मायबोलीकर मित्रहो,
कोणत्याही राजकिय पक्षाशी मी बांधिल नाही किंवा कोणाचेही मी समर्थन करत नाही. सध्या मुंबापुरीत घडत असलेल्या (सोमवारी पुण्यापर्यंत पोचलेल्या) या ज्वलंत विषयावर निकोप चर्चा व्हावी, काही विधायक मार्ग निघावेत ही सदिच्छा!
रविवार आणि सोमवारी घड्लेल्या गोष्टींचा थोडक्यात आढावा हा असा:
मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये परप्रांतियांना मारहाण केली. यामध्ये प्रामुख्याने टॅक्सी चालक आणि ठेलेवाले-विक्रेते यांचा समावेश. ठाणे येथील चित्रपटगृहात भोजपुरी चित्रपट चालु असताना जाळपोळ.
समाजवादी पार्टीचे नेते अमर सिंग, जया बच्चन यांची याबद्दलची व्यक्तव्ये. लालु प्रसाद यांचे मत. या सगळ्यांवर राज ठाकरे यांची प्रत्युतरे.
बच्चनच्या बंगल्यावर कथित बाटली हमला.
स. पा. च्या कार्यकर्त्यांनी कलकत्ता, अलाहबाद, लखनौ येथे केलेला निषेध.
अधिक तपशिल कुठल्याही पेपर किंवा न्युज चॅनेल वर मिळतीलच. महत्त्वाचे वाटणारे संदर्भ जरुर मांडावेत.
प्रश्ण असा राहतो कि, मुंबई कोणाची? हे ठरवण्याचा अधिकार कुणाचा? जरी कोणाचे मत मुंबई फक्त मुंबईकरांची असे असले तर हे दर्शवण्याची पद्धत कशी असावी?
या गोष्टींचा राजकिय पार्ट्या कसा फायदा करुन घेतील?
मुंबईमधील जनसामान्यांचे काही कल्याण हे साधु शकतात का?
आणि तुम्हाला असे वाटते का की हे सर्व १९७२ १९७३ सालात घडलेल्या मराठी विरुद्ध साउथ इंडियन सारखेच घडत आहे?
-झुळूक
अपेक्षेप्
अपेक्षेप्रमाणे राजसाहेबांना रत्नागिरीला अटक केल्याचे वाचले. आता विलासरावांनी राज-मनसे चे जे मुद्दे आहेत त्यांचा पण समाचार (मुद्यांची दखल घ्यावी) घ्यावा.
रेल्वेच्या ज्या पदांच्या रविवारी परिक्षा होत्या, त्यांच्या जाहिराती महाराष्ट्रातील कुठल्याही वृत्तपत्रात आल्या नव्हत्या हे (राज - मनसे चे) म्हणणे खरे आहे कां? मग कोर्टा कडून त्या परिक्षा रद्द नाही का करता येत? जसा कायदा सर्वांना समान असतो तसेच भरती सत्र पण सर्वांना समान नको कां?
राजना अटक
राजना अटक ही दुर्दैवी गोष्ट आहे... रेल्वेच्या जाहीराती मराठी पेपर्मध्ये असाव्यात हा पूर्वीपासून आग्रह आहे, पण सरकारचे सतत त्याकडे दुर्लक्ष आहे.. देशात कुठेही कुणीही नोकरी करु शकतो हे मान्य आहे, पण मग जाहीराती बिहार- यू पी च्या पेप्रात का ? मराठी लोकाना जाणीव पूर्वक नोकर्यापासून दूर ठेवणे यामुळे ते तथाकथित समानतेचे तत्व भंग होत नाही का ? आणि यू पीच्या लोकानी / लालूने अहिंसात्मक मार्गाचा आग्रह धरणे हास्यास्पद आहे.. त्याना त्या भाषेतच 'उत्तर' दिले पाहिजे... बॅन्क्/इन्सुरन्स/ यूपीएस्सी/मेडिकल एन्टन्स अशा इतर अनेक परिक्षानाही परराज्यीय लोक येतात. त्याना कधी राजने/मनसेने/कुणीही विरोध केला नाही.. कारण त्यात मराठी लोकाना जाणीव्पूर्क दूर ठेवण्याचे असे प्रकार घडत नाहीत... जेंव्हा घडले, तेंव्हा विरोध झालेला आहेच. प्रश्न बाकी लोकाना विरोध करण्याचा नाही, जाणीव पूर्वक मराठी लोकाना दूर ठेवण्याचा आहे...
