गझल रचना.... तरही गझल.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 4 December, 2010 - 04:49

गालिब्,मीर आदि शायर मैफिल संपल्यावर एक ओळ देत्,की ज्या ओळीचा उपयोग मतल्यात सानी मिसरा म्हणून करुन पुढच्या वेळेस त्यावर आधारीत एक गझल तयार करून आणायची असे.

असाच प्रयोग्,गझल सागर प्रतिष्ठान च्या वतीने मुंबई इथे काही काळ चालला. .... माझ्याशी नियमित संपर्क असलेल्या काही शायरांनी त्यात उत्तमोत्तम गझल रचून गझल हा काव्यप्रकार लोकप्रिय व्हावा,सर्वमान्य व्हावा म्हणून बराच हातभार लावला आहे.

गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर्,प्रसादपंत्,भुंगा यांचेशी गप्पा मारताना गेली काही दिवस एक मैफिल्,एक गझल अश्या तून काही सामूहिक गझलांची निर्मिती झाली. हीच कल्पना पुढे नेवून नियमित पणे तरही गझल रचाव्यात ह्या कल्पनेतून हा धागा सुरु करतोय.

ह्यात दर आठवड्याला एक ओळ देण्यात येईल व ती ओळ मतल्यातील सानी मिसर्‍यात चपखल बसवून गझल रचावयाची आहे. आपणा सगळ्यांचे यात स्वागत आहे.

आजची ओळ आहे.

ओळ क्र.१ = जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

वृत्त : आनंदकंद
काफिया : जगण्यात किंवा अर्थ
रदीफ : अर्थ नाही किंवा नाही
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२= सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी
वृत्त : चामर
काफिया : उन्हात
रदीफ : मी
लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.३= कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते
वृत्त : वियदगंगा
काफिया : वाटले
रदीफ : होते
लगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ४ = तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
वृत्त : हिरण्यकेशी
काफिया : नकार
रदीफ : आहे
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा

ओळ क्र.५ = दु:ख आता फार झाले
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रदीफ : झाले
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र.६ = थांबणे सोसेल तोवर लागते चालायला ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - चालायला, वाकायला, जायला, यायला, व्हायला वगैरे स्वरुपी ('आ'यला समान)

ओळ क्र.७ = वादात या कुणीही सहसा पडू नये
वृत्त - विद्युल्लता
रदीफ - नये
काफिया - पडू
लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा

ओळ क्र.८ = ठरेन या जगात मी,महान एकदा तरी ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : एकदा तरी
काफिया : महान
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र.९ = थेट माझ्या सारखा तो कोण होता ? डॉ.अनंत ढवळे यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : कोण होता
काफिया :सारखा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. १० = अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही
वृत्त : आनंदकंद
रदीफ = माणसे ही
काफिया = छळतात
लगावली= गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ११ = कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मंदाकिनी
काफिया - आराम, दाम, ठाम, उद्दाम वगैरे
अलामत - आ
रदीफ - पहिल्यासारखा
गागालगा गागालगा गागालगा गागालगा

ओळ क्र.१२ = षंढ म्हणती लोक सारे,ऊठ तू आता तरी
वृत्त - कालगंगा
काफिया = सारे,तारे,वारे,न्यारे,उतारे,दारे,यारे, वगैरे
अलामत -आ
रदीफ - ऊठ तू आता तरी
लगावली - गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र.१३ = माणसे व्यर्थ मी जतन केली ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त = लज्जिता
काफिया = जतन, गहन, सहन इ.इ.
अलामत - अ
रदीफ - केली
लगावली - गालगा गालगा लगागागा

ओळ क्र.१४ = विसरणेही तुझ्या लक्षात नाही ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मृगाक्षी
मात्रा - १९
लगावली - लगागागा लगागागा लगागा
काफिया - लक्षात, गावात, रस्त्यात, कोणात, जात, आत इत्यादी
अलामत - आ
रदीफ - 'नाही'
किमान शेर - मतला धरून पाच

