तरुणाईत उसळली होती
लाट...................
गोविंदाच्या आगमणाची
पथकांनी धरली होती
वाट.................
करतबी दाखवण्याची
युवक-युवती एकसंघ
जोडीने...............
उभे होते
बक्षिस अमाप लुटण्यास
मंडळही.................
सज्ज होते
ढोल-लेझीमच्या तालावर
स्तरावर-स्तर............
होते चढत
रिमझिम त्या वर्षात
हर्ष..............
सारखे होते खुलत
बघता-बघता पथक
गगनाला...........
होते भिडत
आजुबाजुची गर्दी ती,
साहसद्रुष्य..........
होती टिपत
अचानक! त्या पथकाचा,
पाया हो ढासळला
स्तरावरचा गोविंदा मग
खाली हो आदळला
पथकाने त्याला बाजु सारत
प्रयत्न चालु ठेवले
विजयाचा पटकावुनी मान
बक्षिस कबजात केले/घेतले
आनंदात सारे पथक
नाचु-कुदु लागले
जल्लोषात धुंद सारे
त्या गोविंदास विसरले
तो गोविंदा............................
आजही आशेन वाट पाहतोय,आपल्या पथकाची
ना पथक आले त्याला भेटायला,ना आयोजक...............
आजही कणा गमवुन तो आपल्या पाठीचा, उपचार घेतोय
एका सरकारी दवाखान्यातील त्या मोडक्या पलंगावर.
सुरक्षीतता महत्वाची आहे.
सुरक्षीतता महत्वाची आहे. योग्य दिवशी योग्य विषयावर लिखाण केलेस मित्रा.
आशय चांगला आहे.
आशय चांगला आहे.
सुंदर..
सुंदर..
समर्पक कविता आशिश
समर्पक कविता आशिश
ओह्ह. वाईट वाटलं. ही सत्य
ओह्ह. वाईट वाटलं.
ही सत्य परिस्थिती आहे का?
गोविंदांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळत नाही का?
एहनतीचा मोबदला मिळत असेल
एहनतीचा मोबदला मिळत असेल नसेल... पण अपघातात पाठीचा कणा गमावला/किंवा अपंगत्व आले,तर कुणी त्याचे/त्यांचे पुनर्वसन करत नसणार हे नक्की......
आता सर्व गोविंदांचा विमा उतरवण्यात येतो... हे खूप बरे आहे.
दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले
दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे मनपुर्वक आभार.
चांगली कविता.
चांगली कविता.
खरच योग्य दिवशी योग्य कविता.
खरच योग्य दिवशी योग्य कविता.
ये हुई ना बात...
ये हुई ना बात... जियो....!!!!!!!:)