मालाड-गोरेगाव

मालाड/गोरेगावमधले मायबोलीकर

Submit to kanokani.com

प्रकाटाआ.

मी पण गोरेगावकरीण रे.... जयप्रकाशनगर मधली. नंदादीप शाळेत गेलेय.

दाद तुम्हीपण गोरेगावच्या आहात? मीपण जयप्रकाश नगर मध्येच राहते. तुम्ही कोठे राहता?

अरे इथे तर भरपुर लोक आहेत गोरेगावचे.

वर्षा, मी पण नगरात राहतो. स्मित तुम्ही नक्की कुठे??

. . . . .
If you dream to fly with eagles.... Don't waste time swimming with ducks!!
~ Barrack Obama

नुसते हाय हुई करुन चालणार नाही आपला ग्रुप हवा फोन करा ९८२०१२५५५१

सुनील, आपण पण गोरेगावकर का?
. . . . .
If you dream to fly with eagles.... Don't waste time swimming with ducks!!
~ Barrack Obama

गोरेगाव वेस्ट्ला १०० - १५० लोकांसाठि हॉल सुचवु शकता का? माझ्या पुतणीचा वाढदीवस आहे. पण जेवणाचि मोनोपोलि नको. सप्रेंच जेवण ठेवायच आहे.

mogaraa-ketakI , शक्यतो सगळीकडेच मोनोपोली असते. तरी केशव गोरे स्मारकचा हॉल बघ. किंवा शेजारीच गोविंद दळवी hall आहे( अ.भि. गोरेगावकर शाळा) आहे. त्याच्यापुढेच अशोका सुपरमार्कॅट मधे टेरेस हॉल आहे. पण चौकशी करावी लागेल स्मित. तुम्ही सप्रेनाच का नाही विचारत? स्मित

झोपलेत काय सगळे?

मी हाय पन माजा कायबी उपेग नाही हतं...

सगळ्यानी हात जोडा रे....

तर देवा म्हाराज्या रवळनाथा,

तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)

दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्‍या, वाचणार्‍या आणि अंकाची कामा करणार्‍या सगळ्यांचो हात आसा.

कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.

तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.

म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.

तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.

आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)

. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्‍याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...

अरे आजुनय खंय परकास नाय पडलो तर - टिचकी पडो रे हेच्यार.

कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, >>> आमीच कलेच्या नशेत आसो!! स्मित

भ्रमरा आज इथे कसा? (मुलुंड मधे कोणी घेतलं नाही का? डोळा मारा )
धनु.

सुप्रभात गोरेगावकर.
स्वतःची, कुटुबियांची विशेषतः मुलांची काळजी घ्या, माझ्या लेकीच्या शाळेला आजपासुन सुट्टी दिली आहे.

सुप्रभात!!!

काल माझ्या वहिनीचा फोन आला होता( ती रहेजामध्ये डॉक्टर आहे). तिच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना हे करण्यासाठी सांगितले आहे. ह्या स्वाईन फ्लुपासुनच्या बचावासठी एक अगदी सरळ सोप्पा घरगुती उपाय सांगितला आहे.

आपल्या तर्जनीच्या आकाराचे १ सुंठीचे बारिक तुकडे
आपल्या तर्जनीच्या आकाराचे १ हळकुंडाचे बारिक तुकडे
१ वेखंडाचे(तेवढ्याच आकाराचे) बारिक तुकडे

साधारण १ लिटर पाणि घेउन त्यात चंगले उकळावाआअच्यहे. पाणि १ लिटरचे पाव लिटर झाले पाहिजे इतके उकळावे अणि मग तेच पणि थंड करुन प्यायचे. कमीत कामी ७-८ चमचे मोठ्यांनी प्यावे. हा उपचार तीन दिवस न चुकता करायचा आणि घरातल्या लहान मोठ्या सगळ्यांनी हे पाणि प्यायचे.
आंही आज घरातले सगळे हे पाणि प्यायलो. माझ्या "श्रीयाला" पण हे २-३ चमचे पाणि पाजले.

प्लिज जितक्या लोकांना तुम्हाला हे सांगणे शक्य होईल तितक्या लोकांना सांगा. कालपासुन आम्ही हे आमच्या आजुबाजुच्या सगळ्यांना सांगत आहोत.

धन्यवाद रुपाली-
मी आमच्या ऑफिसमधे सगळ्यांना ह्याचे प्रिंट काढुन दिले. आता घरी गेल्यावर करेन.
धनु.

धन्यवाद रुपाली, घरी गेल्यावर नक्की करेन.

मायबोली गणेशोत्सव २००९

**************************************************
B&W_Teaser_1.jpg

**************************************************
Paryavaran_Teaser_1.jpg
**************************************************
chitrakala_teaser_1.jpg
**************************************************
Pakakruti_Teaser_1.jpg
**************************************************

धनु, माझ्या नावाप्रमाणेच माझं भ्रमण सुरु असतं. स्मित

glucon d.jpg

अरे .. गोरोगावकर थंड.. एवढे?