वाघुळफुले
वाघुळफ़ुले.
काहि दिवसांपुर्वी बसमधून या झाडाला फ़ुले आलेली बघितली होती, पण हि फ़ुले दिवसा झाडावर दिसणे कठिण म्हणून, अगदी सकाळीच दादरच्या पाच उद्यानाजवळच्या या झाडाला गाठले. डोळ्यासमोरच फ़ुले टपाटप खाली पडत होती. पुरेसा प्रकाश नसल्याने झाडावरच्या फ़ुलांचे फ़ोटो तितकेसे नीट आलेले नाहीत.
हि आहेत वाघुळफ़ुले. आकारावरुन वटवाघळाचाच भास होतोय ना ? या झाडाची पाने साधारण वारसवृक्षासारखीच. पण याची पानझड होत नाही. झाड सदा गच्च पर्णसंभार लेऊन असते. भक्कम दांडोर्यावर अशी झुंबरासारखी फ़ुले येतात. धसमुसळ्या वटवाघळाना लटकणे सोयीचे व्हावे म्हणून फ़ुलांचा दांडा लांब आणि भक्कम. वटवाघळे ध्वनिलहरी सोडुन त्याच्या प्रतिध्वनीचा मागोवा घेत उडतात हे आपल्याला माहित आहेच, तर या ध्वनिलहरी नीट प्रतिद्वंदीत व्हाव्यात म्हणुन या फ़ुलाचा आकार हा असा कर्ण्यासारखा. शिवाय त्याना आकर्षित करण्यासाठी कुजका मांसासारखा गंध. बघा म्हणजे पाहुण्यांची किती सोय करुन ठेवली आहे ती. मग त्याबदल्यात परागीभवनाची अपेक्षा ठेवली तर कुठे बिघडले.
पुरेसा प्रकाश मिळण्यासाठी मला उजाडायची वाट बघावी लागली, तर या फ़ुलानी जमिनीवर उड्या घ्यायला सुरवात केलीच होती. आणखी उशीर होता तर गाड्यांच्या चाकाखाली आणि पादचार्यांच्या पायाखाली याचा चुथडा झाला असता. परिसरात घाण कुजकट वास येत होता तो या फ़ुलांचाच. हा वास इतका तीव्र होता कि या फ़ुलांवर घरमाश्या घोंघावत होत्या.
वरच्या फ़ोटो दिसताहेत तसी छोट्या दूधीभोपळ्यासारखी हि फ़ळे आधी या रंगाची आणि सुबक दिसतात मग मात्र ती सुकुन लाकडासारखी होतात आणि थोडीशी ओबडधोबडही. गोरखचिंचेसारखी दिसत असली तरी या फळांचा खाण्यासाठी उपयोग होत नाही. त्यामूळे हि वजनदार फ़ळे दोरीला बांधलेल्या वरवंट्यासारखी ( हि उपमा जी एंची ) झाडाला लटकत असतात. जी एंच्याच मते एकमेकाच्या टाळक्यात हाणण्याशिवाय याचा दुसरा उपयोग नाही. हि झाडे ज्या परिसरात आहेत त्याना पण हिच भिती वाटत असते. त्यामुळे हि झाडे तोडून टाकावीत अशी मागणी काहि वर्षांपुर्वी होत होती, पण अजुनतरी ती झाडे तिथे आहेत. उद्याचे काय सांगावे. ?
याचे शास्त्रीय नाव आहे Kigelia pinnata हे आलेय मुळ आफ़्रिकन नावावरून. आणि इंग्लिशमधे याचे नाव सॉसेज ट्री.
वाघुळफुले
वाघुळफुले कित्ती सुंदर आहेत!
आणि ते तिसर्या चित्रातील फळ बरेचदा बघितले आहे, पण आजच नाव आणि इतर माहिती कळली. धन्यवाद!
दिनेश, फूल
दिनेश, फूल काय मस्त आहे दिसायला.
जिएंच्या कोणत्या कथेत याचा उल्लेख आहे?
मी पण
मी पण डोक्याला ताण देऊन बघितला पण जीएंच्या कुठल्या कथेत ह्यांचा उल्लेख आहे ते आठवत नाही.
वटवाघुळांचा आणखी एक उपयोग म्हणजे ती रात्री जाग्या होणार्या व उडणार्या किड्यांना खातात. जे इतर पक्षी खात नाहीत. त्यामुळे पिकाचे अश्या किड्यांपासून संरक्षण होते. आमच्या इथल्या एका जवळच्या खेड्यात काही तरुण मुलांनी गम्मत म्हणुन बरीच वटवाघुळे छर्याच्या बंदुकीने मारली (दिवसा मारायला सगळ्यात सोपा पक्षी ना). त्या गावातले पीक त्यावर्षी फारच वाईट आले होते.
जी. एंच्या
जी. एंच्या कथेत नाही त्यानी लिहिलेल्या एका पत्रात हा उल्लेख आहे.
काहि प्राणी हि फळे खातात असा उल्लेख वाचला मी.
नाशिक परिसरात बरिच झाडे आहेत याची.
दिनेश, हा
दिनेश, हा लेख अप्रतीम जमला आहे.
VAGHUL phulanchi information
VAGHUL phulanchi information far aavadli. fulanla vas jari ugra asala tari fulancha rup far god aahe.dinesh i would love 2 visit jijamata udyan, bhyculla with u this seaon as i can identify d flowers with ur help. If u r going this week my group is eager 2 com with u. i regularly read informtion & photos given by u.its very interesting.
It would be my pleasure too.
It would be my pleasure too. सध्या गायत्री म्हणजे निळ्या फुलांची लिग्नम व्हायटे आणि गोरखचिंच फुलानी लगडल्या आहेत. याच रविवारी गेलात तर दिसतील.
वाघुळफुला
वाघुळफुलांचा फोटो छान आलाय,
बहवा आणि तामण फुलांचा पण असाच मस्त फोटो येऊ द्या ना.
छान फोटो
छान फोटो काढलेत!