ह्म्म... मॅकेनच्या धोरणांना टिपिकल GOP वास आहे, तो मला तरी आवडत नाही. पण माणूस अनुभवी आहे, स्पष्टवक्ता आहे आणि पक्ष, सरकार, अध्यक्ष यापेक्षा वेगळा विचार करण्याची धमक आहे. ओबामाचा मला वाटणारा प्रश्न म्हणजे अनुभव थोडा कमी आहे. पण शक्य तितकं लोकांना (म्हणजे राजकीय लोकांना) बरोबर घेऊन पुढे जाणे हे त्याला जास्त जमेल हिलरीपेक्षा. इराणी राष्ट्राध्यक्षाशी विनाअट बोलायला तो एकटाच तयार आहे हे मला सूचक वाटतं. परंतु, गरज पडेल तेव्हा हिलरी या तिघांत सर्वात जास्त निष्ठूर ठरेल असं वाटतं.... बहुतेक राजकारणी स्त्रीया असतात तसं तो तिचा सर्वात मोठा गुण ठरेल.
*** Veni, vidi, Visa. I came, I saw, I bought. ***
मॅकेन हा एक हेकेखोर, संतापी, म्हातारा माणूस आहे. इराकचे युद्ध अजून १०० वर्षे चालले तरी मला चालेल असे तो एकदा बोलून गेला आहे. ह्या निरर्थक, खर्चिक युद्धाला विटलेली अमेरिकन जनता ते वाक्य लक्षात ठेवेल आणि ह्याला धूळ चारेल अशी आशा.
इराकच्या युद्धाबद्दलचे ह्याचे धोरण हे एकमेव कारण त्याच्याविरुद्ध मत निर्माण करायला पुरेसे आहे.
हिलरी मला अत्यंत ढोंगी वाटते. स्वतःचे धोरण काही नाही. जिथे, जेव्हा, ज्या लोकांना जे आवडेल तिथे, तेव्हा, त्यांना, तसे सांगणे हे ती बिनबोभाट नि नि:संकोच करते. आज इराकचे युद्ध लोकांना आवडत नाही मग व्हा युद्धविरोधी. काल आवडत होते तेव्हा व्हा युद्धाचे समर्थक.
ओबामा त्या मानाने खूपच सरळ वाटतो. उत्तम भाषण करतो. तरुण आहे. इराक युद्धाविरुद्ध बोलण्यात सगळ्यात पुढे.
सत्तेवर आल्यावर काय करेल देव जाणे पण आत्तातरी हाच सगळ्यात उजवा वाटतो.
Submitted by shendenaxatra on 14 May, 2008 - 11:07
धोरणे तशी असतील, तरी मॅकेन लिबरल रिपब्लिकन आहे. त्यांच्यातल्या कॉन्झर्वेटिव्ह लोकांना बरोबर ठेवायचे असेल तर थोडीफार धोरणे तशी ठेवावी लागतील. आणि व्हीपी कँडिडेट सुद्धा बर्यापैकी कॉन्झर्व्हेटिव्ह असणार. हिस्पॅनिक हेरिटेजचा असेल तर अजून बरं.
>>पण शक्य तितकं लोकांना (म्हणजे राजकीय लोकांना) बरोबर घेऊन पुढे जाणे हे त्याला (ओबामाला)जास्त जमेल हिलरीपेक्षा.
हे मला नाही पटले. हिलरीने सिनेटमध्ये ऑलरेडी तसे काम केले आहे. रिपब्लिकन्स बरोबरही काम करण्याचा अनुभव आहे तिला. पुन्हा ओबामा हा जास्त लिबरल आहे, म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या धोरणांपासून अजूनच लांब. तेव्हा त्यालाच जमवून घ्यायला अवघड पडेल. आणि तो indecisive आहे. नंतर गोत्यात येऊ नये म्हणून का महित नाही, पण पोझिशनच घेत नाही एखाद्या इश्यू वर. धोरण नंतर बदलण्याइतकेच हे वाईट आहे. काही गोष्टी नंतर लक्षात आल्यावर धोरण बदलले तर त्यात चूक नाही. लिहून दिलेली भाषणे करत असेल, उस्फूर्तपणे बोलता येत नाही. टेक्सास ओहायो प्रायमरीच्या आधीच्या डिबेट मध्ये तर प्रचंड विस्कळीत बोलत होता. नाहीतर 'yes yes, I agree' म्हणत होता. (यावर मिडियामध्ये बरेच जोक झाले)
कोणीही प्रेसिडेन्ट झाले तरी अमेरिका अजून बरीच वर्षं इराकमध्ये असेल हे सत्य आहे. अजून काही वर्षं लढावे लागेल, मग कायमस्वरुपी मिलिटरी बेस असेल (मॅकेन म्हणतो ती १०० वर्षं म्हणजे अशी आहेत.) ओबामाचा युद्धाला पहिल्यापासून विरोध होता हे ठीक, पण आता त्यात पडलेल्या अमेरिकेला बाहेर काढायला तो तेव्हा काय म्हणत होता याला फारसा अर्थ नाही. आणि बाहेर पडण्याचे धोरण हे सर्वांचे जवळपास सारखेच आहे.
मला आपले म्हणणे साफ नामंजुर आहे. ओबामा हा उत्तम वक्ता आहेत्. त्याचे एखाददुसरे भाषण विस्कळित असले तरी बरीच भाषणे प्रभावी हृदयस्पर्शी आहेत. हिलरीचे उच्चरवातले कानठळ्या बसवणारे, मॅकेनचे रटाळ भाषण ह्यापेक्षा ओबामा नक्कीच उजवा आहे. बुशबाळाचे तर काय बोलायलाच नको!
लिहून दिलेले भाषण असले तरी ते उत्तमरित्या सादर करणे हे येरागबा़ळ्याचे काम नाही.
>> अमेरिका अजून बरीच वर्षे इराकमधे असेल हे सत्य आहे
कशावरुन? हे एक मिथ्य असू शकेल. नुसते इराकमधे असणे पुरेसे नाही. काही लोकांना अनेक वर्षे झुंजायची खाज आहे तर काहींना निव्वळ बगदादमधे ठाणे इतपच आकांक्षा असेल. ह्या दोन्ही टोकात कमालीचे अंतर आहे. एकात अब्जावधी डॉलरचा चुराडा आणि सैनिकांचे मरण तर दुसर्यात कितीतरी कमी खर्च.
ह्या युद्धात आपले काहीतरी चुकलेच ह्या वृत्तीने पुढचा कारभार केला गेला तर ह्या खर्चाला आळा बसेल. इराकचे युद्ध आपले धर्मकर्तव्य आहे ह्या भावनेने राज्याचा ताबा घेतला तर काय होईल ते उघड आहे.
Submitted by shendenaxatra on 14 May, 2008 - 23:44
डिबेट म्हणजे भाषण नव्हे हो. तिथे उस्फूर्तपणे बोलावे लागते. तेच येत नसेल तर 'उत्तम वक्ता' कसे म्हणणार?
>>कोणीही प्रेसिडेन्ट झाले तरी अमेरिका अजून बरीच वर्षे इराकमधे असेल हे सत्य आहे
>>कशावरुन?
- तिघांचेही धोरण तेच सांगते.
>>इराकचे युद्ध आपले धर्मकर्तव्य आहे ह्या भावनेने राज्याचा ताबा घेतला तर काय होईल ते उघड आहे.
नाही समजले. तिथे नियंत्रण नाही म्हणून तर प्रॉब्लेम आहे. तुमच्या मते काय होईल?
उत्तम वक्ता हा उत्तम नेता असतोच अस नाही..ओबामा ची आघाडी अनेक गोश्टिंचा एकत्रित परिणाम आहे..एकतर पहिला आफ़्रिकन अमेरिकन उमेदवार असल्याने बर्याच आ. अ. लोकांची मत त्याला केवळ आपला माणुस! म्हणुन मिळालित( जे सगळे पुर्वी क्लिंटन सपोर्तिव्ह होते).. शिवाय सुरवातिच्या प्रायमरिज आ. अ. जास्त असलेल्या राज्यात झाल्यात
ओबामाला पार्टि झुकत माप का देतय?.. एकतर तो नविन आहे..त्यामुळे त्याला हाताशी धरुन जुन्या जाणत्यांना स्व:ताच घोडही दामटता येइल..
