जल्ला ही लोकं लगीन करतात आणि आमच्या डोचक्याला ताप.
बर मुहुर्त तरी जरा डिशेंबरात काढावा की. ते काय बी न्हाय. मुहुर्त चांगला रणरणत्या उन्हातच. बर ते पण जावु दे लगीन जरा पुण्यासारख्या थंड हवेच्या ठिकाणी (कोण रे ते पाठिमागुन कुत्सित हसतय??
) ठेवाव की. नाही. ठाण्याला याच (मग बघतोच तुमच्या थंड हवीची मग्रुरी) अस प्रेमळ निमन्त्रण.
आता जा लग्नाला उकडुन घेत. आणि करा मजा. अस मनातल्या मनात पुटपुटत (हि माझी सवय माझ्या लग्नानंतरची बरं
) मी निघालो.
न जावुन करतोय काय. समजा त्या स्वातीने रजनीकांतकडे (हे सुर्याच आंदुने ठेवलेल टोपण नाव आहे) आपली तक्रार केली की हा लग्नाला आलाच न्हाय आणि मी ह्याच्यावर रागवले आहे. तर जल्ला तो रजनीकांत साउदिंडीयन ष्टायलीत ठोसा हाणायला पुण्याला येइल की धावत पळत (नवीन लग्न झाल्यावर बायकोने तोंडातून शब्द बाहेर काढायचा अवकाश काम फ़त्ते. एकदा नवरा जुना झाल्यावर काय हा कान आणि तो कान आणि मध्ये ट्रॅफ़िक जॅम अज्याबात न्हाय.
) ते काय परवडणार नाही म्हणुन जावुच असा सुज्ञ विचार केला.
तर असो नमनालाच घडाभर तेल (महाग झाल असताना देखील) जाळुन झाल आहे.
आता माझ्या प्रवासाची चित्तर कथा. (बिना चित्राची हाय बरं
)
सकाळी सकाळी भरपुर वेळ शॉवर खाली अन्घोळ केल्याने बहुतेक आज सगळी काम सुरळीत होणार असा देवाने (कधी नव्हे ते) आशीर्वाद दिला असेल.
मला नीट वेळेत जाग येण्यापासुन कपडे धुणार्या बाइच्या गमनापर्यंत सगळ सुखदरित्या सुरळीत पार पडले. खादाडी करुन निघालो एकदाचा जड पावलानी. (सुट्टीच्या दिवशी दुपारी बाहेर जाव लागल की पावल आपोआपच जड होतात हो )
रस्ता क्रॉस केला की लग्गेच ठाण्याला जाणारी यश्टी दिसली. मी हात केला तर चक्क मागच ट्रॅफ़िक अडवत ती चक्क माझ्यासाठी थांबली. आणि मला चक्क आत बसायला जागादेखील मिळालि. त्यांचा सौजन्यसप्ताह सुरु होता की काय ते नकळे (कि हा सकाळच्या देवाच्या आशीर्वादाचा परिणाम हे आता तो देवच जाणे.
)
मग आमची वरात निघाली त्या यश्टीत बसुन. (खरतर पुण्याहुन वरातीत एकच माणुस होता)
मी जरी सुर्यकांत याच्या लग्नाला निघालो असलो तरी वरुन सुर्यदेवाने काहिही कृपा न करता तळपण्याच काम सुरुच ठेवल आणि मी सकाळी शॉवर लावुन केलेली अंघोळ अमान्य आहे म्हणुन घामाच्या धारानी अंघोळ घालायला सुरवात केली. वैतागुन यश्टीच्या बाहेर मुंडक काढुन "हे सुर्यदेवा, सुर्यकांत नावाचा व्यक्तीच्या लग्नास चाललो असल्याने मला थोडे कन्सेशन दे आणि आमच्या यष्टीवर जरा कमी उन पाड" अस जोरात म्हणाव वाटत होत पण मग तस केल असत तर ती यश्टी ठाणे वंदना टॉकिज यश्टी श्टॅंडात न जाता सरळ "त्या" दवाखान्यात त्याने मला उतरवण्यासाठी नेली असती
म्हणुन गप्प बसलो. (बर्याच वेळेला शांत आणि गप्प बसण्याचा सुज्ञपणा मी लग्नानंतरच शिकलोय बरं
)
मग यष्टी पुढे पुढे जात होती. मी आजुबाजुला निरिक्षण करण्यास काही वाव आहे का हे पाहिल पण यश्टी मंगळवेढ्यातुनच बर्यापैकी भरुन आल्याने तसा काय बी चान्स नव्हता.
