निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या स्टेशनचं नाव बदललंय का हल्ली ? मी आजच ऐकतेय. Sad कदाचित मला माहित नाही.

सॅन्डहर्स्ट रोड स्टेशनच्या अलिकडे आणि पलिकडे मस्जिद आणि डॉकयार्ड रोड आहे ना?

>>> काय जागू तू पण. त्या दगडीत मस्त पाणी भरुन छान कमळं लावायची आणि झकास गोल्डफिश सोडायचे त्यात.>>

आयडिया बुरा नाही है. पण ते मासे कावळे किंवा मांजरी खाऊन टाकतील ना?

जागु तू निदान कमळं तरी लावच.

माय मिष्टेक. स्टेशन डॉकयार्डच, एरिया माझगाव. Happy

कमळाची पान पाण्यावर तरंगतात छान्शी. त्या आडोशाने सुखात जगतील मासे.

निकिता, टोमॅटोच्या झाडाला आधार द्यावा लागेल.

अलिकडे बर्‍याच सिनेमात, टुमदार बैठी घरे आणि त्यात छोट्या छोट्या गल्ल्या असा भाग दाखवतात तेही माझगावच. या प्रसंगात बर्‍याचवेळा पाठलाग चाललेला असतो. माझगावला सेल्स टॅक्स ऑफिसपण आहे की. त्या चौकाला राणा प्रताप चौक म्हणतात ना ? तिथून ६० नंबरची बस, माझ्या घरापर्यंत येते, पण प्रचंड वळसा घालून. ती भक्ती पार्क, फाइव्ह गार्डन भागातून जाते. अरे हो या फाइव्ह गार्डन भागात, ब्रम्हदंड, बहावा, ट्रंपेट फ्लॉवर अशी भरपूर फूलणारी झाडे आहेत.

साधना, मागे नक्षत्र उद्यानाबाबत बोलली होती ना ? झाली का ती लागवड ?

टुमदार बैठी घरे आणि त्यात छोट्या छोट्या गल्ल्या असा भाग दाखवतात तेही माझगावच. >>> दिनेशदा, ती खोताची वाडी पण असू शकते.

मी आर्टिकलशिप त्याच भागात केली (ठाकूरद्वार) आणि माझगावच्या ऑफिसात जायचो पण (वहिनीचे ऑफिस) पण आता तो भाग ओळखता यायचा नाही मला.

मी मागे उल्लेख केला होता. कळंबोलीहून पनवेलला जायला जे वळण आहे, तिथे एक स्मृति उद्यान आहे. त्या उद्यानाच्या मागे कमळाचे मोठे तळे आहे. तिथे खरी कमळे दिसतात (वॉटर लिलि नाही) पनवेल एस्टी स्टँडच्या समोरच्या बाजूला पण एक मोठे तळे आहे. तिथे पण दिसतात कमळे. त्या मुख्य रस्त्यावर आजूबाजूला जी छोटी छोटी डबकी पावसाळ्यात तयार होतात, तिथे पण कमळं दिसतात.

माझ्या ऑफिसातल्या नक्षत्र उद्यानाचे फोटॉ मोबाईलमध्य आहेत पण इथे टाकायला वेळच मिळत नाही.

कालही बरेच फोटो काढलेत. ओळखा पाहु टाईपचे. अपलोड करायचेत. आज रात्री बघते मिळतो का वेळ ते.

असुदे अरे पण ती दगडी भांडी खोल नाहीत. आम्ही जागा घेतली तेंव्हा तेथील जुन्या वस्तु आम्हाला सापडल्या त्यात ही दगडी भांडी होती. पुष्करणीसाठी कमीत कमी किती जागा लागेल ?
आणि माझ्या शेजारी एक शेत, शेत म्हणण्यापेक्षा डबक होत त्याच पावसाळ्यात त्यात पावसाळी निळी कमळ येतात. त्यातच मासे पण येतात.

दिनेशदा ते पनवेलचे तळे माहीत आहे मला. आमच्या उरणमधील एका गावातही कमळाची तळी आहेत. अगदी मोठी आणि गुलाबी कमळे येतात त्यात.