पण परिक्षा
पण परिक्षा द्यायला आलेल्या लोकांना मारुन काय उपयोग. त्यांना मारुन फारतर मनसेला काही तरी केल्याचे समाधान मिळत असेल. पण ह्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते.
मग कोर्टा कडून त्या परिक्षा रद्द नाही का करता येत? जसा कायदा सर्वांना समान असतो तसेच भरती सत्र पण सर्वांना समान नको कां?>>> पण त्यामधे पटकन प्रसिद्धी कशी मिळणार? त्यापेक्षा राडा केलेला बरा.
आता लालु म्हणतो की परिक्षा महाराष्ट्राबाहेर घेणार. मग महाराष्ट्रात कळणार पण नाही केव्हा परिक्षा झाल्या आणि कोणाला नोकर्या दिल्या ते. ह्यावर राजचे काय म्हणणे आहे.
असो निवडणुका होइपर्यंत हे असेच चालु रहाणार. दोन सेनेच्या भांडणाचा फायदा घेवुन विलासराव परत मुख्यमंत्री होतील.
या आधी
या आधी सनदशीर मार्गाने या प्रकरणाचा फॉलो अप केला होताच की.. पण 'सनदी' लोक ऐकतच नाहीत, मग आता 'शीर' पकडायला नको का ? यात राडा करण्याचा प्रश्न येतोच कुठे ? 'नाठाळांचे माथी हाणू काठी' असं आपल्याच महाराष्ट्रात 'कुणीतरी' म्हणून ठेवलंय.... ... उद्या न्यू दिल्लीत किंवा न्यू जर्सीत आपली नोकरी शाबूत राहील का, अशी चिन्ता असणार्याना राज/मनसे प्रकरण पचणे कठिणच आहे !
या आधी
या आधी सनदशीर मार्गाने या प्रकरणाचा फॉलो अप केला होताच की.. >>> केव्हा केला होता? कोणी केला होता? काही डिटेल्स आहेत का? आणि कायदा हातात घेउन लहान प्याद्यांना मारुन काय फायदा. लालु विरुद्ध आवाज का नाही उठवत.
आणि उगाच वैयक्तिक पातळीवर येवु नका. आमच्या नोकरीची आम्ही काळजी घेउ.
राज ठाकरे
राज ठाकरे यांचा मूळ मुद्दा जरी समजण्यासारखा नि मान्य करण्याजोगा असला तरी त्यांनी स्वीकारलेला मार्ग चुकीचा आहे. साफ चुकीचा आहे. राडा हा वाईटच. पुनः मागे कुणि म्हंटल्याप्रमाणे, पुढारी कधीच कबूल करत नाहीत की त्यांनी बेकायदेशीर वर्तन केले. ते सांगतात, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना शांततापूर्ण निदर्शने करायला सांगितले होते, कदाचित् आमच्या विरुद्ध असलेल्या लोकांनी आमच्या बद्दल वाईट मत व्हावे म्हणून गुंडांकडून असे वर्तन करविले!
उगाच बाहेरच्यांना मारण्या आधी, जरा महाराष्ट्रियांना जागे करा! स्वाभिमानशून्य जनता आहे ही. त्यांना पटवून द्या की मराठीतच बोलायचे. ते होणे नाही! कारण परप्रांतियांचे सर्व प्रकारचे इतके धंदे महाराष्ट्रात आहेत, की उलट मराठी लोकांनाच इतर भाषेतून बोलले नाही तर धंदा करणे कठीण होईल.
