कधीच ही आयुष्य कहाणी खरी वाटली नाही

Submitted by बेफ़िकीर on 2 September, 2010 - 02:01

अस्तित्वाची जबाबदारी कधी घेतली नाही
कधीच ही आयुष्य कहाणी खरी वाटली नाही

नुसते बसण्याहून म्हणालो जीव गुंतवावा हा
पृथ्वीसंगे मीही फिरलो सूर्यासभोवताली
प्रदक्षिणा चाळीस जाहल्या, धाप लागली नाही

नवे पुराणे अब्ज प्रवासी होते गाडीमध्ये
संपत होते, जन्मत होते, जिंकत, हारत होते
उभाच होतो, बसायला जागाच लाभली नाही

कधीच ही आयुष्य कहाणी..

गुलमोहर: 

नुसते बसण्याहून म्हणालो जीव गुंतवावा हा
पृथ्वीसंगे मीही फिरलो सूर्यासभोवताली
प्रदक्षिणा चाळीस जाहल्या, धाप लागली नाही....... वा वा... सुंदर..

नवे पुराणे अब्ज प्रवासी होते गाडीमध्ये
संपत होते, जन्मत होते, जिंकत, हारत होते
उभाच होतो, बसायला जागाच लाभली नाही

अब्जाहूनही जास्त आहेत भूषणराव... Happy

छान कविता..

अस्तित्वाची जबाबदारी कधी घेतली नाही
कधीच ही आयुष्य कहाणी खरी वाटली नाही

नवे पुराणे अब्ज प्रवासी होते गाडीमध्ये
संपत होते, जन्मत होते, जिंकत, हारत होते
उभाच होतो, बसायला जागाच लाभली नाही

कविता आवडली.

उभाच होतो, बसायला जागाच लाभली नाही....

व्वा व्वा.

'उभाच आहे' हे अजून प्रभावी होईल की काय असे वाटले आपले सहज.

सगळी कविता उत्तमच फक्त वरची ओळ म्हणजे 'आपबीती' वाटली आणि अधिक आवडली.