ओळ क्र.१५=अजूनही मी तुझ्याचसाठी जिवंत आहे ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - सती जलौघवेगा
लगावली - लगालगागा लगालगागा लगालगागा
मात्रा - २४
काफिया - जिवंत, महंत, संत, वसंत, आसमंत इत्यादी
अलामत - अं
रदीफ - 'आहे'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र.१६=आला पाउस गेला पाउस ( श्री .प्रसाद गोडबोले,''पंत'' यांची ओळ )
वृत्त - पादाकुलक
लगावली - गागागागा गागागागा

ओळ क्र.१७ = श्वासांचा या ब्रेक दाबता मृत्यूचे ये गांव मनोहर (उमेश कोठीकर यांची ओळ.)
वृत्त - गागागागा * ४ - किंवा ३२ मात्रांचे मात्रावृत्त
काफिया - मनोहर, घर, उत्तर, जर, तर, अंबर इत्यादी स्वरुपाचे
रदीफ - रदीफ नाही
अलामत - 'अ'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र. १७ = खोल खोल आतवर तुझी नजर
वृत्त = श्येनिका
काफिया = नजर्,उदर्,अधर्,शहर इ.
अलामत = अ
रदीफ = नाही.गैरमुरद्दफ
लगावली =गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.१८ = काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
वृत्त = कालगंगा /देवप्रिया
काफिया = आनंदण्याची, ......... पेरण्याची,तारण्याची,वाकण्याची,अंधारण्याची इ.इ.
अलामत्=अ
रदीफ= कारणे
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.१९ = ही जगाची रीत नाही
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रददीफः नाही
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र. २० = चांदणे आहे खरे की भास नुसता ?.......नचिकेत जोशी,आनंदयात्री यांची ओळ
वृत्त : मंजुघोषा
रदीफ :नुसता
काफिया :भास्,खास्,आभास्,त्रास्,इ..इ..
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.२१ = जगावेगळे मागणे मागतो मी......... नचिकेत जोशी ( आनंदयात्री ) यांची ओळ.
वृत्त : भुजंगप्रयात
काफिया : मागतो,ठेवतो,पाहतो ,बोलतो
रददीफः मी
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र.२२ =************************************************
वृत्त : सुमंदारमाला
काफिया : जावे,खावे,विसावे,जडावे इ.इ.
रददीफः कुठे
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

ओळ क्र.२३ *********************************************************************************************************
वृत्त :तोटक
काफिया :खरा,जरा,बरा,धरा,करा
रदीफ : गैरमुरद्दफ
लगावली :ललगा ललगा ललगा ललगा

ओळ क्र.२४ :शेवटी संपायला आलीच ही एकांकिका......भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ.
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - एकांकिका, मालिका, विका, शिका, टिका, राधिका, इत्यादी
अलामत - र्‍हस्व इ
शेर - मतला धरून पाच
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.२५ : या इथे कधी काळी देखणे शहर होते.......... बेफिकिर यांची ओळ
वृत्त : रंगराग
रदीफ : होते
काफिया : शहर्,गजर्,अधर्,पदर्,इ.इ.
अलामत : अ
लगावली : गालगाल गागागा गालगाल गागागा

ओळ क्र.२६ :कशास त्याची वाट पहावी,जे घडणे आहेच असंभव....... अमितदेसाई, बागुलबुवा यांची ओळ
वृत्त : वनहरिणी ( मात्रा वृत्त्, अष्ट मात्रिक ४ आवर्तने )
रदीफ : नाही..गैरमुरद्दफ
काफिया : असंभव्,अनुभव्,वैभव्,संभव्, उद्भव,

ओळ क्र.२७ : हा कोणत्या दिशेचा,आहे प्रवास अजुनी............नयना मोरे, मी_ आर्या यांची ओळ
वृत्त : आनंदकंद
रदीफ : अजुनी
काफिया : प्रवास्,भास्,तास्,निवास्,श्वास
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२८ : तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता
वृत्त : वियदगंगा
रदीफ : होता
काफिया : ओलावला, पाणावला,भंडावला,पावला,धावला,इ.इ...
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र.२९ : सोड चिंता मीच माझे पाहतो आता '' कणखर'' यांचि ओळ
वृत्त : राधा
रदीफ : आता
काफिया : पाहतो,वाहपाहतो,वाहतो,साहतो,राहतो,नाहतो
लगावलि : गालगागा गालगागा गालगागा गा