अजूनहि महाराष्ट्रियांना इतर भाषांचेच प्रेम जास्त आहे हे मायबोलीवरून दिसून येते. कितीदा सांगितले, अरे हा मायबोलीचा उपद्व्याप, स्वतःच्या खर्चाने, मराठीच्या प्रेमाखातर सुरू केला आहे. इतर ठिकाणी नाही तर निदान इथे तरी मराठी लिहा, वाचा. पण लोक हट्टाने इतर भाषा लिहीतात. बरेच जण प्रयत्न सुद्धा करत नाहीत. वर टिंगल करून, हट्टाने मुद्दाम इतर भाषेत लिहीतात. असली ही यांची वृत्ति. कशाला फुकट बोंबा मारायच्या - 'आमची मराठी!' आणि हे शिकले सवरलेले लोक. मग बिचार्या अशिक्षितांना काय सांगणार!
राजला जर खरच काही करायचे असेल तर आधी राडा बंद कर, नाहीतर महाराष्ट्रियांची नुसती बदनामी करण्यापलीकडे काही साध्य होणार नाही.
त्याच्यात नि रानटी लोकांच्यात (पक्षी: अमेरिका) काहीच फरक नाही. आधी झोपा काढायच्या नि अंगावर आले की एकदम मारामारी! अमेरिकेने इराक, अफगाणिस्तान इकडे लढाया सुरू केल्या. आता तेलाच्या किंमती वाढल्या, नि एकंदरीत या युद्धाच्या खर्चापायी पैशाच्या हव्यासाने एकंदरीत सगळ्या अमेरिकेचेच वाट्टोळे झाले. तेच पैसे युद्धा ऐवजी अमेरिकेतच वापरले असते, तर??
जसे महाराष्ट्रियांचे या धंद्या शिवाय अडते, तसे या धंदेवाल्यांचे सुद्धा महाराष्ट्रियांविरुद्ध अडते. पण लाचारी, स्वाभिमानशून्यता या मुळे महाराष्ट्रियनांनी स्वतःला विकले. त्या लोकांना कळले, की हे महाराष्ट्रियन म्हणजे पुचाट! मग काय. त्यांनी आपली भाषा सोडलीच नाही.
आज राजची ताकद वाढली तर काही विधायक करण्या ऐवजी तो परप्रांतातून मुंबईत येणार्या गाड्या, विमानेच बंद करेल! मग बसतील महाराष्ट्रीय बोंबलत. हिंदी सिनेमातले नट जरी परप्रांतीय असतील तरी बहुसंख्य कामगारांचा उदरनिर्वाह त्या धंद्यावरच अवलंबून आहे. तेंव्हा विचार करा, राजला समजवा.
झक्कींना
झक्कींना अनुमोदन. राजला अटक झाली म्हणुन त्याच्या लोकांनी बसेस जाळल्या. हि सार्वजनीक मालमत्ता महाराष्ट्राचीच आहे. बिहारची नाही. त्याचे नुकसान करुन काय साधणार.
त्याचे
त्याचे नुकसान करुन काय साधणार.
>>>>
काय साधणार म्हणजे? प्रसिद्धी , राजकारण..
झक्कीसाहेबांचा एक संसकृत शेर आहे ना तो काहीतरी..
घटं छिंद्यात पटं भिंद्यात...
काय हो ते पूर्ण झक्की साहेब?
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
झक्कीसाहे
झक्कीसाहेबांचा एक संसकृत शेर ..?
( येन केन प्रकारेण प्रसिद्धो पुरुषो भवेत .. हाच का ? हा शेर ( !) झक्की साहेबान्चा आहे, हे माहीत नव्हते.. )
टोणगा
टोणगा यांना माझी गंमत करायची हौस आहे. त्यातून विनोद निर्माण झाले तर तेव्हढीच आपली करमणूक.
असो.
संस्कृत सुभाषित असे आहे:
घटं छिंद्यात् पटं भिंद्यात्
कुर्यात् रासभरोहणं
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत् |
दुर्दैवाने हा राज इतर महाराष्ट्रियांचेच नुकसान करतो आहे. अर्थात् तो म्हणेलच, की मी नि माझे कार्यकर्ते यांनी नाही केले, प्रतिपक्षाच्या लोकांनीच आमची बदनामी करण्यासाठी राडा केला!
