वनदास - ऐक... ऐक... मारू नको... ऐक.. तू काह्यला चिडतो बे? तुझ्या फ्यान्सीवर केलीय होय कविता?
दिल्या रूममधे वनदासच्या मागे लागला होता आणि त्या एवढ्याश्या खोलीत वनदास जमेल तिकडे पळत होता. अशोक आणि आत्मानंद खदखदून हसत होते.
होय! आत्मा हसायला शिकला होता. गेल्या पंधरा दिवसात त्याने तब्बल पाच वेळा ओल्ड मंकचे चक्क सव्वा सव्वा पेग लावले होते एकावेळेस! आणि सव्वा पेगनंतर पेंग आली की होता तिथेच आडवा व्हायचा!
आणि आज त्याने थोडी अधिक पिऊन बघायचे ठरवले होते. बाबांनी फोन केला नव्हता. पण आत्म्याने स्वतःच केला होता.
"माझ्या खोलीतील सर्व मुले दारू पितात. पण तुम्ही आल्यावर ते तुमच्याशी मुलांसारखेच वागले. आदराने वागले. इतकेच काय तुमची थट्टा करणार्या गुणेला दिल्याने चोपला सुद्धा! मी दारू प्यायलेली नाही. मात्र एक सांगतो! माझ्यावर तुमचेच संस्कार आहेत. मी दारू पिणार असे मी म्हणतही नाही आहे. पण प्यायलीच, तर ती जबाबदारी माझी आहे. एक मुलगा म्हणून माझे कोणतेच कर्तव्य मी कधीच टाळणार नाही. पण एक व्यक्ती म्हणून मी निश्चीतच जगणार आहे. फक्त.... फक्त तुमचाच मुलगा म्हणून ... असे नाही."
इतके धाडस त्याचे झालेले नव्हतेच! हे त्याने सर्व लिहून आणले होते फोनपाशी! एक दीर्घ श्वास घेऊन एका दमात ही सगळी वाक्ये बोलून फोन ठेवून देऊन तो कित्येक क्षण स्वतःतील हरवलेले काहीतरी शोधत खिन्नपणे उभा होता. त्याही वेळेस अशोक पवारनेच त्याच्या पाठीवर थोपटले होते. मात्र.. या फोननंतर आत्मानंदला एक फार फार मोठा शोध लागला होता. तो म्हणजे 'आत्मानंद ठोंबरे ही एक वेगळी व्यक्ती आहे, फक्त त्याच्या आई वडिलांचे अपत्य नाही'!
आणि त्याचा परिणाम म्हणून त्यने त्या रात्री पुन्हा दारू प्यायली. ज्या रात्री तो दारू घेईल त्याच्या दुसर्या दिवशी तो डॉकेच धरून बसायचा. तोंडावर दिवसभर चव रेंगाळायची! त्या दिवशी संध्याकाळि येऊन तो सर्व आरत्या व प्रार्थना टाळून सरळ झोपून जायचा! त्याला एखाद्याच पेगने इतका त्रास होतो यावर बाकीचे हसत असताना तो घोरत असायचा. पण आजची गोष्ट वेगळी होती! परवा रात्री प्यायलेल्या दिड पेगने काल दिवसभर काहीच त्रास झालेला नव्हता. किंचित प्रमाणात शरीराला अल्कोहोलची ओळख पटली होती व रक्ताने सामावून घेतले होते त्याला!
आणि काल काहीही त्रास न होवूनही आत्मानंदने काल एकही घोट प्यायला नव्हता. आज मात्र त्याने ठरवले होते. आपल्याला त्रासच होत नाहीये! आज चांगले दोन, तीन पेग घेऊन बघायचे!
आणि हे ठरवण्यामागे एक कारण होते! एक ड्रिन्क घेतल्यावर आत्मानंदच्या मेंदूतील नसांवरचा ताण कमी व्हायचा इतरांप्रमाणेच! मग हळूहळू आत्मविश्वास वाढायचा. मग आपण काहीही करू शकतो असे वाटू लागायचे. मुख्य म्हणजे दारू प्यायल्यामुळे या ग्रूपमधे आपण बरेच लवकर प्रिय होत आहोत हेही जाणवू लागले होते. दारू पिताना चाललेल्या गप्पा मजेशीर होत्याच! त्यातूनही मजा घेता यायची! मांसाहार मात्र तो अजिबात करायचा नाही.
आणि आज आणखीन एक प्रकार झाला. वनदासने आज दुपारी सरळ दीपा बोरगे वाटेत एकटीच असताना तिला नडून बिनदिक्कतपणे सांगून टाकले होते....