महाराष्ट्र निसर्ग उद्यानातपण आहे ना "नक्षत्र बाग"??
गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण म्युझियममध्ये पहिल्यांदा पाहिली होती हि नक्षत्र बाग. माझ्या राशीचा आराध्यवृक्ष "अशोक" आहे. Happy

जागू कमळासाठी ३ फूट बाय २ फूट बाय दिड फूट खोल डबके पण पुरेसे आहे. बँकॉकला अशी कमळे बघितली होती. तिथे बुद्धाला वाहतात अशी कमळे.

महाराष्ट्र निसर्ग उद्यानातपण आहे ना "नक्षत्र बाग"??

डोंबल त्यांचं... त्यांनी नक्षत्रबागेचे एक ब्रोशर माहितीफलकावर चिकटवलेय. त्यापलिकडे त्यांना काही माहित नाही. तिथे कसली झाडे आहेत तेही त्यांना माहित नाही तर नक्षत्रवन कुठले कळायला???????

जागू, टॅन्क काचेचा असतो ते त्याच्या बाजूतून मासे दिसावे म्हनून. कमळं / वॉटर लिली पाण्याच्ता वरती वाढणार, तूला टॅन्क जमिनीवर ठेवायला लागेल

पण मला एकुणच नक्षत्रबागेचे प्रयोजन कळले नाही. लोकांचे लक्ष झाडांकडे जाईल एवढी एक गोष्ट सोडल्यास इतर काय उपयोग माहित नाही. एखाद्या राशी/नक्षत्राचे झाड अमुकअमुक याचा अर्थ काय?? त्या झाडाचा त्या राशीच्या मणसाला फायदा होतो काय? इ.इ. काहीही माहिती नेटवर मिळू शकली नाही. शिवाय प्रत्येक नक्षत्राचे झाड असेलच असेही नाही.

भारतातले सगळ्यात मोठे नक्षत्रवन झारखंड रांची मध्ये आहे.

माझे नक्षत्र झाडलेस आहे. म्हणुन बहुतेक मला झाडांनी झपाटलेय..

मी खरं सांगू का? ते माहिमचं निसर्गउद्यान काही फारस झेपलं नाही. म्हणजे डंपिंग ग्राउंडवर निर्माण केलय वगैरे ठीकच पण त्यामागे फारशी काही व्हिजन दिसतच नाही. एक सरकारी खटलंच वाटतं. मी सिअ‍ॅटलचं अर्बोरेटम पाहिलय. सामान्य नागरीक मेहनत घेऊन ते जोपासताहेत. मॉरीशसचं ते फेमस उद्यान - वेडावून गेले होते. बाकीही इतर कितीतरी ठिकाणची अशी सुंदर सुंदर ठिकाणं पाहिल्यावर हे फारच बिच्चारं वाटतं. तळ्यावर तर वास येत होता घाणेरडा.

माझ्या आधीच्या लेखातील एक भाग.
"प्राचीन कोकण - एक अनोखे म्युझियम"

गावात आपल्याला प्रथम दिसते ती "नक्षत्र बाग". आपली संस्कृती निसर्गातून फुलली आहे. आपल्या पुर्वजांनी विविध वनस्पती, प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात एक राखीव जंगल असे त्याला देवराई म्हणत. विविध धार्मिक ग्रंथाचा आधार घेऊन हि नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष "आराध्यवृक्ष" मानला जातो. त्याचे पुजन केल्यास त्या व्यक्तीला आरोग्य, सौख्य लाभते असे मानले जाते. नक्षत्र बागेतून आपआपल्या राशींचे आराध्यवृक्ष पाहत आपण गावात प्रवेश करतो.

मामी, आपल्याकडे जोपासणे ह्या गुणाचा अभाव आहे.

