निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या संस्कृतीमधे, झाडांशी या ना त्या रुपाने नाते जोडायचा प्रयत्न केलाय. नक्षत्र वृक्ष काय, कूलवृक्ष काय, पत्री काय. थोडक्यात झाडांशी नाते टिकून रहावे असा प्रयत्न. आणि त्याला देवधर्माचे लेपन.
देवाला फुले तरी का वहायची, तर त्या निमित्ताने दोनचार फूलझाडे लावली जातील.
पण या सगळ्यापासून फार दूर चाललोत आपण.
इथे आफ्रिकेत एक छान प्रथा आहे. कुठल्याही खेळाच्या सामन्यात विजय झाला तर आधी एका झाडाला हात लावायचा. का तर आपल्या विजयाचे श्रेय झाडाला द्यायचे. आपला गर्व सोडून द्यायचा. विजयाच्या उन्मादात एखादा खेळाडू तसे करायला विसरला, तर बाकीचे खेळाडू त्याला आठवण करुन देतात.

३५ वर्षांपूर्वी चेंबूर परिसरात प्रचंड प्रदूषण होत असे. आम्हा सगळ्यांना खोकल्याने हैराण केले होते. त्या काळात हरीत चेंबूर अशी चळवळ झाली होती. राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझरतर्फे झाडांची रोपे मोफत वाटली जात होती.

आता बरेच प्रदूषण कमी झालेय (यात झाडांपेक्षा, चिमणीच्या वाढवलेल्या उंचीला श्रेय जाते.) पण ती चळवळ आता नाही. अजूनही काही भाग ओसाड आहेत. (उदा सायन ते शिवसृष्टी रस्ता )
माझ्या आठवणीत हिंदु कॉलनी, कालिना भागातल्या अनेक झाडांची कत्तल झालीय. हाजी अलीला प्रचंड मोठे उद्यान होते, ते गेले. सायनच्या सर्कलवर फ्लायओव्हर झाला. शिवसृष्टीच्या जंक्शनच्या फ्लायओव्हरखाली एक उद्यान जातेय.

नव्या बागा काहि वसल्या नाहित फारश्या. जी झाडे लावली गेलीत, त्यात पण तोचतोचपणा आहे.

पण मला आशा आहे. नक्कीच आहे.

<<<मोठी झाली की जॉईंट फॅमिलीतल्या लोकांचे कसे हाल होतात लहान घरात तसे त्यांचे हाल होणार सुरू...>>>> Lol

अगं जागु, धावत ये. आज सकाळीच गावावरुन गाडी आली. ताज्या पपया आल्यात, टोमॅटो आलेत. तुला जास्तीचे कांदे पाहिजे असतील तर तेही आहेत. तुझी गाडी असली तर घेऊन जायला त्रास होणार नाही.

भाजी आम्ही ठेवत नाही जास्त आणि भाजी पुढे ठेवायची नाहीच असे ठरवलेय. खटाणा खुप पडतो, नुकसान खुप होते आणि वर लोकांना २ रुपयाला भाजी दिली तर १ रुपयाला का नाही देत म्हणुन विचारतात.... Happy लोक पण विचित्र आहेत असे. आमचे दुकान नविन म्हणुन त्यांना सगळे स्वस्त पाहिजे असते पण त्याचवेळी इतरत्र महाग मात्र चालते. एनी वेज, आम्ही होलसेलच करतोय सगळे. कांदा, पपई, टोमॅटो सगळेच होलसेल देतोय हॉटेल्स, धाबे इ लोकांना. एक भाऊ रात्रंदिन हेच मार्केटींग करण्यात गुंतलाय.. Happy

>>नव्या बागा काहि वसल्या नाहित फारश्या. जी झाडे लावली गेलीत, त्यात पण तोचतोचपणा आहे

अगदी बरोबर, तीच तीच झाडं लावतात नाहितर जे नैसर्गीक आहे ते दडपून तिथे लॉन लावतात किंवा फरश्या घालतात. जैव वैविध्य नाहीसं होत चाललय.

मी रोज पारसिक हिलवर जाते फिरायला. वर हिलवर बंगले आहेतच. परवा टेकडिच्या अर्ध्या भागात रस्त्याच्या कडेने लोखंडी खांब दिसले, उद्या पत्रे दिसतील. आणि मग आतल्या झाडांची कत्तल. गेल्या आठवड्यात बाजुला राहणारे एक आजोबा, 'हमारे पेड भी उन्होने अंदर लिये' म्हणुन सकाळीच दु:ख आणि त्रागा करत होते. परवा त्याचा अर्थ कळला. अगदी रस्त्याच्या कडेलाच त्यांनी खांब ठोकलेत. जागा विकत घेणारे, विकणारे, खांब ठोकणारे आणि आपले मायबाप सरकार सगळ्यांनीच हातमिळवणी केलीय. कुठे दाद मागावी??????