हिलरी आली तर हे सगळे मनसुबे च राहतिल..त्याशिवाय का " हिलरी अगदी vice-president सुध्हा होण्याच्या लायकिची नाही वैगरे " तारे तोडण चालु आहे..
कोणिही आल तरी ४ वर्ष बुश ने केलेला घोळ निस्तरण्यातच जातिल..मग आहेच 'येरे माझ्या मागल्या..
*** १०० % सपोर्ट हिलरिला ***
लालू ने पी पी वर लिहिलंय त्या अनुषंगाने :
'हिलरी बाई आहे म्हणून सुद्धा मी तिला पाठिम्बा देते' असं मी म्हटल्यावर गोरे (निळे अन लाल ) माझ्यावर तुटून पडले होते की ओबामा मायनॉरिटी आहे म्हणून मी त्याला पाठिम्बा द्यायला पाहिजे.
मी परदेशी असले, संख्याशास्त्रा प्रमाणे अल्प संख्यांक असले तरी मी स्वतःला disadvantaged minority मानत नाही. किंबहुना कोणीच भारतीय स्वतःला असे मानत नसतील हे त्यांना पटवून देता देता माझ्या नाकी नऊ आले बाबा! शिवाय ओबामा फक्त रंगाने मायनॉरिटी. त्याचं शिक्षण, त्याची करीयर, त्याचे सोशल सर्कल मार्था'स व्हिन्यर्ड ला जास्त जवळचं आहे.
ओबामा ला हिलरीशी नीट वाद घालता येत नाही तो सिनेट काय मॅनेज करेल असं वाटतं. २००० सालीच मकेन ने रिपब्लिकन नॉमिनेशन जिंकायला हवं होतं
एकाच दिवसात या निवडणुकीवर परिणाम करणार्या दोन गोष्टी काल झाल्या:
१. बुश ने तिकडे इस्रायल मधे बोलताना ओबामा वर मारलेली कॉमेंट (बहुधा सर्व डेमोक्रॅट्स वर मारलेली) व त्याची प्रतिक्रिया.
२. कॅलिफोर्निया हाय कोर्टाने गे लोकांच्या लग्नांना दिलेली मान्यता.
दोन्ही गोष्टी पुढच्या काही दिवसांत बर्याच चर्चिल्या जातील असे दिसते. रिपब्लिकन्स बहुधा तो गे लग्नाचा इश्यू पुढे आणणार २००४ प्रमाणे.
यातील पहिल्या मुद्द्यावर प्रतिक्रिया चालू झाल्यात...
बुश म्हणाला की हिटलर सारख्यांशी चर्चा करून काही उपयोग नाही. डेमोक्रॅट्स वाले (ओबामा) म्हणतो की इराण शी चर्चा करणार म्हणून त्याला हा टोला बहुतेक.
मग ओबामाचे उत्तर की अतिरेक्यांशी चर्चा करणार नाही, जसे 'हमास' शी.
त्याला मॅकेन चे उत्तर की अतिरेक्यांशी करणार नसाल तर त्यांना पोसणार्यांशी पण करू नका...
...आणि दुसर्या दिवशी बुश सौदी अरेबियाशी चर्चे ला रवाना
रोव्हच्या लेखाची लिन्क वर आहेच. साधारण तश्याच प्रकारचा पण मॅकेन साठी हा पोस्ट मध्ये आज आलेला लेख- McCain's Path to Victory
यातलेही काही मुद्दे पटले. सगळा रिपब्लिकन बेस मॅकेनला मत देणारच आहे. त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही, पण ज्या डेमॉक्रॅट्सना ओबामाबद्दल खात्री नाही त्यांना मॅकेन acceptable alternative होऊ शकतो.
.
आ.अ. लोकांच्या गठ्ठा मतदनामुळे प्रायमरीज, कॉकस मध्ये(ओबामा ची कॉकस आणि लहान स्टेट मधल्या प्रायमरीज वर लक्ष केन्द्रित करण्याची स्ट्रॅटेजी पण यशस्वी झाली) फरक पडला पण नॅशनल इलेक्शन मध्ये पडणार नाही कारण एरवीही ते डेमॉक्रटसनाच मते देतात. इथे independents मुळेच फरक पडेल. कट्टर हिलरी समर्थक Dems (bitter :p, नुसते कट्टर डेम्स नव्हे. ते कोणीही आले तरी डेम्सना मत देतील.), हिलरी समर्थक independents हे मॅकेनला मत देऊ शकतील.
.
ओबामा वाईट आहे असं म्हणायचं नाही आहे, पण सध्याची देशाची स्थिती पाहता अशा अननुभवी माणसाला प्रेसिडेंट करावे का? त्याचा राजीव गांधी होईल. (दोघेही व्यक्ती म्हणून चांगले पण नेता म्हणून अननुभवी, इथेच तुलना थांबवा!) स्फूर्तीदायक भाषणे वगैरेना तरुण वर्ग भुलतो, पण त्या सगळ्या कल्पनांमागे काही ठोस प्लॅन असावा लागतो. तेवढी चिकित्सा ते करत नाहीत. इथल्या काही नवमतदारांशी बोलायची संधी मिळाली तेव्हा ते अगदी 'ओबामामय' होते, की 'हिलरी आली तर आम्ही मतदानच करणार नाही' असं ते म्हणाले. (:) आणि ही शैक्षणिक दृष्ट्या 'हुषार' अशी मुले होती. ती काही नवमतदारांचे प्रतिनिधित्व करतात असे म्हणायचे नाही. तरीही... ) हिलरीच्या टाऊन हॉल मीटिन्ग च्या तिथे रांगेत उभे असताना काही लोकांशी बोलायला मिळाले. सगळे डेम्स समर्थक होते. ते सगळे प्रौढ होते, त्यातले बरेचसे म्हणाले की कोणीही आले तरी आम्ही डेम्सनाच मत देऊ. एकजण म्हणाला रॉमनी असता तर मी विचार केला असता, मॅकेनला मत देऊ शकत नाही (interesting). शेवटी farend म्हणतो तसं कोणत्या इश्श्यूवर निवडणूक होईल त्यावरही अवलंबून आहे.
एक वेगळा मुद्दा मांडतोय. नेता म्हणून कोण योग्य ते काळच ठरवेल.
हिलरी क्लिंटनला अजून एका बाबतीत बलाढय समजले जात असे. तिच्या कडे न आटणारी पैसे जमा करून देणारी यंत्रणा आहे असा समज होता. इतकच नाही तर डेमॉक्रॅटीक पक्षाचा आतापर्यंत सगळ्यात जास्त पैसे जमा करून देणारा, राजकीय समज अत्यंत प्रगल्भ असणारा बील तिच्या बाजूला आहे. असे असतानाही त्यांच्या पेक्षा जास्त पैसे गोळा करायला नुसत्या वक्तृत्वापेक्षा नक्कीच काहीतरी जास्त असणार. तो फरक आहे जुने पैसे आणि नवीन पैसे यामधला.
हिलरी आणि त्याअगोदरचे अनेक राजकीय नेते यांची पैसे गोळा करायची पद्धत कित्येक वर्षांपासून चालत आलेली आहे. परीपक्व झाली आहे. काही प्रचंड श्रीमंत धेंडं आपल्या हाताशी ठेवायची आणि त्यांच्या नेटवर्कचा उपयोग करून पैसे गोळा करायचे.
या पध्दतीला डावलून पहिल्यांदा नवीन पध्दतीने, तंत्रज्ञानाचा वापर करून पैसे गोळा केले ते ,गेल्या निवडणूकीत, हार्वर्ड डीन ने. वेबसाईटचा वापर अत्यंत यशस्वीपणे करून त्याने एक प्रभावी ऑनलाईन नेटवर्क तयार केले. या नेटवर्कचा उपयोग करून थोडे थोडे का होईना पण लाखो लोकांकडून त्याने पैसे जमा केले. नुसते राजकीय भांडवलच नाही तर तंत्रज्ञानाचा कमी खर्चात प्रभावी वापर करणारे तंत्रज्ञही तितकेच महत्वाचे होऊ लागले आहेत याची ती नांदी होती.
