Submitted by जया एम on 21 August, 2010 - 12:04
लाटा कुरळ्या बटांच्या पोरी अवखळ भारी
झिम्मा फुगड्यांचा दंगा रोज घुमे घरी दारी
असा धरुनिया फेर त्यांनी हादगा मांडला
जीव ऐलमा पैलमा, जीव पाण्यात सांडला
लाटा भरतीच्या सख्या, त्यांना ओहोटीचे काय
खेळ तळ्यात मळ्यात पोरी भिजविती पाय
समुद्राच्या तटावरी धुंद उसळती लाटा
शुभ्र अभ्रकी ओढीने जाती फेसाळत वाटा
त्यांची खळाळ भरारी खडकाला धडकली
तेव्हा त्याच्या कपारीत काही स्वप्ने अडकली
थेंबभर ओले सुख जन्म भरून वाहिले
शिंपल्याच्या मनी कोण मोती बनून राहिले
तिथे तटावर लाटा इथे जीव झाला पाणी
मनी वारा गात गेला काही मन्त्रमुग्ध गाणी
अशा सोज्वळ दुपारी सूर्य आर्द्र मऊ झाला
आणि दिवसाला कैवल्याचा स्पर्श होऊ आला
थोडी खुपणारी वाळू थोडे मखमली ऊन
माये आयुष्य उसळे आज लाटालाटातून
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर!!!!!!
सुंदर!!!!!!
व्वाह !
व्वाह !
!
!
क्या बात है! जया तुमच्या
क्या बात है! जया तुमच्या कविता फारच सुंदर असतात.
यमकांशी व व्याकरणाशी कुस्ती खेळून इथे पद्य लिहणार्यांनी त्या वाचून, त्यातून नक्कीच शिकावे.
व्वाव! खुपचं सुंदर !
व्वाव! खुपचं सुंदर !
!!!!
!!!!
अजूनही मला कविता पूर्ण कळाली
अजूनही मला कविता पूर्ण कळाली असे म्हणता येत नाही, पण केवळ शब्दरचनेसाठी सुद्धा तुमच्या कविता वाचायला अतिशय आवडतात. ही पण अतिशय सुंदर आहे!
सुंदर, वाचताना शब्द फेर धरुन
सुंदर, वाचताना शब्द फेर धरुन नाचताहेत असा भास होतो.
-हरीश
शब्दभूल! अप्रतिम!!
शब्दभूल! अप्रतिम!!
फारेंडाला अनुमोदन! तुमच्या
फारेंडाला अनुमोदन! तुमच्या कविता पुन्हा पुन्हा वाचत रहाव्याशा वाटतात.
अप्रतिम कविता आहे. सरस ओळी,
अप्रतिम कविता आहे. सरस ओळी, सुपर्ब!
मनापासून अभिनंदन आपले!
-'बेफिकीर'!
फारेंडा ला परत अनुमोदन. मी
फारेंडा ला परत अनुमोदन. मी कवितेत कच्चा लिंबु, पण जे काही कळलं ते आणि शब्दरचना आवडली.
सुंदर ! थोडी खुपणारी वाळू
सुंदर !
थोडी खुपणारी वाळू थोडे मखमली ऊन
माये आयुष्य उसळे आज लाटालाटातून
या ओळी एकदम खास !!
शब्दभूल!!!!
शब्दभूल!!!!
!!!!!!!!!
!!!!!!!!!
फारेंडाला अनुमोदन... पण
फारेंडाला अनुमोदन...
पण तुमच्या कविता वाचताना मनाला एक वेगलाच आनंद मिळतो, समाधान मिळते हे नि:संशय !
सुंदर कविता.
सुंदर कविता.
फारेंडाला अनुमोदन...
फारेंडाला अनुमोदन...
अप्रतीम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अप्रतीम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
क्या बात है... ही पण खुप
क्या बात है... ही पण खुप आवडली...
-- अशा सोज्वळ दुपारी सूर्य आर्द्र मऊ झाला------ अहाहा :-)...
निवडक १० त! अप्रतिम!!!
निवडक १० त! अप्रतिम!!!
वाह! क्या बात है! तुमची शैली
वाह! क्या बात है!
तुमची शैली अगदी स्वतंत्र आहे!
खूप छान आहे कविता!
सुंदर!!
सुंदर!!
अशा सोज्वळ दुपारी सूर्य
अशा सोज्वळ दुपारी सूर्य आर्द्र मऊ झाला
आणि दिवसाला कैवल्याचा स्पर्श होऊ आला
थोडी खुपणारी वाळू थोडे मखमली ऊन
माये आयुष्य उसळे आज लाटालाटातून
या ओळी लाटांसारख्या मनात हिंदोळे घेतात.
माझेही फारेंडला अनुमोदन!! परत
माझेही फारेंडला अनुमोदन!!
परत परत वाचाविशी वाटतीय!!
आज एका मित्राला माबोवरच्या
आज एका मित्राला माबोवरच्या काही कवितांची लिन्क देताना ही परत वाचली. तेवढीच वाचनीय वाटली पुन्हा!
आज परत वाचली , परत परत
आज परत वाचली , परत परत वाचाविशी वाटते .
जर ह्या कवितेला स्वरतालात गुंफलं तर काय मस्त होईल. ( जर कवयत्रीची हरकत नसेल तर ).
मस्त मस्तच.. यमकांशी व
मस्त मस्तच..
यमकांशी व व्याकरणाशी कुस्ती खेळून इथे पद्य लिहणार्यांनी त्या वाचून, त्यातून नक्कीच शिकावे.<<<
याला +१०००००००००००००००००००००००००
आई गं! खरंच शब्दभूल! थोडी
आई गं! खरंच शब्दभूल!
थोडी खुपणारी वाळू थोडे मखमली ऊन
माये आयुष्य उसळे आज लाटालाटातून
!!
सुंदर !!! अप्रतिम शब्दरचना
सुंदर !!! अप्रतिम शब्दरचना
Pages