नमुतल्या सगळ्यात मोठ्या राजकारणी घराण्याने नमुतले सगळे डोंगर दगडांसाठी पोखरलेत. पावसाळ्यात या तुटलेल्या डोंगरातुन धबधबे वाहतात. आधी डोंगर पोखरले, सगळे उजाड केले आणि आता झाडे लावा असा सल्ला देत पर्यावरणप्रेमी असल्याचा आव आणताहेत... आता त्या अर्धवट उरलेल्या मोडक्या डोंगरांवर का झाडे लावायची?????

आजुबाजुला जे चाललेय ते पाहुन मन निराशेने भरुन येते. जिवंत झाडावर लोक कु-हाड कशी चालवु शकतात हे माझ्य आकलनाबाहेरचे आहे. मला हे मनुष्यहत्येसारखेच नृशंस वाटते. पण माणुस एकदा बिल्डर झाला की त्याच्या बाकीच्या जाणीवा नाहिशा होतात बहुतेक. मी तर त्यांना शाप देते मनातल्या मनात... (पुलंची आठवण झाली, आपण दुबळी माणसे सगळे मनातल्या मनात करतो. तोंडाने बोलायचेही धैर्य नाही Sad )

योगी.. कशात बुडवली आहेत ही बोटं... मस्त फोटो.. कसला आहे रे ?

दिनेशदा.. तुम्हाला अनुमोदन.. नि सध्या झाडांच्या कत्तलीला अजून एक निमित्त मुंबईत फोफावतेय.. ते म्हणजे पुर्नबांधणीचे काम ! जुन्या इमारती तोडून नविन बांधताहेत.. साहाजिकच मोकळी जागा नष्ट होतेय.. नि त्या जागेत असणार्‍या झाडांचे काय ?? कोणाला पडलीय..

कशात बुडवली आहेत ही बोटं... मस्त फोटो.. कसला आहे रे ?>>>>>यो, या सोनटक्क्याच्या कळ्या आहेत. उद्या फुलतील. Happy

जिप्सी,डॉक,जागु
आज (पेंडींग) सगळ वाचुन काढलं, छान फोटो !
Happy

जन्मजात आणि जातिवंत आळशी अशी मी. तुम्हा सगळ्यांचा उदंड उत्साह आणि हे सुरेख सुरेख फोटो बघून मी पण माझ्या घरच्या झाडांचे फोटो टाकते.
मामी,
तुम्ही स्वता:ला आळशी म्हंटले आणि हे छान छान फोटोदेखील टाकले, त्याबरोबरच (कित्येक महिन्यात नविन १-२ झाडेही न लावणार्‍याला) मी किती महाआळशी आहे याची आठवण करुन (:राग:) दिल्याबद्दल धन्यवाद !
लहानपणी लाल कर्दळीच्या काळ्या हलक्याशा बिया,भोपळ्याच्या पानाच्या देठाचा पाईपासारखा उपयोग करुन, ते तोंडात धरुन वर बी ठेऊन ते हवेवर उडवायचो/तरंगायचो.
इतक्या उंचीवर देखील अशी झाडे येतात आणि त्यांना अशी फुलेही लागतात, हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं.
Happy

सहज नजरेस न येणारा सरडा
Lapaachhapi.jpg

कोथिंबिरीसारखी नाजुक पान असलेल्या झाडाची चिमुकली फुलं
Najuka.jpg

शेवग्याच फूल
Shevagyaach Fool.jpg

रानतुरा
Tura.jpg

असुदे, शेवग्याचे फूल खरेच सुंदर.

योगेश, या कळ्यांना डॉ डहाणुकरांनी कसली उपमा दिली होती, माहितीये ? बॅले नर्तिकांची, या उमलताना जे काही दिसते ते एखाद्या अभिजात बॅलेसारखेच असते.

साधना, तो डोंगर आता आणखी किती वर्षे काढेल सांगता येत नाही. पुर्वी हिरवागार होता तो. सुंदर धबधबे दिसायचे त्यावर. आता त्यावरुन विमान येताना, खाली बघवत नाही.

मी परवा उंबराची कथा लिहिली, त्या किटकांची आणि उंबराची दोस्ती ७ कोटी वर्षं टिकलीय. आपण तर त्यांच्या मूळावरच उठलोय.

