निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा हल्ली दिसण्यात नाही आलीत बांडगुळ पण दिसल्यावर फोटो काढल्याशिवाय राहणार नाही. माझ्या माहेरी होती ती पण आंब्यावरच होती.

मामी ती अहमदाबादी बोरे येतात बाजारात पण त्यांना गावठी बोरांची चव नसते. थोडी पाणचटच लागतात. त्यातुन हल्ली संकरीकरण त्यातील मुळ गोडवा काढुनच टाकत आहे.

अहमदाबादी बोरे वेगळी आणि मेवा वेगळा. बोरे माहितीच आहेत सगळ्यांना. मेवा पिवळाधम्मक असतो आणि आत काळी बी असते.

पिवळी आणि मेव्यावरुन आठवल अजुन एक रान मेवा रांजण माहीत आहेत का ? त्यात चिक असतो खाताना लागतोही कच्चट असतील तर घासही बसतो. पण पिकलेल्या रांजणांची चव खुप मधुर असते. त्यात चिकुसारखी छोटी बी असते.

अंबोली ही जागा भौगोलिक दृष्ट्या एकमेव आहे.

आंबोली खरेच एकमेव आहे. जगातला सगळ्यात लहान पुर्ण वाढ झालेला बेडुक फक्त इथेच सापडतो. अतिशय दुर्मिळ असलेल्या वनौषधी इथे सापडतात. एकदा महादेवगडावर गेलो होतो. त्याचे ते टकमक टोक आहे ना, तिथुन एक जोडपे रॅपलिंग करुन वर येत होते, वनौषधी घेऊन...

http://natureindiatour.blogspot.com/2010/06/amboli-ghat-biodiversity-hot...

http://www.amboliww.com/

(रच्याकने, ह्या विसलिंग वुड्स हॉटेल चे बांधकाम माझ्या काकाने केलेय. माझेही घर अर्थात त्यानेच बांधलेय आणि आता इतक्या वर्षांनी स्वत्:चे घर रिपेअर करतोय Happy )

दिनेशदा,
या फोटोतले बरचसं मला तर नविनच आहे,
फक्त फोटो ३ मधलं जे आहे, त्याची काही झाडे गावाकडे ओढ्याकडेला होती, लहानपणी आम्ही खात होतो,च व बरी (थोडीशी गोड) लागते, गावाकडे बरेचजण कन्नड मध्ये याला 'सुंबळकाई' (सुंबळ म्हणजे शेंबुड,कारण तसाच (दिसणारा) द्रव त्यात असतो) म्हणताना पाहिलयं, मराठीत काय म्हणतात ते माहित नाही .
कन्नडमध्ये जसं वांग्याला 'बद्नीकाई' म्हणतात,कन्नड भाषेत बहुतेक फळांना 'काई' हा शब्द शेवटी असतोच
Happy

जागू, मग त्यालाच अहमदाबादी मेवा म्हणत असावेत.

व्हेनेझूएला च्या सीमेवर असाच एक दुर्मिळ वनस्पती असणारा पर्वत आहे. त्यावे नाव रोरायमा.
त्याच्या कडा उभ्या सरळसोट आहेत. त्या डोंगरावर अतोनात पाऊस पडतो पण त्या पावसामूळेच तिथल्या जमिनीतले बहुतेक क्षार वाहून जातात. ढगांमूळे सूर्यप्रकाशही अडतो. (अंबोलीतही साधारण अशीच स्थिती आहे.) या सर्वांमूळे तिथल्या वनस्पती अनोख्या झाल्या आहेत. क्षार मिळवण्याच्या वेगवेगळ्या आयडिया त्यांनी लढवल्या आहेत. (त्यापैकी काही शिकारही करतात. कांस मधेही साधारण असेच आहे.)
या वनस्पतीनी जे गुण मिळवले आहेत ते बाकिच्या ठिकाणी कुचकामी आहेत किंवा बिनगरजेचे आहेत. अशा वनस्पति मग बाकिच्या ठिकाणी जगू शकत नाहीत.