(मायबोली आणि इतर अनेक मराठी वेबसाईटस ज्या वर चालतात त्या दृपल या मुक्तस्रोत सॉफ्टवेअरवर आधारीत हार्वर्ड डीनचे वेबसाईट्चे नेटवर्क होते). http://www.wired.com/politics/law/news/2003/07/59497
हार्वर्ड डीनचे वेबसाईट्चे नेटवर्क तयार करणारा मुख्य तंत्रज्ञ आज ओबामाचा मुख्य तंत्रज्ञ आहे आणि त्याने डीन पेक्षा कितीतरी जास्त मोठे आणि प्रभावी नेटवर्क ओबामाला बांधून दिले आहे. (अर्थात केवळ तंत्रज्ञानाने कुणी जिंकून येऊ शकत नाही हे डीनच्या पराभवामुळे सिध्द झालेच. )
माझा सांगायचा मुद्दा इतकाच की प्रत्यक्ष मतदानाला लोकाना प्रवृत्त करायला जो समुदाय जमा करावा लागतो त्यापेक्षा जास्त (किंवा तितकीच )महत्वाची ही पैसे गोळा करणारी यंत्रणा उभारावी लागते. आणि ती नुसत्या भाषणांमुळे होईल असे वाटत नाही. त्यामुळे ओबामापाशी अनुभव नसला तरी अशी यंत्रणा उभी करण्याची ताकद दिसते आहे. किंवा कमीतकमी असा अनुभव असणारे लोक त्याच्या बाजूला गोळा झाले आहेत.
हिलरीला खरोखरच राज्यकारभार करायचा अनुभव आहे? वाटत नाही.
निव्वळ ८ वर्षे राष्ट्राध्यक्षाची पत्नी असणे म्हणजे अनुभव?
आजच्या अमेरिकेच्या बिकट परिस्थितीला तथाकथित अनुभवी, जाणते राजकारणीच जबाबदार आहेत. इराकचे युद्ध अमेरिकेवर लादण्यात हे जाणतेच पुढे होते. हिलरीसारख्या कसलेल्या, अव्वल, अनुभवी नेत्याने त्याला समर्थनही दिले. काय करायचा असला अनुभव?
आता त्याच त्याच जुन्या वाटा चोखाळून काही नवे उत्तर शोधण्यापेक्षा नव्या रक्ताला स.न्धी देऊन काहीतरी वेगळे करायची वेळ आली आहे.
उगाच अनुभवाचे तुणतुणे वाजवण्यात काही अर्थ नाही
धाकला बुश कागदावर अगदी गुणी बाळ वाटेल. उच्चविद्याविभूषित, एका राज्याचा प्रमुख, बाप, भाऊ मोठे राजकारणी वगैरे. काय दिवे लावले ह्या गुणी बाळाने? सगळ्यात नीचतम लोकप्रियता मिळवलेला नेता!
उत्तम वक्तृत्व काय कामाचे? वक्तृत्व हे जनतेशी स.न्वाद साधायचे महत्त्वाचे साधन आहे. राष्ट्राध्यक्ष ह्याच माध्यमातून जनतेशी स.न्वाद करतो. सद्य हलाखीच्या परिस्थितीत काही अप्रिय निर्णय घ्यावे लागणारच. जसे करवाढ, सुविधा.न्मधे काटछाट इत्यादी. तर ते लोका.न्च्या गळी उतरवायला ओबामासारखे प्रभावी वक्तेच उपयोगी पडणार. हिलरीसारखे ढो.न्गी, कर्णकटू वा म्याकेनसारखे रटाळ वक्ते काय उपयोगाचे?
Submitted by shendenaxatra on 19 May, 2008 - 15:35
अजय, थोडी थोडी रक्कम डोनेट करणारे डोनर्स खूप जास्त आहेत ओबामाचे. निवडणूक लढवायला पैसा लागतो ही पटत नसली तरी खरी गोष्ट आहे. कोणी किती पैसा उभा केलाय याबद्दल सतत चर्चा, बातम्या यामुळे खरी चढाओढ तीच आहे की काय असं वाटावं. पैसा रॉमनीकडेही भरपूर होता. मॅकेन कडे तर New Hampshire प्रायमरीच्या वेळीच फारशी शिल्लक नव्हती. त्यामुळे खूप पैसा जिंकून देतो असंही नाही. मात्र या छोट्या डोनर्स मध्ये त्यांनी काही हातभार लावल्याची आणि त्यामुळे मतदान करण्याची किंवा बाकी लोकांनाही प्रवृत्त करण्याची भावना निर्माण होत असेल तर त्याचा निश्चित फायदा होईल.
(इथे कोणाला निवडणून लढवायची असेल तर मायबोलीवरुन असे काही करता येइल का? )
लालू यांनी सांगितले म्हणून लिहीतो आहे. लालू, माफ करा, पण हिलरीचे हे असले सगळ्यांना जबरदस्तीने आरोग्या विमा घ्यायला लावायचा हे खरे नाही. विम्याचे भाव कमी करणे महत्वाचे आहे. पण या बाबतीत असे टोकाचे निर्णय घेऊन चालत नाही. जबरदस्ती सर्वांनी विमा घ्यायचा, पण काय भावात? नुसतेच भाव कमी केले तर विमा कं त्यांचे फायदे कमी करतील का? डॉक्टर, हॉस्पिटल यांच्या सेवेत काय फरक पडतो? या सर्वाचा विचार करावा लागतो ना? नि आता नाही परवडत हो, नुसते फेडरल कर कमी केले तर राज्यांचे, स्थानिक नगरपालिका, नि आमच्या बाग राज्यात विक्रिकरहि वर जातात! म्हणजे सामान्य माणसाला त्याचा खरा उपयोग नाही.
माझे असे म्हणणे नाही की ओबामा बरा किंवा मॅक्केन. कारण मला रिपब्लिकन लोक मुळीच आवडत नाहीत. नि ओबामा बद्दल खरेच प्रश्न आहेत की याला काही जमणार आहे का? की तो रेव्ह. राईटला विचारणार काय करायचे ते!
प्रश्न गंभीर आहेत. ह्या अत्यंत गहन प्रश्नांचे उत्तर फार कठिण. आणि राजकारणी तर फक्त लोकांना आवडेल तेच बोलतात, करत काहीच नाहीत. तेंव्हा उगीच आपले कुणालातरी मत द्यायचे झाले!
आता या हिलरीने नुकतेच जे वक्तव्य केले ते ऐकून मला काळजीच वाटते. बाई लई म्हणजे फारच महत्वाकांक्षी!
म्हणजे कसे, सरकारनामा चित्रपटात तो मुख्यमंत्री म्हणतो 'सत्कार करा'! तसे प्रत्यक्षात तिचे अति उत्साही, चमचेगिरी करणारे भडक डोक्याचे कार्यकर्ते October surprise ऐवजी June surprise करतील की काय? का कुणास ठाऊक, व्हिन्स फॉस्टरची आठवण येते. निक्सन किंवा रेगनच गुप्त कारवाया करत असे नाही. डेमोक्रॅट लोकांना पण येतात त्या गोष्टी करता.
हिलरीला खरोखरच राज्यकारभार करायचा अनुभव आहे? वाटत नाही. >> माझ्या मते प्रत्यक्ष व्यक्तीपेक्षा तीच्या सल्लागार मंडळाचा वाटा in general धोरणे ठरवण्यामधे अधिक असतो. They may be biased towards particular idealogy. (Read : left or right or conservative or liberal) here. Clintons are known to be one of the better policy makers. हिलरीचे Health care reform चे proposal जे ८-१० वर्षांपूर्वी आले होते ते पाहिल्यावर हे लक्षात येईल. (तीने वाहत्या वार्याप्रमाणे पाठ फिरवली हा भाग अलहिदा)
ह्या द्रुष्टिने मला मॅकेनchI dhoraNe jaast suspaSht vataatat.
ओबामाला फक्त खूप शिकलेल्या लोकांचा, काळ्यांचा नि तरुणांचा पाठिंबा आहे. शिकलेले नि काळे मिळून तसे फार नाहीत. तरुण लोक मतदानाला जातीलच अशी खात्री नाही. बरेचसे अमेरिकन गोरे, कमी शिकलेले व ज्यांना blue collar workers म्हणतात असे आहेत. त्यांना ओबामा काय म्हणतो ते कळत नाही. त्यापेक्षा त्यांना मॅक्केन जास्त आवडतो. कारण तो नुसता मारामारी, नि ख्रिश्चन धर्म किती छान हेच बोलतो. त्यांनी एकवेळ हिलरीला मत दिले असते, कारण ती गोरी तरी आहे, पण ओबामाला? कठीणच आहे.