(ह्याबाबतीत नेहमीप्रमाणेच देवाने हात आखडता घेतला होता वाट्ट.
)
मग आपल सरळ समोर बघत बसलो.
एवढ्यात मला आठवण झाली की मला ठाण्यात कुठुन कस जायच काहीच माहीत नसल्याने आता पुढच्या शिलेदारांवर अवलंबुन रहाव लागणार आहे. मग फ़ोनाफ़ोनी सुरु केली आणि शेवटी घारु अण्णाने कळव्यात उतर आणि माझ्या घरी थांब, फ़्रेश होउन जावुया अस सांगितल. (घारु अण्णा की जय हो. पुढे गेलो असतो तर ५ वाजता स्टेशन्वर येणार्या सगळ्यांची वाट मला ४:१५ ते ६ वाजेपर्यंत पहावी लागली असती.
))
मग कळव्यात उतरुन घारु च्या घरी गेलो. (घारुला जाता येता जितक्या लोकानी हात केला ते पाहुन समजलो की हा एक जग्नमित्र व्यक्ती आहे)
घारुने घरी गेल्यागेल्या पाणी दिल प्यायला आणि मला ५ मिनटात जावुन येतो अस सांगुन कलटी मारली.
मग त्याची ५ मिनटे साधारन ४५ मिनिटानी संपली आणि मी तोवर TV बघणे, फ़ॅनची हवा लागत असताना देखील घामाघुम होण्याचा चमत्कार अनुभवने आणि हे सगळ करुन झाल्यावर फ़्रेश होणे हे सगळ केल.
घारुने देखील त्याला येणार्या फ़ोन मधुन वेळ काढत काढत फ़्रेश होण्याच काम केल आणि नवीन कुर्ता घालुन आता जावुया अस जाहिर केल. (अर्थात हे करताना मी AC मध्ये बसलोय, AC बस मध्ये आहे, येतोच आहे, कळव्याच्या जवळ आहे, ट्रेन मध्ये आहे,रिक्शात आहे अस बरच काही खर खोट ऐकुन घेतल बर आम्ही दोघानी. घारु फ़ोन वर बोलत होता आणि मी गदागदा हसत होतो)
मग इन्द्रुला घारुने फोन वर सांगितले की आम्ही निघालो आहोत. (अर्थात हे खर होतच पण आम्ही मध्येच एक श्टॉप घेवुन कोल्ड्रिन्क पिल.) मग निवांतपणे रिक्शात बसलो. (अर्थात घारुला माहीतच होत की मुंबईकर किती वेळ पाळतात म्हणुन तो निवांत होता. मी उगाचच टेन्शन मध्ये की आम्हा पुणेकराना नाव ठेवतील म्हणुन.) यथावकाश हॉल वर पोचलो आणि नेहमीप्रमाणे एकही तिथे हजर नव्हता.
