मालवणच्या प्रेमात - भाग ३ - तारकर्ली

Submitted by नील. on 15 December, 2010 - 09:14

तारकर्ली पहाट
Tarkarli 8.jpg

तारकर्ली सुर्योदय १
Tarkarli 7.jpg

तारकर्ली सुर्योदय २
Tarkarli 9.jpg

तारकर्ली सकाळ १
Tarkarli 10.jpg

तारकर्ली सकाळ २
Tarkarli 11.jpg

तारकर्ली समुद्र किनारा दुपार १
Tarkarli 1.jpg

तारकर्ली समुद्र किनारा दुपार २
Tarkarli 15.jpg

तारकर्ली सुर्यास्त १
Tarkarli 2.jpg

तारकर्ली सुर्यास्त २
Tarkarli 3.jpg

तारकर्ली सुर्यास्त ३
Tarkarli 4.jpg

तारकर्ली सुर्यास्त ४
Tarkarli 5.jpg

तारकर्ली सुर्यास्त ५
Tarkarli 6.jpg

वडे सागोती
Tarkarli 12.jpg

कोलंबी ताट
Tarkarli 13.jpg

मी आणि ओम
Tarkarli 14.jpg

------------------------------------------------------------------------------------------------------------------
मालवणच्या प्रेमात - भाग १ - चिवला आणि परिसर
http://www.maayboli.com/node/21863

मालवणच्या प्रेमात - भाग २ - किल्ले सिंधुदुर्ग
http://www.maayboli.com/node/21893

गुलमोहर: 

मस्त!

वा वा! सही फोटो. तारकरलीबद्दल अजून माहिती लिहा. तिथे अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्ट्स बरेच आहेत असं ऐकलं आहे. त्यातलं तुम्ही काही केलं का?

<<मला तार्कर्ली पण एखाद्या फिशचेच नाव वाट्ते.>> आश्विनजी, एखाद्या कां, दोन फिशची नांवं दडलीत त्यात - तारली आणि करली ! पण कर्ली नदीवरची महत्वाची व जुनी कोरजाई ते देवबाग ही "तर" [फेरी सर्वीस] तिथं आहे, म्हणून तारकर्ली नाव पडलं असावं, ही शक्यताच अधिक आहे.

काय सुरेख फोटो आलेत. अप्रतिम!
पूनमला अनुमोदन. तारकर्ली अजुन माहिती लिहा. तिथे जाण्याचा प्लॅन लवकरच बनवायचाय.

सही Happy

धन्यवाद....

भुंगा,
अरे स्नोर्केलिंग नाहे करु शकलो. वारावरण ढगाळ असल्याने काही दिसणार नाही असे कळ्ले. Sad

आशुचँप,
अरे दुपारी मस्त आभाळ भरुन आलं होतं... दुर समुद्रात पाउस पडत होता आणि किनार्‍यावर उन....

बंडुपंत, सुकी,
महाराजांचं चित्र असलेलं टी शर्ट मुलुंडमध्ये घेतलं.

शेवटची ३ फोटो मस्त... Lol (पाणीच आले एकदम वडे सागुती बघून रे!!! जल्ला...)

