गणेशोत्सव स्पर्धा २०१० - आमने-सामने - ४

Submitted by संयोजक on 29 August, 2010 - 21:43

आमने-सामने - खुमासदार चर्चा

2010_MB_Amane-Samane-4.jpg

या स्पर्धेसाठी संयोजक मंडळाकडून दोन व्यक्तींची नावे देण्यात येतील. त्यावरून प्रश्नोत्तरे स्वरूपात काल्पनिक संवाद लिहायचा आहे. जोडीतील व्यक्ती एकमेकांना प्रश्न विचारतील, म्हणजे सुरुवातीला व्यक्ती क्र.१, व्यक्ती क्र.२ ला ५ प्रश्न विचारेल. व्यक्ती क्र.२ या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल आणि त्यानंतर व्यक्ती क्र.१ ला ५ प्रश्न विचारेल.

नियम :

१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. हा प्रश्नोत्तरे स्वरुपातील संवाद ही एखाद्या विशिष्ट विषयावरील चर्चा किंवा इतर काहीही काल्पनिक विषयावरील चर्चा असू शकते.
४. एका सभासदातर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारण्यात येईल.
५. आपली प्रवेशिका [काल्पनिक संवाद] स्पर्धेच्या त्या त्या विषयाच्या धाग्यावर आपण स्वतः प्रकाशित करावी. एकदा प्रकाशित केल्यानंतर प्रवेशिकेमध्ये कोणत्याही स्वरुपाचे बदल करु नयेत, केल्यास स्पर्धेसाठी ती प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
६. संवादासाठी दोन्ही मिळून कमीत कमी ५ आणि जास्तीत जास्त १० प्रश्नांची मर्यादा आहे. दिलेल्या विषयातील एका व्यक्तीने कमी आणि दुसर्‍याने जास्त प्रश्न विचारले तरीही चालेल.
७. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जास्तीत जास्त ३ ओळींपेक्षा जास्त नसावे. [कमी चालेल]
८. सगळे संवाद खुसखुशीत/चटकदार असावेत. प्रश्नोत्तरांमधून कोणतेही वाद अपेक्षित नाहीत. सामाजिक वाद निर्माण करणार्‍या प्रवेशिका बाद ठरवून, स्पर्धेच्या धाग्यावरून काढून टाकण्यात येतील
९. अंतिम विजेता वाचकांच्या मतदान पद्धतीने ठरविला जाईल.
१०. विषय जाहीर झालेल्या दिवसापासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

..