प्रेम

Submitted by वर्षा_म on 28 November, 2010 - 23:44

मी रुसावं,तू समजवावं..........
मी चिडावं,तू हसावावं.......
कधी मी अबोला धरायच्या आधीच,
तू मला बोलतं करावं,
कधी मी रडायच्या आधीच,
सगळं तुला उमजावं.....
तुझ्या समंजसपणा आणि पेशंसच्या या मिलापाला...
प्रेमापेक्षा उचित काय नाव द्यावं?

गुलमोहर: 

मी बनवावं, तू गडबडावं..........
मी वाढावं, तू पचवावं.......
कधी मी स्वयंपाक करायच्या आधीच,
तू हॉटेलातून मागवाव,
कधी तू पळायच्या आधीच,
कालच शिळं मी द्यावं.....
तुझ्या पचनशक्ती आणि सहनशक्तीच्या या मिलापाला...
भोगापेक्षा उचित काय नाव द्यावं?

वर्षे, करत जा कविता अधूनमधून....

कौतूक Rofl विडंबन मॅडमांना विडंबन फूले देऊन सत्कार केल्याबद्दल टाळ्या वाजवणारा बाहूला: Rofl

वर्षे.. शॉर्ट अन स्वीट बरं का !

रोज भांडतेस का नवर्‍याशी? >> माझी इच्छा असतेच.. पण वरील ओळींवरुन तुझ्या लक्षात नाही का आले... एका हाताने टाळी वाजत नाही Wink

इतके दिवस विडंबनात घालविवले व्यर्थ >>> मी कविता करायला लागले... तर विडंबन परवडले वाटेल Happy

वर्षे, करत जा कविता अधूनमधून.... >> कशाला Uhoh मग माझ्या विडंबन संम्राज्ञीच्या मुकुटावर गदा येइल ना Lol

रच्याकने... कौतुका माझा सावत्र शेजारी तर नाहीस ना तू Uhoh ( नाही आमच्या घरातले तुला एव्हडे डिटेल मधे माहित म्हणुन विचारले Proud )

धन्यवाद Happy

रच्याकने... कौतुका माझा सावत्र शेजारी तर नाहीस ना तू ( नाही आमच्या घरातले तुला एव्हडे डिटेल मधे माहित म्हणुन विचारले )>>>>> हाहाहा Happy

वर्षा मस्तच कविता आणि विडंबन हि छान Happy

कौतुकराव हे घ्या आमचेबी विडंबन Proud

तू कमवावं, मी गमवावं..........
तू साठवावं, मी खर्चावं.......
कधी तूझ्या पगाराच्या आधीच,
मी उधारीवर आणावं,
कधी कर्ज फेडायच्या आधीच,
नविन कर्ज मी काढावं.....
तुझ्या नियोजन आणि काटकसर या मिलापाला...
कंजुशीपेक्षा उचित काय नाव द्यावं?

वर्षे-कौतुक्-वर्षे __/\___

Rofl
किस्स!!!किस किस को दाद दूं,कैसे दाद दूं
वर्षा भी है,कौतुक भी है
हाय>>किस किस को दाद दूं
Proud

तुझ्या समंजसपणा आणि पेशंसच्या या मिलापाला...
दहशत, भीती, मुखदुर्बळपणा, लाटण्याच्या वळाची आठवण, वळलेली बोबडी, दातखीळ, मौनात शांती....वगैरे वगैरे; उचित काय नाव द्यावं? Happy