असल्या डोकेफिरु, अशिक्षित, मागास ब्लू कॉलर लोका.न्ना घाबरून कायम निव्वळ गोरे लोक उमेदवार म्हणून उभे करणे हे चा.न्गले आहे का? कधीतरी बदल करायचा प्रयत्न व्हायलाच हवा.
बघू या. काळच काय ते सा.न्गेल की अमेरिका असले पुढचे पाऊल उचलायला तयार आहे की नाही ते.
Submitted by shendenaxatra on 4 June, 2008 - 13:56
असल्या डोकेफिरु, अशिक्षित, मागास ब्लू कॉलर लोका.न्ना घाबरून कायम निव्वळ गोरे लोक उमेदवार म्हणून उभे करणे हे चा.न्गले आहे का?
नाही. क्लिंटन हा अत्यंत हुषार माणूस होता. त्याच्या लंपटपणामुळे त्याचे चांगले कार्य जगाला दिसले नाही. म्हणून मग बुशसारखा माणूस निवडून आला. एकंदरीत शिकलेले काय नि कमी शिकलेले काय, एकंदरीतच अमेरिकन म्हणजे भडक डोक्याचे नि मारामारीने सगळे प्रश्न सोडवणारे. तेंव्हा हा नवीन उमेदवार काय करतो , तो निवडून आला तर काय होईल?
खरा प्रश्न अर्थव्यवस्थेचा आहे. तो क्लिंटनने सोडवला होता. पण त्याच्या लंपटपणामुळे लोक खवळले नि त्याचा फायदा घेऊन बुश निवडून आला. त्याने वाट्टोळे केले. आता लोक ओबामाचा काळेपणा विसरून मतदान करतील का?
पण मत द्यावेसे वाटण्यासाठी आठवायचे काय हा प्रश्न आहे >> अग लालु त्याचा पुजार्याल आठव की. तो खुप दिवस फ्रंट पेज वर राहीला होता. ओबामा मला तरी चांगला वाटतो. कधी कधी त्याचा गोंधळ उडतो खरा पण तोच आज तरी सर्वात लायक वाटतो.
शेंडे, इथले सुरवातीपासूनचे तुमचे चौथे पोस्ट वाचा, मग त्यानंतरचे माझे पोस्ट वाचा.
केदार, Illinois चा गव्हर्नर म्हणून का रे? त्याने आधी तेच व्हायला हवे होते.
नियमाप्रमाणे बघितले तर ओबामा जिंकला आहे ह्यात शंका नको. ह्या शर्यतीचे नियम आधीच सांगितले होते. पण आता हिलरीचे कट्टर समर्थक रडीचा डाव खेळून नियम बदलायला बघत आहेत. म्हणजे १०० मीटरची धावण्याची शर्यत असावी आ़णि त्यात पहिला कोण पोचला हे न बघता तमक्या स्पर्धकाचा धावण्याचा वेग अमक्या सेकंदाला सगळ्यात जास्त होता म्हणून तोच खरा विजेता म्हणायचे असा प्रकार आहे. १ नंबरचे रडीचे खेळाडू.
दुसरी एखादी असती तर खिलाडूपणे आपला पराभव स्वीकारती.
इराकच्या युद्धात आपले काहीतरी चुकलेच. आता ते लवकरात लवकर निस्तरावे ह्या भूमिकेने राज्यकारभार करणारा अध्यक्ष ह्या व्यर्थ खर्चाला आळा घालून आपले सैनिक लवकरात लवकर घरी आणेल. ह्या निरर्थक युद्धाला अतिरेक्यांविरोधी उघडलेल्या आघाडीचे रुप देऊन अजून १०० वर्षे युद्ध चालले तरी चालेल म्हणणारा अध्यक्ष आणखी अब्जावधी डॉलर आणि हजारो सैनिकांचे प्राण वाया घालवेल हे नक्की.
Submitted by shendenaxatra on 5 June, 2008 - 18:01
दुसरी एखादी असती तर खिलाडूपणे आपला पराभव स्वीकारती.
तसले काही नसते नसते अमेरिकेत.
मी, माझे, मला एव्हढेच पहायचे. नियम काहीहि असोत, कायदा असला तरी त्याबद्दल पकडून खटला भरून जर माझा दोष सिद्ध झाला तरच बोला. तोपर्यंत मी माझ्या साठी काय वाट्टेल ते करीन! त्यातून एका माणसाने केलेल्या कायद्यात दुसरा हुषार माणूस काही ना कारणाने दोष काढून कायदाच रद्द करू शकतो.
पूर्वी everything is fair in love and war असे होते. आता सगळ्याच गोष्टी युद्ध होऊन बसल्या आहेत. कॅन्सरने आजारी पडलेला माणूस कॅन्सरशी झुंज देत असतो. क्रिकेटमधे पीचवर गोळ्या टाकायच्या, चेंडू कुरतडायचा, पंचाने बाद ठरवले तरी हट्टीपणा करत तसेच उभे रहायचे, हे सर्व काही आजकाल क्षम्य. स्पर्धा म्हणजे युद्धच! म्हणून कुठेहि काहीहि निषिद्ध नाही.
खरे तर सा रे ग म प मधेहि तो कोणीतरी 'महायुद्ध' महायुद्ध' म्हणून ओरडत असतो. तेंव्हा तिथेहि खोटे मतदान करून आपल्या उमेदवाराला पुढे आणणे चालूच असते. कारण युद्धात सर्वकाही fair.
तर मंडनमिश्र व शंकराचार्य यांच्यासारखे भारतीय संस्कृतीचे लोक, जे भांडण न करता वादविवाद करून प्रश्न सोडवत, त्यांचा काळ गेला. आता मुसलमान, अमेरिका इ. मी म्हणतो तेच खरे, नि ऐकले नाहीत तर तुमच्यावर छुपे, उघड हल्ले करून तुमच्यावर आमचे विचार लादू.
पण मत द्यावेसे वाटण्यासाठी आठवायचे काय हा प्रश्न आहे.
तेहि खरेच! ज्यानी काही केलेच नाही, त्याला कोणत्या भरवशावर मत द्यायचे?
फक्त रिपब्लिकन नकोत, नि १०० वर्षे इराकमधे पैसे वाया घालवणारा माणूस नको म्हणून दुसर्याला निवडायचे. नि मॅक्केन सारखा भडक डोक्याचा माणूस उद्या कुणावर अणुबाँब पण टाकेल! बुश हून भयानक माणूस तो.
अहो शेंडे आणि झक्की, खरी निवडणूक तर पुढे आहे. हिलरी समर्थकांची मते पाहिजेत का नको ओबामाला? पाहिजेत ना? हे ओबामाला माहित आहे म्हणून तो गप्प आहे पण त्याच्या काही समर्थकांना कळत नाही, त्यांना घाई झाली आहे हिलरी कधी एकदा माघार घेते.
.
नुसता पराभव मान्य केला की झाले असे नाही आहे ते. हिलरी जिंकणार नाही हे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते तरी सगळ्या प्रायमरीज होऊ दिल्या हे चांगले झाले. कोण लोक कसे मतदान करतायत याचा अंदाज आला असेल पक्षाला. नोव्हेंबर च्या दृष्टीने DNC चे काम आधीच सुरु झाले आहे. मला एक सर्व्हे पण आला होता. हिलरीचे समर्थक खूप आहेत, त्यांच्याकडे आणि हिलरीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. म्हणूनच ओबामा जिंकला तरी सगळ्यांचे लक्ष आहे पुढे हिलरी काय करते याकडे. अर्थात काल टीव्ही वर असेही ऐकले-एका चॅनेलला अश्या बर्याच ईमेल आल्या की हिलरी काहीही करो, ओबामाला support करो किंवा endorse करो, आम्ही त्याला मत देणार नाही.
ह्म्म...
ह्म्म... मॅकेनच्या धोरणांना टिपिकल GOP वास आहे, तो मला तरी आवडत नाही. पण माणूस अनुभवी आहे, स्पष्टवक्ता आहे आणि पक्ष, सरकार, अध्यक्ष यापेक्षा वेगळा विचार करण्याची धमक आहे. ओबामाचा मला वाटणारा प्रश्न म्हणजे अनुभव थोडा कमी आहे. पण शक्य तितकं लोकांना (म्हणजे राजकीय लोकांना) बरोबर घेऊन पुढे जाणे हे त्याला जास्त जमेल हिलरीपेक्षा. इराणी राष्ट्राध्यक्षाशी विनाअट बोलायला तो एकटाच तयार आहे हे मला सूचक वाटतं. परंतु, गरज पडेल तेव्हा हिलरी या तिघांत सर्वात जास्त निष्ठूर ठरेल असं वाटतं.... बहुतेक राजकारणी स्त्रीया असतात तसं
तो तिचा सर्वात मोठा गुण ठरेल.