ओळ क्र. ३०: जिथे रमलो कधी नाही तिथे रेंगाळतो आहे.
वृत्त : वियदगंगा
रदीफ : आहे
काफिया : रेंगाळतो,जाळतो,टाळतो,हेटाळतो
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ३१: हृदय एवढे धडधडत का असावे?
वृत्त :भुजंगप्रयात
रदीफ : असावे
काफिया : सौतीकाफिया " आ'' कारान्त स्वरकाफिया
लगावली :लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र. ३२: कितीक प्रश्न का असे अनुत्तरीत राहिले ? डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : राहिले,पाहिले,साहिले,वाहिले,दाहिले,
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र. ३३: जीवनाचे रंग सारे बोलती माझ्यासवे डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : देवप्रिया
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : माझ्यासवे, चालवे,आसवे, कालवे, काजवे,आठवे, जाणवे,पारवे,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३४: पिंजर्‍याला मानती आकाश रावे गझलसम्राट सुरेश भट यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : रावे, व्हावे, असावे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३५ : येत जा देवून थोडी कल्पना
वृत्त : मेनका
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : कल्पना,प्रार्थना,वंचना,वासना,साधना,कामना,वेदना
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३६ : दाटते आहे निराशा फार हल्ली
वृत्त :मंजुघोषा
रदीफ : हल्ली
काफिया : फार्,चार्,आजार्,बाजार्,व्यापार.....
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३७ : आज आहे नेमका शुद्धीत मी
वृत्त : मेनका
रदीफ : मी
काफिया : शुद्धीत्,रीत्,प्रीत्,विपरीत्,गीत्,भीत्,आश्रीत,
लगावली : गालगागा गालगागा गालगा

khal.jpg

ओळ क्र. ३८ : चालला आहे कशाचा खल इथे
वृत्त : मेनका
रदीफ : इथे
काफिया :खल्,चल्,निश्चल्,बल्,कल्,दल्,कोलाहल
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३९ : सारे जुनेच आहे काही नवीन नाही....... शाम यांची ओळ.
वृत्त : आनंदकंद
रदीफ :नाही
काफिया : नवीन्,लीन्,दीन.विहीन्,हीन्,लगीन्,तीन्,अधीन्,मशीन,
लगावली :गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ४० :कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा.... रसप यांची ओळ.

लगावली - लगालगागा लगालगा - यती - लगालगागा लगालगा

वृत्ताचे नांव - ज्ञात नाही, कोणाला ठाऊक असल्यास कृपया नोंदवावेत.

काफिया - विरघळून / जळून / पळून / वळून इत्यादी

अलामत - 'ऊ' (दीर्घ ऊकार)

रदीफ - जा

ओळ क्र. ४१: आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे
वृत्त : व्योमगंन्गा
रदीफ : तितकीच आहे
काफिया : वेदना , साधना, वन्चना,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.42 : सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची ( वैभव वसंत कुलकर्णी यांची ओळ )
वृत्त : वियद्गंगा
लगावली: लगागागा लगागागा लगागागा लगागागा
काफिये: ताज्या, माझ्या, साध्या , गेल्या
अलामत : तंत्रानुसार आ ह्या स्वरांतयमकाची अलामत..बाकी त्याच्या आधीच्या अक्षरावर आलेली जोडाक्षरातील उछारात येणारे वजन हेही अलामतीसारखे वारंवार येणारे ठरावे अश्या काफियांची अपेक्षा !!
रदीफ : विचारांची

ओळ क्र.४३ : आतला माणूस माझ्या जळत आहे.
वृत्त : मंजुघोषा
काफिया : जळत्,कळत्, वळत्,पळत्,हळहळत
रदीफ : आहे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

गुलमोहर: 

बरोबरः

हेही मुद्दे आहेतच.