तोवर घारुला त्याच्या कामातल्या लोकानी फोन करुन त्रास देण्याच महत्वाच काम चालु ठेवलच होत. तो आतापर्यंत माझ्याशी कमी आणि फोनवरच जास्त बोलत होता. त्याच फोनवरच बोलण ऐकुन मला जोरात हसु येत होत. तो एकच वाक्य पलिकडच्या माणसाला समजावुन सांगत होता आणि ते पलिकडच ध्यान सगळ ऐकुन रामाची सीता कोण हे विचारल्यासारख त्याला परत तेच वाक्य समजावुन सांगाव लागेल असा प्रश्न विचारत होत. माझी करमणुक छान होत होती आणि मी हसत होतो. फोन संपल्यावर घारुने मला विचारले की काय रे हसतोस काय?? मग परत फोनाफोनी आणि अजुन न पोचल्याबद्दल सगळ्याना जाब विचारण्याच काम केल घारुन. मग एक रिक्शा येवुन थांबली त्यातुन दोन इसम उतरले. एक इन्द्रा होता तर दुसरा योगी असावा मी अंदाज करत होतो तोच त्याने येवुन मी आनंद मैत्री अस स्वतःहुन ओळख करुन दिली. मग एकामागोमाग एक करत सगळे हजर होत होते. हजर झालेल्यापैकी मी फक्त आंदु ला ओळखल. आता एक मुलगा आणि एक मुलगी कोण हे काय मला कळेना. चला चहा घेवुया अस घारुने फर्मान काढले म्हणुन आम्ही तिकडे चाललो. जाता जाता मी त्या मुलीला बोललो की माझ्या डोक्यात कोण कोण आहे ही ट्युब काय पेटली नाय बॉ. त्यावर तीने लगेच सांगितले की हा योगी आणि मी..... तोवर योग्याने तिच वाक्य तोडल आणि बोल्ला की नाय अशी ओळख नको देवु आपण त्याची ओळख परेड घेवु. जल्ला ह्या योग्याला मी गिर्हाइक सापडलो कि. मग टपरीवर जावुन चाय पिण्याचा कार्यक्रम सुरु झाला. आता ती मुलगी म्हणजे चेतना कि मंजु अशा गोंधळात मी सापडलो होतो. इतक्यात तो सकाळचा देव धावुन आला. आणि मला मंजुचा स म स आला की तुम्ही ठाणे स्टेशनात आहात का असा. चला सुटलो अस मनातल्या बोललो. ती मुलगी म्हणजे चेतना हे नक्कि झाल होत. मंजुला मी फोन केला तर तिने ती आता हापिसातुन निघाली आहे आणि ती रिसेप्शनला पोचत नाही असा निरोप दिला. पण त्यानंतर तुम्ही असाल तर मी भेटायला येइन अस सांगितल होत. ठिक आहे म्हणून मी फोन ठेवला. परत एक रिक्षा येवुन थांबली. त्यातुन रीना उतरली. ती आल्यावर हास्यमस्करीला उत आला. अर्थात तीची मस्करी करत होते सगळेच मिळुन. त्यात तिला रिसेप्शन संपले अस देखील सांगण्यात आल होत. आंदुने जरा तिची जास्तच "भगल" केली. त्यातला रस्त्यावर जाणार्या एका बाईकडे बोट करुन ती तुला बोलवत आहे अस रीनाला खुणावणे व तिने तिकडे बघताच त्या बाईल खुणवुन अस सांगणे की हे तुम्हाला बोलवत आहे असल एक जबरा प्रात्यक्षिक करुन दाखवल. हे करुन परत तो आकाशाकडे बघत त्याने केलेला साळसुद भाव तर....
अशीच थट्टा मस्करी चालु होतीच तर लगेच इन्द्राची ट्युब पेटली की अरेच्या आपण पुष्पगुच्छ आणलाच नाही. मग तो आणि मैत्री परत पुष्पगुच्छ आणण्यासाठी गेले. ही संधी साधुन घारु ने त्यांच्या प्लॅनिन्ग वर तोंडसुख घेतले.
