त्रिवेणी.

Submitted by A M I T on 25 November, 2010 - 01:20

१) काल तुला पाहून
बागेतल्या फुलांनी आत्महत्या केली.
माळ्याने मात्र उगाच माझ्यावर फुले तोडल्याचा आरोप केला.

२) आज हवेत गारवा जरा जास्त आहे.
की मला
तुझ्या मिठीतल्या उबेची सवय झालीय?

३) अंगणातल्या झाडावर एक लालसर फळ लटकलेलं पाहीलं मी.
तू म्हणालीस, सूर्य आहे तो.
दिवसेंदिवस माझी नजर कमजोर होत चाललीय, की तुझी आकलनशक्ती?

४) काल रात्री चंद्र दिसला नाही आभाळात.
मी म्हणालो, जळून राख झाला असेल बिच्चारा.
तू म्हणालीस, पण काल तर अमावस्या होती..!!

गुलमोहर: 

Happy !!!

आज हवेत गारवा जरा जास्त आहे.
की मला
तुझ्या मिठीतल्या उबेची सवय झालीय?

वाह वाह वाह्.....क्या बात हैं...

-परीक्षित

अमित
खुपच सुदर.... मी हा प्रकार पहिल्यांदाच वाचतोय...
मला कोणी सांगू शकेल का त्रिवेणी म्हणजे नक्क्की काय ते?

'त्रिवेणी यह फॉर्म मेरी अपनी इजाद है. बडी सीधी सी फॉर्म है तीन मिसरोंकी. लेकिन उसमें जरासी एक घुंडी है. हल्की सी. पहले दो मिसरों में बात पूरी हो जानी चाहिए. गजल के शेर की तरह वो अपने आप में मुकम्मल होती है. तीसरा मिसरा रोशनदान की तरह खुलता है. उसके आने से पहले दो मिसरों के महफूम पर असर पडता है. उसके मानी बदल जाते हैं. आ उनमें अजाफा हो जाता है.'त्रिवेणी' में एक शोखी का अंग भी है. ये योगासन मैं कर के दिखा सकता हूं. जुबानी समझा नही सकता.'------------------गुलजार.

अमित,
त्रिवेणींचा आशय आवडला.
------------------------------------------------------------------------------------
परंतु, कवितेच्या या फॉर्मबाबत मी अबोध आहे.
भरत यांचा प्रतिसाद वाचून थोडासा बोध झाला.
अनेक त्रिवेण्या वाचल्याशिवाय मी मांडणीबद्दल
मत देणं संयुक्तिक नाही.

Happy अमित मस्तच रे...

मंद्या, गिरीशजींच्या नितांत सुंदर अशा त्रिवेण्या माबोवर आहेत. त्या वाच म्हणजे कळेल Happy