सम्पर्कातील वा आठवणीतील जवळचे-लांबचे नातेवाईक

Submitted by limbutimbu on 6 September, 2010 - 07:23

पूपूवरील चर्चा वाचत असताना एक जाणवत गेल की या निरनिराळ्या समाजामध्ये निरनिराळी नाती जपली जात असतील, तर किमान माझ्या (अन अर्थातच माबोकरान्च्या) माहितीतील किती नाती कशाप्रकारे जपली गेली आहेत याचा आढावा घ्यावा!
अपेक्षा अशी की येथे, सख्खे आईवडील व सख्खे भाऊबहीण वगळता अन्य बाकी कोणकोणत्या पैत्रुक, मातुल व (असल्यास) सासुरवाडीकडच्या नातेवाईकान्शी सम्पर्कात आहोत वा त्यान्ची आठवण तरी येते याचे वर्णन व्हावे
जसे की,
मला पाच मावश्या, त्यान्ची मुले/जावई/सूना/नातवण्डे/पन्तवण्डे इत्यादिक
चार काका, त्यान्ची मुले/जावई/सूना/नातवण्डे/पन्तवण्डे इत्यादिक
एक बायको, तिचे काका/मामा/आत्या/मावश्या, त्यान्ची मुले/जावई/सूना/नातवण्डे/पन्तवण्डे इत्यादिक
ही यादी एखाद्या वन्शावळी सारखी होईल, पण ती आहे, अन ती तशी आहे, म्हणूनच माझ्या अस्तित्वालाही काही एक अर्थ आहे! (असे माझे मत)
अन म्हणूनच याची उजळणी घ्यावी असे वाटले. आपणांसही तसे वाटत असेल, तर आपल्या सम्पर्कातील अथवा आठवणीतील नातेवाईकान्ची जुजबी नातेओळख इथे जरुर द्यावीत

(नातीगोती मध्ये मला हा धागा उघडायचा होता, पण ते न जमल्याने आत्ता जिथे कुठे आहे तिथे उघडला असे!)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वत्सला, अगदी बरोबर - सहभागाबद्दल धन्यवाद Happy
अहो बरीचशी माणसे इतकी स्वार्थी अस्तात की देवाला देखिल, जर स्वतःला निभावता न येण्यासारखे "अपरिमित सन्कट आले", तरच आठवून आठवुन अन आळवुन आळवुन प्रार्थना करतात, देवान्ची ही गत, तिथे क्षुद्र अन मर्त्य नातेवाईकान्ची कसली आलीये पत्रास? Proud (पुन्हा एक टाळीबाज वाक्य बरं का!)
तर या बीबीच्या निमित्ताने गत पूर्वज व हयात नातेवाईकान्ची थोडीफार उजळणी, अगदी मनातल्यामनात झाली तरी व्हावी असा हेतू! त्यानिमित्ताने जमल्यास इतरान्ना त्या त्या लोकान्चे व्यक्तिविशेष व त्यान्च्या कालखन्डातील जगण्याची वैशिष्ट्ये समजावेत हा अजुन एक हेतू!
अजुन पाचपन्चवीस वर्षात (माझ्यासहित) हे सान्गायला आपण कुठे कसे शिल्लक असू की नसू याची खात्री नाही, तर हे लिखित स्वरुपात इथे उतरले तर नको का? तुम्ही आज जे लिहीता तो उद्याकरताचा-उद्यान्च्याकरताचा इतिहास आहे हे देखिल मला विसरुन चालत नाही ना!

लिम्बुदा
तुमच्या लिखाणातील खालील पैलूवर पुनर्विचार केल्यास त्यास एक वेगळी झळाळी येयील.
>>रहाता राहीला प्रश्न, हे इथे असे "सार्वजनिक" नेटवर का मान्डावे?
तर ज्यान्ना हा प्रश्न पडतो, त्यान्नी हे मान्डू नये, व उत्तर शोधत वणवण आयुष्य कण्ठावे>>
एक चांगले थीम तुम्ही मांडले आहे म्हणून हे व्यक्त करावेसे वाटले.
चुकले तर दुर्लक्ष करा

लिंबूटिंबू,
सहवास नसल्याने बर्‍याच रक्ताच्या नातेवाईकांशी पूर्णपणे संबंध तुटला. उद्या माझ्या सख्ख्या मामेबहिणीचा किंवा चुलत, आते, बहिणीचा मुलगा मला भेटला, नाव सांगितले, दहा वेळा भेटलो तरी पत्ता नाही लागणार की तो आपला नातेवाइक आहे. कारण त्या बहिणींचे लग्न झाल्यावरचे आडनाव आठवत नाही, माहित नाही, त्यांना मुले किती, कोण हे त्याहून माहित नाही.

