दिल्ली

दिल्लीतले मायबोलीकर

Submit to kanokani.com

ghoshana.jpg

नमस्कार मंडळी!!

वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं. आपल्या मायबोलीवरदेखील गणेशोत्सव दणक्यात साजरा होतो आहे. आणि बघता बघता बाप्पांना निरोप द्यायची वेळ येणार. निव्वळ विचारानंदेखील मन थोडं खट्टू होतं खरं! पण बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून बोळवलं की निवांत बसायला वेळ आहेच कुठे? कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय!

एव्हाना सगळ्या मायबोलीकरांनी दिवाळी अंकाची घोषणा वाचली असेलच. पण कामाच्या गडबडीत दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू देऊ नका! महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. तुमच्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही! तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या.

साहित्य पाठवण्यासाठी इथे जावं लागेल. एकाच बैठकीत लेखन पूर्ण झालं नाही तरी हरकत नाही. फक्त लेखन स्थिती 'अपूर्ण' ठेवून save वर टिचकी मारा. तुमचं अपूर्ण लेखन इतरांना दिसणार नाही. वेळ मिळाला की, त्या दुव्यावरच्या स्वतःच्या 'सदस्यत्वा'तून 'पाऊलखुणां'त जाऊन अपूर्ण लिखाण पूर्ण करता येईल. लिहून, तपासून झाल्यावर 'सुपूर्त करण्यायोग्य'वर टिचकी दिलीत की फक्त संपादक मंडळाला ती साहित्यकृती दिसू लागेल.

तुमचं साहित्य ५ सप्टेंबर, २००९च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला?

दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.

आपले,

संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २००९

नमस्कार दिल्लीकर,
एक माहिती हवी होती. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हरयाणा (जिंद) ला जाण्यासाठी ऑनलाईन कार किंवा टॅक्सी बुक करता येईल का?
नेट वर टॅक्सीवाले आणि काही साईट पाहिल्या पण अंदाजे ३५००-४००० रुपये खर्च सांगत आहेत, तो बरोबर आहे का?
मदतीसाठी आभारी आहे!

मेकमायट्रीपवरून ऒनलाईन करता येते. तसेच प्रिपेड मिळेल बहुधा !(एवढ्या लांबचे माहीत नाही)

जींद बाबत काही अंदाज नाही, किती खर्च असेल याचा. पण घरी जरा चौकशी करुन उद्यापर्यंत सांगू शकेन. कधी यायचं आहे? उद्या सांगितले तर चालेल ना?

धन्यवाद प्रकाश, अल्पना!
हो उद्या चालेल ना, तिथला काहिच अंदाज नाहि, विचारलेत तर फार बरे होईल. धन्यवाद!

०९८१८१४५१३१ वर फोन करा व प्रकाश जयसिन्घानी चे-माझा मित्र नाव सान्गा.खात्रिदायक व माफक दर लावणारा taxi waalaa airport pick up ला येअईल

मी अतुल देश्मुख.नॉएडाला असतो जॉब निम्मित्ताने.माय्बोलिचा हा फ़ोरम स्तुत्य आहे..

नमस्कार अतुल स्मित
मी गुडगावला नोकरीला आणि राहायला आहे.
मायबोलीवर स्वागत! स्मित कधीपासून आहे नोयडामधे ?
मायबोलीवरचे मंदार कुलकर्णी आणि शॆंकी असतात नोयडामधे.
येत जा इथे अधूनमधून !

नमस्कार प्रकाश आणि सर्व मायबोलीकर,
फार वेळ घेतला reply करायला त्याबद्दल क्षमस्व..
में नॉएडा ला १.५ वर्षांपासून राहतो. software engg म्हणून कार्यरत आहे.
नॉएडात जर मराठी मंडल असतील तर कृपया माहिती कळवावी..
धन्यवाद्

श्री ओखडे -यांना ९९९९६८९८०८ वर स.म्पर्क साधावा
9999689808

Hello everyone.... Majhe naav Dr.Anagha Mhatre Ahe, ani me recently Gurgaon madhe shift zhali ahe from Mumbai....can anyone let me know if marathi people are staying in Gurgaon.... I am feeling really homesick and am carving to listen to marthi language being spoken.. स्मित..!!!!!!!!

Dr.Anagha Mhatre, मी गुडगाव मधेच असतो, ७ सेक्टरमधे. गुडगावमधे बरेच मराठी लोक आहेत.माझे दोन मुंबईचे मित्रही आहेत. स्मित

अहो दिल्लीतील मायबोलीकर,
आपणा सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या
संक्रांतीच्या निमित्ताने तिलगुलचा कही छोटेखानी कार्यक्रम आयोजीत केलाय काय ??

नमस्कार मंडळी ,
संक्रांतीच्या शुभेच्छा.

तिळगुळ घ्या , गोड गोड बोला ,
मकरसंक्रातीच्या अनेक हार्दीक शुभेच्छा !
sankrant.gif

दिल्लीत सध्या कोणी मायबोलीकर आहेत काय? उद्या (६ नोव्हेंबर) दुपारी १ नंतर गुरगावात आणि नंतर ३-४ दिवस दिल्लीत आहे. जमल्यास ७ किंवा ९ तारखेला संध्याकाळी कुणी कॅनॉटप्लेसच्या जवळ असेल तर भेटायला आवडेल.

नमस्कार दिल्लीकर, मला दिल्लीतील महाराष्ट्र भवनाबद्दल माहिती हवी आहे. तिथे राहावयाचे असल्यास आरक्षण कसे करावे, भाडे किती आहे तसेच त्यांच्याकडून काही सुविधा मिळतात का इ.इ.
काही दिवसाकरिता दिल्ली ला यायचे आहे, त्यानिमित्त महाराष्ट्र भवनात राहता येईल का याची चौकशी करायची होती? अन्यत्र कुठे राहायची व्यवस्था करता येईल काय?

रंगासेठ इथे बघा
http://delhimarathi.com/organisation.html

riksha1.jpg

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
धन्यवाद,
संयोजक_संयुक्ता