*** Veni, vidi, Visa. I came, I saw, I bought. ***
मॅकेन हा
मॅकेन हा एक हेकेखोर, संतापी, म्हातारा माणूस आहे. इराकचे युद्ध अजून १०० वर्षे चालले तरी मला चालेल असे तो एकदा बोलून गेला आहे. ह्या निरर्थक, खर्चिक युद्धाला विटलेली अमेरिकन जनता ते वाक्य लक्षात ठेवेल आणि ह्याला धूळ चारेल अशी आशा.
इराकच्या युद्धाबद्दलचे ह्याचे धोरण हे एकमेव कारण त्याच्याविरुद्ध मत निर्माण करायला पुरेसे आहे.
हिलरी मला अत्यंत ढोंगी वाटते. स्वतःचे धोरण काही नाही. जिथे, जेव्हा, ज्या लोकांना जे आवडेल तिथे, तेव्हा, त्यांना, तसे सांगणे हे ती बिनबोभाट नि नि:संकोच करते. आज इराकचे युद्ध लोकांना आवडत नाही मग व्हा युद्धविरोधी. काल आवडत होते तेव्हा व्हा युद्धाचे समर्थक.
ओबामा त्या मानाने खूपच सरळ वाटतो. उत्तम भाषण करतो. तरुण आहे. इराक युद्धाविरुद्ध बोलण्यात सगळ्यात पुढे.
सत्तेवर आल्यावर काय करेल देव जाणे पण आत्तातरी हाच सगळ्यात उजवा वाटतो.
धोरणे तशी
धोरणे तशी असतील, तरी मॅकेन लिबरल रिपब्लिकन आहे. त्यांच्यातल्या कॉन्झर्वेटिव्ह लोकांना बरोबर ठेवायचे असेल तर थोडीफार धोरणे तशी ठेवावी लागतील. आणि व्हीपी कँडिडेट सुद्धा बर्यापैकी कॉन्झर्व्हेटिव्ह असणार. हिस्पॅनिक हेरिटेजचा असेल तर अजून बरं.
>>पण शक्य तितकं लोकांना (म्हणजे राजकीय लोकांना) बरोबर घेऊन पुढे जाणे हे त्याला (ओबामाला)जास्त जमेल हिलरीपेक्षा.
(यावर मिडियामध्ये बरेच जोक झाले)
हे मला नाही पटले. हिलरीने सिनेटमध्ये ऑलरेडी तसे काम केले आहे. रिपब्लिकन्स बरोबरही काम करण्याचा अनुभव आहे तिला. पुन्हा ओबामा हा जास्त लिबरल आहे, म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या धोरणांपासून अजूनच लांब. तेव्हा त्यालाच जमवून घ्यायला अवघड पडेल. आणि तो indecisive आहे. नंतर गोत्यात येऊ नये म्हणून का महित नाही, पण पोझिशनच घेत नाही एखाद्या इश्यू वर. धोरण नंतर बदलण्याइतकेच हे वाईट आहे. काही गोष्टी नंतर लक्षात आल्यावर धोरण बदलले तर त्यात चूक नाही. लिहून दिलेली भाषणे करत असेल, उस्फूर्तपणे बोलता येत नाही. टेक्सास ओहायो प्रायमरीच्या आधीच्या डिबेट मध्ये तर प्रचंड विस्कळीत बोलत होता. नाहीतर 'yes yes, I agree' म्हणत होता.
कोणीही प्रेसिडेन्ट झाले तरी अमेरिका अजून बरीच वर्षं इराकमध्ये असेल हे सत्य आहे. अजून काही वर्षं लढावे लागेल, मग कायमस्वरुपी मिलिटरी बेस असेल (मॅकेन म्हणतो ती १०० वर्षं म्हणजे अशी आहेत.) ओबामाचा युद्धाला पहिल्यापासून विरोध होता हे ठीक, पण आता त्यात पडलेल्या अमेरिकेला बाहेर काढायला तो तेव्हा काय म्हणत होता याला फारसा अर्थ नाही. आणि बाहेर पडण्याचे धोरण हे सर्वांचे जवळपास सारखेच आहे.
असामीच्या सौजन्याने एक लिन्क- http://www.newsweek.com/id/134322
क्रमशः
मला आपले
मला आपले म्हणणे साफ नामंजुर आहे. ओबामा हा उत्तम वक्ता आहेत्. त्याचे एखाददुसरे भाषण विस्कळित असले तरी बरीच भाषणे प्रभावी हृदयस्पर्शी आहेत. हिलरीचे उच्चरवातले कानठळ्या बसवणारे, मॅकेनचे रटाळ भाषण ह्यापेक्षा ओबामा नक्कीच उजवा आहे. बुशबाळाचे तर काय बोलायलाच नको!
लिहून दिलेले भाषण असले तरी ते उत्तमरित्या सादर करणे हे येरागबा़ळ्याचे काम नाही.
>> अमेरिका अजून बरीच वर्षे इराकमधे असेल हे सत्य आहे
कशावरुन? हे एक मिथ्य असू शकेल. नुसते इराकमधे असणे पुरेसे नाही. काही लोकांना अनेक वर्षे झुंजायची खाज आहे तर काहींना निव्वळ बगदादमधे ठाणे इतपच आकांक्षा असेल. ह्या दोन्ही टोकात कमालीचे अंतर आहे. एकात अब्जावधी डॉलरचा चुराडा आणि सैनिकांचे मरण तर दुसर्यात कितीतरी कमी खर्च.
ह्या युद्धात आपले काहीतरी चुकलेच ह्या वृत्तीने पुढचा कारभार केला गेला तर ह्या खर्चाला आळा बसेल. इराकचे युद्ध आपले धर्मकर्तव्य आहे ह्या भावनेने राज्याचा ताबा घेतला तर काय होईल ते उघड आहे.
डिबेट
डिबेट म्हणजे भाषण नव्हे हो. तिथे उस्फूर्तपणे बोलावे लागते. तेच येत नसेल तर 'उत्तम वक्ता' कसे म्हणणार?
>>कोणीही प्रेसिडेन्ट झाले तरी अमेरिका अजून बरीच वर्षे इराकमधे असेल हे सत्य आहे
>>कशावरुन?
- तिघांचेही धोरण तेच सांगते.
>>इराकचे युद्ध आपले धर्मकर्तव्य आहे ह्या भावनेने राज्याचा ताबा घेतला तर काय होईल ते उघड आहे.
नाही समजले. तिथे नियंत्रण नाही म्हणून तर प्रॉब्लेम आहे. तुमच्या मते काय होईल?
ह्म्म्म....
ह्म्म्म.... रोव्हने मांडलेले मुद्दे पटले.
*** Veni, vidi, Visa. I came, I saw, I bought. ***
उत्तम
उत्तम वक्ता हा उत्तम नेता असतोच अस नाही..ओबामा ची आघाडी अनेक गोश्टिंचा एकत्रित परिणाम आहे..एकतर पहिला आफ़्रिकन अमेरिकन उमेदवार असल्याने बर्याच आ. अ. लोकांची मत त्याला केवळ आपला माणुस! म्हणुन मिळालित( जे सगळे पुर्वी क्लिंटन सपोर्तिव्ह होते).. शिवाय सुरवातिच्या प्रायमरिज आ. अ. जास्त असलेल्या राज्यात झाल्यात
ओबामाला पार्टि झुकत माप का देतय?.. एकतर तो नविन आहे..त्यामुळे त्याला हाताशी धरुन जुन्या जाणत्यांना स्व:ताच घोडही दामटता येइल..
हिलरी आली तर हे सगळे मनसुबे च राहतिल..त्याशिवाय का " हिलरी अगदी vice-president सुध्हा होण्याच्या लायकिची नाही वैगरे " तारे तोडण चालु आहे..
कोणिही आल तरी ४ वर्ष बुश ने केलेला घोळ निस्तरण्यातच जातिल..मग आहेच 'येरे माझ्या मागल्या..