बाकी राजच कशाला पहिजे, काहीहि कारणावरून राडा करणे हीच आजकालची पद्धत आहे. नुसती गुंडगिरी, चोर्यामार्या, लुटालूट. धन्य धन्य माझा भारत! त्यातून महाराष्ट्रीय लोक म्हणजे स्वतःच्या कुठल्याच गोष्टीचाच अभिमान नाही. हिंदी, इंग्रजी चे एव्हढे प्रेम! खुद्द राज सुद्धा स्वतःच्या वृत्तवाहिनीला Star channel म्हणतात. कारण इंग्रजीचे पाय चाटायचे. मराठीत काही शब्द नाहीत का? चोर, ढोंगी माणूस! हिंमत नि कळकळ असेल काही तरी विधायक कार्य करून दाखव! ते कोण करेल?
हा शेर ( !)
हा शेर ( !) झक्की साहेबान्चा आहे,
--- शेर म्हणायचे अथवा सुभाषित ?
'नाठाळांचे
'नाठाळांचे माथी हाणू काठी' >> जागो रामदासांनीच लिहून ठेवले आहे " भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळांचे माथी हाणू काठी".
राज ने परिक्षा बंद पाडून चांगले केले. विद्यार्थ्यांना मारहाण करायला नको होती. पण त्यांना मार खायची सवय आहे हो, लालू, मुलायम यांच्या राज्यात अजुन काय होनार. विसरतील बिचारे. शेवटी सर्व काही भोगनारी जनताच.
मराठवाड्यात नांदेडला रेल्वेचे सबडिव्हीजन आहे. तिकडे पण परिक्षा घेउन नौकरभरती केली जाते, पण त्याची मराठी पेपरात जाहिरात केली जात नाही, तिकडे द म रे च्या मुख्यालयातूनच ( हैद्राबाद) जाहीरात केली जाते, ईग्रंजी वा तेलगू भाषेत आणि मराठी लोक बसतात बोंबा मारत. त्यांना नंतरच् कळत की अशी काही परिक्षा होती ते. पण भरती होते महाराष्ट्रात. कारण देताना ते सांगू शकतात की द म रे ही सेंट्रलच्या अखत्यारीत येते, राज्याच्या नाही. त्यामूळे सनदशिर वैगरे काही नाही, ऐका नॅशनल लेवल च्या वॄत्तपत्रात (पक्षी फक्त टाईम्स ऑफ ईंडीया) जाहिरात दिली की झाले.
त्यामुळे हा प्रश्न फक्त मुंबई वा पुण्याचा नाही. आणि मनसेच्या लोकांनी गाड्या जाळून काय मिळवले हे विचारन्याआधी हा पण विचार व्हावा की गाड्या, सार्वजनीक मालमत्ता सर्वच जन फुकतात. पण राजनी निदान त्यांना थांबवायला पाहिजे, म्हणजे पार्टी विथ डिफरंस होऊ शकेल. सरकारी लोकांना घेराव, त्यांच्या स्वतःच्या गाडीची जाळपोळ मात्र करायला हरकत नाही, सार्वजनीक मालमत्ता मध्ये आनू नये. ऐवढे जरी केले तरी भरपुर शिक्षीत लोकांना तो त्याचा कडे ओढू शकतो.
सार्वजनीक
सार्वजनीक मालमत्ता मध्ये आनू नये.जाळपोळ नि राडा करणारे लोक मालमत्तेची मालकी कुणाची आहे ते तपासत बसतील असे वाटते का तुम्हाला? आता राजच्या मनात असेल तर जिथे राडा होतो आहे तेथे जाऊन राडा करणार्याचा हात ते धरू शकत नाहीत का? त्यांचे 'शांतताप्रिय" अनुयायि इतके दुर्बळ आहेत का? मग तो तसे का करत नाही?
विद्यार्थ्यांना मारहाण करायला नको होती. पण त्यांना मार खायची सवय आहे हो, लालू, मुलायम यांच्या राज्यात अजुन काय होनार. विसरतील बिचारे. शेवटी सर्व काही भोगनारी जनताच.