"काल तू आली नाहीस ना... खूप कसं तरीच वाटंत होतं मला... "
सुरुवातीला हा कसा काय एकदम मधे येऊन बोलतोय या विचाराने बावरलेली, मग गोंधळलेली, मग कुतुहल जागृत झालेली अन शेवटी कान देऊन वन्याचे ते वाक्य ऐकणारी दीपा वाक्य ऐकून मात्र...
.. चक्क लाजली अन खाली मान घालत हसत निघून गेली....
वनदासचे पाय आता एक थेंबही न घेता कित्येक फूट उंचीवर गेले होते. आधी त्याला काय करावे तेच समजेना! आपण तिच्याशी बोललो हे कुणी पाहिले की काय याचा त्याने आधी शोध घेतला. कुणीच पाहिलेले नाही हे कन्फर्म झाल्यावर त्याने पुन्हा लांब गेलेल्या पाठमोर्या दीपाकडे पाहिले. ती अजूनही चालत जातच होती. तिच्या चेहर्यावर ते वाक्य ऐकून संताप, चीड वगैरे नक्कीच नव्हते इतके वन्याला समजलेले होते. हळूहळू त्याच्या ध्यानात सगळाच प्रकार आला. आधी त्याने स्वतःची पाठ थोपटली. आपण दीपाशी इतकं धाडसी वागू शकलो म्हणून! मग त्याने देवाचे आभार मानले. दीपाला राग आला नाही म्हणून! आणि मग त्याने आधी कॉलेजच्या बाहेर जाऊन एक स्वतंत्र, म्हणजे कुणीही शेअर करणार नसलेली अशी एक क्लासिक माईल्ड व चहा घेतला व धूर सोडत समोर जो दिसेल त्याला हसत हसत हात करू लागला.
नशीबच पालटले की राव?
त्याच्या मनात आलेला पहिला विचार! आता चार वर्षे नुसती धमाल! एक प्रेयसी असणं आणि ती चार वर्षे सतत डोळ्यासमोर असणं, तेही लग्नाआधी, इतके भाग्य तर एखाद्या देखण्या पोरालाही मिळणार नाही.
दीपा.... दीपा!
आता मनात फक्त दीपा या नावाचा जप चालू झाला. सकाळचे अकरा वाजलेले! दीपा केव्हाच पिरियडला जाऊन बसली होती. हे साहेब चहा वगैरे घेऊन दुसर्या पिरियडला गेले तेव्हा आत्मा आणि अशोक एका बाकावर बसलेले होते. त्यांच्या डोळ्यात 'होता कुठे यार तू' असे भाव होते. दिल्या अर्थातच रूमवर असणार होता. आणि दीपा???
वनदासला तिने आलेले पाहिले आणि एकदम तिच्या चेहर्यावर कॉनशसनेस जाणवला त्याला! आता ती समोर बघूनही डोळ्यांच्या कोपर्यातून वनदासच्या हालचालींकडे बघत होती. तोही मधून मधून सहज बघितल्यासारखे तिच्याकडे बघत होता.
आपल्या गेल्या पन्नास पिढ्यात कुणी असले साहस केलेले नसेल हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याचे कशात लक्षच लागत नव्हते.
आणि सायंकाळी पार्किंगमधून स्वतःची सायकल काढत दीपा जेव्हा गेटबाहेर निघाली... गेटमधून बाहेर जाऊन चक्क थांबली.... आणि मागे खूप लांबवर फिजिक्स लॅबपाशी उभ्या असलेल्या वनदासकडे तिने वळून पाहिले... आणि .... मग निघून गेली....
नंबर वन व्हिस्की!
आज वन्याच्या या गीतांजली एक्स्प्रेससारख्या प्रगतीवर ओल्ड मंक चालणारच नव्हती! च्यायला रम कोण पिणार प्रेम जमले म्हंटल्यावर? अगदी रॉयल चॅलेंज नाही, पण निदान... ओल्ड गोल्ड किंवा.. नंबर वन तरी????
पैसे कुठे आहेत पण? दिल्याकडे कायम पैसे असणे हा भाग सोडला तर कुणाकडेही महिन्याच्या सातशे रुपयांच्या वर पैसे नसायचे. आणि नाना हिकमती करून अश्क्या अन आत्म्याने गेल्या दहा पंधरा दिवसात मनी ऑर्डरने मागवलेले अनुक्रमे सहाशे अन बाराशे रुपये आता अर्ध्यावर आलेले होते. अशोकला खूप वाईट वाटले होते त्या सहाशे रुपयातून चार खंबे आणायला! वडिलांना त्याने सांगीतले होते की चार मोठी पुस्तके घ्यायला सांगीतली आहेत. अर्थातच वडिलांचे दादाशी पुन्हा भांडण झालेले असणार होते. पण....
