहीतरी गोंधळ होतोय. टवाळचा आक्षेप नवीन कविता किंवा लेख तसेच नवीन कवी किंवा लेखक यांना नाहीये, उठसुठ विडंबने ते ही पुरेसा दर्जा नसलेली पाडण्याला आहे. Happy

विशालला अनुमोदन
सत्य आठवण मोड ऑन
काये ना की मला आठवतय, लहानपणी जेव्हा मला पहिल्यान्न्दा पाटीवर (अर्ध्या वाट्या उभ्या आडव्या रेषा वगैरे न समजुन घेता) आईने शिकवल्या प्रमाणे अ लिहीता आला तेव्हा मी उठून दाखवायला गेलो. आईने कौतुक केले
मग मी आ काढला, तो दाखवायला गेलो, आईने छान छान म्हणून कौतुक केले, भरपुर गिरव आणि अजुन काढ असे म्हणाली
नन्तरचे प्रत्येक अक्षर मी दाखवित सुटलो, तेव्हा शेवटी आई कावली अन म्हणाली, हे उठसुठ प्रत्येक अक्षर काय दाखवतोस मला? ते तस तर यायलाच हव, पण ते अधिक सुवाच्य, वळणदार, आणि भरभर लिहीता यायला हवे, मला हगल्यापादल्या प्रत्येक गिरवलेल दाखविण्यापेक्षा तुझा तूच समजुन घे अन भरपुर सराव कर. मला, प्रत्येक अक्षरानन्तर "कौतुक स्विकारण्याची" सवय तुला लावायची नाहीये! एक वेळ अशी येईल, यायला पाहिजे की तुझे तुच ठरवू शकशील की तू केलेस ते योग्य की अयोग्य, आणी कितिक सुधारणा व्हायला हव्यात. अस उठसुठ पावलोपावली दाखवित सुटू नये, लोक कण्टाळतात मग!
अग पण लोक कुठाहेत इथे, आई तुच तर आहेस ना?
अरे हो, पण मी आई आहे म्हणूनच हे तुला सान्गत्ये, लोक सान्गणार नाहीत, हिडीसफिडीस करतील किन्वा दुर्लक्ष (हल्लीचा अनुल्लेख तर नव्हे? Proud ) करतील.
सत्य आठवण मोड ऑफ
थोडक्यात काय? तर "नवोदितपणाचेच" भान्डवल करू नये. लौकर वरघटाव

टवाळ.. चांगला लेख..
लिंबूटींबू.. पोस्ट आवडली.. Happy

टवाळा विचार आवडले....
आणि लिंबूटिंबू तुमची पोस्ट तर तुफान आवडली...
कौतुक होतंय म्हणून सरसकट सगळ्या गोष्टी आपण माबोवर तर टाकत नाही ना या विचाराने अस्वस्थ झालोय....
तुमच्या पोस्टने चांगलेच झणझणीत अंजन घातले आहे नवोदितांच्या डोळ्यात...

मूळ लेखाबरोबरच त्यावरची (झब्बू नसलेली) माझी पोस्ट आवडल्याचे आवर्जुन सान्गणार्‍या सर्वान्चे मनःपूर्वक आभार Happy
[थ्यान्क्स गॉड, अस्ल्या पोस्टी टाकायला मला दिडकीची भान्ग घ्यावी लागत नाही, देवदयेने आपोआप सूचतात, पण खरोख्खरची भान्ग घेतली तर काय होईल बरे? Proud ]

Pages