आता जी आशा ठेवायची, ती मुंबईच्या बाहेरचीच.

वा अजुन छान माहीती जमा झाली आहे इथे.

आमच्या मागे एक करंजाच झाद आहे. त्याला खुप सुंदर पालवी आली आहे आता. ह्या करंज्याच्या झाडाला जी फळे लागतात त्यापासुन तेल काढतात. करंजाच्या पाल्याकडे बघुनच अगदी सुखद शितल वाटत. संपुर्ण हिरवगार झाड असत. पुर्वी ताडगोळे काढले की ताजे राहण्यासाठी टोपलीत करंज्याचा पाला टाकुन त्यावर ताडगोळे ठेउन परत वरुन करंज्याचा पाला टाकुन ते विकायला नेत असत.
हे आहे करंज्याचे झाड.
karanj.JPG

ह्या करंज्याच्या झाडाचा गारवा पाहून गांधिलमाशिने तर ह्या झाडावर आपला मोठ्ठा महाल उभारला आहे.

gath.JPGgath1.JPG

जागू, मोहोर येऊन गेला का ? मोहोराच्या दिवसात या झाडाखाली जणू कुरमुरे पडल्यासारखेच दिसतात. नायजेरियाला याची जांभळी फूले येणारी झाडे बघितली.
हि पालवीच काय याची पाने पण लखलखत असतात !

जागु,
धन्यवाद ! करंजाच्या फोटो बद्दल !

माझ्या मते ही झाडे ओढ्या/नदीकाठी खुप पहायला मिळाली,याच्या पासुन बायो डिझेल तयार होत असल्यामुळे आता याची सध्या खुप लागवड होत आहे.
याच्या पानापासुन गुंडाळी करुन झालेली पिप्पानी खुप वाजायची, आताही कधी कधी पान मिळाल कि वाजवतो.
ग्रामीण भागात (पुर्वी) लग्नात आंब्याबरोबर्,याच्या फांद्याही असायच्या , याच्या बियांचा खेळ खुप रंगायाचा
Happy

या बिया गोळा करणे, हा एक ग्रामोद्योग आहे. कोल्हापूरच्या बाजारात या विकायला असतात. घरोघरी याचे तेल, संग्रहात असते. अंगाला चिलटे, डास चावू नयेत म्हणून लावतात. वास भयानक असतो.

मी आज-याला विकत घेतलेल्या याच्या बीया.. तिथे ढिगानी विकत असतात. बहराच्या दिवसात झाडाखाली चिखल असतो नुसता फुलांचा... याच्या सावलीत खुप गार वाटते.

ह्या रविवारी ग्रंथालयात डॉ. सतिश पांडे यांचे 'सोयरी वनचरे' हे अतिशय सुंदर पुस्तक मिळाले. फोटो पाहुन लगेच पुस्तक उचलले. आत पक्ष्यांच्या एकापेक्षा एक मस्त गोष्टी आणि माहिती आहे. जंगलात मुद्दाम जाऊन पाहिलेल्या पक्ष्यांची वर्णने तर आहेतच पण इथेच शहरात पक्ष्यांनी माणसांच्या जंगलात स्वतःची सोय कशी लावलीय त्याचेही अतिशय हृद्य वर्णन आहे. (डॉ. पुण्यात राहतात).

पुण्यात एका वर्षी ४३ डिग्रीपर्यंत तपमान गेले होते आणि एका मैनेला अंडी घालायची घाई लागलेली. मागच्या वर्षीचे झाड यावर्षी माणसाने तोडले. पत्र्याच्या छपराखाली घरटे बांधायला घेतले तेव्हा पहिल्याच दिवशी पत्रा इस्त्रीसारखा तापतो हे तिच्या लक्षात आले आणि ती जागा सोडावी लागली. डॉक्टर लक्ष ठेऊन होते मैना काय करते आता त्यावर. त्या शहाण्या पक्षीणीने बिल्डिंगच्या ड्रेनेजपाईपमध्ये जिथे व्ही आकार तयार होतो तिथे घरटे केले, आणि तो पाईपही अशा घराचा निवडला ज्या घरात माणसे भरपुर होती आणि त्यामुळे मोरीत दिवसभर पाणी ओतले जायचे. पाणी पायपातुन जाऊन पाईप दिवसभर थंडगार आणि भिंतीवर उनही यायचे नाही. अग्दी मस्त निवारा तयार झाला तिच्यासाठी.