... दारूच्या मोहापुढे वडिलांना मनस्ताप देणे हे निदान सध्या तरी.... फारच क्षुल्लक वाटत होते.
आत्मानंद मात्र सरळ विचारांचा होता. त्याने पैसे पाठवा असे सांगताना 'मला हवे आहेत, लागतात, येथे बरेच खर्च असतात' इतकेच सांगीतलेले होते. पैसे आलेही होते. आत्म्याचे वडील बुवा कीर्तनकार असले तरी गरीब नव्हते. मात्र आलेल्या बाराशे रुपयांमधील आत्तापर्यंत साडे तीनशे नुसते दारूतच गेले होते! आणि आत्मानंदने ठरवले होते. हे बाराशे पुन्हा कमवायचे कसेतरी! वडिलांना याहून अधिक त्रास द्यायचा नाही. गेल्या पंधरा दिवसात त्याला एक संधीही मिळालेली होती. अत्यंत छुप्या मार्गाने त्याने होस्टेलमधे त्या कल्पनेचा वादळी प्रसार आणि प्रचार केलेला होता. सबमिशनमधले जे लिखाणाचे काम आहे ते मी विषयाला दोनशे रुपये या रेटने करून देईन!
ब्बास! तीन दिवसांमधेच त्याला आठ ऑर्डर्स मिळाल्या. त्याचे अक्षर इतके लिहून बिघडायच्या ऐवजी सुधारूच लागले. हा खरे तर वाममार्ग होता. पण त्यातूनच त्याचा अभ्यास आपोआप होत होता. आठ पेक्षा अधिक ऑर्डर्स मात्र त्याने घेतल्या नाहीत. त्याही, मेकॅनिकलची एक, सिव्हिलच्या दोन, इलेक्ट्रॉनिक्सच्या दोन, इलेक्ट्रिकल मधून गुणेच्या ओळखीने एफ्.ई. मधली दोन आणि दिल्या स्वतः! दिल्याने दिलेल्या अॅडव्हान्स दोनशे मधून त्या दिवशीच एक पार्टी झाली होती. इतरांकडूनही त्याने अॅडव्हान्सच घेतलेला होता. वर्गात जसजसा पोर्शन पुढे जात होता तसतसा आत्मानंद चार दिवसात स्वतःसकट नऊ सबमिशन्स तयार करायचा. दिल्याचे सबमिशन करताना मात्र आत्म्याने अत्यंत हुषारीने रनिंग लिपी काढली होती. स्वतःचे सबमिशन सरळ लिपीत! फर्स्ट इयर सर्व ब्रॅन्चेसना कॉमन असल्यामुळे सबमिशन कॉमनच होते. आत्मानंदचा अभ्यास जवळपास नऊवेळा होत होता अशामुळे! त्या आघाडीवरही तो निर्धास्त आणि पैशाच्याही! सोळाशे रुपये म्हणजे थट्टाय का त्या जमान्यात? दिडशे रुपयाप्रमाणे दहा खंबे आणि उरलेल्या शंभरमधे चकणा येणार की चांगल्यापैकी??
आणि आज रूममधे आल्यावर वनदासने बॉम्ब फोडला.
'दीपाच्याही मनात आहे'
वन्या अन अश्क्याच्या खिशात दमडा उरलेला नव्हता. दिल्याकडून नेहमी पैसे घेणं ठीक नव्हतं! पण प्यायची तर होतीच! प्यायला पाहिजेच होती. इतकी चांगली बातमी म्हंटल्यावर?
आत्मानंदने उधार अडीचशे रुपये दिले. बुवा ठोंबरेंचे बाराशे रुपये मस्त रोटेट होतच होते. हे अडीचशे पुढच्या सेमिस्टरमधे आणखीन एखादी ऑर्डर घेऊन रिकव्हर झालेही असते.
अखेरीस! या वर्षीची पहिलीच... नंबर वन व्हिस्की रूम नंबर २१४ वर दिमाखात प्रवेशली!
जोडीला सिगारेटी, कांदा, खारे दाणे, फरसाण आणि.... एक अत्यंत ज्वलंत विषय! दीपा बोरगे!
