Submitted by जया एम on 15 December, 2010 - 05:15
तुझ्या दिठीत मिटले काही उबदार क्षण, त्यांना सोनकळा आली
एका रेशीमवेळेला मीही मोग-याची उन्हे तुझ्या ओंजळीत दिली
तुझे प्रेयस पाऊल दूर तिन्हीसांज होता माझ्या दारात पडले
पाचू होऊन खुलले माझे अधांतरी मन, निळ्या कोंदणी जडले
तुझे हिमानी पाखरू त्याचे केवड्याचे पंख आता मिटून घेईल
मग दूरच्या वा-याचा एक सुगंधी निरोप तुला शोधत येईल
कुठे शहाण्या गावाला शुभ्र चांदण्याची नदी बांध सोडून वाहील
तेव्हा चाफा शहारेल, एक कांचनी शपथ तुला घालून जाईल
सारे खेळ जीवघेणे, चांदण्याने मोग-याला काय घालावे उखाणे
देवाघरचे पाखरू त्याच्या चोचीत भरुया चल मोतियाचे दाणे
गुलमोहर:
शेअर करा
व्वा... क्या बात है... खूपच
व्वा... क्या बात है... खूपच छान..
तुझे हिमानी पाखरू त्याचे केवड्याचे पंख आता मिटून घेईल
मग दूरच्या वा-याचा एक सुगंधी निरोप तुला शोधत येईल
काय ओळी आहेत.. खूप सुरेख.. मस्तच...
http://merakuchhsaman.blogspot.com/
आवडली
आवडली
केवळ अप्रतिम..!! जयाजी
केवळ अप्रतिम..!! जयाजी तुमच्या सगळ्याच कविता अक्षरश: वेड लावतात..प्रत्येक शब्दांत ताजेपणा असतो. नवेपणा असतो..
चांदण्याने मोग-याला काय
चांदण्याने मोग-याला काय घालावे उखाणे>>>>वा वा
मस्त कविता
खरच छान! सारेच खेळ
खरच छान!
सारेच खेळ जीवघेणे....! सुरेख!!
सुंदर.
सुंदर.
सुंदर, सुंदर, सुंदर!
सुंदर, सुंदर, सुंदर!
छान कविता.
छान कविता.
अप्रतिम!
अप्रतिम!
चांदण्याने मोग-याला काय
चांदण्याने मोग-याला काय घालावे उखाणे>>!!!
खास!
सुंदर
सुंदर
सारे खेळ जीवघेणे, चांदण्याने
सारे खेळ जीवघेणे, चांदण्याने मोग-याला काय घालावे उखाणे
देवाघरचे पाखरू त्याच्या चोचीत भरुया चल मोतियाचे दाणे
दिल को छू गये आप तो...!!! खूप खूप म्हणजे खूपच आवडली!!!!
वाह!!!
वाह!!!
मस्त
मस्त
हाय.... (काहीतरी.... विलक्षण
हाय....
(काहीतरी.... विलक्षण देखणं, भुरळ घालणारं, वेड लावणारं वाचल्याचा अनुभव आहे...)
आज आता यापुढे काहीही वाचायचं नाही.... हा माझा ह्या कवितेला सलाम!
काय सुरेख!
काय सुरेख!
सारे खेळ जीवघेणे, चांदण्याने
सारे खेळ जीवघेणे, चांदण्याने मोग-याला काय घालावे उखाणे >>> वाह ! काय सुंदर शब्दरचना !
क्या बात!
क्या बात!
सह्हीये...... केवळ अप्रतिम
सह्हीये...... केवळ अप्रतिम .....
खजिना यालाच म्हणतात का?
खजिना यालाच म्हणतात का?
शप्पत!!
शप्पत!!
सुंदर ! एरव्हीं गूढ वाटतील
सुंदर !
एरव्हीं गूढ वाटतील अशा प्रतिमाना गोंडसपणे कवितेत चपखलपणें बसवणं .. मानलं !!
स्फटिकासारखे शुभ्र तेजस्वी
स्फटिकासारखे शुभ्र तेजस्वी काहीतरी वाचताना वाटत रहाते.
अप्रतिम..!
अप्रतिम..!
सुंदर. तुमच्या कविता शोधून
सुंदर. तुमच्या कविता शोधून वाचते आहे आता.