मायबोली गणेशोत्सव २०१० स्पर्धा घोषणा

aikaGaneshDevaNew.jpg
सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा घोषणा:

मायबोली गणेशोत्सव २०१० घेऊन येत आहे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, श्राव्य कार्यक्रम आणि अवांतर बरेच काही.

ज्या स्पर्धांसाठी स्पर्धकांना पूर्वतयारी आवश्यक आहे अशा स्पर्धा आधी जाहीर करत आहोत. तसेच लहान मुलांच्या कलागुणदर्शनाच्या तयारीस आवश्यक वेळ देण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचे नियम आधी जाहीर करत आहोत.

सगळ्या स्पर्धांची सुरुवात गणेश चतुर्थीला होईल. प्रवेशिका कुठे आणि कशा पाठवायच्या हे खालील धाग्यांवर सविस्तरपणे लिहीण्यात आले आहे.

---------------------------------------------------------------------------------------
टाकाऊतून टिकाऊ

टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा

---------------------------------------------------------------------------------------

प्रकाशचित्र स्पर्धा:

प्रकाशचित्र स्पर्धा क्र. १ : विरुध्द - Contrast

प्रकाशचित्र स्पर्धा क्र. २ : एक नवीन सुरुवात

प्रकाशचित्र स्पर्धा क्र. ३: आधार

स्पर्धेच्या नावावर टिचकी मारल्यास स्पर्धेची माहिती आणि नियम बघता येतील.

---------------------------------------------------------------------------------------

लहान मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रमः

किलबिल : लहान मुलांसाठी गुणदर्शनाचे कार्यक्रम

Submit to kanokani.com

|| श्री गणेशायनमः ||

सगळ्याच स्पर्धा उत्तम स्मित

मजा येणर यंदा पण स्मित

सर्व posters उत्कृष्टं झाली आहेत खरोखर. केवळ अप्रतिम !

मस्त आहेत स्पर्धा

कहाणी मस्त आहे स्मित
बाकी सर्व कार्यक्रमांसाठी शुभेच्छा.

मायबोली गणेशोत्सव २०१० गृपचे सभासद कसे व्हायचे?

यंदा पाककला स्पर्धा नाही का?

मस्तं आहेत स्पर्धा !!

मस्त स्पर्धा!!
सगळ्या जाहिराती आणि पोस्टर पण सुंदर आहेत. स्मित

सगळ्या जाहिराती आणि पोस्टर्स सुंदर झालेत.
एकदम नाविन्यपुर्ण स्पर्धा दिसताहेत यावेळी. स्मित

चला माबोकरांनो लागा तयारीला स्मित
"जिंकण हरणं महत्वाचे नसुन स्पर्धेत भाग घेणे जास्त महत्वाचे आहे" तेंव्हा सगळ्याच स्पर्धेच्या प्रवेशिका सगळ्यांनीच पाठवून संयोजकांचा/परिक्षकांचा ताण अजुन वाढवूया स्मित
गणपती बाप्पा मोरया

लय भारी पोस्टर्स! स्मित
मेजवानी आहे गंपती बाप्पा आला की स्मित
वाट पाहे....

पोस्टर्स छान तसंच वरची कहाणीही छान जमलीये. स्मित

..

छान स्पर्धा आणि सुंदर पोस्टर्स!

मस्त! पोस्टर झकास. स्मित

झकास पोस्टर आणि झकास कथा..

संयोजक , मुख्य पानावर ठळक गणेशोत्सवाची लिंक देता येईल का? स्पर्धा शोधून काढाव्या लागल्या. अरेरे
जर अगोदरच तशी दिली असेल आणि मला ती दिसली नसेल तर क्षमस्व. स्मित

हा मजकुर प्रचंड आवडला. आता स्पर्धा बघते स्मित

अरे वा, लै भरी घोषणा!!!! जाम आवडली हि कहाणी ..... बोला, गणपती बाप्पा मोरया!!!

वा वा! झाली का घोषणा..
छान आहेत स्पर्धेचे विषय. ही घोषणा पहिल्या पानावर पाहिजे. आत आल्यावरसुद्धा लिन्ककडे पटकन लक्ष जात नाही. तिथे एखाद्या पोस्टरची इमेज देऊन लिन्क दिली तर बरं होईल.

वा.......मस्त आहेत सगळ्याच स्पर्धा !!
धम्माल येणार एकंदरीत स्मित
गणपती बाप्पा मोरया ..........!!!!!!!!!

वा!!
झकास कहाणी... नाविन्यपूर्ण स्पर्धा... आणि अप्रतिम पोस्टर्स!!

वाह ! सही आहे कहाणी.

सीमा - 'नवीन लेखन' पानावर सर्वात वरती 'गणेशोत्सव स्पर्धा घोषणा' असा दुवा दिसतो आहे ना?

नंद्या आज दिसतो आहे. काल दिसत नव्हता.(माझ्या मते)

>>(माझ्या मते)
माझ्या डोळ्याला म्हण. फिदीफिदी
(मलाही दिसली नव्हती, ती आहे तिथे काही दिवस, फक्त लक्ष जात नाही पटकन्)

मला २१ गणपती व त्यांची नावे गणपतीच्या दिवसात टाकण्याची इच्छा आहे. (स्पर्धा नव्हे) पण मी गॄप मध्ये सामिल होउ शकत नाहीये, मी काय करु??

संयोजक मंडळाला इमेल कर. sanyojak@maayboli.com आयडी असेलच तुझ्या अ‍ॅड्रेस बूकमध्ये फिदीफिदी

पल्ली गृपचे सदस्यत्व मंडळात असलेल्या व्यक्तींसाठी मर्यादित आहे पण तुम्ही sanyojak@maayboli.com या आयडीवर इमेल पाठवू शकता.

बाकीच्या स्पर्धांची घोषणा कधी करणार?

वर सांगितल्याप्रमाणे ज्या स्पर्धांना पूर्वतयारी आवश्यक आहे अशा स्पर्धा आधी घोषित केल्या आहेत, जेणेकरून तयारीला वेळ मिळेल. बाकीच्या स्पर्धा गणेशोत्सवाच्या दिवशीच घोषित होतील.