आत्मानंदने व्हिस्कीची चव प्रथमच चाखली होती. रमपेक्षा बरी वाटत होती त्याला! सगळ्यांचेच दिड दिड पेग्ज झालेले होते. बर्यापैकी झिंग आलेली होती.
अशोक - नेमकं झालं काय???
दिल्या - च्यायला सतरांदा सांगीतलं तरी तेच विचारतंय पुन्हा... हाड..
अशोक - अरे... या बाबी अतिशय तपासून घ्याव्या लागतात..
दिल्या - काय तपासून बिपासून नाय... खुल्ला बोलायचं ... आय लव्ह यू... काय??
वनदास - हा! म्हणे आय लव्ह यू!
दिल्या - मग काय करणार? कवळी बसवल्यावर सांगणार का?
आत्मानंद - त्यांनाही तुम्ही आवडता का?
वनदास - ए आईशप्पथ अश्क्या... ह्याचं बोलणंय ना? ते झेपत नाय मला...
अशोक - आत्मानंद? तुम्ही जरा थांबानंद व्हा... तू बोल रे..
वनदास - काय बोल??
अशोक - नेमकं कसं झालं ते सांग... म्हणजे मी अर्थ सांगतो...
वनदास - सकाळची पावणे अकराची वेळ...
अशोक - हं...
वनदास - सूर्य असा नभात चढत होता..
दिल्याची एक बुक्की!
अशोक - सूर्य चढूदेत.. तुमचं काय झालं??
वनदास स्वप्नील डोळ्यांनी आढ्याकडे बघत होता. तो मुद्दाम दिल्यापासून आठ एक फुटांवर बसलेला होता.
वनदास - पाखरं मनोहर किलबिलाट करत होती...
दिल्या - ए तुझ्याXXXXX
वनदास - अश्क्या... हा बघ कसा शिव्या देतोय एका निष्पाप प्रेमाला...
अशोक - दिल्या.. तू थांब जरा.. हां.. बोल.. ते पाखरं बिखरं राहूदेत...
वनदास - अचानक एक थंड हवेची झुळूक आली...
अशोक - वन्या.. तू मुद्यावर ये हां?? आई शप्पथ डोकं फिरेल आता माझंही...
वनदास - मी हरवलेल्या नजरेने गेटकडे पाहात होतो...
आत्मानंद - का?
वनदास - माझी ख्वाबोंकी रानी, बहारोंकी मलिका, एक परी, एक लावण्यलतिका प्रवेशत होती...
आत्मानंद - कोण होत्या या चौघी???
वनदास - आत्म्या... आता मात्र शिव्या घालीन हां??
अशोक - बर मग? पुढे काय झालं?
वनदास - तिने तिचा नाजूक उजवा हात तिच्या केसांवरून पुढून मागे असा फिरवला...
दिल्या - तुला उलटा टांगून लाथेने तुडवणार आहे मी...
वनदास - त्यातच तिचे लक्ष गेले... तिच्या घसरणार्या ओढणीकडे...
अशोक - ठीक आहे.. नंतर तुम्ही भेटलात... बोलणं काय झालं...
वनदास - अरे ऐकून तर घे?? ती अशी चालत येत होती...
वन्याने रूममधे चालण्याची अॅक्शन केली.
आत्मानंद - हे कसे चालतात नाही?
वनदास - संपूर्ण वातावरणातली मरगळ झटकली गेली....
अशोक - हं... आत्म्या... घाल रे याच्यात एक स्मॉल..
वनदास - अॅन्टिक्विटीची काय नशा येईल अशी नशा पसरली आसमंतात...
अशोक - बोल बोल... तू बोलत राहा...
वनदास - जणू काळच स्तब्ध झाला... ते अभुतपुर्व लावण्य पाहून...
अशोक - ... पुढे....
वनदास - कांदा दे...
आत्मा - हा घ्या...
वनदास - आणि आली की ती सरळ??
अशोक - म्हणजे काय? मगाशीच आली होती की
वनदास - अंहं??? माझ्याकडे आली....
दिल्या - फेकतंय रे.. फेकतंय आईशप्पथ....
वनदास - माझा बर्फ झाला होता...
अशोक - बोलणं काय झालं??
वनदास - तिचे ते अर्धोन्मीलीत नेत्र माझ्या डोळ्यांत काय मिसळले... एकच बहार आली...
दिल्या - तुझा हा सजीव देह काहीच मिनिटांनी रिपेअर होण्याच्या पलीकडे जाणार आहे..
