बरं झालं पावसा तू आलास....

Submitted by गणेश कुलकर्णी on 12 August, 2010 - 08:55

बरं झालं पावसा तू आलास....
नाही तरी आजकाल मला
उचकीच लागत नव्हती...
कारण ती मला विसरून
गेली होती!

तू बरसायला लागलास आणी...
मी तिला आठवायला लागलो...
थेंबागणीक...
ती मला...मी तिला साठवायला लागलो...

बरं झालं पावसा तू आलास....
नाहीतरी मी एकटाच रडत होतो.

:गणेश कुलकर्णी (समीप)

गुलमोहर: 

गणेश, मस्तच रे Happy
थेंबागणीक...
ती मला...मी तिला साठवायला लागलो...>>>>>व्वाह!!!!