कुठल्याही क्षेत्रात, विशेषतः ते क्षेत्र सरकारी असेल तर तिथे काम करणारे लोक निवडायचा पहिला निकष निवडलेल्या लोकांना त्या क्षेत्राची खास नावड असलीच पाहिजे हा असतो. आणि सामान्य नागरिकांचे काय बोलणार? 'रेल्वे ये राष्ट्र की संपत्ती है' हे वाक्य वाचले की ती आपली संपत्ती नाही हे लगेच अधोरेखीत होते आणि आपण तिची नासधुस करायला मोकळे होतो.

जिप्सी, मी सगळेच वाचत नाही असे वाटतेय.....
रच्याकने, माझा वृक्षच नाही तर मला आरोग्य आणि सौख्य कोण देणार??

<< माझा वृक्षच नाही तर मला आरोग्य आणि सौख्य कोण देणार??>>
अस का म्हणत्येस साधने. कदाचित तू वृक्षांच्या आरोग्य आणि सौख्याची काळजी घ्यावीस अशी 'त्या/ती'ची योजना असेल

मी टाकते उद्या फोटो नक्षत्रवनाचे.

जिप्स्याने त्याच्या लिन्कवर फोटो दिले असतील तर पाहता येतील.

एक गोल बागेत सगळी नक्षत्रे क्रमाने गोलाकार बसलीत असे मानुन त्या जागी वेगवेगळ्या नक्षत्रांची झाडे जसे उंबर, पिंपळ, खैर, शमी, कदंब इ.इ. झाडे लावायची आणि त्याला नक्षत्रवन म्हणायचे. यामागची कल्पना योग्याने लिहिली आहेच वर. किती जागा आहे त्यावर जंगल्/बाग किती मोठी होणार हे ठरणार. माझ्या ऑफिसातले नक्षत्रवन लहान आहे, आणि झाडे अजुन चार-पाच फुटच उंच आहेत. शिवाय ती इतकी जवळ आहेत की मोठी झाली की जॉईंट फॅमिलीतल्या लोकांचे कसे हाल होतात लहान घरात तसे त्यांचे हाल होणार सुरू...

जिप्स्याने त्याच्या लिन्कवर फोटो दिले असतील तर पाहता येतील.>>>>नाही, त्या लिंकवर नक्षत्रबागेचे फोटो नाही आहेत. मी फक्त माझ्या आराध्यवृक्षाचा फोटो काढला. Proud

हि माझ्या राशीच्या आराध्यवृक्षाची माहिती Happy
रास - धनु
जन्म नक्षत्र - पूर्वाषाढा
आराध्यदैवत - उदक किंवा आप
आराध्यवृक्ष - अशोक
औषधी गुणधर्म - कफपित्त नाशक, वेदना, विष असल्यास, तुष्णाशामक, सुज, रक्तशामक, मुतखडा, प्रदरादि, गर्भशयाला बल देणारा, रक्तपित्तावर.
मंत्रः "ओम् अद्भभ्यो नमः"

अगं, मला ऑफिसातली बाग अशीच भटकत असताना दिसली. फोटो लगेच घेतले आणि लेख लिहायचा हेही ठरवले. पण नक्ष्त्रवन का बनवतात इ.इ.माहिती कुठेही मिळेना.. त्यामुळे इथे टाकले नाही. आता नुसते फोटो टाकते. माहिती मिळते का ते पाहते.

<< साधना उद्या ते भाजीच दुकान आहे का ग चालु ? कदाचित मी येणार आहे.>>
घाई कर साधने, पटकन सगळ्या भाज्या लपवून ठेव "जागू" येणारे

अम्या Proud

जिप्सी किंवा साधना, किंवा दोघेही, नक्षत्रबाग बद्दल एक स्वतंत्र लेख लिहा ना.>>>>मामी, मला त्याबद्दल जास्त माहिती नाही आहे. गणपतीपुळ्यालाच पहिल्यांदा पाहिलेली हि नक्षत्रबाग.

आता नुसते फोटो टाकते. माहिती मिळते का ते पाहते.>>>>साधना तु लिहि Happy मी सुद्धा पाहतो याबाबत जास्त माहिती मिळते का.

Pages