*** १०० % सपोर्ट हिलरिला ***
लालू ने पी
लालू ने पी पी वर लिहिलंय त्या अनुषंगाने :
'हिलरी बाई आहे म्हणून सुद्धा मी तिला पाठिम्बा देते' असं मी म्हटल्यावर गोरे (निळे अन लाल ) माझ्यावर तुटून पडले होते की ओबामा मायनॉरिटी आहे म्हणून मी त्याला पाठिम्बा द्यायला पाहिजे.
मी परदेशी असले, संख्याशास्त्रा प्रमाणे अल्प संख्यांक असले तरी मी स्वतःला disadvantaged minority मानत नाही. किंबहुना कोणीच भारतीय स्वतःला असे मानत नसतील हे त्यांना पटवून देता देता माझ्या नाकी नऊ आले बाबा! शिवाय ओबामा फक्त रंगाने मायनॉरिटी. त्याचं शिक्षण, त्याची करीयर, त्याचे सोशल सर्कल मार्था'स व्हिन्यर्ड ला जास्त जवळचं आहे.
ओबामा ला हिलरीशी नीट वाद घालता येत नाही तो सिनेट काय मॅनेज करेल असं वाटतं. २००० सालीच मकेन ने रिपब्लिकन नॉमिनेशन जिंकायला हवं होतं
एकाच
एकाच दिवसात या निवडणुकीवर परिणाम करणार्या दोन गोष्टी काल झाल्या:
१. बुश ने तिकडे इस्रायल मधे बोलताना ओबामा वर मारलेली कॉमेंट (बहुधा सर्व डेमोक्रॅट्स वर मारलेली) व त्याची प्रतिक्रिया.
२. कॅलिफोर्निया हाय कोर्टाने गे लोकांच्या लग्नांना दिलेली मान्यता.
दोन्ही गोष्टी पुढच्या काही दिवसांत बर्याच चर्चिल्या जातील असे दिसते. रिपब्लिकन्स बहुधा तो गे लग्नाचा इश्यू पुढे आणणार २००४ प्रमाणे.
यातील
यातील पहिल्या मुद्द्यावर प्रतिक्रिया चालू झाल्यात...
बुश म्हणाला की हिटलर सारख्यांशी चर्चा करून काही उपयोग नाही. डेमोक्रॅट्स वाले (ओबामा) म्हणतो की इराण शी चर्चा करणार म्हणून त्याला हा टोला बहुतेक.
मग ओबामाचे उत्तर की अतिरेक्यांशी चर्चा करणार नाही, जसे 'हमास' शी.
त्याला मॅकेन चे उत्तर की अतिरेक्यांशी करणार नसाल तर त्यांना पोसणार्यांशी पण करू नका...
...आणि दुसर्या दिवशी बुश सौदी अरेबियाशी चर्चे ला रवाना
रोव्हच्या
रोव्हच्या लेखाची लिन्क वर आहेच. साधारण तश्याच प्रकारचा पण मॅकेन साठी हा पोस्ट मध्ये आज आलेला लेख-
) हिलरीच्या टाऊन हॉल मीटिन्ग च्या तिथे रांगेत उभे असताना काही लोकांशी बोलायला मिळाले. सगळे डेम्स समर्थक होते. ते सगळे प्रौढ होते, त्यातले बरेचसे म्हणाले की कोणीही आले तरी आम्ही डेम्सनाच मत देऊ. एकजण म्हणाला रॉमनी असता तर मी विचार केला असता, मॅकेनला मत देऊ शकत नाही (interesting). शेवटी farend म्हणतो तसं कोणत्या इश्श्यूवर निवडणूक होईल त्यावरही अवलंबून आहे.
McCain's Path to Victory
यातलेही काही मुद्दे पटले. सगळा रिपब्लिकन बेस मॅकेनला मत देणारच आहे. त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही, पण ज्या डेमॉक्रॅट्सना ओबामाबद्दल खात्री नाही त्यांना मॅकेन acceptable alternative होऊ शकतो.
.
आ.अ. लोकांच्या गठ्ठा मतदनामुळे प्रायमरीज, कॉकस मध्ये(ओबामा ची कॉकस आणि लहान स्टेट मधल्या प्रायमरीज वर लक्ष केन्द्रित करण्याची स्ट्रॅटेजी पण यशस्वी झाली) फरक पडला पण नॅशनल इलेक्शन मध्ये पडणार नाही कारण एरवीही ते डेमॉक्रटसनाच मते देतात. इथे independents मुळेच फरक पडेल. कट्टर हिलरी समर्थक Dems (bitter :p, नुसते कट्टर डेम्स नव्हे. ते कोणीही आले तरी डेम्सना मत देतील.), हिलरी समर्थक independents हे मॅकेनला मत देऊ शकतील.
.
ओबामा वाईट आहे असं म्हणायचं नाही आहे, पण सध्याची देशाची स्थिती पाहता अशा अननुभवी माणसाला प्रेसिडेंट करावे का? त्याचा राजीव गांधी होईल. (दोघेही व्यक्ती म्हणून चांगले पण नेता म्हणून अननुभवी, इथेच तुलना थांबवा!) स्फूर्तीदायक भाषणे वगैरेना तरुण वर्ग भुलतो, पण त्या सगळ्या कल्पनांमागे काही ठोस प्लॅन असावा लागतो. तेवढी चिकित्सा ते करत नाहीत. इथल्या काही नवमतदारांशी बोलायची संधी मिळाली तेव्हा ते अगदी 'ओबामामय' होते, की 'हिलरी आली तर आम्ही मतदानच करणार नाही' असं ते म्हणाले. (:) आणि ही शैक्षणिक दृष्ट्या 'हुषार' अशी मुले होती. ती काही नवमतदारांचे प्रतिनिधित्व करतात असे म्हणायचे नाही. तरीही...
शोनू,
हे वाच - Misogyny I won't miss
एक वेगळा
एक वेगळा मुद्दा मांडतोय. नेता म्हणून कोण योग्य ते काळच ठरवेल.
हिलरी क्लिंटनला अजून एका बाबतीत बलाढय समजले जात असे. तिच्या कडे न आटणारी पैसे जमा करून देणारी यंत्रणा आहे असा समज होता. इतकच नाही तर डेमॉक्रॅटीक पक्षाचा आतापर्यंत सगळ्यात जास्त पैसे जमा करून देणारा, राजकीय समज अत्यंत प्रगल्भ असणारा बील तिच्या बाजूला आहे. असे असतानाही त्यांच्या पेक्षा जास्त पैसे गोळा करायला नुसत्या वक्तृत्वापेक्षा नक्कीच काहीतरी जास्त असणार. तो फरक आहे जुने पैसे आणि नवीन पैसे यामधला.
हिलरी आणि त्याअगोदरचे अनेक राजकीय नेते यांची पैसे गोळा करायची पद्धत कित्येक वर्षांपासून चालत आलेली आहे. परीपक्व झाली आहे. काही प्रचंड श्रीमंत धेंडं आपल्या हाताशी ठेवायची आणि त्यांच्या नेटवर्कचा उपयोग करून पैसे गोळा करायचे.
या पध्दतीला डावलून पहिल्यांदा नवीन पध्दतीने, तंत्रज्ञानाचा वापर करून पैसे गोळा केले ते ,गेल्या निवडणूकीत, हार्वर्ड डीन ने. वेबसाईटचा वापर अत्यंत यशस्वीपणे करून त्याने एक प्रभावी ऑनलाईन नेटवर्क तयार केले. या नेटवर्कचा उपयोग करून थोडे थोडे का होईना पण लाखो लोकांकडून त्याने पैसे जमा केले. नुसते राजकीय भांडवलच नाही तर तंत्रज्ञानाचा कमी खर्चात प्रभावी वापर करणारे तंत्रज्ञही तितकेच महत्वाचे होऊ लागले आहेत याची ती नांदी होती.
(मायबोली आणि इतर अनेक मराठी वेबसाईटस ज्या वर चालतात त्या दृपल या मुक्तस्रोत सॉफ्टवेअरवर आधारीत हार्वर्ड डीनचे वेबसाईट्चे नेटवर्क होते).
http://www.wired.com/politics/law/news/2003/07/59497
हार्वर्ड डीनचे वेबसाईट्चे नेटवर्क तयार करणारा मुख्य तंत्रज्ञ आज ओबामाचा मुख्य तंत्रज्ञ आहे आणि त्याने डीन पेक्षा कितीतरी जास्त मोठे आणि प्रभावी नेटवर्क ओबामाला बांधून दिले आहे. (अर्थात केवळ तंत्रज्ञानाने कुणी जिंकून येऊ शकत नाही हे डीनच्या पराभवामुळे सिध्द झालेच. )
माझा सांगायचा मुद्दा इतकाच की प्रत्यक्ष मतदानाला लोकाना प्रवृत्त करायला जो समुदाय जमा करावा लागतो त्यापेक्षा जास्त (किंवा तितकीच )महत्वाची ही पैसे गोळा करणारी यंत्रणा उभारावी लागते. आणि ती नुसत्या भाषणांमुळे होईल असे वाटत नाही. त्यामुळे ओबामापाशी अनुभव नसला तरी अशी यंत्रणा उभी करण्याची ताकद दिसते आहे. किंवा कमीतकमी असा अनुभव असणारे लोक त्याच्या बाजूला गोळा झाले आहेत.