तशी महाराष्ट्रियनांना सुद्धा असले सगळे अपमान सहन करत जगायची सवय आहेच की हो! खुश्शाल मराठी न येणारे लोक मराठी लोकांवर राज्य करतात, नि महाराष्ट्रीय त्यांची भाषा शिकतात, नि मराठी विसरतात.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3625269.cms
अत्यंत लाजिरवानी गोष्ट.
या अशा
या अशा दंगलींमुळे खरच सामान्य माणसाला खूप त्रास होतो.
माझे आई, वडील काल पहाटे यु. स वरुन मुंबई ला पोचले.
तिकडे गाडी ने पुण्यात पोचायला त्यांना ६ तास लागले
मधे काचा फोड्ण्याच्या घटना घडलेल्या, एवढ्या पहाटे सुधा..
आणी ईकडे टि. वि वर राज ठाकरेंच्या अटकेचि बातमी वाचली तेव्हा पासुन ते आई बाबा सकाळी सुखरूप घरी पोहोचेपर्यन्त काळजी लागून राहिलेली.
सामना मधली
सामना मधली ही बातमी खरी आहे का ?
http://www.saamana.com/2008/Oct/21/Link/Main7.htm
जोशी
जोशी साहेब, अहो ते वचन रामदासांचे नाही, तुकारामांचे आहे..
रामदास कशाला काठी हातात घेतील ? कारण त्यानीच म्हणून ठेवलंय... समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे ?
( .........आणि कायदा हातात घेउन लहान प्याद्यांना मारुन काय फायदा. लालु विरुद्ध आवाज का नाही उठवत. ? ) साहेब, अशा प्रकरणांमध्ये बळी प्याद्यांचाच पडत असतो. सर्वच राजकीय पक्षांच्या बाबतीत हे होत असते, एवढेच कशाला... अगदी इतिहासातील राजे, महाराजे, बादशाह, शहेनशाह आणि छत्रपतीही याला अपवाद नाहीत...
मुंबइ- पुणे पोहोचायला सहा तास लागले हे आश्चर्यच आहे.. अन्धेरी ते घाटकोपर बसचा प्रवास आणि नंतर डोम्बिवली पर्यन्त लोकलने आम्हाला कसला त्रास झाला नाही. उलट काल सगळ्या बसेस, ट्रेन्समध्ये अजिबात गर्दी नव्हती, रस्त्यावर रिक्शा, फळवाले, भेळवाले यान्ची अनावश्यक गर्दी हटलेली होती. रस्ते छानपैकी मोकळे होते.. फिरणारे सगळे लोक बहुतांशी महाराश्ट्रियन होते.... गर्दी नसताना स्टेशनपासून घरापर्यन्त चालत जाणे हा एक सुखद अनुभव होता.. कालची रात्र खरंच एक मंतरलेली रात्र होती... हार्ट फेल झाले की माणसाला सर्वांगाला सूज येते.. अचानक एक स्ट्राँग डाय युरेटिक दिले की सूज ओसरते आणि पेशन्टला रिलिफ मिळतो.... बस्स ! तेच फीलिन्ग.... सूज ओसरण्याचे.. मलाच नाही, बर्याच जणांचा कालचा अनुभव असाच आहे.... राजना डोम्बिवलीना नेलेले आहे, सावधपणे घरी जा असा घरून ( कोल्हापूरहून) फोन आलेला होता, ऑफिसमध्येच रहा असाही निरोप होता, पण सगळे शान्त शान्त होते...
>>अचानक एक
>>अचानक एक स्ट्राँग डाय युरेटिक दिले की सूज ओसरते आणि पेशन्टला रिलिफ मिळतो
काही कळ्ले नाही पण काल खरच रिलिफ मिळाला ट्राफीक पासून...
अगदी सहमत!!!
http://www.starmajha.com/NewD
http://www.starmajha.com/NewDiscussionReply.aspx?ForumID=2483
ही बंदी
ही बंदी कदाचित् कुणि मराठी न्यायाधीशानेच आणली असेल. कारण मराठी लोकच म्हणतात की मराठी वाहिन्या बेक्कार, कंटाळवाण्या असतात, त्यापेक्षा हिंदी, इंग्रजी वाहिन्याच बर्या. मराठी वाहिन्यांवर अन्याय झाला तरी मराठी लोकच पर्वा करत नाहीत. फार तर आणखी थोडा राडा करून आणखी बदनामी करून घेतील, नि आपल्याच गरीब मराठी लोकांचे नुकसान करतील!
