स्कार्लेट कॉर्डिया

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

स्कार्लेट कॉर्डिया.
\\
\\
100_0739.jpg

\
\
\

शहरातील बागांमधून हि केशरी फ़ुले आणि त्याची झाडे आता खुप दिसायला लागली आहेत. क्युबा या छोट्याश्या देशातील हे झाड आपल्या मातीत चांगलेच रुजलेय.

तीन सेमी व्यासाची हि फ़ुले भडक केशरी रंगाची असतात. सहसा गुच्छानेच येतात. मातकट रंगाच्या कळ्या असल्या तरी पाने मात्र गर्द हिरवी ठळक शिरांची आणि हृदयाकृति असतात.

हे झाड आपल्याकडे दोन तीन मीटर्सपर्यंत वाढू शकते. झाडाला वर्षभर फ़ूले येतच असतात. त्यामूले झाड नेहमी लक्षवेधक ठरते. गोव्याला कला अकादमीच्या आवारात याचा खुपच देखणा वृक्ष आहे. इतर ठिकाणी याची पाने थोडी विरळ असतात, पण कला अकादमीमधले हे झाड मात्र कायम गच्च पर्णसंभार एवून असते.

यालाच मोदकाच्या आकाराची पांढरी शुभ्र फ़ळेदेखील लागतात. त्यानेही झाडाची शोभा वाढते.

याचे शास्त्रीय नाव Cordia sebestena

याचे वर उल्लेख केलेले फ़ळ खाता येते पण त्याला विचित्र वास येतो. यात पिवळी आणि पांढरी फ़ुले येणारी पण जात असते. आपल्याकडे मात्र केशरीच फ़ुले दिसतात.

याचे लाकूड मऊ असले तरी टिकाऊ असते. इजिप्तमधल्या ममी ज्यात ठेवल्या आहेत, ते लाकडी पेटारे या लाकडापासून बनवले आहेत. नूसत्या घर्षणाने आग पेटवण्यासाठी पण या लाकडाचा उपयोग करतात.

विषय: 
प्रकार: 

ह्म्म्म मी पाहिलेय हे ब-याच ठिकाणी, पण मला फक्त फुले आवडली. झाड काहिच्या काहीच दिसते. काळपट खोड, पाने येताहेत की गळताहेत त्याचा पत्ता नाही, वेडिवाकडी वाढ.

माझ्या ऑफिसच्या पहिल्या मजल्यावरिल गार्डनमध्ये ह्याचि दोन झाडे होती. लंचनंतर गार्डनमध्ये फिरताना पायाने याची फळे फोडणे हा माझा आवडता उद्योग होता. ती खातात हे माहित नव्हते. (जनरल लोक पण खातात की फक्त दिनेश यांनीच खाउन पाहिलीत??)

साधना.

आधी मी खाल्ली. मग खाता येतात हे वाचले. पण मुद्दाम खावीत असे काहि सांगणार नाही मी.
नावातले सबस्टिना, हे फळावरूनच आलय.

ग्रेट आहात. मी कधीच असे धाडस करणार नाही. शिवाय ती फळे पाहुन खायची इच्छा ही होत नाहि.

दिनेश, मला लांभ देठ असलेली आणि खाली जमिनीकडे झुकलेली फुले खूप आवडतात. उदा. मधुमालतीची फुले!

>>पण कला अकादमीमधले हे झाड मात्र कायम गच्च पर्णसंभार एवून असते.>> एवून म्हणजे नक्की काय अर्थ होतो?