हिलरीला
हिलरीला खरोखरच राज्यकारभार करायचा अनुभव आहे? वाटत नाही.
निव्वळ ८ वर्षे राष्ट्राध्यक्षाची पत्नी असणे म्हणजे अनुभव?
आजच्या अमेरिकेच्या बिकट परिस्थितीला तथाकथित अनुभवी, जाणते राजकारणीच जबाबदार आहेत. इराकचे युद्ध अमेरिकेवर लादण्यात हे जाणतेच पुढे होते. हिलरीसारख्या कसलेल्या, अव्वल, अनुभवी नेत्याने त्याला समर्थनही दिले. काय करायचा असला अनुभव?
आता त्याच त्याच जुन्या वाटा चोखाळून काही नवे उत्तर शोधण्यापेक्षा नव्या रक्ताला स.न्धी देऊन काहीतरी वेगळे करायची वेळ आली आहे.
उगाच अनुभवाचे तुणतुणे वाजवण्यात काही अर्थ नाही
धाकला बुश कागदावर अगदी गुणी बाळ वाटेल. उच्चविद्याविभूषित, एका राज्याचा प्रमुख, बाप, भाऊ मोठे राजकारणी वगैरे. काय दिवे लावले ह्या गुणी बाळाने? सगळ्यात नीचतम लोकप्रियता मिळवलेला नेता!
उत्तम वक्तृत्व काय कामाचे? वक्तृत्व हे जनतेशी स.न्वाद साधायचे महत्त्वाचे साधन आहे. राष्ट्राध्यक्ष ह्याच माध्यमातून जनतेशी स.न्वाद करतो. सद्य हलाखीच्या परिस्थितीत काही अप्रिय निर्णय घ्यावे लागणारच. जसे करवाढ, सुविधा.न्मधे काटछाट इत्यादी. तर ते लोका.न्च्या गळी उतरवायला ओबामासारखे प्रभावी वक्तेच उपयोगी पडणार. हिलरीसारखे ढो.न्गी, कर्णकटू वा म्याकेनसारखे रटाळ वक्ते काय उपयोगाचे?
McCain tries to fill ticket
McCain tries to fill ticket जिन्दाल?
अजय, थोडी थोडी रक्कम डोनेट करणारे डोनर्स खूप जास्त आहेत ओबामाचे. निवडणूक लढवायला पैसा लागतो ही पटत नसली तरी खरी गोष्ट आहे. कोणी किती पैसा उभा केलाय याबद्दल सतत चर्चा, बातम्या यामुळे खरी चढाओढ तीच आहे की काय असं वाटावं. पैसा रॉमनीकडेही भरपूर होता. मॅकेन कडे तर New Hampshire प्रायमरीच्या वेळीच फारशी शिल्लक नव्हती. त्यामुळे खूप पैसा जिंकून देतो असंही नाही. मात्र या छोट्या डोनर्स मध्ये त्यांनी काही हातभार लावल्याची आणि त्यामुळे मतदान करण्याची किंवा बाकी लोकांनाही प्रवृत्त करण्याची भावना निर्माण होत असेल तर त्याचा निश्चित फायदा होईल.
)
(इथे कोणाला निवडणून लढवायची असेल तर मायबोलीवरुन असे काही करता येइल का?
लालू यांनी
लालू यांनी सांगितले म्हणून लिहीतो आहे. लालू, माफ करा, पण हिलरीचे हे असले सगळ्यांना जबरदस्तीने आरोग्या विमा घ्यायला लावायचा हे खरे नाही. विम्याचे भाव कमी करणे महत्वाचे आहे. पण या बाबतीत असे टोकाचे निर्णय घेऊन चालत नाही. जबरदस्ती सर्वांनी विमा घ्यायचा, पण काय भावात? नुसतेच भाव कमी केले तर विमा कं त्यांचे फायदे कमी करतील का? डॉक्टर, हॉस्पिटल यांच्या सेवेत काय फरक पडतो? या सर्वाचा विचार करावा लागतो ना? नि आता नाही परवडत हो, नुसते फेडरल कर कमी केले तर राज्यांचे, स्थानिक नगरपालिका, नि आमच्या बाग राज्यात विक्रिकरहि वर जातात! म्हणजे सामान्य माणसाला त्याचा खरा उपयोग नाही.
माझे असे म्हणणे नाही की ओबामा बरा किंवा मॅक्केन. कारण मला रिपब्लिकन लोक मुळीच आवडत नाहीत. नि ओबामा बद्दल खरेच प्रश्न आहेत की याला काही जमणार आहे का? की तो रेव्ह. राईटला विचारणार काय करायचे ते!
प्रश्न गंभीर आहेत. ह्या अत्यंत गहन प्रश्नांचे उत्तर फार कठिण. आणि राजकारणी तर फक्त लोकांना आवडेल तेच बोलतात, करत काहीच नाहीत. तेंव्हा उगीच आपले कुणालातरी मत द्यायचे झाले!
आता या
आता या हिलरीने नुकतेच जे वक्तव्य केले ते ऐकून मला काळजीच वाटते. बाई लई म्हणजे फारच महत्वाकांक्षी!
म्हणजे कसे, सरकारनामा चित्रपटात तो मुख्यमंत्री म्हणतो 'सत्कार करा'! तसे प्रत्यक्षात तिचे अति उत्साही, चमचेगिरी करणारे भडक डोक्याचे कार्यकर्ते October surprise ऐवजी June surprise करतील की काय? का कुणास ठाऊक, व्हिन्स फॉस्टरची आठवण येते. निक्सन किंवा रेगनच गुप्त कारवाया करत असे नाही. डेमोक्रॅट लोकांना पण येतात त्या गोष्टी करता.
हिलरीला
हिलरीला खरोखरच राज्यकारभार करायचा अनुभव आहे? वाटत नाही. >> माझ्या मते प्रत्यक्ष व्यक्तीपेक्षा तीच्या सल्लागार मंडळाचा वाटा in general धोरणे ठरवण्यामधे अधिक असतो. They may be biased towards particular idealogy. (Read : left or right or conservative or liberal) here. Clintons are known to be one of the better policy makers. हिलरीचे Health care reform चे proposal जे ८-१० वर्षांपूर्वी आले होते ते पाहिल्यावर हे लक्षात येईल. (तीने वाहत्या वार्याप्रमाणे पाठ फिरवली हा भाग अलहिदा)
ह्या द्रुष्टिने मला मॅकेनchI dhoraNe jaast suspaSht vataatat.
ओबामा
ओबामा डेमॉक्रॅटिक नॉमिनी असणार अशी जवळपास खात्री झाली आहे. हिलरी आपला पराभव कबूल करणार का? कळेल लवकरच.
चला, हे एक चांगले झाले!
ओबामाला
ओबामाला फक्त खूप शिकलेल्या लोकांचा, काळ्यांचा नि तरुणांचा पाठिंबा आहे. शिकलेले नि काळे मिळून तसे फार नाहीत. तरुण लोक मतदानाला जातीलच अशी खात्री नाही. बरेचसे अमेरिकन गोरे, कमी शिकलेले व ज्यांना blue collar workers म्हणतात असे आहेत. त्यांना ओबामा काय म्हणतो ते कळत नाही. त्यापेक्षा त्यांना मॅक्केन जास्त आवडतो. कारण तो नुसता मारामारी, नि ख्रिश्चन धर्म किती छान हेच बोलतो. त्यांनी एकवेळ हिलरीला मत दिले असते, कारण ती गोरी तरी आहे, पण ओबामाला? कठीणच आहे.
