अत्युच्च्य शिल्पकला : हळेबिड व बेलूर

Submitted by जयु on 7 September, 2010 - 06:22

टिप : हौशी फोटोग्राफरने(म्हणजे मीच) फोटो काढ्ले आहेत.तांत्रिक बाबी फारश्या माहित नाहि.पण मला भावलेले दगडी सौंदर्य आपल्यापुढे मांड्ण्याचे धाडस करत आहे.तसेच माबोवर फोटोची साइझ वाढवता येत नाहि. Sad जाणकारांनी मार्गर्द्शन करावे.
*********************************************************************************************************************

हळेबिड व बेलूर हि कर्नाटकातील ऐतिहासिक गावे आहेत.येथे भारतातील अत्युच्च्य शिल्पकलेची मंदिरे आहेत.हि मंदिरे संपूर्ण दगडी असून दगडांमध्ये अत्यंत बारिक असे कोरिवकाम केलेले आहे.

हळेबिड : हळेबिड हे हौसला राज्याची राजधानी होती.तेथिल प्रधान केतुमलने १२व्या शतकात ,राजा विष्णूवर्धन व राणी शांतला यांच्या स्मरणार्थ शिवाची मंदिरे बांधली.उत्तरेला शांतलेश्वर आणि दक्षिणेला हौसलेश्वर.
मंदिराच्या भिंतीवर दगडांमध्ये पुराण कथा,हिंदू देवदेवता,प्राणी,पक्षी कोरलेले आहेत. हि कलाकुसर पाहुन अगदि अचंबित होते.
१४व्या शतकात मल्लिक कफूरने या मंदिरांवर हल्ला करून बरिच तोडफोड केली.आता हे मंदिर World Heritage च्या अखत्यारित आहे.

१.हळेबिड वाटेवर एक प्रसन्न सकाळ.
DSC02364.jpg
२.
DSC02361.jpg
३.
DSC02363.jpg
४.
DSC02367.jpg
५.
DSC02371.jpg

६.शांतलेश्वर.
DSC02377.jpg
७.
DSC02378.jpg

८.दगडी भिंतीमधील गवाक्श.
DSC02383.jpg
९.
DSC02387.jpg
१०.
DSC02389.jpg
११.
DSC02390.jpg
१२.
DSC02392.jpg
१३.
DSC02393.jpg
१४.
DSC02394.jpg
१५.
DSC02395.jpg
१६.
DSC02396.jpg
१७.
DSC02397.jpg
१८.
DSC02398.jpg
१९.
DSC02403.jpg
२०.
DSC02404.jpg

२१.हौसलेश्वर
DSC02410.jpg
२२.
DSC02415.jpgबेलूर : हिला दक्षिण वाराणशी असे ओळखतात.हि हौसला राज्याची १ली राजधानी होती.येथे ११व्या शतकात राजा विष्णूवर्धनने चेन्नकेशवाचे(Handsome Vishnu) मंदिर बांधले.या मंदिरातसुध्धा देवदेवता,उपनिषद्,पुराण कथा,रामायण,महाभारतातील प्रसंग तसेच राणीच्या न्रुत्यमुद्रा कोरलेल्या आहेत.

२३.मंदिर प्रवेशद्वारावरिल गोपूर
DSC02417.jpg
२४.विजयस्तंभ
DSC02420.jpg
२५.
DSC02422.jpg
२६.
DSC02423.jpg
२७.
DSC02427.jpg
२८.
DSC02428.JPG
२९.न्रुत्यमुद्रा : नर्तिकेच्यावरिल वेलबुट्टीहि दगडामध्ये कोरलेली आहे.
DSC02429.JPG
३०.
DSC02430.JPG
३१.
DSC02433.JPG
३२.चेन्नकेशवा
DSC02434.JPGउंदिर

गुलमोहर: 

अत्युच्च कलाकारी.
जयु, खुप खुप धन्यवाद फोटो शेअर केल्याबद्दल. मागे भटकंती मासिकात एकदा वाचले होते या मंदिराबद्दल.

व्वाव ! काय जबरदस्त शिल्पकला आहे ! इतकी बारीक आणि नाजुक दगडी कोरीव कला खरोखरचं अद्वितिय आहे.
धन्यवाद जयु !

प्रतिसादाबददल धन्यवाद.
खरंच हि दगडी शिल्पे पाहताना भान हरपून जाते.आश्चर्य वाटते हे कसे कोरले असेल.
@योगेश्२४,श्री : हे शिल्प सौंदर्य ह्या लहान फोटोत नीट दिसत नाहि.पण ते प्रत्यक्शात पहाणं एक अनुभवच आहे.
@ साधना : कर्नाटकातील मंदिरांवर फारच कलाकुसर केलेली असते.इथली गोपूरे तर प्रसिध्द आहेतच.तुम्ही जरुर एकदा पाहुन घ्या.

येथील मंदिरांच्या सुरेख शिल्पशैलीचा अभ्यास केलाय फक्त! अजून प्रत्यक्षात बघण्याचा योग नाही आला. फोटोज शेअर केल्याबद्दल धन्यवाद! Happy

वा!!अति सुरेख फोटो.. भारताच्या पुढच्या ट्रिप ची आखणी आत्ताच कराविशी वाटतेय Happy

अप्रतीम मंदिरे आहेत ही. बंगलोरहुन एका दिवसात जाऊन येता येते. रस्त्यातील श्रावणबेळगोळा गाळून हसनांबा च्या हसन येथील मंदिराला भेट देता आली तर द्या - वेगळेपणाकरता. मात्र हे मंदिर वर्षातून एकच दिवस उघडे असते.

हलेबिडुतील हा उंदीर पहा. गणपतीच्या वजनामुळे दम लागुन तोंड उघडल्या गेले आहे. खालची जमीन देखिल खाली गेली आहे. आणि हे सर्व दगडात.
halebudu_mouse_by_ashishmahabal.jpg

हे इथे दाखवल्याबद्दल धन्यवाद Happy

(आता मी निवान्तपणे वाट बघत बसतो की ही मन्दीरे हिन्दून्ची नव्हेतच असे कोण कधी सान्गतय! Wink ) Proud