Submitted by वैदेही जोशी on 17 November, 2010 - 12:43
खरडू दे पानावरती जे सुचले आहे
जरी कुणा ना मला तरी ते रुचले आहे / धृ /
धडधडणारे हृदय कुणा वर्णिता न येते
मनात नसता कुणास ते अर्पिता न येते
प्रेमाचे विष कुणा कधी का पचले आहे? / १ /
प्रेमाचा हा भाव्,भूक होवूनी छळते
ब्रम्हराक्षसावाणी मागे मागे पळते
जाणुनी या सत्याला मी तर खचले आहे / २ /
वैदेहि जोशी.
गुलमोहर:
शेअर करा
हाय वैदेहि खुप छान सुधीर
हाय वैदेहि
खुप छान
सुधीर
प्रेमाचा हा भाव्,भूक होवूनी
प्रेमाचा हा भाव्,भूक होवूनी छळते
ब्रम्हराक्षसावाणी मागे मागे पळते
- इथे छ्ळते, पळते ऐवजी छळतो, पळतो असे हवे ना (भाव आणि ब्रम्हराक्षस पुल्लींगी आहे )
छान
छान
कविता आवडली वैदेहि.....
कविता आवडली वैदेहि..... शुभांगीची शंका रास्त वाटते.....
हा बदल पटला तर पहा.
प्रेमाची ही भूक, भावना होवूनी छळते
ब्रम्हराक्षसावाणी मागे मागे पळते
पुलेशु.
सुधीर जी,आपले खूप खूप आभार.
सुधीर जी,आपले खूप खूप आभार.
शुभांगीजी, भूक छळते,व ब्र्म्हराक्षसा सारखी मागे पळते हा अर्थ आहे.
विशालजी व डॉक्टरसाहेब, आपल्या सारख्या दिग्गजांचे प्रतिसाद माझ्या कवितेस लाभले.... खूप आनंद वाटला.
डॉ.साहेब्,आपण केलेला बदल खूप छान आहे. मला वाटतं हे लिहिल्याने शुभांगीजींच्या शंकेचंही निराकरण होईल.
छान झाली आहे. << खरडू दे
छान झाली आहे.:)
<< खरडू दे पानावरती जे सुचले आहे
जरी कुणा ना मला तरी ते रुचले आहे >>
हे विशेष आवडले.
वैदेही, सहज सुंदर ! अजुन लिहि
वैदेही,

सहज सुंदर !
अजुन लिहि !
ध्रुपदाशी इमान राखणारी
ध्रुपदाशी इमान राखणारी कविता...
वेगळा विचार.. नेमकेपणाने मांडला गेलाय..
प्रेमात पडलात वैदेहीजी तुम्ही
प्रेमात पडलात वैदेहीजी तुम्ही सुध्दा..
चांगलं आहे...
पण कविता खरच छान आहे...
-परीक्षित
रुणुझुणू,अनिल्,परिक्षित [आपले
रुणुझुणू,अनिल्,परिक्षित [आपले आभार.
आनंदयात्री,आपल्या प्रतिसादाने मी जरा गोंधळून गेलिये. म्हणजे धृपदाशी इमान राखणारी कविता म्हटले तर ही कविता इतरांना आवडली नाही पण मीच रचली असल्याने मला आवडली, अशी कोपरखळी घ्यायची की तारीफ समजायचं?
आपलेही आभार.
वैदेहीजी, तुम्ही ध्रुपदामध्ये
वैदेहीजी,
तुम्ही ध्रुपदामध्ये म्हटलंय, की इतरांना जरी आवडलं नाही, तरी मला आवडलंय त्यामुळे मी ते खरडणार (हा आपण वापरलेला शब्द, मला तरी हे खरडणं वाटलं नाही)...
आणि कडव्यांचा आशय (मला असं वाटलं की) फारसा कुणाला पटेल असं वाटत नाही. प्रेमामध्ये स्वप्नपात झालेले सोडले, तर इतरांना प्रेमाचे विष हेच पटणार नाही. त्याचप्रमाणे प्रेम ब्रह्मराक्षसाप्रमाणे मागे पळते, त्यामुळे खचले आहे हे दुसरे कडवेसुद्धा इतरांना पटणार नाही (असं मला वाटलं). so said, की ध्रुपदाशी इमान राखणारी कविता!
कोपरखळी (अथवा टोमणा) वगैरेचा हेतु अजिबात नव्हता...
(अन्यथा "वेगळा विचार.. नेमकेपणाने मांडला गेलाय" हे म्हटलं नसतं)
धन्यवाद!
छान जमली
छान जमली
खरडू दे पानावरती जे सुचले
खरडू दे पानावरती जे सुचले आहे
जरी कुणा ना मला तरी ते रुचले आहे / धृ /
छान लिहिले आहे
धडधडणारे हृदय कुणा वर्णिता न
धडधडणारे हृदय कुणा वर्णिता न येते
मनात नसता कुणास ते अर्पिता न येते
प्रेमाचे विष कुणा कधी का पचले आहे?
या ओळी छान आहेत. कविता आवडली. शुभंगीजींना अनुमोदन. तसे बदल योग्य ठरतील.
सुंदर आहे गं.... आवडलं
सुंदर आहे गं.... आवडलं खरडणं..
सही!
सही!