नंतर बराच वेळ उरलेल्या लोक्स नी हास्यमस्करीचा कार्यक्रम सुरुच ठेवला होता. बराच वेळ झाला इन्द्रा आणि आनंद मैत्रा अजुन आलेच नाहीत म्हणुन मग घारुने त्याना फोन केला. मग त्यावेळी तु काय बागेतुन फुल खुडुन आणायला गेला आहेस का वै वै असा सुखसंवाद झाला. इन्द्रा यायला वेळ होता म्हणून आणि आम्हाला फार वेळ झाला होता म्हणुन चेतना आणि रीना दोघीनी आम्ही पुढे जावुन स्वातीला भेटतो अस सांगुन निघाल्या. तिथे रीना एक धमाल उडवली. लग्नाचा हॉल समजुन ती बाजुच्याच MTNL च्या ऑफिसात घुसत होती. ते पाहुन एक मोठा हास्यस्फोट झाला. झाल आता रीनाला चिडवण्यासाठी अजुन एक विषय मिळाला. लगेच इन्द्रा आणि आनंद मैत्री एक छानसा पुष्पगुच्छ घेवुन आले. तर रीना आणि चेतना आमच्या पुढेच गेल्या होत्या. पण त्यानी लग्नाचा हॉल सोडुन पुढे शाळेच्या दिशेने कदमताल केले होते. ते पाहुन परत हास्यस्फोट झाला होता. नंतर आंदुनेच (बहुतेक) त्याना हाक मारुन अजुन पुढे सरळ जा अस सांगितल होत
मग त्यांच्या लक्षात आल असाव आणि त्या मागे फिरल्या. आणि आमच्या सोबत आल्या. आता हॉल कडे जाताना पाहिले तर साधारण पावणेसात वाजले होते. ४ ते ७ च्या रिसेप्शनला आम्ही पावणेसात वाजता चाललो होतो. घारुने बोलल्याप्रमाणे खुर्च्या आवराआवरी सुरु झाली नसली तर नशीब अस मनात म्हणुन आत गेलो. फारशी गर्दी नव्हती. सगळे लोक वेळेत येवुन गेलेले दिसत होते. काहि थोडेफार आमच्यासारखे होते तिथे. मग स्वाती सुर्यकांत याना भेटलो. पुष्पगुच्छ आणि गिफ्ट त्यांच्या हातात दिला. स्वातीच्या आई बाबाना भेटलो.फोटोसेशन करुन घेतल आणि परत येवुन खुर्चीवर बसलो. आइसक्रीम खाल्ल. स्वाती आणि सुर्यकांत दोघेहि गळ्यात २ किलोचा भरभक्कम हार नसल्याने बरेच फ्रेश दिसत होते. तरी बरं त्या नवरा नवरीला गळ्यात दोन किलोचा हार, अंगावर (कितिही उकडत असल तरी) भरभक्कम शालु आणि सुट, झालेल्या सगळ्या धार्मिक कार्यक्रमामुळे वैतागलेला चेहरा ह्यापेक्षा रिसेप्शन मध्ये बघण चांगलच की. दोघेहि छान दिसत होते. टायच्या भाषेत जोडा लक्ष्मिनारायणासारखा शोभत होता. सुर्यकांत गोंडस दिसतो.
