नमस्कार मायबोलीकरांनो ,
सुरुवातीला तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो , गेल्या महिन्यापासुन मी इथे नियमीत यायला लागलो आणि मायबोली वर रोज नविन नविन वाचुन अनुभवाने सम्रुध्द व्हायला लागलो ...
मला स्वत:हा ला प्राध्यापक व्हायच होत , पण पालकांच्या इच्छेखातर इंजिनियर झालो आणि पुण्यात येउन रोजच्या रुटीनमधे अडकलो , मला नेहमी माझे शाळेचे , कॉलेजचे दिवस आठवायचे तेंव्हा मी खुप वाचन करायचो , आमच्या परळीला मोठे वाचनालय होते , मी दोन-तीन दिवसाला जायचो न चुकता , आभ्यासातही पुढे होतो त्यामुळे घरच्यानी कधी काही आडकाठी नाही आणली .
मी मामांकडे शिक्षणासाठी होतो , आईची निवांत भेट फक्त उन्हाळी सुट्टीत , आईला वाटायच मी तिच्याशी बोलाव पण मला पुस्तक असेल वाचनेबल तर कोणाशी बोलाव नाही वाटायच , पण पुण्यात आल्यावर सगळच सुटल १४ तास कंपनीत , कुठुन होनार वाचन ! आज ७ वर्ष झाली जॉब प्रोफाइल चेंज झाल , थोडा वेळ मिळतोय पण आता बायको आली
घरी पेपर वाचायला मिळण मुश्कील पुस्तक कसल वाचतो ..
त्यातुनच गुगल वरुन मायबोलीचा शोध लागला आणि क्रुत्यक्रुत्य झाल्यासारख वाटल . दाद,अज्जुका, पुनमवैनि, मिलिंदा,अरुण्,बी,चाफा,लिंबु ,म्रुन्मयी,लोपा,आय टी,गोबु,रमणी,मंदार, (अजुन बरेच आहेत ....)
हे सगळे लोक भेटले , ज्या लोकांचे ब्लॉग होते ते सगळे वाचुन काढले , खुप दिवसांच वाचायच रहिलेल ह्या १-२ महिन्यात भरुन काढल , सगळे लोक फॅमिली सारखे काळ्जी ने एकमेकांची विचारपुस करतात , मदत कराय्ला तयार असतात ... मला अगदी पहिल्यापासुन कुठल्याही नातेवाइकांपे़क्षा मित्र परीवारच जवळ्चा वाटतो , आणि एक खुप मोठा मित्र परीवार मला मायबोलीने मिळ्वुन दीला , जाणिवा सम्रुध्द असलेला मित्र परीवार! मला सगळ्यांचे आभार मानायचे होते त्यासाठी हा लेखन प्रपंच ! मित्रांनो शुध्दलेखनाच्या काहि चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करा
आणि आशा करतो की हा परीवार वाढतच जावो . जाणते-अजाणते पणात कोणाला दुखवले असेल तर माफ करा ...
>>> हा परीवार वाढतच जावो
अगदी अगदी
छान लिहिले की!!
धन्स आय टे , पहिला प्रयत्नय . मनापासुन धन्स तु वाचल्याबद्द्ल ...
छान लिहिलय.
थोडा वेळ मिळतोय पण आता बायको आली घरी पेपर वाचायला मिळण मुश्कील पुस्तक कसल वाचतो ..>>>>> हे वाक्य "त्या" बीबीवर शोभुन दिसेल
-प्रिन्सेस...
छान लिहिलय्.खरच मायबोली हा भारी प्रकार आहे
धन्स प्रिंसेस , चिन्या ...
खरच ह्या मायबोलीचा मलाही चारच महिन्यापुर्वी शोध लागला व लळाही. मराठी टिकविण्यासाठी मी दररोज येथे येण्याचे ठरवुनच टाकले आहे.
दिपूर्झा आणि किशोर मुंढे यांना अनुमोदन. खरचं लळा हा अगदी योग्य शब्द. गेले पाच दिवस कामानिमित्त बाहेर होते. आल्या आल्या सकाळी मायबोली उघडली. छान वाटल. कधी कधी मनात लिहायच असत. ते लिहिल्यावर कुणीतरी वाचाव असही वाटत. मग आपण ज्यांना वाचायला देतो त्यांच्यावर कधी कधी सक्तीही होते वाचण्याची. त्यामुळे मला लिहावे असे नाही वाटायचे. इथे मायबोलीवर छान वाटत लिहायला. अगदी रोख प्रतिसाद मिळतात. नवे नवे लेखन वाचायला मिळते. मायबोली आणि मायबोलीकरांचेही आभार.
किशोर्,बेडेकरयम, तुम्ही आवर्जुन माझ्या मोडक्यातोड्क्या लिखानाला प्रतीसाद दिल्याबद्दल धन्स
किशोर्,बेडेकरयम, तुम्ही आवर्जुन माझ्या मोडक्यातोड्क्या लिखानाला प्रतीसाद दिल्याबद्दल धन्स
. खरच मराठी माणसातल मराठीपण "साता समुद्रापलीकडेही "जपण्याच काम मायबोली करते आहे 
मायबोलिकर होऊन फारच छान वाटतय. मी पण अशीच मराठी भाषेवर प्रेम करणारी एक सातारकर आहे. नवीन ओळखी करुन घ्यायला आवडत.
दीपु,

दीप्या!! मस्तच लिहिलयंस!!! ते मराठीतुन म्हणतात ना, लाँग लिव्ह मायबोली!!!
धन्स राजश्री , गोब्स , रमणी ...