कर्जात जोवरी मृत्यू .... हे मीपण आहे केवळ

Submitted by बेफ़िकीर on 12 October, 2010 - 22:12

जीवनाकडे मृत्यूचे.... मी तारण आहे केवळ
कर्जात जोवरी मृत्यू.. हे 'मीपण' आहे केवळ

माझ्यापोटी कोणीही जन्माला आले नाही
प्रत्येक घोट मदिरेचा हे तर्पण आहे केवळ

घर वेगळेच असते हे कोणीही जाणत नाही
आजन्म गुंततो जेथे ते अंगण आहे केवळ

तू बोल, नको बोलू तू, माझ्याशी... नटल्यानंतर
पण सार्‍या नटण्याचे 'मी' हे कारण आहे केवळ

वाटेल करावे जे जे, ते करता येतच नाही
हे कसले जीवन आहे, हे शोषण आहे केवळ

हा भिनला माझ्यामध्ये, तो भिनला माझ्यामध्ये
माझ्यामध्ये मी नाही, ही चणचण आहे केवळ

मी तुझी कधीही नव्हते यावर विश्वास बसेना
मी तुझीच आहे वेड्या हे भाषण आहे केवळ

हे आता कोठे कळले, मी मला शोधतो आहे
मी तुला शोधतो आहे ती वणवण आहे केवळ

मातीचे, संस्कारांचे, मोहांचे अन भोगांचे
त्या लाख लाख पितरांचे, मी मिश्रण आहे केवळ

दैवात तुझ्या जे आहे ते लागेलच भोगावे
'बेफिकीर' अपुल्या कविता हे वंगण आहे केवळ

गुलमोहर: 

निखालस दर्दभरी गझल.... Sad

मतला अगदी यथार्थ...
चणचण्,भाषण्,वणवण्,वंगण.... खूप अर्थगर्भ झाले आहेत.

जीवनाकडे मृत्यूचे.... मी तारण आहे केवळ
कर्जात जोवरी मृत्यू.. हे 'मीपण' आहे केवळ

आजन्म गुंततो जेथे ते अंगण आहे केवळ

मातीचे, संस्कारांचे, मोहांचे अन भोगांचे
त्या लाख लाख पितरांचे, मी मिश्रण आहे केवळ >> हेच फक्त आवडले!

तू बोल, नको बोलू तू, माझ्याशी... नटल्यानंतर
पण सार्‍या नटण्याचे 'मी' हे कारण आहे केवळ.......व्वा व्वा!

हा भिनला माझ्यामध्ये, तो भिनला माझ्यामध्ये
माझ्यामध्ये मी नाही, ही चणचण आहे केवळ....अहाहा!

मी तुझी कधीही नव्हते यावर विश्वास बसेना
मी तुझीच आहे वेड्या हे भाषण आहे केवळ......अप्रतिम!!

हे आता कोठे कळले, मी मला शोधतो आहे
मी तुला शोधतो आहे ती वणवण आहे केवळ.....जबरी!!!

दैवात तुझ्या जे आहे ते लागेलच भोगावे
'बेफिकीर' अपुल्या कविता हे वंगण आहे केवळ.....कळस!!!!

.............जियो भुषणजी

खुप सुंदर आहे गझल.... आवडली Happy

<<तू बोल, नको बोलू तू, माझ्याशी... नटल्यानंतर
पण सार्‍या नटण्याचे 'मी' हे कारण आहे केवळ>> हे तर एकदम खास...

शेवटच्या चार ओळी देखील मस्त आहेत... Happy

सर्वांच्या प्रेमळ प्रतिसादांचे मनःपुर्वक आभार मानत आहे.

-'बेफिकीर'!

जीवनाकडे मृत्यूचे.... मी तारण आहे केवळ
कर्जात जोवरी मृत्यू.. हे 'मीपण' आहे केवळ

घर वेगळेच असते हे कोणीही जाणत नाही
आजन्म गुंततो जेथे ते अंगण आहे केवळ

हे आता कोठे कळले, मी मला शोधतो आहे
मी तुला शोधतो आहे ती वणवण आहे केवळ

मातीचे, संस्कारांचे, मोहांचे अन भोगांचे
त्या लाख लाख पितरांचे, मी मिश्रण आहे केवळ

दैवात तुझ्या जे आहे ते लागेलच भोगावे
'बेफिकीर' अपुल्या कविता हे वंगण आहे केवळ
>>>>

हे आवडले Happy

अरोभोट, अनिल, योग,

मनापासून आभार! (अनिल, गझल कळू लाग'ली' आहे, लाग'ले' आहेत नव्हे! साज सांगीतले. गै.न.)

-'बेफिकीर'!

कारण , चणचण हे शेर आवडले. त्यातही चणचण अधिकच आवडला.
हा भिनला माझ्यामध्ये, तो भिनला माझ्यामध्ये
माझ्यामध्ये मी नाही, ही चणचण आहे केवळ
हा फारच सुंदर शेर आहे.

पण, बाकी एवढी मजा नाही आली.

पुलेशु.

तू बोल, नको बोलू तू, माझ्याशी... नटल्यानंतर
पण सार्‍या नटण्याचे 'मी' हे कारण आहे केवळ

वाटेल करावे जे जे, ते करता येतच नाही
हे कसले जीवन आहे, हे शोषण आहे केवळ

मी तुझी कधीही नव्हते यावर विश्वास बसेना
मी तुझीच आहे वेड्या हे भाषण आहे केवळ

या सगळ्या शेरांना दाद देतोच, मात्र-

मातीचे, संस्कारांचे, मोहांचे अन भोगांचे
त्या लाख लाख पितरांचे, मी मिश्रण आहे केवळ

हा सर्वाधिक आवडला. अत्युच्च आहे ! हासिले गझल- निर्विवाद. Happy
गजल आवडली, हेवेसांनल.

तू बोल, नको बोलू तू, माझ्याशी... नटल्यानंतर
पण सार्‍या नटण्याचे 'मी' हे कारण आहे केवळ

वाटेल करावे जे जे, ते करता येतच नाही
हे कसले जीवन आहे, हे शोषण आहे केवळ

हा भिनला माझ्यामध्ये, तो भिनला माझ्यामध्ये
माझ्यामध्ये मी नाही, ही चणचण आहे केवळ

मी तुझी कधीही नव्हते यावर विश्वास बसेना
मी तुझीच आहे वेड्या हे भाषण आहे केवळ

हे आता कोठे कळले, मी मला शोधतो आहे
मी तुला शोधतो आहे ती वणवण आहे केवळ

संपुर्ण गझल अप्रतिम आहे.
वरिल ओळी विषेश आवडल्या.
ओळींमधला भावार्थ अतिशय खोल, मनाचा ठाव घेणारा आणि शाश्वत आहे.
मनापासुन अभिनंदन !!!

'तर्पण" चा अर्थ काय?>>>
तर्पण- तृप्ती, मृतांच्या नावाने पाणी देणे.

गझल आवडली.

सर्वांचे मनःपुर्वक आभार!

अ.अ., श्री नंदन, हंसा, भाऊ नमस्कार, गिरीश, ज्ञानेश, मयुरेश, गणेश, बुमरॅन्ग, निलिमा, अनुजा,

आपण आवर्जुन प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभारी आहे. ज्या कोणा तीन जणांना हे लेखन निवडक दहामधे घेण्याइतपत आवडले त्यांचे विशेष आभार, कारण ते प्रतिसादकाच्या निवडक दहामध्ये गेल्याशिवाय समजत नाही व ती प्रोसेस वेळखाऊ असते.

-'बेफिकीर'!

Pages