अशोक - डोळे मिसळले.. बहार आली... पुढे??
वनदास - तो क्षण काय वर्णावा अश्क्या...
अशोक - झाला तो वर्णून....
वनदास - जनम जनम का नाता सिद्ध होगया उस नजरोंकी कैदसे...
अशोक - बरं...
वनदास - मला म्हणते कशी?
अशोक - .... कशी???
वनदास - काल मी आलेच नव्हते कॉलेजला....
अशोक - .... मग? .... यातून काय सिद्ध होतं???
वनदास - त्यावर मी म्हणालो.... कालचा दिवस माझ्या जिंदगीतील एक घटिया किसम का दिवस होता..
अशोक - मग?
वनदास - तर म्हणते कशी??
अशोक - अरे बोल ना तिच्यायला...
वनदास - काही म्हणालीच नाही....
अशोक - दिल्या... तू याच्यावर भडकतोस ते काय चुकीचं नाही...
दिल्या - तू धर रे त्याला.. कोचा करतो कोचा...
वनदास - लांब राहा या निर्मळ आशिकापासून... नुसतीच लाजली रे अश्क्या ती...
अशोक - तुला कसे कळले ती लाजली ते??
वनदास - अरे?? हे... हे या अंतरावरून पाहतोय ना मी???
अशोक - हेच... मगाचपासून यालाच महत्व देतोय मी... लाजली म्हणजे काय केलं???
वनदास - म्हणजे... असं.... म्हणजे मला ते दाखवता बिखवता नाय येणार...
अशोक - अरे वर्णन तर कर ना??
वनदास - वर्णन?? म्हणजे अशी.. मान खाली घातली...
अशोक - आणि??
वनदास - आणि काय?? मंद स्मितहास्य केलं....
अशोक - आणि??
वनदास - नजर चोरली...
अशोक - आणि???
वनदास - तिचे... गाल किंचित गुलाबी झाले...
अशोक - आणि??
वनदास - मानेला तिने एक नाजूक झटका दिला...
अशोक - कुणाच्या??
वनदास - तिच्या...
अशोक - आणि??
वनदास - आणि गेली निघून...
अशोक - हां! आता मला सांग... त्यावेळेस त्या परिसरात आणखीन कोण होतं??
दिल्या - परिसर?? काय मर्डर बिर्डर झालाय काय??
वनदास - त्यावेळेस त्या परिसरात वसंत आला होता वसंत...
अशोक - वन्या तू नीट बोलला नाहीस ना... तर काकडीसारखा चिरीन मी तुला..
वनदास - इतर कुणीही नव्हतं...
अशोक - लांबवर कुणी तुमच्याकडे पाहात असण्याची शक्यता??
वनदास - असेलही... पण त्याने या पहिल्या मधूर भेटीत काय होणार??
अशोक - ते मधुर बिधुर जाऊदेत... होतं का कुणी??
वनदास - लांबवर खूप जणं होते...
अशोक - हां!..... दिल्या... येड्या... अरे हे खरं प्रेम आहे खरं...
दिल्या - अश्क्या... याच्याऐवजी तू मार खाणारेस माझा...
अशोक - अरे ऐक.. जवळपास कुणी असतं ना? तर ती याच्याशी बोलायला थांबलीच नसती... लांब होते सगळे म्हणून निदान थांबली ती... जिचं प्रेम नसतं ना? तिने नेमकं उलटं केलं असतं.. जवळपास कुणी असतं तरच याचं म्हणणं ऐकून घेतलं असतं... लांबवर लोक असते तर थांबलीच नसती याच्या वार्याला...
दिल्या - हे पहा..प्रेम करायचं असेल तर खुल्ला जाऊन बोलायचं... या रूममधे वसंत बिसंत नाय चालणार..
वनदास - मी त्या भावनेच्या भरात एक कविता केलीय तिच्यावर...
या डायलॉगनंतर वन्या रूममधे पळत होता आणि मागून दिल्या! आत्मा आणि अशोक हसत होते. आजच पहिल्यांदा होस्टेलमधे हसायला शिकला होता आत्मा! मॅक्डोवेल नंबर वन व्हिस्कीने धीर दिल्यामुळे!
अशोकने दिल्याला धरलं..
अशोक - हे बघ दिल्या.. एकेकाचे मन मोकळे करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात... तू याच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणतोयस...
अभिव्यक्तीस्वातंत्र्य हा शब्द ऐकल्यावर दिल्याने अश्क्याच्याच कानसुलात लगावली. आता वन्या आणि आत्मा हसायला लागले.