एका साळूंकीने म्युन्सिपालिटीच्या फुटक्या दिव्याच्या शेडमध्ये घरटे थाटले. पावसाळा सुरू झाला, घरट्यात पाणी झिरपू लागले. अंडी गार पडु लागली, साळूंकीचे अंग ओलेचिप्प व्हायला लागले. पाऊस नुकताच सुरू असल्याने मध्येमध्ये उनही पडायचे. उन पडले की ही बाहेर येऊन उन्हात गरम झालेल्या विजेच्या खांबावरील पट्य्ट्यांना ती अगदी चिकटुन बसायची. पिसे वाळायची आणि गरमही व्हायची, मग ती गरम उब परत घरट्यात जाऊन अंड्यांना द्यायची Happy पिले होईपर्यंत पावसाळा वाढला, झड यायला लागली आत. मग बाईसाहेबानी प्लेस्टिकचे तुकडे आणुन अंथरले घरट्यात Happy साधा कागद निवडला नाही.

हे सगळे वाचले की पक्षीही किती विचार करतात आजुबाजुच्या परिस्थितीचा आणि जुळवुन घेतात सगळ्याशी हे लक्षात येते.

जागू, धन्स करंजाच्या फोटोबद्दल Happy
आमच्या इथे खुप झाडे आहेत (होती :(). त्यातीलच एका करंजाच्या झाडाला गणपतीचा आकार आला आणि आता तेथे एक मंदिर बांधले आहे.

लहानपणी लपाछपी खेळताना मी नेहमी या झाडावर चढुन त्या हिरव्या पानात लपायचो Proud (आईकडुन धपाटेही खाल्लेय :-)). झाडावर लपताना फुलांवरच्या घोंगावणार्‍या माश्या हा एकमेव त्रास असायचा :फिदी:. झाडावर लपल्या लपल्या थोड्या थोड्या फांद्या तोडायचो आणि त्या सुकवायचो आणि होळीच्या दिवशी त्याची आमची "सेपरेट" लहान होळी करायचो. Happy यासगळ्यांमुळे या झाडाबद्दल खुप आपुलकी आहे.

सर्व आठवणी जाग्या झाल्या. Happy

जिप्सी ,५ बोटं मस्तच.
असुदे, हा सरडा आज प्रथमच पहातेय. आणि त्या शेवग्याच्या फुलांची भाजी पण मस्त होते. रानतुरा पण छानच आहे.
जागू, हे झाड बहुधा पाहिलय मी.

जिप्स्या बराच मार खाल्लेला दिसतोस लहानपणी.
साधना मी पण आणेन आता हे पुस्तक. छान माहीती दिलीस.
अनिल, शोभा Happy

योगेश, या करंज्याच्या झाडाची आणखी एक मजा. त्यावर आपले नाव कोरले तर काही दिवसांनी तो भाग वर येतो.
साधना, पक्षी अंड्याच्या तपमानाची बरीच काळजी घेतात. (मधमाश्याही घेतात. )
ते पुस्तक आता लिस्ट वर ठेवून देतोय.

हे झाडं मी ही पाहीलय.
जिप्सी लगेच जाऊन झाडावर नाव कोरू नकोस बरं का. Light 1
साधना पुस्तक नक्की वाचेन. तुला इमेल मिळालं का गं?

'ॐ नम शिवाय्'!!!
आज महाशिवरात्र. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.!!!
गुगलवर शोध घेताना हि माहिती मिळाली. आणि ही माहिती आधी मायबोलीवर आलेली आहे.तरी आज महाशिवरात्र म्हणून हे कॉपी , पेस्ट केले आहे. bel-Aegle.jpg
बेल
लॅटिन नाव - Aegle marmelos (ईगल मार्मेलॉस)
इंग्रजी नाव - वुड अ‍ॅपल, बेंगाल क्विन्स, गोल्डन अ‍ॅपल
भारतीय नावे - बिल्व, श्रीफल (संस्कृत/हिंदी), बिली (गुजराथी), विल्वम (तमीळ), मुरेडू (तेलुगू)
कुल - लिंबूकुळ
बेल हा एक मध्यम उंचीचा पानगळी वृक्ष आहे. याची साल खडबडीत, राखाडी रंगाची असते. तपकिरी रंगाच्या फांद्यांवर जवळजवळ एक इंच लांबीचे काटे असतात. पाने एकांतरित आणि त्रिदली असतात. लंबगोलाकार आणि टोकदार पर्णिकांवर पारदर्शक तैलग्रंथींचे ठिपके असतात. फुले हिरवट पांढरी आणि सुवासिक असतात.
belphaL.jpg

