Submitted by पल्ली on 8 May, 2008 - 03:26
लिहित रहा लिहित रहा राणी
जोवर आहेत ओठांवर शब्द आणि गाणी...
हळव्या शब्दांना गाणं मिळेल
गाण्याला शब्दांचं नव घर मिळेल!
प्रसन्न राहिल जोवर तुजवर सरस्वती
उधळीत रहा असेच देखणे शब्दांचे मोती.
लिहित रहा जोवर आठवतंय सारं
कोण जाणे उद्या मनाचं पान होईल कोरं.....
विस्मृतीचा शाप घेउन सोबत करेल विस्मरण,
शब्दाविना एकटेपण............
वाट पहात राहिल विनम्र मरण !
--
(माझी आई हळुहळु विस्मृतीत गेली, अखेरीस तिची स्मृती परत आली पण वाचा गेली.....ती नजरेनं बोलायची.)
गुलमोहर:
शेअर करा
खुपच छान
खुपच छान !
तुझ्याच शब्दांमधुन एक ओळ तुला द्यावीशी वाटली !
|उधळीत रहा असेच देखणे शब्दांचे मोती.|
- प्रकाश
मी सुवर्णा
मी सुवर्णा नलावडे,तुझी कवीता खुपच आवडली .प्रत्यकाने आपल्या भावना उमजुन व्यक्त केल्या पाहिजे.मी पहिल्यादाच लिहित आहे,चुका समजुन घे.
सही!
सही!

पल्ली, "लिह
पल्ली,
"लिहित रहा जोवर आठवतंय सारं
कोण जाणे उद्या मनाचं पान होईल कोरं.....
विस्मृतीचा शाप घेउन सोबत करेल विस्मरण,
शब्दाविना एकटेपण............"
सुंदर !!
.......................अज्ञात