दिल्या - या खोलीत कवितेतला क काढायचा नाही क!
आत्मानंद - दिलीप? मी आपल्याशी बोलू शकतो का?
दिल्या - ए तू पयली भाषा सुधार बे.. च्यायला वसिष्ठांच्या आश्रमात असल्यासारखं वाटतं!
आत्मानंद - यांना कविता रचायला व ती प्रकट करायला आपण मोठ्या मनाने परवानगी द्या...
दिल्या - घोळणा फोडीन नाकाचा एका फटक्यात...
अशोक - दिल्या.. कवितेचा तुला इतका राग का रे??
दिल्या - ही माझी रूम आहे...
अशोक - माझ्याही बापाने पैसे भरलेत...
दिल्या - अरे हा काय कविता करतो होय?? च्यायला डोळे कमळासारखे अन हात टिळकांसारखे????
आता अशोक हसायला लागला.
अशोक - रागवू नको.. लेका त्याचं नवीन प्रेम आहे.. आपण साथ द्यायला पाहिजे त्याची आत्ता..
दिल्याला अशोकने धरून ठेवला.
आत्मानंद टूकूटुकू बघत होता.
वनदास एका पलंगावर उभा राहून 'एखादी गृहिणी जशी जमीनीवर पळणार्या पालीकडे घाबरून पाहाते' तसा दिल्याकडे पाहात उभा होता. त्याच चेहर्याने त्याने कविता सुरू केली.
' तुझ्या त्या मासोळीसारख्या गहिर्या नेत्रांची शप्पथ....
... आज आपल्यातले अंतर.... झपाट्याने आकुंचन पावत असताना...
.... माझ्या विशाल छातीतील हृदयाची आंदोलने... तिपटीने वाढलेली होती दीपा....
... आणि तू?? ... तुझे ते भुरभुर उडणारे केस?? ज्यांना तू उजव्या हाताच्या मरंगळीने मागे ढकलताना माझ्याकडे काही......
.... लाडीक कटाक्ष टाकत होतीस... ते तुझे केस... साक्ष देत होते आपल्या जन्मोजन्मीच्या प्रेमाची...
.... तुझ्या ओठांवर होते काही ताटवे.. नवीनच उमलू पाहणार्या कळ्यांचे... आणि... गालांवर होते..
... तेजाळलेल्या रवीचे सोनेरी किरण... तुझी ती तलम, रेशमासारखी.. ओढणी....
.... एखाद्या निर्मळ.. बारा महिने वाहणार्या... नदीसारखी जेव्हा मला भासली ना दीपा..???'
.............................
वन्या - ए... आता त्याला नीट धर
अशोक - का???
वन्या - पुढचं वाक्य ऐकलं की तो मारेल....
अशोक - बोल तू बोल.. धरलंय मी...
वन्या - तुझी ती तलम, रेशमासारखी ओढणी.. जेव्हा मला एखाद्या निर्मळ, बारा महिने वाहणार्या नदीसारखी भासली ना दीपा... तेव्हा....
अशोक - ........
वन्या - तेव्हा.. स्वराज्य स्थापनेमागची भूमिका...
मोठा गदारोळ झाला. अशोकच्या तावडीतून सुटून दिल्याने एका झेपेत वन्याला धरला. अयायाया करत वन्या मार खाऊ लागला. अशोकला स्वतःला धड हसताही येत नव्हतं अन दिल्याला रोखताही येत नव्हतं!
'लय ब्येक्कार' फटके खाऊन वन्या अर्धमेला होऊन पलंगावर पडल्यावर दिल्याने एक मोठा पेग तसाच घेतला.
रूम नंबर २१४ मधे सन्नाटा पसरलेला होता... भीतीयुक्त...
वनदास कण्हत होता... अशोक हादरून दिल्याकडे बघत होता आणि आत्मानंद काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता...
पण... परिस्थिती बदललीच!
क्षणात पालटली.... दिल्याने तीन बुक्या मारल्या भिंतीवर... अशोक कधी हसला नसेल असा हासला.. आणि वन्या दुखरे अंग घेऊनही पडल्या पडल्याच हसू लागला...
आत्मानंद - मलाही... ती... अलकायना अलका?? ती .. आवडते...
आज ही मी
आज ही मी पहिली...........
मस्तच....आता वाचते
सावरी
आज ही तुच पहिली...........
आज ही तुच पहिली...........
मी पहिली आज
मी पहिली आज
अरेरे!