किंवा एखाद्या अमराठी वकीलाला जबरदस्त पैसे देऊन न्यायालयाकडे पाठवतील. मराठी वकीलांना अमराठी अशिले बरी वाटतात, पैसे मिळतात. शिवाय त्यांच्याशी घाटी लोकांसारखे मराठीत बोलावे लागत नाही.
मग तो अमराठी भरपूर पैसे घेऊन चार वर्षाची तारीख देईल सुनावणि साठी! तोपर्यंत बहुधा सगळे लोक इतर वाहिन्यांचेच पंखे बनतील.
हे का
हे का म्हणे. च्यायला हे बर ये, हिंदी चालू आणी मराठी बंद. व्यक्ती, प्रदेश स्वातंत्र्य यांचा गप्पा मारनार्या लोकांनी मराठी वाहिन्या का बंद केल्या असा प्रतिप्रश्न आता हिंदी वाहिन्या विचारनार आहेत का? ही सावत्र वागनूक दिल्यामुळेच मराठी हा विषय परत वर आला.
बास झाले हे दंगे आता. हिंदू - मुस्लीम, मराठी- हिंदी, भारत पाक, ब्राम्हण मराठा, मराठा - ईतर जाती, पुणे विरुध्द ईतर मराठी लोकं, च्यायला आपण सोबत कधी असतो.
राज
राज ठाकरेंना एक कलावंत म्हणुन ह्या घटना पसंत असतील असे वाटत नाही. स्वत: ची ओळख ते नेहमी च एक व्यंगचित्रकार म्हणुन करुन देतात. पण राजकरणात कलावंत अन कलावंतीण दोन्ही ही गोष्टी सांभाळावया लागतात. नवीन पक्षाच्या स्थापणा काळात आपल्याकडे लक्ष वेधुन घेण्याच्या गरजेतुन ह्या गोष्टी घडत आहेत. शिवसेने ने ही हेच केले होते. अन त्याच पक्षाच्या मुशीत तयार झाल्यामुळे राज पण ते च करत आहेत! एकदा पक्ष एस्टॅबलीश झाला कि बहुदा ते उधोसाहेबा प्रमाणे मवाळ होतीलही!
इंदिरा गांधी ची हत्या झाल्यनंतर शीखांच्या दंगलीबाबत बोलताना राजीव बोलले होते कि, जेंव्हा मोठा वॄक्ष पडतो तेंव्हा धरती थोडी हलणारच की. महाराष्ट्रातील प्रमुख अश्या ठाकरे कुटंबातील भाउबंदकी चा एवढा तेवढा परिणाम दिसणारच की!!
असो! `साहेबांनी राज ला सकाळी लवकर उठुन, एकशे वीस तीनशे खायला पण सांगीतलेले आहे. अन त्याप्रमाणे राज सकाळी पवार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र असा गजर देणारे घड्याळ वापरत आहेत ही. त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल हे!
राज
राज ठाकरेंना एक कलावंत म्हणुन ह्या घटना पसंत असतील असे वाटत नाही. स्वत: ची ओळख ते नेहमी च एक व्यंगचित्रकार म्हणुन करुन देतात. पण राजकरणात कलावंत अन कलावंतीण दोन्ही ही गोष्टी सांभाळावया लागतात. नवीन पक्षाच्या स्थापणा काळात आपल्याकडे लक्ष वेधुन घेण्याच्या गरजेतुन ह्या गोष्टी घडत आहेत. शिवसेने ने ही हेच केले होते. अन त्याच पक्षाच्या मुशीत तयार झाल्यामुळे राज पण ते च करत आहेत! एकदा पक्ष एस्टॅबलीश झाला कि बहुदा ते उधोसाहेबा प्रमाणे मवाळ होतीलही!