एव्हाना मधल्या काळात दोने तीन वेळा टायला फोनाफोनी झाली होती आणि तिने मी ५ मिनटात आले अस सांगुन आताशा जवळपास अर्धातास उलटुन गेला होता. परत टाय आल्यावर ती, रीना, चेतना परत एकदा स्टेज वर जावुन भेटून आल्या. खुर्चीवर बसल्या बसल्या देखील हास्यविनोद सुरुच होता जोरजोरत. थोडेफार फोटो काढले आणि मग तिकडून निघालो. स्वाती आणि सुर्यकांत याना निघतो अस सांगुन निघालो. येता येता सुर्यकांतला मायबोलीवर येत जा असा आमंत्रण देवुन आलो. खाली आल्यावर मग टांगारुंच्या नावाने खडे फोडण्याचा कार्यक्रम करावा का असा माझ्या मनात विचार आला होता. पण आजुबाजुला मंजु,मोना,भ्रमर्,नील अशा टांगारुना शोभेल असे मोठे मोठे खडे ?(
) दिसले नाहीत म्हणून तो प्रोग्राम रद्द केला. तिथुन मोर्चा आंदुच्या सुचनेनुसार मामलेदाराची मिसळ इकडे वळवला. आंदुच्या मते ते फार जवळ होते चालत जावुया असे होते. म्हणून थोडे चाललो पण अजुन बरच लांब आहे अस सांगुन रिक्षा बघुन जावु असा प्रस्ताव निघाला. ह्यावर घारुने तुमच प्लॅनिन्गच खराब असत ही नेहमीची टेप (आधुनिक म्हणून सीडी म्हणा हवतर) लावली. एक रिक्षा थांबली त्यातुन त्या तीन मुलीना पाठवले पुढे पाठवले. त्यानंतर दुसरी रिक्षा मिळायला थोडा वेळ लागला मग त्यातुन उरलेले लोक गेलो. आम्ही तिकडे पोचलो आणि बघतो तर काय त्या तीन मुली अजुन तिथे दिसतच नव्हत्या. हे कस बरं असा विचार करत होतो तर आमच्या नंतर तिथे रिक्षातुन तिघि उतरल्या. पैसे देवुन टाय ने पुढे पाहिले तर आम्ही. ती चकीत झाली. मग तिच्या लक्षात आल की रिक्षावाल्याने फिरवुन आणल. मग तिने ठाण्यातले रिक्षावाले चांगले नाहीत ह्या तिच्या मतावर परत एकदा शिक्कामोर्तब केले.
मामलेदाराची मिसळ चविष्ट होती. मिसळ खावुन आणि नंतर ताक (बर्फासकट आणि बर्फाविना) पिउन झाल्यावर आम्ही ठाणे स्टेशनकडे वळालो. स्टेशन यायच्या आधीच एका चौकात रीना आणि चेतना वळाल्या. मी त्याना अस कस विचारल त्यावर आंदुच उत्तर अरे खेडेगावात जायला बस तिकडेच लागतात
त्याच चौकात आल्यावर रीना मला परत एकदा माझ्यासोबत घरी चल कांद्यावरच अंड खायला असा जोरदार आग्रह केला. पण मी नको बोललो.त्यावेळी माझ्या चेहर्यावरचे भाव बहुद्दा फारच केविलवाणे असावेत. कारण ते पाहुन सगळी मंडळी जोरदार हसली होती. रीना आणि चेतनाला बाय करुन आम्ही पुढे गेलो. ठाणे स्टेशन वर आलो. तिथे निलु आणि आंदुचा एक माझ्या डोक्यावरुन जाणारा सांवाद झाला. आंदु तिच्या तिकिटावर काहितरी लिहुन देत होता आणि टायला ती मस्करी वाटत होती. ते मला कळाल नाही काय होत ते. पण टाय ला बाय केल त्यावर तिने बाय करुन जा आता तुमच्या मनात जे आहे ते करायला असा आज्ञापर आशिर्वाद दिला.
मग टायचा शब्द मोडायचा कसा म्हणुन आम्ही रस्ता ओलांडुन समोरच्या एका हाटेलात गेलो. तिथल्या A/C मध्ये बर वाटल जरा. तिथे मग शुक्रवारीच बुधवार करण्याचा प्रोग्राम संपन्न झाला. तिथे घारुअण्णाने पुढच्या वविचे त्याच्या डॉक्यातले चित्र रंगवले. घारुअण्णा फॉर्मात होते
. त्याने बोलता बोलता एकदा हिरमोड हा शब्द वापरला होता त्यावर आंदुचा श्वास कसा अडकला होता ते मी पाहिले
अजुनदेखील आंदु हीरेमोड ला अडकतो.
इन्द्राने तिथे अरे लवकर आवरु अशी गडबड केली. त्यावर मला वाटल होत की त्याला फार लांब जायच आहे म्हणुन तो गडबड करत असेल पण नंतर त्याने खर कारण सांगितल. त्याला दुसर्या दिवशी शनिवार असल्याने रात्री बाराच्या आत घरी जावुन मासे हादडायचे होते.