१. योजलेल्या प्रतिमांमधून खरे तर मूळ खयाल अचूकपणे ध्वनीत व्हायला हवा. पण हा पहिलाच 'अटेंप्ट' असल्याने ते कोणाला किती साधेल हाही प्रश्नच आहे.

२. वेगळाच भाव प्रकट करायचा असेल तरी कुठे बिघडले? पण मग तशी एक हलकीशी नोंद दिली तर उगाच चर्चाही टळेल नाही काय? (जसे प्रसाद लिमयेंनी वर तस्वीर तरहीबाबत केले होते) Happy

१)योजलेल्या प्रतिमांमधून खरे तर मूळ खयाल अचूकपणे ध्वनीत व्हायला हवा.>>>>>म्हणजे भाव /फीलिंग्ज सेम यायला हवे होय ना ??

२)(जसे प्रसाद लिमयेंनी वर तस्वीर तरहीबाबत केले होते) >>>>>>>ओके बेफीजी आता आले लक्षात

धन्स

बेफीजी प्राजुच्या स्संकेत्यिक तरही वर हा प्रतिसाद दिला आहे मी आताच पाहल का माझे बरोबर आहे की चुकेले?

_________________--

आता जरा मी काही सांगू का सर्व मते वैयक्तिक आहेत बरका .......

प्रतिके-प्रतिमा ही संकेत आहेत खयाल नाही ना !!!!.............

आता त्याच्यात कोणतेही को- रिलेशन दाखवणे ...प्रस्थापितच करणे ........शयराच्या विचारसामर्थ्यावर अवलंबून मग त्यात पुन्हा कल्पकता ...सखोलता वगैरे मुद्दे येतीलच....

आता पाहा की उदा: तू सोडून जाण्याने दु:ख नाही मे मला साथ दिली नाही हे दु:ख आहे असा सब्स्टंस यायला हवा होता अशी अपेक्षा होती हे मान्य पण मला वाट्ते की एखाद्या व्यक्तीने जाण्याने दुसरी आनंदीतच का नै होवू शकत (जसे मी माझ्याशेरात आनंद -दु:ख काहीच दाखवले नाही उलट एक निर्णय सरळ्सरळ कळवला आहे की तू जा आता मलाही माझ्यात थावंबायचे नाही आहे यात "मला आनंद नाही दु;ख नाही" हा भाव /एक नविन्यपूर्ण व्हीजन आला ना हे मला अधिक श्रेयस्कर वाट्ते शायरी शिकायच्या अँगलने पाहता )

म्हणजे
~दोन प्रतिमा जुन्याच का असेनात व त्यातला नाविन्यपूर्ण संबंध ...असे केले तर त्यात "श्रेय" जास्त आहे

~दोन नाविन्यपूर्ण प्रतिमा व तसाच नाविन्यपूर्ण संबंध असेही करता येईल

~... किंवा किमान त्या भोवतीचे नाविन्यपूर्ण कथानक /नाट्य जसे-कसे शायराने खुलवले आहे ते पाहणे जास्त श्रेयस्कर त्या करिता संकेत तरही हा प्रकार जास्त लाभदायक वाट्तो !

"खयाल दिला व योजलेल्या "टोटल्ली चेन्जड् प्रतीमातून" अचूकपणे पाहता आला हा क्रायटेरिया त्यापेक्षा मला फार कमी महत्त्वाच वाटतो

सुचलेल्या खयालातला अचूकपणा त्यातील सखोलता व कल्पकता या मुद्द्यानुसार जोखायला शायर-वाचक खयाली व् तस्वीर तरहीतून जवळ्पास शिकलेच आहेत एव्हाना......मग संकेत तरहीचा नेमका उद्देश हेतू आहे तरी काय असे म्हणता येईलचलच की ........

आता वेगळ्या बाजूने पाहू ................

