भर स्टेशनच्या बाहेर
पाटी बघून तो म्हातारा काहीसा थबकला
एका खांबावर लटकली होती पाटी
हरवला आहे ...! सापडवून देणार्यास योग्य ते बक्षीस !!!
हसला किंचितसा
फोटोतर वयाच्या मानाने वाटत होता दहा वर्षापूर्वीचा
काहीसा पोक्त ..! काहीसा म्हातारा …!!
तो हलकेच म्हणाला कोण ब्वा हा म्हातारा ..??
नि कसे हरवतात नि पळून जातात
कंटाळून आपल्या घराला ..?
कोठल्या आठवणी असतील
ह्या उभ्या म्हातार्याकडे कुणास ठाऊक…?
पाटीकडे बघून कशास कुणास-ठाऊक ….
किंचित वाटला भाऊक …!!
कशास जगतात एवढी हि चिकट म्हातारी माणसे ……?
फतवा काढायला लावतो सरकारला
जगण्यातून रिटायर करा योग्य वयाला
नि त्यांच्या तरुण बायका-पोरांना
घेउद्या मोकळा श्वास एकमेकाच्या मिठीत .. .
म्हातारा हसला किंचितसा
हा म्हातारा पळाला
नि खराब केली ह्याने रात्र आपल्या पोरांची
मेला असता तर नस्तेका मस्त ढोंग केले रडण्याचे ......???
फुलांचा चांगला महाग हार पण टाकला असताना गळ्यात…?
दुसर्या दिवशी एक गादीतर रिकामी झाली असती
छान स्वप्न बघण्यास ....?????
_


