Submitted by जया एम on 23 October, 2010 - 15:46
जसे नितळसे हसू
तसे कोवळेसे ऊन
कुण्या कळीचे आर्जव
उमलते फुलातून
शोधताना पाकळ्यांचे
मधभरले सांगावे
मनी भांबावून वेडे
फुलपाखरू थांबावे
निळ्या तळ्यात हळूच
काळ थांबून राहतो
त्याचे हले प्रतिबिंब
क्षण भरून वाहतो
पाण्याखालून पोहती
जसे मंत्रावले मासे
तुझे आयुष्य माझ्यात
जावे तरूनिया तसे
गुलमोहर:
शेअर करा
पाण्याखालून पोहती जसे
पाण्याखालून पोहती
जसे मंत्रावले मासे
तुझे आयुष्य माझ्यात
जावे तरूनिया तसे
>>> क्या बात है.. ! मस्तच !
शोधताना पाकळ्यांचे मधभरले
शोधताना पाकळ्यांचे
मधभरले सांगावे
मनी भांबावून वेडे
फुलपाखरू थांबावे
निळ्या तळ्यात हळूच
काळ थांबून राहतो
त्याचे हले प्रतिबिंब
क्षण भरून वाहतो
खुप हळुवार आहे हे...
सारीच कविता सुरेख!! खूप
सारीच कविता सुरेख!! खूप आवडली!
जबरदस्त अष्टाक्षरि... आवडलीच.
जबरदस्त अष्टाक्षरि... आवडलीच.
क्या बात है....मस्त मस्त
क्या बात है....मस्त मस्त मस्त.......!!!
क्यूट आहे ही कविता. नाजूक,
क्यूट आहे ही कविता. नाजूक, हळूवार आणि अलगद.
फार सुन्दर, हळुवार आणि
फार सुन्दर, हळुवार आणि गेयपूर्ण
शशांक
पाण्याखालून पोहती जसे
पाण्याखालून पोहती
जसे मंत्रावले मासे
तुझे आयुष्य माझ्यात
जावे तरूनिया तसे>>
अप्रतिम!
मधाळ
मधाळ