तिथुन निघालो तेव्हा जवळपास १०:१५ झाले होतेच. इन्द्रा,आंदु आणि योगीला बायबाय करुन मी, घारु आणि आनंदमैत्री निघालो. तिथे मला एक खुप चांगल दृश्य पहायला मिळाल. दोन ट्रॅफिक हवालदार उभे होते. एकाने रिक्षाची रांग लावली होती. एक जण माणसांची रांग बघत होता आणि आलेल्या रिक्षात रांगेतली माणस बसवुन पाठवत होता. अख्ख्या आयुष्यात मी पहिल्यांदाच असल चांगल दृश्य पाहिल. तिथुन मला घारु आणि मैत्री ने वंदना टॉकिजच्या यश्टी ष्टंडात सोडल आणि ते पुढे गेले. तिथे जवळपास सगळ्या सीट भरलेल्या यश्टीत मला चक्क जागा मिळाली (त्याच सकाळच्या देवाची कृपा)आणि पाचच मिनटात यश्टी सुटली पुण्याच्या दिशेने. मध्ये फूड मॉल वर गाडी थांबली होती तेव्हा साधारण बारा वाजले होते आणि मी माझ्या एका धमाल दिवसाची आणि सगळ्या भेटलेल्या धमाल लोकांची आठवण काढत एक मस्त आइस्क्रीम खाल्ल.
माझ एक निरिक्षण घारु हा २०१२ ची निवडणुक नक्की लढवणार. त्याने मला पुण्याहुन आलेला केंद्रिय निरिक्षक अस नाव दिल होत
बोलताबोलता तो राजकीय विषयावर यायचा. अर्थात त्याने मांडलेले विचार हे खरोखर विचार करण्यासारखेच होते. आंदु वेळ मिळेल तेव्हा धमाल करण्याची एकही संधी सोडत नाही. रीनाने एकदा तरी सगळ्याना कांद्यावरच अंड खायला बोलवणारच असा पण केला. रीना ज्या ग्रुप मध्ये जाते तिथे जोरदार धमाल उसळत असणार नक्कीच.
टाय ला बघुन मी निराश झालो राव. कोणत्याही मस्करीला खणखणीत षटकार मारणारी टाय मला वाटले होते प्रत्यक्षात देखील खणखणीत आवाज आणि दणकट असेल पण...
इन्द्रा आणि योगी त्यामानाने शांत होते. चेतना ही खुपच शांत स्वभावाची आहे.
हा आहे सुर्या टॉवर
लग्नानंतर सुर्याने स्वाने सांगितलेले काम करायला कुरकुर केली की ती फक्त त्याला हा टॉवर दाखवणार आहे म्हणे. त्यात मोठा इंग्रजी एस दिसतो आहेच शिवाय तारीख आणि वेळ देखील आहे ज्यावेळपासुन स्वातीचे सगळ काम सुर्याने ऐकण्याचा पण केला
ह्याचा अजुन एक फायदा म्हणजे सुर्यकिरण म्हणून ज्या टोकदार काड्या लावल्या आहेत त्या सुर्याने फारच काम करण्यात आळशीपणा केला तर टोचणी लावण्याकरता आहेत म्हणे 

हे दोघांचे स्वप्नातील घर


हे लाडू , मोठे होते.

हे सगळे मायबोलीकर मिसळ चापताना 

हा आहे रुकवत.

मस्तच वृत्तांत झ

एकदम डीटेल मध्ये
मध्ये काही फोटो दिसत नाहियेत.
http://picasaweb.google.co.in/zakasrao/SwakantMarriage
ह्या लिन्क वर पहायला मिळतील
अरे झकोबा फोटो छान आहेत

पण नवरा नवरीचा फोटो कुठाय रे ?
झकासा,

)
सही लिहीलेस रे!!!!!!!!
मी मिस केले रे हे सगळे!
(घारुअण्णा....