केनया मधे असलेला माऊंट केनया पण असाच अनोखा. ऐन (विषुववृत्त) एक्वेटॉर वर असूनही तो बर्फाच्छादीत असतो. रोज रात्री गोठवणारी थंडी तर दिवसा गरम, असे हवामान असते तिथे. पण याही वातावरणात अनोख्या वनस्पती तग धरून आहेत तिथे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ध्रुवीय प्रदेशातील वनस्पती, उंची कमी ठेवतात, तर इथल्या वनस्पती, उंच वाढून देखील स्वतःचे संरक्षण करतात.
या वनस्पतींचे काही नमुने मला माझ्या आजूबाजूला देखील दिसत असतात.

अनिल, आधी माहीत असतं तर ते फळ खाल्लं असत मी. तू म्हणतो आहेस तेच असावं. आत तसाच चिकट द्रव होता.
पण जंगलात भटकताना एक नियम लक्षात ठेवावा लागतो, तो म्हणजे अनोळखी फळे, कितीही आकर्षक दिसली तरी खाऊ नयेत.

दिनेशदा पण ती रांजणे (अहमदाबादी मेवा) आमच्याइथेही होतात.

होय.... नेरुळला दक्षिणेस टेकडीवर बालाजी मंदिर आहे .. त्याच्या समोरच गावचा पाठीराखा म्हणून ओळखला जाणारा झोटिंग देव आहे..या देवावर सावली धरुन हा ''रांजणे'' देणारा वृक्ष आहे. चैत्रात्,म्हणजे साधारणता अप्रील महीन्यात याला पिवळीधमक मधुर फळे येतात... तोच हा अहमदाबादी मेवा. ग्राम्य भाषेत याला ''रान्ना'' असं म्हणतात.

अरे वा, डॉ मला आता यायलच हवं तिथे.
मी दिल्ली सावरचा उल्लेख केला होता. आमच्याकडे आता फूललीय. हा फोटो काढताना हवा नेहमीप्रमाणेच ढगाळ होती. हि सावर भरभरून फूलते. नावाप्रमाणेच दिल्लीत भरपूर आहे. मुंबईत माझ्या बघण्यात तरी नाही.

या झाडाला तूम्ही चेंगटच म्हणाल कि नाही ? लहानपणापासून पठ्ठ्यने एकही पान गाळलेले नाही. आहे हे पाम कूळातलेच. या पानांना राखून ठेवण्यात काहीतरी "विचार" नक्कीच आहे. बघा विचार करुन !

आकर्षक फूले निर्माण करण्यात ऑर्किडप्रमाणेच निवडूंग पण पटाईत असतात. इथे अनेक प्रकारची फूले, अगदी रस्त्याच्या कडेनेदेखील दिसतात.

आणि हो मी वेडाच. दिसतील तिथे गुलाबांच्या फूलांचे फोटो काढत बसतो.
पण हे असे निसर्गशिल्प समोर असल्यावर, दूसरे करावे तरी काय ?

ही फळे पण अंबोलीलाच, पूर्वी जिथे आयुर्वेदिक झाडांची बाग होती, तिथे दिसली होती. अगदी मौल्यवन रत्ने दिसताहेत कि नाही ? आत चिकट पारदर्शक रस होता. >> दिनेशदा या रसाने आम्ही लहानपणी कागद चिकटवायचो.
नविन फोटो छान.

साधना,
<<हा माणुस खरेच भाग्यवान. याला मुळात जंगलाची/झाडांची ओढ होती. आणि नोकरी लागली ती नेमकी वनपाल म्हणुन... असे भाग्य पाहिजे. अर्थात फिरती असल्याने त्यांना काय कमी त्रास झाला नाही पण निदान आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळाले हेही नसे थोडके....>>> अनुमोदन. त्यांचे वाचन आणि अभ्याससुद्धा प्रचंड आहे.