अरेरे!
आज ही मी
आज ही मी पहिली...........
मस्तच....आता वाचते << म्हणजे काय नं वाचताच असा नंबर लावता होय तुम्ही सावरी. हे काय ठीक नाही हां! पुर्ण ज्याचे पहीले वाचून होईल त्यानेच पहिला नंबर लावणे ठीक होईल ना जास्त?
बेफिकीर आत्माराम सोडून बाकी सगळे अट्टल बेवडे आहेत तर
सगळ्यांचेच दिड दिड पेग्ज झालेले होते. बर्यापैकी झिंग आलेली होती.
हे खटकते आहे. दीड पेग मधे कसली झिंग? हे बदलाल का प्लीज?
छान !!!!!!!!! लिखानाचं स्पीड
छान !!!!!!!!!
लिखानाचं स्पीड वाढवा आम्ही सारखं मायबोली चाळ्त बसतो.
भन्नाट आहे सारच...... वन्या -
भन्नाट आहे सारच......
वन्या - पुढचं वाक्य ऐकलं की तो मारेल....
अशोक - बोल तू बोल.. धरलंय मी...
वन्या - तुझी ती तलम, रेशमासारखी ओढणी.. जेव्हा मला एखाद्या निर्मळ, बारा महिने वाहणार्या नदीसारखी भासली ना दीपा... तेव्हा....
अशोक - ........
वन्या - तेव्हा.. स्वराज्य स्थापनेमागची भूमिका...
..........छान.....जबरी.......
आत्मानंद - मलाही... ती... अलकायना अलका?? ती .. आवडते...
......हा एक बॉम्ब...मस्तय.....
आता मात्र आत्मानंदची कवीता ऐकण्यास उत्सुक आहोत...
सावरी
एच एच्...माफ करा..... परत अस
एच एच्...माफ करा.....
परत अस होणार नाही....आधी वाचेन नी मगच प्रतिक्रिया देईन....
पण खर सान्गु का मी वाटच पाह्त होते...नव्या पोस्टची......
सावरी
आई ग...., हसुन हसुन पोट आणि
आई ग...., हसुन हसुन पोट आणि गाल दुखायला लागले,
वनदास - सूर्य असा नभात चढत होता..
वनदास - पाखरं मनोहर किलबिलाट करत होती...
वनदास - अचानक एक थंड हवेची झुळूक आली...
वनदास - मी हरवलेल्या नजरेने गेटकडे पाहात होतो...
वनदास - माझी ख्वाबोंकी रानी, बहारोंकी मलिका, एक परी, एक लावण्यलतिका प्रवेशत होती...
आत्मानंद - कोण होत्या या चौघी???
वनदास - तिने तिचा नाजूक उजवा हात तिच्या केसांवरून पुढून मागे असा फिरवला...
दिल्या - तुला उलटा टांगून लाथेने तुडवणार आहे मी...
वनदास - त्यातच तिचे लक्ष गेले... तिच्या घसरणार्या ओढणीकडे...
वनदास - अरे ऐकून तर घे?? ती अशी चालत येत होती...
वन्याने रूममधे चालण्याची अॅक्शन केली.
आत्मानंद - हे कसे चालतात नाही?
वनदास - अॅन्टिक्विटीची काय नशा येईल अशी नशा पसरली आसमंतात...
वनदास - जणू काळच स्तब्ध झाला... ते अभुतपुर्व लावण्य पाहून...
आणि हे ओढणि आणि स्वराज्य स्थापना, बापरे हा तर कडेलोट होता, कडेलोट.
खुप हसलो, मागे कोणि तरि विचारले होते बेवडे हसवतात? अरे मि तर म्हणतो, तेच सगळ्यात जास्त करमणूक करतात, फक्त आपण शुद्धित असणे महत्वाचे(ह्याचे खुप किस्से आहेत माझ्याकडे, पिल्यावर कोनाच्या आंगात कोण संचारेल ह्याचि काहि शाश्वति नाहि बाबा). खुप काहि आठ्वल.
एच्चेचची पोस्ट
एच्चेचची पोस्ट
मस्तच!!! जाम धम्माल येतीये या
मस्तच!!! जाम धम्माल येतीये या कादंबरीत..येऊदे अजुन..
(No subject)
संदिप, छान !!!!!!!!! लिखानाचं
संदिप,
छान !!!!!!!!!
लिखानाचं स्पीड वाढवा आम्ही सारखं मायबोली चाळ्त बसतो....