घारुला जाता येता जितक्या लोकानी हात केला ते पाहुन समजलो की हा एक जग्नमित्र व्यक्ती आहे<<<<<<<<<<
झ. घारुचे एकदम सहि निरीक्षण केलेस.
इन्द्र आणि शांत - चल काहितरी काय??
झकोबा,एवढे अवलिये भेटले म्हणजे मुंबईची तुझी ट्रिप एकदम छानच झाली म्हणायची..... तुम्ही जेव्हा टांगारुंच्या नावाने खडे फोडत होतात तेव्हा मी ऑफिसच्या आणि बॉसच्या नावाने खडे फोडत होते. मध्येच एकदा आनंदने मला फोन करून पिडायचा प्रयत्न केला पण तेवढ्यात रीनाचं आगमन झाल्याने त्याला आयतीच एक बकरी मिळाली. जल्लां मिसळ खायला तुम्ही चपलांच्या दुकानाच्या बाहेर बसलात??
फोटोमधल्या दोघा जणांना मी ओळ्खलं नाहीये....
झकोबा
मस्त लिहिलं आहेस...
...
घारुला जाता येता जितक्या लोकानी हात केला ते पाहुन समजलो की हा एक जग्नमित्र व्यक्ती आहे>>>
ते जग्नमित्र नाही रे.. जगन्मित्र असं आहे
झकास, मस्तच लिहिलं आहेस रे!!
धमाल वर्णन झक्स!
'सूर्या टॉवर' खास आहे!
मेल्या झकासा ईथे खणखणीत षटकार मारायला मी कशाला दणकट पाहिजेल रे. बाकी मी पण तशी शांत स्वभावाची आहे हा.
काय तू पण
>>>निलु आणि आंदुचा एक माझ्या डोक्यावरुन जाणारा सांवाद झाला.
च्यामारी तिथेच तर गम्मत होती
बाकी तू पण भरघोस मिशा असणारा, कोणीतरी पैलवान गडी असावा अशी तुझ्या आयडीवरुन प्रतिमा झालेली नि लिंबूनी तसं चित्र पण काढलेले पण....
असो वृतांत लिहलायस मात्र खास.
व्वा व्वा झकासराव. खरोखरच पश्चाताप होतोय आता तुला फोन न करण्याचा. मी गावावरुन जरा उशिराच निघालो आणि माळशे़ज घाटातही बराच वेळ टाईमपास केला. लेख छानच.
अर झकासा....... भारी लिवलस बग!!!!!
धन्यवाद सार्याना!

)
सॉरी दिनेशदा.

निलुटाय आपल वाटत होत असच.
अरे हो एक लिहायच राहिलच की.
फोनरुपाने तिथे भ्रमर आणि नील हजर झाले होते पण रात्री आम्ही निलुटाय ला बाय केल्यावर.
(जल्ला टाय ने ती ४ नंची मेणबत्ती आणली असती तर तिचा प्रयोग करुन पाहिला असता की.
आणि दिनेशदानी दोनदा फोनवर मला घरी राहण्याचा खुप आग्रह केला होता पण अफसोस मला दुसर्या दिवशी सुट्टी नसल्याने मी जावु शकलो नाही.
पण त्यांच्या घरी गेलो असतो तर "मायबोलीकरांची मांदियाळी" जमली असती.
महेश आमच्या मुलुंडच्या साप्ताहिक शाळेत मास्तर हवेत भरती होतोय का???
मंजु तु ज्या दोघाना ओळखले नाही त्यात कदाचित एक मी असेन.
आता दुसरा कोण मला नाय माहीत.
आणि हो मी आधी फोटो (ऑर्कुट किंवा मायबोलीवर) पाहुन देखील मी योगी आणि चेतनाला बिलकुल ओळखु शकलो नाही.
आंदुच्या बाबतीत कन्फ्युजन व्हायला चान्स नव्हता पण तसाच दुसरा कोणी असता तर अजुन गडबड झाली असती माझी. कारण आंदुचा मी मिशीवाला फोटो पाहिलाय आणि आता त्याने मिशा काढल्या आहेत.