आता इथे १० पानं झाली आहेत. कुठल्या पानावर काय आहे ते शोधायला फार वेळ जाणार. तर ओरिजिनल पोस्ट मधे याची माहीती टाकुयात का? जागुला मधेमधे अपडेट करत बसावं लागेल पण निदान शोधायला सोपं जाईल.
आत्तापर्यंतची लिस्ट मी देते. जागू वरच्या पोस्ट मधे अपडेट करशील का प्लिज?

पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

सावली हे अत्यंत महत्वाचे काम आहे आणि ते नेटाने करायलाच पाहिजे. लिहिण्याच्या नादात मी वहावत जातो, जागू शिस्त लावेल अशी आशा आहे.
त्या फळांसारखीच फळे मला तिवरांच्या जंगलात पण सापडली होती. त्याचा पण असणार फोटो माझ्याकडे.

जागू शिस्त लावेल अशी आशा आहे.
हे वेड (छंद) आहे आणि वेडाला शिस्त नसतेच.

सावली खरच खुप चांगल काम केलस. धन्स ग.

दिनेशदा...... आणि आलात म्हणजे ,याच नेरुळला ''कैलास'' नावाचा एक इसम पडीक असतो हे लक्षात ठेवून आमचे कडे पायधूळ झाडायला विसरु नका. Happy

हो डॉक्टर नक्कीच.
जागू, यापुढे प्रत्येक नवीन पान निर्माण झाले कि त्याच्यावरचे कि वर्डस मूख्य पानावर द्यायचे, बरं का.

हे एक अजब पाहा कंदमुळ वेलिंवर ह्या जातील करांदे आणि कोनफळ येतात. मुळ कंदाच्या छोट्या आकारात वाढतात. पण ह्या झाडावरच्या कंदांची वाढ मर्यादीत असते. पण हेच वेलीवरचे कंद परत जमिनीत लावले की चांगले फोफावतात. हे कोनफळ किंवा करांदे भाजुन चांगले लागतात. करांदे चांगले लागतात उकडून पण वेलीवरचे कोनफळ जमिनीतल्या कोनफळाएवढे चविष्ट नसते. ते भाजुन चांगले जास्त लागतात.कोणतेही कंद खोदताना खुप खबरदारी घ्यावी लागते. पारईच्या सहाय्याने कंद खोदले जातात त्या पारईने जर कंदाला इजा झाली तर त्या कंदाचा तेवढा भाग जखमी होतो व त्याचा बाजुचाही थोडा भाग खाण्यास योग्य राहात नाही.

सुरण, कोनफळ जेव्हा वाढ झाल्यावर काढले जातात तेंव्हा मुळ कंदाला बारीक बारीक कंद असतात थोडे ते पुन्हा लावता येतात. तसेच त्याचे वरचे तोंड व्यवस्थित कापुन लावल्यावरही त्यापासुन दुसरा कंद तयार होतो. गाजर, अननस ची लागवडही त्यांचे वरील तोंड लावुन करता येते.

लागवड करताना १ फुटी खड्डा करुन त्यात थोडी वाळू, राखाडी , सुका पाला पाचोळा, भुसभुशीत माती घालुन त्यात कंद लावुन वरुन माती टाकली जाते. खाजर्‍या प्रकारच्या कंदांना शेणखत टाकत नाहीत त्यामुळे ती जास्त खाजरी होतात. त्या कंदांना आलेला पाला जरी बईल किंवा म्हशिंनी खाल्ला तरी ते कंद खाजरे होतात असे म्हटले जाते.

सुरणाचा छोटा कंद लावल्यावर साधारण दोन ते तिन वर्षात चांगला भोपळ्या एवढ्या आकाराचा होतो. तसेच करांदे, अळकुड्या, कोनफळ हे दोन तिन वर्षे ठेउनच काढतात म्हणजे त्यांचे आकारमान वाढलेले असते. जसजसे कंद वाढतात तसतसे वेलीचे खोडही आकाराने वाढते. जेंव्हा कंद काढायचे असतात तेंव्हा वेल किंवा सुरणाचे झाड पुर्ण सुकल्यावर ते काढले जातात. उन्हाळ्यात ह्या वेली किंवा सुरणाचे झाड पुर्ण सुकते व पावसाळ्यात पुन्हा त्याला कोंब फुटतो.