इतकेच काय, भारतातून कुणा जवळच्या नातेवाईकाचा फोन येतो, आमचा बाब्या किंवा बाबी तिकडे जर्सीतच आली आहे, तिला तुमचा फोन नं पत्ता दिला आहे. आपण वाट बघावी, फोन कधी येत नाही. दोन तीन वर्षांनी कळते, की ती किंवा तो आता जर्सी सोडून अर्कन्सॉ/युटा/भारतात, किंवा अश्याच दूरच्या ठिकाणी गेला आहे!

आता तुम्ही म्हणाल, माझे ठीक आहे, मी अनेक वर्षांपूर्वी परांगदा झालो. पण भारतात आलो असताना बर्‍याच चौकश्या केल्या. नात्यामधे, सख्ख्या भावांना माहित नाही, आपली सख्खी बहिण किंवा भाऊ कुठे आहे, त्यांना काय मुले बाळे? मान्य आहे, पुणे, मुंबई, नागपूर ही मोठी शहरे आहेत, पण अजिबात कल्पना नाही? आमच्या घरी एव्हढे श्रीमंत कुणि नव्हते की इस्टेटीवरून भांडणे व्हावीत!! कदाचित् लग्न झाल्यावर भावाभावांचे किंवा बहिण भावंडांचे संबंध उगीचच, अहंकार, मानापमानाच्या कल्पना यामुळे बिघडतात. अमेरिकन लोकांच्यात तर अशी कित्येक उदाहरणे आहेत्.असो.

झक्की, तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती मला इकडेही पावलापावलावर बघायला मिळाली, नव्हे नव्हे, मी स्वतः त्याच अवस्थेतून गेलो, अन म्हणूनच, नातेसम्बन्धात आपण काय "कमावल नि गमावल" याचा मनातल्यामनात ताळेबन्द मान्डण्यासाठीच हा बीबी निमित्तमात्र! Happy
(कृपया, यातिल "कमावणे व गमावणे" या बाबीन्चा "आर्थिक-भौतिक व्यावहारिक फायदा" असा अर्थ घ्यायचा नाहीये!)

http://www.maayboli.com/node/19311#comment-900013
लिम्बु जी
तुमच्या थीमला अगदी साजेशी अन खूप सकारात्मक आणि ह्रुद्य असा हा वरील दुवा आहे.
इतर मा बो सदस्य जे लिहू इचछितात त्याना ही मार्गदर्शक ठरू शकेल्.कवितेविना सुद्धा.
Happy

अश्विनी के, श्री, मंजीरी सोमण ला अनुमोदन.

स्पर्धात भाग घेणे आणि नातेवाईकांची यादी देणे या दोन्ही गोष्टींमागचा उद्देश नक्कीच भिन्न आहे>> बरोबर.

ही पोस्ट ह्या धाग्यावर योग्य आहे का नाही माहित नाही. नसेल तर मी उडवून टाकीन नंतर. वरती आपण वेगवेगळ्या नातेवाईकांबद्दल चर्चा केली, पण माझा प्रश्न व्याही-विहीणी ह्या नात्याबद्दल आहे. तुमच्यापैकी कोणाच्या मुलांची लग्न झाली असतील तर तुम्ही तुमच्या व्याही-विहीणीशी किती रेग्युलरली संपर्क ठेवता? सहज्च (कोणतही खास कारण नसताना, सणवार नसताना त्यांना भेटता किंवा फोन करता का? मित्र-मैत्रिणीं इतकी जवळीक तुमच्यात निर्माण झाली आहे का?)
मुलानी किंवा मुलीने आपले सासू-सासरे ह्यांच्याशी रेग्युलरली संपर्क ठेवणे योग्यच आहे. पण दोन व्याही/ दोन विहीणी ह्यांनी एकमेकांचे मित्र झालेच पाहिजे का? अनेकदा ते फार कठिण वाटू शकते. अश्यावेळी काय करावे?

सोहा जी तुमचं बरोबर आहे. मुलीच्या आई-वडिलांना न्युनगंड संस्काराने मिळालेला असतो. आपली मुलीची बाजू आहे. मुलाकडचे नाराज तर होणार नाही ना ही काळजी आत कुठेतरी वसत असते.‌ मुलाकडच्यांनी थोडे वरचढ/आब राखून राहिले पाहिजे हे सोशल कंडिशनिंग झालेलं असतं. आपल्या अपत्यांच्या संसारात आपल्यामुळे काही विघ्न येऊ नये यासाठी जेवढ्यास तेवढं एकत्र येतात.‌ पण आजकाल पुढारलेले लोक सहलीला, देवदर्शनाला व्याही विहिणींसोबत पर्यटन करताना दिसत आहेत. योग्य अंतर ठेवून नात्यात गोडवा राखला जावा , जास्त मैत्री केली तर मानापमान नाट्य रंगात येऊन कटुता निर्माण होईल.

Pages