कोणी कुठले ताट खाल्ले ते कसे कळणार???
तूच खाल्ली असतील बहुदा दोन्ही... Lol

<< तारकर्ली अजुन माहिती लिहा.>>अमृताजी व इतराना असलेलं तारकर्लीबद्दलचं कुतूहल काही प्रमाणात मी शमवू शकतो असं वाटलं, म्हणून हा उपद्व्याप -
फार पूर्वी- कदाचित दोनशे वर्षांपूर्वी- कर्ली नदी [ कुडाळच्या आसपास तिला "भंगसाळ" नदी म्हणतात ] मालवणपासून ४-५ किलोमीटरवर असलेल्या तारकर्लीच्या जवळ समुद्रास मिळत असे. हळुहळू तेथेच समुद्रात एक चिंचोळा लांबच्या लांब वाळूचा पट्टा तयार होत गेला;उत्तराभिमुख असलेली ही नदी मग यू-टर्न घेऊन दक्षिणेकडे वळली व त्या वाळूच्या पट्ट्याच्या आंतल्या बाजूने येवून आताच्या भोगवे या ठीकाणी समुद्रास मिळाली. त्यामुळे तारकर्लीपासून भोगव्यापर्यंत फक्त कांही फर्लांग रुंदीचं, मुख्य भूभागाला नाममात्र जोडलेलं ४-५ किलोमीटर लांबीचं एक बेटच तयार झालं [एका बाजूला समुद्र व दुसर्‍या बाजुला कर्लीची खाडी ]. तिथं मग वस्तीही होऊं लागली, नारळीच्या, रेताड जमिन व खार्‍या वातावरणात वाढणार्‍या झाडांची लागवड झाली. अन, दृष्ट लागावी अशी सुंदर "देवबाग" निर्माण झाली ! रीअली, अ साईट फॉर गॉडस !!

माडांच्या बागा, समुद्राच्या बाजूला स्वच्छ ,सफेद वाळूचा लांबच्या लांब किनारा. खुला, निळाशार समुद्र व क्षितिजाच्या बाजूला सतत दिसणारा सिंधुदूर्ग व निवतिचा द्वीपस्तंभ, तर आंतल्या बाजूला खार्‍या पण स्वच्छ पाण्याचं खाडीचं रुंद पात्र, व पैलतरी माडांची झालर ल्यालेले हिरवेगार डोंगर हे तारकर्ली-देवबागचं वैशिष्ठ. [प्रदूषण करणारा कोणताही उद्योग या नदी/खाडीच्या तीरावर नसणं, हेही आताचं एक दुर्मिळ वैशिष्ठ्यच !].मोठ्या लाटा व खोली यामुळे इथला समुद्रकिनारा पोहण्यासाठी मात्र योग्य नाही. पण आता खाडीतुन व समुद्रात फिरवून आणणार्‍या होड्यांची चांगली सोय झाली आहे.[ डॉल्फीन व सी गल्स दर्शनाचीही संधि आहे ] "स्नॉर्केलींग"चीही हवामान अनुकूल असल्यास सोय आहे. इथला समुद्र प्रदूषण विरहीत असल्याने व तापमान, खडक इ.च्या अनुकूलतेमुळे इथं आंतराष्ट्रीय दर्जाचं "ओशन पार्क" निर्माण करण्याची योजना तयार आहे पण काही स्थानिक अडचणींमुळे अजून ती कार्यान्वित होत नाहीय.

ताजे समुद्रातील व खाडीतील मासे, शहाळी, नारळ हे येथील आकर्षण आहेच पण इथल्या शेवग्याच्या शेंगानाही विशेष सुंदर स्वाद असतो, हे बर्‍याच जणाना माहित नाही.

देवबागच्या भोगव्यासमोरच्या टोंकाला [जिथं खाडी समुद्राला मिळते ]मोबार म्हणतात. इथं संध्याकाळी उभं रहाण्याचा एक वेगळाच थरार असतो. पण इथंही तयार होत असलेला वाळूचा पट्टा पाहून देवबागच्या भवितव्याची चिंताही वाटते. खाडीचं पाणी कितीही भरती असली तरी देवबागेत येत नाही [ अपवाद - सुनामीच्या वेळी मात्र कांही घरांच्या पायरीपर्यंत पाणी आलं होतं] पण आठ-दहा वर्षांपूर्वी समुद्राच्या बाजूने मात्र देवबागेवर आक्रमण होण्याची स्थिती निर्माण झाली होती. देवांनीच निर्माण केलेली बाग आहे, तेंव्हा तेच समर्थ आहेत रक्षणकर्ते म्हणून !

मी खास संशोधन नाही केलेलं पण माहितगारांकडून हे सर्व पडताळून घेतलंय. कारण लहानपणापासूनच
जीव गुंतलाय त्या परिसरात !

Pages