देवसरानी (एकच शायर) समजा आतापावेतो लाट - किनारा (सेम प्रतिमा ) ......दोघानी भेटणे / न भेटणे ( पेटर्ण जरा चेंज ) कधी दु;:ख् कधी आनंद(भाव /एकंदर फील).....कधी लाट काहीतरी म्हण्ते कधी किनारा बोलतोय (नाट्य)..... मग प्रत्येकवेळी खयालातील कल्पकता सखोलता यावरून कथानक वेगवेगळ योजणे ..........यावरून त्यांनी २५ शेर केले प्रत्येकात वेगळेपवण काय असेल का नाविन्य असेलच का ?

होय नक्कीच असू शकते किमान स्कोप तरी वाढेलच की नै?
(किमान प्रत्येक वेळी त्यांनी "मी -द प्रा. सतीश देवपूरकर " हा फॅक्टर त्या शेरात घुसवायचा नाही ठरवले तर मग खात्रीने तसे होईल डोळा मारा)

आता या उदाहरणात फक्त मायबोलीतील वेगवेगळा शायर आपण बसवू तो त्याच्यात्याच्या शैलीत शेर खुलवेल ......झाले २५ -एक शेर तयार!!..... तेही वेगवेगळे तरही शेर तरह- तरह् के शेर !! स्मित

म्हणजे केवळ प्रतिमांची जोडी दिली तरी काम साधण्यासारखे असेल (एका शेरत किमान दोन प्रतिमा लागतीलच एकच दिली तर शायरास अजून स्वातंत्र्य!!)

आधी खयाल (जुजबी स्वरूपातले एखादे कथानक + भावभावना ) मग त्यातल्या मूळ प्रतिमा मग सांकेतिक प्रतिमा असे प्रोसेसिंग शक्यतो गरजेचे नाही माझ्यामते

आता अजून एक बाजू ...............संकेत तरहीचा नेमका उद्देश हेतू आहे तरी काय ..काय असायला हवा
इथे देताना खयाल दिल्याने (उदा:शेर क्र. दोन साठीचा )
जागेवरून हालवलेले देवूळ तरी त्या जागेकडे पाहून जोडले जाणारे हात हेच शेत -पाखरे- पीक यातून दिसते
दिसते म्हणण्यापेक्षा वाचकास माहीत असल्याने की पहायचे आहे ...दिसतेच)

......ही अवलंबीता नकोच ना

आता इथे सांकेतिकता या बाबत थोडा विचार करू ...... जसे उर्दू शायरीत(ऐकीव माहीती) विशिष्ट प्रतिमा(त्यांची जोडी) विशिष्ट खयाल ....विशिष्ट कथानक/नाट्यमयता याकडे अंगुली निर्देश करतात ... बरोबर?

आता असे पहा की आपल्याला मराठी शायरीत असे संकेत तयार करायचे आहेत/ असलेले बदलायचे आहेत किंवा एका प्रतिमेबरोबर नेहेमीचीच प्रतिमा न वापरता नवी जोडी तयार करायची आहे ...बरोबर ?

यामुळे काय होईल पहिल्या ओळ्वीत क वसंत आला की पुढे बहर फुले येतील हा जो "संकेत" वाचकास आपोआप मिळतो तो सवय झालेली असते त्यात नाविन्य/ बदल यातून वेगळ्वे काही गवसल्याचा आल्हाद रसिकास देण्याचे / सातत्याने देत राहणे हे धक्कातंत्र वापरून शेर यादगार करायचा आहे आपल्याला ही सांकेतिकता महत्त्वाची आहे

......ना की..... श्रीमन्त पोराला राजहंस म्हणावे व गरीब पोराला बगळा म्हणावे (ही केवळ प्रतिमासृष्टी आहे ती खयाली तरहीतूनही जोपासता येतेच की )
एकदा श्रीमंत पोरास शायर लोक राजहंस म्हणतात हे वाचकास समजले की त्या वेळी हेच प्रतीक /प्रतिमा राजसी वृत्तीच्या लोकासाठी वापरावे बगळा ध्यान लावतो म्हणून तो सात्विक ठरवावा हे संकेत रूढ करावेत हा हेतू असायला हवा ..... हेच करणे म्हणजे "संकेत" नाविन्यपूर्ण पध्धतीने "प्रस्थापित" करणे हेच या प्रकाराचे श्रेय असावे असे मे म्हणालो तर बरोबर आहे का ........