फळे आकाराने मोठाली, गोल असतात. बाह्य कवच लाकडासारखे टणक, पांढुरके हिरवट असते. आतला गर केशरी भगवा असून त्यात धाग्यांत गुरफटलेल्या अनेक बिया असतात. बेलफळाच्या गरापासून सरबत बनवतात. अतिसारावरचा तो एक खात्रीशीर उपाय.
बेलतेलाचा वापर लाकडाला झिलई देण्यासाठी करतात. कीडरोधक म्हणूनही हे तेल उपयोगी असते. लाकूड घरबांधणीसाठी आणि हत्यारे बनवण्यासाठी वापरतात. कच्च्या फळांच्या कवचापासून पिवळा रंग निघतो तो कापडावरील छपाईसाठी वापरतात. पाने डोळ्यांवर पोटीस म्हणून बांधतात. वातविकारावरील
दशमुळांपैकी बेलमूळ एक महत्त्वाचा घटक आहे. बेलाच्या पानांत पार्‍याचा अंश असतो असे म्हणतात आणि या पार्‍यामुळे बिल्वपत्र ज्यात असते ते पाणी कधी खराब होत नाही. म्हणूनच कदाचित अभिषेकाच्या अर्थात बिल्वदलं घातली जातात.
लोककथा - महादेवाच्या पूजेअर्चेत बेल वाहणे हा विधी अत्यंत आवश्यक मानला गेला आहे, त्यामुळेच शंकराच्या देवळाजवळ एकतरी बेलाचे झाड असतेच. बेलाच्या लाकडाचा दंड महादेवाने हातात धरलेला असतो, त्यामुळे महादेवाला 'बिल्वदंडिन्' असेही एक नाव आहे.
बेपर्वा माणसांबद्दल बोलताना-" बेल पकल कौआ के बोप लाका" (बेलाची फळे पिकली तरी कावळ्याला त्याचे काय?) सगळ्या पिकल्या फळांवर कावळा चोच मारतो, परंतु बेलाचे फळ इतके टणक असते, की कावळ्याची चोच त्यात घुसूच शकत नाही. त्यामुळे बेलफळ पिकले तरी कावळ्याला त्याचे सोयरसुतक काही नाही.
बेलाचे झाड आणि बोरीचे झाड जर एखाद्या जागेवर शेजारीशेजारी वाढली असतील, तर त्या जमिनीखाली झरा असणार असे समजतात.
नवीन कार्याच्या शुभारंभी लोक बेलास प्रदक्षिणा घालतात, कारण बेल नवे कार्य यशस्वी करून देतो असे म्हणतात.

खूप वर्षापूर्वी याच महाशिवरात्रीच्या दिवशी बेल आणायला जाताना एक प्रसंग घडला होता. आमच्या जिवावरच बेतले होते. पण 'देव तारी त्याला कोण मारी'. नाहीतर आज हे लिहायला मी नसते. तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो व अंगावर काटा ऊभा रहातो. इथे लिहित नाही. या निसर्गाच्या गप्पा आहेत. याची आठवण कोणीतरी करून देतील. असो.

जिप्सी लगेच जाऊन झाडावर नाव कोरू नकोस बरं का.>>>>> :-). नक्कीच सावली. का कोण जाणे पण मला झाडावर नावे कोरणे, खिळे ठोकणे हे क्रुरपणाचे वाटते. Sad

जिप्सी ते आहेच क्रुर पणाचे. तु करणार नाहीस हे नक्कीच माहीती आहे पण तरी मी लिहिले कारण इतर कुणीतरी वाचुनही प्रय्त्न करुन बघु नये म्हणुन ... Happy

शोभा छान माहीती. त्या इंग्लिश नावावरून आठवले. सध्या पाथेर पांचाली इंग्रजी भाषांतर वाचत आहे. त्यात असंख्य झाडांची बंगाली किंवा इंग्लिश मधली नावाचे उल्लेख आहेत. ती सगळी झाडं बघावीशी वाटली पण शक्य नाही. शिवाय एखाद दोन उल्लेख चुकलेले वाटले. म्हणजे कस्टर्ड अ‍ॅपल्स पिकल्यावर लाल दिसत होती वगरे. क्स्टर्ड अ‍ॅपल म्हणजे सिताफळ असं मला वाटतय. ते पिकल्यावर लाल कसं होईल!

छान माहिती शोभा. Happy

कारण इतर कुणीतरी वाचुनही प्रय्त्न करुन बघु नये म्हणुन ...>>>>>>अगदी अगदी

Pages