असल्या
असल्या डोकेफिरु, अशिक्षित, मागास ब्लू कॉलर लोका.न्ना घाबरून कायम निव्वळ गोरे लोक उमेदवार म्हणून उभे करणे हे चा.न्गले आहे का? कधीतरी बदल करायचा प्रयत्न व्हायलाच हवा.
बघू या. काळच काय ते सा.न्गेल की अमेरिका असले पुढचे पाऊल उचलायला तयार आहे की नाही ते.
असल्या
असल्या डोकेफिरु, अशिक्षित, मागास ब्लू कॉलर लोका.न्ना घाबरून कायम निव्वळ गोरे लोक उमेदवार म्हणून उभे करणे हे चा.न्गले आहे का?
नाही. क्लिंटन हा अत्यंत हुषार माणूस होता. त्याच्या लंपटपणामुळे त्याचे चांगले कार्य जगाला दिसले नाही. म्हणून मग बुशसारखा माणूस निवडून आला. एकंदरीत शिकलेले काय नि कमी शिकलेले काय, एकंदरीतच अमेरिकन म्हणजे भडक डोक्याचे नि मारामारीने सगळे प्रश्न सोडवणारे. तेंव्हा हा नवीन उमेदवार काय करतो , तो निवडून आला तर काय होईल?
खरा प्रश्न अर्थव्यवस्थेचा आहे. तो क्लिंटनने सोडवला होता. पण त्याच्या लंपटपणामुळे लोक खवळले नि त्याचा फायदा घेऊन बुश निवडून आला. त्याने वाट्टोळे केले. आता लोक ओबामाचा काळेपणा विसरून मतदान करतील का?
काळेपणा
काळेपणा विसरु हो, तो प्रश्न नाही. पण मत द्यावेसे वाटण्यासाठी आठवायचे काय हा प्रश्न आहे.
शेंडे, ते इराकच्या प्रश्नाचे उत्तर द्या जरा..
नक्की
नक्की कुठला इराकचा प्रश्न म्हणताय तुम्ही? लक्षात नाही आले.
पण मत
पण मत द्यावेसे वाटण्यासाठी आठवायचे काय हा प्रश्न आहे >> अग लालु त्याचा पुजार्याल आठव की. तो खुप दिवस फ्रंट पेज वर राहीला होता. ओबामा मला तरी चांगला वाटतो. कधी कधी त्याचा गोंधळ उडतो खरा पण तोच आज तरी सर्वात लायक वाटतो.
शेंडे,
शेंडे, इथले सुरवातीपासूनचे तुमचे चौथे पोस्ट वाचा, मग त्यानंतरचे माझे पोस्ट वाचा.
केदार, Illinois चा गव्हर्नर म्हणून का रे? त्याने आधी तेच व्हायला हवे होते.
हे वाचा.
He won, but he lost his magic touch
हिलरीने शेवटच्या १३ पैकी ९ जिंकल्या. हिलरीच्या दृष्टीने उशीर झाला होता पण यातून काही धडा घ्यावा ओबामाने.
नियमाप्रम
नियमाप्रमाणे बघितले तर ओबामा जिंकला आहे ह्यात शंका नको. ह्या शर्यतीचे नियम आधीच सांगितले होते. पण आता हिलरीचे कट्टर समर्थक रडीचा डाव खेळून नियम बदलायला बघत आहेत. म्हणजे १०० मीटरची धावण्याची शर्यत असावी आ़णि त्यात पहिला कोण पोचला हे न बघता तमक्या स्पर्धकाचा धावण्याचा वेग अमक्या सेकंदाला सगळ्यात जास्त होता म्हणून तोच खरा विजेता म्हणायचे असा प्रकार आहे. १ नंबरचे रडीचे खेळाडू.
दुसरी एखादी असती तर खिलाडूपणे आपला पराभव स्वीकारती.
इराकच्या युद्धात आपले काहीतरी चुकलेच. आता ते लवकरात लवकर निस्तरावे ह्या भूमिकेने राज्यकारभार करणारा अध्यक्ष ह्या व्यर्थ खर्चाला आळा घालून आपले सैनिक लवकरात लवकर घरी आणेल. ह्या निरर्थक युद्धाला अतिरेक्यांविरोधी उघडलेल्या आघाडीचे रुप देऊन अजून १०० वर्षे युद्ध चालले तरी चालेल म्हणणारा अध्यक्ष आणखी अब्जावधी डॉलर आणि हजारो सैनिकांचे प्राण वाया घालवेल हे नक्की.
दुसरी
दुसरी एखादी असती तर खिलाडूपणे आपला पराभव स्वीकारती.
तसले काही नसते नसते अमेरिकेत.
मी, माझे, मला एव्हढेच पहायचे. नियम काहीहि असोत, कायदा असला तरी त्याबद्दल पकडून खटला भरून जर माझा दोष सिद्ध झाला तरच बोला. तोपर्यंत मी माझ्या साठी काय वाट्टेल ते करीन! त्यातून एका माणसाने केलेल्या कायद्यात दुसरा हुषार माणूस काही ना कारणाने दोष काढून कायदाच रद्द करू शकतो.
पूर्वी everything is fair in love and war असे होते. आता सगळ्याच गोष्टी युद्ध होऊन बसल्या आहेत. कॅन्सरने आजारी पडलेला माणूस कॅन्सरशी झुंज देत असतो. क्रिकेटमधे पीचवर गोळ्या टाकायच्या, चेंडू कुरतडायचा, पंचाने बाद ठरवले तरी हट्टीपणा करत तसेच उभे रहायचे, हे सर्व काही आजकाल क्षम्य. स्पर्धा म्हणजे युद्धच! म्हणून कुठेहि काहीहि निषिद्ध नाही.
खरे तर सा रे ग म प मधेहि तो कोणीतरी 'महायुद्ध' महायुद्ध' म्हणून ओरडत असतो. तेंव्हा तिथेहि खोटे मतदान करून आपल्या उमेदवाराला पुढे आणणे चालूच असते. कारण युद्धात सर्वकाही fair.
तर मंडनमिश्र व शंकराचार्य यांच्यासारखे भारतीय संस्कृतीचे लोक, जे भांडण न करता वादविवाद करून प्रश्न सोडवत, त्यांचा काळ गेला. आता मुसलमान, अमेरिका इ. मी म्हणतो तेच खरे, नि ऐकले नाहीत तर तुमच्यावर छुपे, उघड हल्ले करून तुमच्यावर आमचे विचार लादू.
पण मत
पण मत द्यावेसे वाटण्यासाठी आठवायचे काय हा प्रश्न आहे.
तेहि खरेच! ज्यानी काही केलेच नाही, त्याला कोणत्या भरवशावर मत द्यायचे?
फक्त रिपब्लिकन नकोत, नि १०० वर्षे इराकमधे पैसे वाया घालवणारा माणूस नको म्हणून दुसर्याला निवडायचे. नि मॅक्केन सारखा भडक डोक्याचा माणूस उद्या कुणावर अणुबाँब पण टाकेल! बुश हून भयानक माणूस तो.
अहो शेंडे
अहो शेंडे आणि झक्की, खरी निवडणूक तर पुढे आहे. हिलरी समर्थकांची मते पाहिजेत का नको ओबामाला?
पाहिजेत ना? हे ओबामाला माहित आहे म्हणून तो गप्प आहे पण त्याच्या काही समर्थकांना कळत नाही, त्यांना घाई झाली आहे हिलरी कधी एकदा माघार घेते.
.
नुसता पराभव मान्य केला की झाले असे नाही आहे ते. हिलरी जिंकणार नाही हे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते तरी सगळ्या प्रायमरीज होऊ दिल्या हे चांगले झाले. कोण लोक कसे मतदान करतायत याचा अंदाज आला असेल पक्षाला. नोव्हेंबर च्या दृष्टीने DNC चे काम आधीच सुरु झाले आहे. मला एक सर्व्हे पण आला होता. हिलरीचे समर्थक खूप आहेत, त्यांच्याकडे आणि हिलरीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. म्हणूनच ओबामा जिंकला तरी सगळ्यांचे लक्ष आहे पुढे हिलरी काय करते याकडे. अर्थात काल टीव्ही वर असेही ऐकले-एका चॅनेलला अश्या बर्याच ईमेल आल्या की हिलरी काहीही करो, ओबामाला support करो किंवा endorse करो, आम्ही त्याला मत देणार नाही.
थोडक्यात
थोडक्यात काय तर दैव देते नि कर्म नेते अशी अवस्था होणार आहे डेमोक्रट्सची. Time for Blame Game !!!
Pages