(......अपूर्ण.......)

चूक भूल द्यावी घ्यावी
____________________________________

ध्न्स बेफीजी

khal.jpg

ओळ क्र. ३८ : चालला आहे कशाचा खल इथे
वृत्त : मेनका
रदीफ :इथे
काफिया :खल्,चल्,निश्चल्,बल्,कल्,दल्,कोलाहल
लगावली : गालगागा गालगागा गालगा

एका गझले(च्या प्रयत्ना)साठी एक अख्खे पान फुकट घालवेना, म्हणून ईथेच डकवतोय.

घे चाचपून आता बलाबल इथे
चालला आहे कशाचा खल इथे

निखार्‍यांवरी चालणे रोज आहे
असावी कशी मलमल इथे

जे पाहिले, ऐकले वा बोलले
नाही कुणाला कशाचा सल इथे

तुला सांगतो, काही होणार नाही
कोणा हवा आहे बदल इथे

नसेना मेळ कुणाला कशाचा
तरी नांदते सुखे गझल इथे

तरी मायबोली मला सोडवेना
कोण जाणे कसले रमल इथे.

Happy

ओळ क्र. ३९ : सारे जुनेच आहे काही नवीन नाही....... शाम यांची ओळ.
वृत्त : आनंदकंद
रदीफ :नाही
काफिया : नवीन्,लीन्,दीन.विहीन्,हीन्,लगीन्,तीन्,अधीन्,मशीन,
लगावली :गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ४०: तिथेच लागते जिथे जखम असते .......कणखर यां ची ओळ.
रदीफ : असते
काफिया : जखम...तलम...शरम...
लगावली : लगालगा लगालगा लगागागा

तसे काही होणार नाही तू विचार तर खरी ...ज्याना ज्याना अश्या शंका असतील त्यांच्या शंकांचेही निरसन होईलच की आपोआप ...परोपकार करून होईल तुझ्या हातून Happy

तरही गझल या उपक्रमाअंतर्गत डॉक्टरांनी माबोकरांकडून अनेक गझला करून घेतल्या. नवनवीन वृत्ते, प्रभावी ओळी, विविध प्रकारच्या तरही या सर्वांनी हा धागा व हा उपक्रम एक उपयुक्त उपक्रम ठरला.

नुकतेच एका सदस्याशी झालेल्या चर्चेत असे बोलणे झाले की गझलेव्यतिरिक्त एखादा काव्यप्रकार, एक बदल म्हणून, या उपक्रमाअंतर्गत एकदा घेऊन बघितला जावा. याचे कारण असे की गझलतंत्रामुळे येणार्‍या मर्यादा न घालून घेता अभिव्यक्ती अधिक सक्षम / प्रभावी होऊ शकेल व आणखी काहींना या उपक्रमात सहभागी व्हावेसे वाटू शकेल. अर्थात, गझल हाच या धाग्याचा आत्मा राहील.

डॉक्टरांना व अन्य सदस्यांना मान्य असल्यास खालील कल्पना सुचवू इच्छितो:

१. निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली. मात्र ही शिक्षा पुरेशी वाटत नाही अशी प्रतिक्रिया अनेक थरांतून आली असावी.

२. कवीने सामाजिक घटनांना काव्यात स्थान देणे अत्यावश्यक आहे.

निर्भयाचा आत्मा जर आज न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेकडे बघत असेल, तर त्या आत्म्याची प्रतिक्रिया काय असेल यावर एक वृत्तबद्ध कविता करूयात का?