इंदिरा गांधी ची हत्या झाल्यनंतर शीखांच्या दंगलीबाबत बोलताना राजीव बोलले होते कि, जेंव्हा मोठा वॄक्ष पडतो तेंव्हा धरती थोडी हलणारच की. महाराष्ट्रातील प्रमुख अश्या ठाकरे कुटंबातील भाउबंदकी चा एवढा तेवढा परिणाम दिसणारच की!!
असो! `साहेबांनी राज ला सकाळी लवकर उठुन, एकशे वीस तीनशे खायला पण सांगीतलेले आहे. अन त्याप्रमाणे राज सकाळी पवार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र असा गजर देणारे घड्याळ वापरत आहेत ही. त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल हे!
वाजली
वाजली तुतारी, करा तयारी...
असेल मुंबई प्यारी तर हाकला बिहारी...
मुंबई महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र मराठ्यांचा...
जागे व्हा आता तरी खूप झाली दादागिरी...
पाठवा हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला... मराठी माणसाला...!'
महाराष्ट्
महाराष्ट्राला जर स्वतंत्र देश केला किंवा जम्मु काश्मिर सारखी स्वायत्तता दिली तर हा प्रश्न चटकन सुटेल.
स्वतंत्र
स्वतंत्र देश ? मग बेळगाव, दिल्ली, हैदराबादला जायला पासपोर्ट /व्हिसा काढावा लागेल ... नको, ते परवडणारे नाही...
महाराष्ट्
महाराष्ट्राला जर स्वतंत्र देश केला किंवा जम्मु काश्मिर सारखी स्वायत्तता दिली तर हा प्रश्न चटकन सुटेल.
त्यापेक्षा भारतात फेडरलिझम आणा
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
महाराष्ट्
महाराष्ट्राला जर स्वतंत्र देश केला किंवा जम्मु काश्मिर सारखी स्वायत्तता दिली तर हा प्रश्न चटकन सुटेल.
---- नाही... नंतर आपण विदर्भ-नागपूर, औरंगाबाद-मराठवाडा, पुणे-मुंबई असे भांडायला लागायचो.
त्यापेक्षा, महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी एकत्रीतपणे बिहारचा गेल्या ६० वर्षात विकास न-केल्याबद्दल तेथील (बिहारच्या) सर्व राजकीय नेत्यांना जबाबदार धरावे. लालू, पासवान यांच्यावर विश्वासघाताचे (treason) आरोप का ठेवले जात नाही ? पोटा-पाण्यासाठी स्थलांतरे होतात, मग बिहार-उप मधुनच जास्त लोकं बाहेरचा मार्ग का घेतात? तेथे इतर राज्यांच्या मानाने अविकास का ? मला शरद पवार (जे आजचे सर्वात शक्तीशाली मराठी नेते आहेत) यांच्या तोंडी 'मी राजच्या हिंसक कृत्याचा निषेध करतो, त्याचबरोबर लालू कं. यांनी बिहारच्या विकासावर पुर्ण ल़क्ष केद्रीत केले असते तर अशी परिस्थितीच निर्माण झाली नसती.' बिहारच्या नेत्यांनी राज्याचा विकास कसा करावा हे शिकण्यासाठी गुजराथला भेट द्यावी (मोदी भारत देशाच्या प्रेमाखातर लालू कं.ला मोफत शिक्षा देतील), जाण्या-येण्याचा खर्च (रेल्वे दुसरा-वर्ग) महाराष्ट्र शासनाने करावा करेल. बिहारचा तुलनात्मक अविकास हाच सर्वांचा समान शत्रु common enemey आहे. त्याला लक्ष करणे, त्याच्यावर उपाय शोधा!
राज यांना महाराष्ट्राचे खरोखरच नव-निर्माण करायचे असेल तर मार्ग थोडा बदलावाच लागेल. हा स्विकारलेला (आत्म)घातकी मार्ग आहे.