खरेतर कोनफळामध्येही जाती आहेत. जांभळे कोनफळ आणि पायकोन जांभळे कोनफळ बाजारात दिसतात ते गोलाकार असतात. पण पायकोन हे लांबट असतात. पायासारखे लांब म्हणून पायकोन. हे पायकोन काढायलाही तितकेच कठीण असतात.
खालील चित्रातील वेल ही पायकोनाची आहे.

वेलीवरची मुळे
konfal.JPGkonfal1.JPG

वरच्या दिनेशनी टाकलेल्या फोटोतला दुसरा फोटो आहे त्या फळाचे नाव कांगला. गणपतीच्या माटीवर बांधण्यासाठी याचा उपयोग होतो. इतर काही उपयोग घरी तरी कोणाला माहित नाही.

जागू मी मुंबईतून कोनफळ नायजेरियात नेले होते. तिथल्या मातीत वर्षभरात ५ किलो आकाराचे कोनफळ जमिनीत तयार झाले. तिथे जमिनीखालचे बरेच कंद खाल्ले जातात. याम नावाचा एक कंद दोन फूट लांब आणि साधारण ६ इंच रुंद असतो. आतून पांढराशुभ्र असतो तो. त्याला खाज वगैरे काही नसते. खूप चवदार लागतो तो. दिल्लीमधल्या नायजेरियन दूतावासातील नायजेरियन स्टाफसाठी तो आणतात (अर्थातच भारतात मिळत नाही. ) मी नेहमी घरी घेऊन यायचो तो. पण बाजारात आणताना त्याचा पुन्हा रूजणारा भाग नेहमीच काढून टाकलेला असतो, म्हणून आपल्याकडे लावता आला नाही.
या यामबद्दल मजा. मी तो आणला की मला सहज सहा ते आठ वेळा पूरायचा तो. मला हवा तेवढा मी कापून घ्यायचो मग मी ऑफिसला गेलो की माझी हाऊसमेड त्यातला थोडा भाग चोरायची, तरी आम्हला दोघांना मिळून तो बरेच दिवस पुरायचा. तिथल्या बाजारात याचे ढीगच्या ढीग लागलेले असतात. मी अनेक भारतीयांना सांगितले तरी तो कुणी खात नसत.

ते हिरव्या फळांचे झाड नाही बॉ ओळखता आले. कदाचित फूले असते तर ओळखता आले असते. अशा वेळी स्थानिक लोकांची मदत मिळाली तर किती छान. निदान नाव तरी कळले असते.
हिरव्या चाफ्याची फळे अशीच असतात पण त्यांना टोक असते.

साधना, कांगलाचे निदान नाव तरी कळले. त्या भागात माटोळीला गणपतिच्या सजावटीत खूप महत्व असते, ती जास्तीत जास्त भरगच्च असावी याकडे कटाक्ष असतो, अगदी नैसर्गिक घटकांचा वापर करुन केलेली सजावट असते ती.

ती कांगला फळे आम्ही चिकटवायला वापरायचो.
एका देशातली झाडे ,फळे,फुले दुसर्‍या देशात रुजली तरि त्या भवतालचे जैविक विश्व वाढ्त नाही. काहि वेळा तर त्या नविन वनस्पती स्थानिक ना जगु देत नाहित. आपल्या कडचे गाजर गवत आहे तसच. म्हणून इंपोर्ट करताना बिया कंद धान्य रुजु नयेत अशा प्रक्रिया केलेल्या असतात. कंदाचे डोळे काढ्लेले असतात. बॅगेतुन सुद्धा अशा बिया धान्य नेऊ नये म्हणून नियम असतात.