कल्पना स्वीकारार्ह वाटत असल्यासः

१. ओळींची मर्यादा तीस!
२. कालगंगा / व्योमगंगा यापैकी एका वृत्तात कविता रचावी
३. ध्रूपद दोन ओळी व नंतर चार चार ओळींची कडवी असे स्वरूप असावे.
४. याचा अर्थ, ध्रूपदाच्या दोन ओळी आणि पुढे फक्त चारच ओळी, अश्या सहाच ओळींची कविता रचली तरीही चालेल.
५. ध्रूपदामध्ये यमक साधले जावे व प्रत्येक कडव्यातील चौथ्या ओळीच्या शेवटी ते यमक साधले जावे. चार ओळींपैकी पहिल्या तीन ओळींचे यमक साधले जावे व ते ध्रूपदाच्या यमकापेक्षा वेगळे असणे जरूरीचे आहे.

महत्वाचे:

१. ही कविता प्रभावी व संताप फुलवणारी अशी असायला हवी, नुसतेच घडलेल्या घटनेचे वर्णन नको
२. निर्भया स्वतः बोलत आहे अश्या तर्‍हेने ओळी रचल्या जायला हव्यात!

वृत्तासाठी काही मदत हवी असल्यास मी, डॉक्टर, विदिपा, सुप्रिया, वैवकु तसेच अन्य नामांकित गझलकार यापैकी कोणालाही अवश्य विचारावे.

यावेळी कोणतीही ओळ तरही ओळ म्हणून दिली जात नाही आहे कारण यावेळी गझल रचायची नाही आहे.

सर्वांना शुभेच्छा! आपल्या मतानुसार निर्भया आज काय म्हणाली असती हे अधिकाधिक प्रभावीपणे मांडायला सज्ज व्हावेत अशी विनंती!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

या प्रतिसादाला अनुसरून, रणजीत पराडकर उर्फ कवी रसप यांची ओळ तरहीसाठी घेतली जावी अशी सर्व गझलकारांना विनंती! डॉ. कैलास गायकवाड यांची अनुमती असेल असे गृहीत धरत आहे.

कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा

लगावली - लगालगागा लगालगा - यती - लगालगागा लगालगा

वृत्ताचे नांव - ज्ञात नाही, कोणाला ठाऊक असल्यास कृपया नोंदवावेत.

काफिया - विरघळून / जळून / पळून / वळून इत्यादी

अलामत - 'ऊ' (दीर्घ ऊकार)

रदीफ - जा

किमान शेर - मतला धरून पाच

या वृत्तात मधोमध येणारा 'यती' महत्वाचा आहे.

धन्यवाद!

ओळ क्र. ४१: आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे
वृत्त : व्योमगंन्गा
रदीफ : तितकीच आहे
काफिया : वेदना , साधना, वन्चना,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.42 : सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची ( वैभव वसंत कुलकर्णी यांची ओळ )
वृत्त : वियद्गंगा
लगावली: लगागागा लगागागा लगागागा लगागागा
काफिये: ताज्या, माझ्या, साध्या , गेल्या
अलामत : तंत्रानुसार आ ह्या स्वरांतयमकाची अलामत..बाकी त्याच्या आधीच्या अक्षरावर आलेली जोडाक्षरातील उछारात येणारे वजन हेही अलामतीसारखे वारंवार येणारे ठरावे अश्या काफियांची अपेक्षा !!
रदीफ : विचारांची

लगागागा लगागागा लगागागा लगागागा

१. सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है

२. मुझे तेरी मुहोब्बत का सहारा मिल गया होता

३. सलामे इष्क मेरी जाँ जरा कुबूल करलो

Happy

लक्ष्मी गोडबोले | 1 March, 2014 - 09:35 नवीन

लगागागा लगागागा लगागागा लगागागा

१. सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है

२. मुझे तेरी मुहोब्बत का सहारा मिल गया होता

३. सलामे इष्क मेरी जाँ जरा कुबूल करलो

स्मित
<<<

लक्ष्मी गोडबोले,

सलामे ईश्क मेरी जाँ हे वियदगंगेतील नसून पिनाकी वृत्तातील गीत आहे.

डॉक्टरांच्या टंकलेखनाला काय झालं? कोणी लिंबू टाकलं की टिळा(टिंब) लावला?
व्योमगंन्गा : व्योमगंगा
वन्चना, : वंचना
स्वरांतयमकाची : स्वरान्तयमकाची
उछारात : उच्चारात?

Pages