लवासा - एक गझल (????)

Submitted by भुंगा on 17 December, 2010 - 00:32

डॉ. कैलास यांनी सुचवलेला पहिला शेर घेऊन पुढचं लिहिलय..... कल्पना नाही ही गझल आहे की नाही. जाणकारांनी मार्गदर्शन करावे....... काय आहे ते नक्की ठरल्यावर काहीच्या काहीतून हलवेन.
चु.भु.द्या.घ्या.

कुणा स वाटे नको नकोसा,कुणास वाटे हवा हवासा
प्रकल्प आले,हजार गेले,सदैव चर्चेमधे लवासा

अजुनी खुणवितो आभाळातील बागडणारा एक थवासा
निसर्ग सारा लयास जाता, निघती पक्षी दूर प्रवासा

शहर असावे सूनियोजित, म्हणूनी चालला खटाटोपसा
जिवंत गावे उखडुनी देती शहरी जीवा एक निवासा

चर्चा, चळवळ, मोर्चे, पुस्तक बाजारातील प्रपंच खासा
जमीन विकली, विकला माणूस सौदा पक्का नवानवासा

राजकारणी हेतू ठेऊन सत्ता टाकी नवीन फासा
अस्तित्वाची आता लढाई खेळुनी पाही पुन्हा लवासा

छान जमलिये भुंग्या.
बाकी आपल्याला ते गझल वगैरे काही कळत नाही पण कविता खुप आवडली. अगदी मार्मीक टिप्पणी आहे.

अरे वा?

मस्तच की!

आता कैलासरावांकडून हिरण्यकेशीमधे (ध्ये नव्हे बर का? मतल्यातील सानी मिसर्‍यात आहे तसा) बसवून घ्या!

उत्तम!

-'बेफिकीर'!

तंत्रात बसत नाही. म्हणून गझल म्हणता येणार नाही. सध्या इथेच राहू दे. थोडे कष्ट घेतलेस तर नक्की हलवता येईल. भुंग्या, गझल लिहू शकशील सहज. तंत्र शिकून घे. मंत्र समजून घे. फक्त यंत्रवत गझला पाडू नकोस.

भुंग्या मस्त लिहिलं आहेस, गझलेचं आपल्याला कळत नाही. पण जेव्हा मला कळेल तेव्हा मी हे 'गझल' समजूनच वाचेल रे. Happy

बाकी कौतुकशी एकदा बोलून घे. Happy

मस्त आशय!

गझल करावयास पहिली द्विपदी सोडून(ध्ये चा धे करावा लागेलच) बाकी सर्व द्विपदींमधे योग्य ते बदल करावे लागतील. तसे केल्यास छान "मुसल्सल" गझल होईल.

धन्यवाद आणि शुभेच्छा!!

छानच!

मस्तय ! गझलचं तंत्र मलाही कळलेलं नाही.( खरंतर कळवून घ्यायचा प्रयत्नच केलेला नाही.) पण कविता म्हणून चांगली झाली आहे.

भुंग्याम
भन्नाट जमलयं !
Happy

राजकारणी हेतू ठेऊन सत्ता टाकी नवीन फासा
अस्तित्वाची आता लढाई खेळुनी पाही पुन्हा लवासा

सरकार नावाच सोंग मग कारवाईच ढोंग करिशी थोडासा
पुन्हा त्याला हिरवा कंदील दाखवुन देती पुन्हा दिलासा...

(सांभाळुन घ्या....)

मस्त !
कौतुक >>>भुंग्या, गझल लिहू शकशील सहज. तंत्र शिकून घे. मंत्र समजून घे. फक्त यंत्रवत गझला पाडू नकोस. <<< एकदम सोला आने सच बात ! Happy

गझल नाही म्हणता येणार असं मला वाटतं .
पण गझलेच्या दृष्टीने वाटचाल आहे. म्हणजे एकदा तंत्र कळाले कि तुम्हाला अजिबातच अवघड जाणार नाही हे कळून येतंय. तुम्ही लिहा गझल. नक्की लिहा.

बेफिकीर, डॉक्टर आहेतच. सुरेश भट डॉट इन वर पण तुम्हाला जाता येईल. ऑर्कूटवर गझल अभ्यासिका नावाची नीरज कुलकर्णीची कम्युनिटी आहे. तिथं तुम्हाला गझलेसाठी आवश्यक वृत्तंही मिळून जातील.

शुभेच्छा !