ती कांगला फळे आम्ही चिकटवायला वापरायचो.

काय चिकटवायला???
हे नियम म्हटले तर योग्यच आहेत. चांगल्याबरोबर वाईटही इम्पोर्ट होऊ शकते गाजरगवतासारखे Happy

दिनेशदा...... आणि आलात म्हणजे ,याच नेरुळला ''कैलास'' नावाचा एक इसम पडीक असतो हे लक्षात ठेवून आमचे कडे पायधूळ झाडायला विसरु नका.
डॉक,
छान माहिती !
जरी दिनेशदांनी विसरलं तरी मी त्यांना आठवण करुन देण्यासाठी त्यांच्याबरोबर असणार आहेच !
Happy

काल पुन्हा लोणावळ्याच्या डोंगरात गेले होते. तिथे फिरत असताना काही कातकरी बायका टोकेरी लाकुड घेउन खणत होत्या. आता अजुन एखादा रानमेवा दृष्टीस पडणार ह्या खुशीने त्यांच्याजवळ गेले. त्यांना विचारले की तुम्ही हे काय खोदताय? त्यातील एकीने उत्तर दिले की आम्ही कंदमुळ शोधतोय. त्यातील एकीने काढूनही दाखवले ते हलदे होते.

halde.JPG

हे हलदे आमच्याकडेही होतात. आम्ही पावसाळ्यात त्याची तिन पानांची वेल पाहुन काढतो. पण त्या कातकरणी सुकलेली वेल ओळखुन काढत होत्या ह्याच मला नवल वाटल.

हीच ती बारीक सुकलेली वेल
halde1.JPG

ती कातकरीण मला देत होती. म्हणाली खाउन बघा. छान लागत. पण मला त्याची चव माहीत आहे आणि तिच्या पिल्लांचा खाउ मला हिरावुन घ्यायचा नव्हता म्हणून मी तिला सांगितल की मला फक्त त्याचा फोटो काढुन द्या.

हलदे हे कच्चेच खातात. कच्च रताळ जस लागत तसच साधारण हलदे लागत.

जागु,
हलदे बद्दल छान माहिती मिळाली !

हळद ज्यावेळी काढतात त्यावेळी मुळ खोड/कंदाला जोडलेगेलेले मोडुन काढल्यानंतर जे खोड/कंद राहतं ते वरील 'हलदे' सारखच असत, तेच पुढच्या वेळी 'बी' म्हणुन वापरलं जातं.
यात या हळदीच्या 'बी'ला आपण कंदमुळ म्हणु शकतो का ?

हळद हे पिक निघाल्यानंतर त्यातुन बी हे मोठ्या प्रमाणात (दुप्पट्/तिप्पट) मिळत नाही,त्यामुळेच त्याची लागवड (भरमसाठ) मोठ्या प्रमाणात करता येत नाही ,कदाचित त्यामुळेच याचा दर (कांद्यासारखा) एकदम कोसळत नसेल !
Happy

अनिल तो कंदासारखा असेल तर कंद्च म्हणाव लागेल. पण हळद लावुन लागवड नाही होत का हळदीची ? मी कुंडीत बाजारातील ओली हळद लावली आहे पण अजुन रोप आल नाही. मागे एकदा आईकडून झाडच आणल होत तेंव्हा जगली होती.

जागु,
एकत्र हळकुंड बाजुला केल्यावर साधारण हलदे सारखं (लहान भोवर्‍याच्या आकाराचं ) खोडच म्हणता येईल त्याला, तेच बी म्हणुन वापरलं जातं..
ही कच्ची हळद (भट्टी/चुल्/मशीनने) शिजवली की अशी दिसते,ती (८-१०) काही दिवस उन्हात वाळवुन

images_0.jpg

मग पॉलीश केल्यावर अशी पिवळी धमक दिसते ,जी बाजारात दिसते
images1.jpg

Pages