(१) २-४ व्यक्तींना रोज सर्व वर्तमान पत्र वाचण्यासाठी बसवावी. एखादी जाहिरात आल्याबरोबर ती आपल्या सर्व मराठी पत्रात देणे. महाराष्ट्र शासना कडे बिल पाठवणे व खर्च मागणे, मराठी माणसां साठी ते तो आनंदाने मान्य करतील. बंद, गाड्या फोडणे, जाळपोळ इ. झालेल्या नुकसानी पेक्षा हे किती तरी सुखद वाटेल.
(२) रेल्वे मधे गेल्या १५ वर्षात किती लोकांची भरती झाली आणि त्या सर्व भरतीत राज्यनिहाय स्थिती काय आहे (किती बिहारी जास्त आहेत, कां, कसे आहेत) याचा कुठेतरी जाब विचारला जावा.
(३) मराठी होतकरुंना स्पर्धा परिक्षांना सामोरे कसे जावे याचे प्रशिक्षण द्यावे. माझ्या काळात मराठी लोकं स्पर्धा परिक्षांना तोंड देण्यास (तुलनेने) समर्थ नसायचे. ते त्यांच्या (शालेय) अभ्यासात खुप चांगले असायचे, पण उप-राष्ट्रपतीची निवड कशी होते (एक उदाहरण) हे पदवी धारकाच्या गावी नसायचे. मग त्या ९० % मार्कांना काही अर्थ नसायचा. आता परिस्थिती बदलली असावी.
(४) सर्वात महत्वाचे, महाराष्ट्रात सार्वजनीक (ज्यांचे काम करतांना सर्व प्रकारच्या अनोळखी लोकांशी संभाषण होते) ठिकाणी काम करणार्यांना किमान मराठी येणे अनिवार्य करावे. ह्यात सर्व प्रकारचा व्यावसाय करणारे आलेच, रिक्षेचा परवाना देतांना किमान शैक्षणीक पात्रता ठेवा, नियम मराठीतच आहेत तेच जर वाचता नाही आले तर कसा काय गाडा हाकणार? नुकताच ठाण्यात रिक्षेने प्रवास करतांना मला कुठेही मराठी कानावर आली नाही, पैसे ठरवावे लागायचे. १० वर्षांपुर्वी असे काहीच नव्हते, शांतपणे बसा, मिटर प्रमाणे पैसे द्या.
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/Accident_not_MNS_attack_killed_Bihar_...
हा बळी रेल्वे अपघातात गेला असेल तर नाहक राज साहेबांना त्याच्या मृत्युस जबाबदार धरून खुनाचा गुन्हा दाखल केला गेला आहे. मनसे विरुद्धच्या आंदोलनात, केवळ बिहारमधे रेल्वे चे म्हणे ५ कोटीचे नुससान झाले (केले).
'नाठाळांचे
'नाठाळांचे माथी हाणू काठी' असं आपल्याच महाराष्ट्रात 'कुणीतरी' म्हणून ठेवलंय.... >>>>>
'नाठाळांचे माथी हाणू काठी' >> जागो रामदासांनीच लिहून ठेवले आहे " भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळांचे माथी हाणू काठी".
>>>>>
जोशी साहेब, अहो ते वचन रामदासांचे नाही, तुकारामांचे आहे..
>>>>>
येस धिस वचन इज ऑफ सेंट तुकारामा....
द ओरिजिनल व्हर्स इज एज फॉलोज...
मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास
कठिण वज्रासही भेदू ऐसे,
भले तरी देऊ कासेची लंगोटी
नाठाळाचे माथी हाणू काठी...
(फॉर द एन्लाईटमेन्ट ऑफ मराठी पीपल,रिप्रोड्युस्ड फ्रॉम ' एन अनालिटिकल एप्रोच टू द वर्क्स ऑफ सेन्ट तुकारामा, एन इन्डियन सेन्ट, रिटन बाय तुशिहारा लुमुम्बा, चायनीज गिनी, युनिव्हर्सिटी ऑफ अंक्टार्क्टिका.
ओरिजिनल कॉपी राईट इन्स्टीट्यूट ऑफ इम्मॉर्टल लिटरेचर, कोल्ड सिटी, एस्किमो लॅन्ड, नॉर्थ पोल. )

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
Pages