अरे मित्रा हा स्पीडही खुप आहे.....बेफिकीर मानल तुम्हाला...
सावरी
>>एच्चेचची पोस्ट हाहा लोक इथे
>>एच्चेचची पोस्ट हाहा
लोक इथे कथा/कादंबरी वर प्रतिसाद द्यायला येतात की दुसर्यांच्या पोष्टींवर

धमाल...
धमाल...
वनदास - पाखरं मनोहर किलबिलाट
वनदास - पाखरं मनोहर किलबिलाट करत होती...
वनदास - माझी ख्वाबोंकी रानी, बहारोंकी मलिका, एक परी, एक लावण्यलतिका प्रवेशत होती...
आत्मानंद - कोण होत्या या चौघी???
हा हा हा हा!!
पोट दुखायला लागले आता.
अशोक - आत्मानंद? तुम्ही जरा
अशोक - आत्मानंद? तुम्ही जरा थांबानंद व्हा... तू बोल रे..
वाह.... लै हसलो भूषणराव..... अलकायण ची प्रचंड उत्सुकता लागलीये...
मस्तच हसुन हसुन वाट लागली छान
मस्तच
हसुन हसुन वाट लागली
छान होता हा भाग
महाराज, पहिला चार्म निघुन
महाराज,
पहिला चार्म निघुन जातोय असे वाटयला लागलेय... एक हितचिन्तक म्हणून सान्गावेसे वाटते.
-आनन्दा
सही जमलाय हाही भाग अरे वा,
सही जमलाय हाही भाग

अरे वा, आता आत्मानंदची लवस्टोरी
बेफिकिर, छान
बेफिकिर,
छान लिहिताय. Hostel Life झकास जमलय. पण दारु थोडी जास्त होतेय.
================== वन्या -
==================

वन्या - तुझी ती तलम, रेशमासारखी ओढणी.. जेव्हा मला एखाद्या निर्मळ, बारा महिने वाहणार्या नदीसारखी भासली ना दीपा... तेव्हा....
अशोक - ........
वन्या - तेव्हा.. स्वराज्य स्थापनेमागची भूमिका...
===================
आत्मानंदची lovestory कशी असेल, याची उत्सुकता वाटते आहे...
पु.ले.शु.
बेफिकीर , लिखाण छान आहे या
बेफिकीर ,
लिखाण छान आहे या वेळी सुद्द्धा , पण मला वाटतं , जेवढी "एक बाप" grip घेतली सुरवातीपासून तेवढी या कथेनी घेतली नाही असं वाट्तं. अर्थात हे माझं मत म्हणून सांगावसं वाटतं.
हा भाग बाकिच्या भाग पेशा
हा भाग बाकिच्या भाग पेशा जास्त हसवनार होता. मस्त ,,,,,
प्राजक्ताला अनुमोदन. भाग खुप
प्राजक्ताला अनुमोदन.
भाग खुप छान आहे. आत्मानंदचे सवाद मस्तच जम्लेत.
हा भागही मस्तच
हा भागही मस्तच जमलाय.
पुढ्च्या भागाची उत्सुकता लागलीय.
लगे रहो बेफिकीर जी.....
च्यायला डोळे कमळासारखे अन हात
च्यायला डोळे कमळासारखे अन हात टिळकांसारखे????>>
हा हा हा....वाट लागली हसुन हसुन..:)
छान. पुढचा भाग येऊ द्या लवकर.
हाहा
हाहा
सर्वांचे मनःपुर्वक आभार! १.
सर्वांचे मनःपुर्वक आभार!
१. झिंग ही प्राथमिक पातळी आहे. एक नियमीत मद्यसेवक या नात्याने मी हे लिहीत आहे. तरीही, वावगे वाटल्यास कृपया सांगावेच! त्यामुळे चुका कळतात व टळतात.
२. दारू जास्त होतीय - याबद्दल खरच क्षमस्व! पण कथानक प्रामुख्याने दारूवर आहे. प्रयत्न करतो तरीही!
३. पहिला चार्म जात आहे - खरोखरच आपल्या स्पष्ट प्रतिसादाने भानावर आलो. माझ्याकडून पुढच्या भागात मी जमेल तसा प्रयत्न केला आहे. बघुयात, कथा व त्यातील विचार पुढे जातात की नाही. मात्र मनापासून सांगतो की असे प्रतिसाद कृपया देत राहावेत.
प्रोत्साहकांचे मनापासून आभार!
-'बेफिकीर'!
दिल्याचे वन्याच्या कवितेवरचे
Pages