स्तुपांची मंदिरं- भाग १ (विठ्ठल मंदिर)

Submitted by मधुकर on 9 August, 2010 - 04:59

पंढरपुरचे विठ्ठल मंदिर हे बुद्ध मंदिर असुन अन्य काहिही नाही अशी महाराष्ट्रात खुप खोल रुजलेली परंपरा पुरातन काळापासुन चालत आलेली होती. पण नंतर हिंदुनी या स्तुपांचे हळू हळू हिंदु मंदिरात रुपांतर केले. पण विठठल मंदिर हे हिंदु मदिर नसुन ते मुळात बौद्ध मंदिर कसे होते याचे काही पुरावे बघु या.

१) १९४०-१९६५ या कालावधित पुण्यावरुन प्राथमिक शाळेचे उजळणीचे (मुळाक्षर व अंकगणित) पुस्तक प्रकाशित होत असे. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दशावताराचे चित्र असे. त्यात नववा अवतार बुध्द असल्याचे दाखविले जास्त असुन जे चित्र छापले जायचे ते अजिंठा किंवा वेरुळच्या बुद्धाचे नसुन पंढरिनाथ “विठठलाचे” चित्र असे. विट्ठ्ल हाच बुद्ध आहे असे स्पष्ट करणारा हा सगळ्य़ात मोठा पुरावा.
२) कागदाचा शोध लागण्या आधी किंवा त्या नंतरही महाराष्ट्रात शिळाप्रेसवर पंचांगे छापली जात असत. या पुरातन पंचांगाच्या मुखपृष्ठांवर नवग्रहाची किंवा दशावताराची चित्रं छापली जात असतं. या सर्व शिलापंचांगात सर्वत्र नववा अवतार म्हणून विठठलाचे चित्र छापले जात असतं व नावाबद्द्ल शंका येऊ नये म्हणून विठठलाच्या चित्राखाली बुद्ध असे लिहले जात असे. श्री. वा.ल. मंजुळ व डॉ. के जमनादास यानी अशा प्रकारच्या पंचांगाचा संग्रह तयार केला आहे. विठठलाच्या शिल्पाला बुध्द नाव असलेली काही ठिकाणं येणेप्रमाणे आहेत.

अ) तासगांव (जि. सांगली) येथे विंचुरकरानी बांधलेल्या दक्षीणी शैलीच्या गणेश मंदिराच्या गोपुरावर विठठलाचे मुर्तीला बुद्ध असे नाव आहे.

ब) कोल्हापुरच्या महाल़क्ष्मी मंदिराच्या प्राकाराअतिल एक ओवरीत बुद्ध नावाने विठाबो दिसेल.

क) राजापुर (जि. रत्नागिरी) येथील लक्ष्मीकेशव मंदिरात मुर्तीच्या प्रभावळीत जे दशावतार कोरलेले आहेत त्यातही बुद्ध म्हणून जी मुर्ती कोरलेली आहे, ती आज झिजुन गेलेली असली तरी तिच्या उर्वरित आकारातुन ती विठठलाची मुर्ती असल्याचे स्पष्ट होते.

आता बघु या काही पुस्तकांचे व ईतिहासकारांचे या वरिल मत.

डॉ. भाऊ लोखंडे:
यानी संपुर्ण मराठी संतांच्या वाड.मयाची समिक्षा करुन त्यांचा सारांश काढलेला आहे. ज्यानुसार मध्ययुगीन मराठी संतकवीनी विठठलाला, दुसरे काहि नसुन बुद्धच मानलेले आहे. मी तो जशाचं तसं ईथे देतो (लोखंडे : १९७९ पान १२३) “बाराव्या शतकातील ’गीत गोविंद’ कर्ते कवि जयदे वुद्धाची स्तुती नवव्या अवताराच्या स्वरुपात करतात. ती पुराणावर आधारित आहे. मराठी संत त्यांचे प्रमुख दैवत यांना बुद्धच मानतात (विठोबाच्या रुपाने) कारण विठोबाच बुद्ध आहेत असं दशावतारात मांडलेलं आहे. संत एकनाथ विठठलाला बुद्ध मानुन पुढिल प्रमाणे म्हणतात
“ लोक देखोनि उन्मत दारांनी आसक्त।
न बोले बौद्ध रुप ठेवीले जघनी हात।
नववा वेसे स्थिर रुप तथा नाम बौद्धरुप।“
व वारक-याची दिक्षा देताना जी पाच वचने वधविली जातात ती पंचशिलापेक्षा काहि वेगळी नाही.”

श्री. ए. आर. कुळकर्णी.:
श्री कुळकर्णी यांचे मत सर्वविदीत असुन त्यानी संपादन केलेल्या ’धर्मपद’ या ग्रंथाच्य अपरिशिष्टात देलेले आहे. त्यानी मराठी संतकवींव्या साहित्याची समिक्षा करुन निष्कर्ष काढले आहेत जसे कि, आपण पाहिल्या प्रमाणे भाऊ लोखंडे यानी काढले आहेत. कुळकर्णी म्हणतात कि मंदिराच्या मंडपातील खांबावर ध्यानी बुद्धाच्या आकृत्या आहेत. ते असे सुद्धा म्हणतात कि, विख्यात पाश्चिमात्य विद्वान जॉन विल्सन “मेमॉयस ऑन दि केव्ह टेम्पल” नामक आपल्या ग्रंथात विठठल मंदिर हे बुद्ध मंदिर असल्याचे प्रमाण दिलेले आहेत.
पांडुरंगाची मुर्ती हि झिल्लिदार पंजाची एक अप्रतिम नमुना आहे. झिल्लीदार पंजा बुद्धाचे परंपरागत चिन्ह आहे. यावरुन ती बुद्ध मुर्ती आहे हेच स्पष्ट होते.

आर. डी. भांडारकर:
विठालाची मुर्ती हि बुद्ध मुर्ती असल्याचे पुरावे देताना भांडारकर दोन शिलालेखाचे पुरावे देतात. बेळगाव नजीक एका गावाचे दान पुंडरिक क्षेत्रासाठी दिलेले आहे. हे क्षेत्र भिमारथी च्या काठी असुन ते पवित्र आहे. इ. १२४९ व १२७० चा आप्तोराम्य यज्ञ व शिलालेखात पांडुरंग आणि पुंडरिक हि नावे आह्ते. हि दोन्ही नावे बौद्ध परंपरेची आहेत. ’सधर्म पुंडरिक’ नामक ग्रंथ तर प्रसिद्धच आहे. विठ्ठल हे नाव ब-याच नंतरच्या काळात आले हे स्पष्टच आहे असे भांडारकारांचे म्हणने आहे.

रा. चि. ढेरे
ढेरे यांचे “श्री विठ्ठल एक महासमन्वय” (दक्षिण गोपजनांच्या एका लोकप्रिय देवाच्या वैष्णविकरणाची आणि उन्नयनाची शोधकथा) ॥ढेरे: १९८४॥ या ग्रंथात विठठलाच्या अनेक पैलुंचे विश्लेषण केलेले आहे. सर्वच स्थल पुराणांचे विवरण दिलेले आहे. त्यांचे म्हणणे आहे कि, सर्वच स्थल-पुराणातिल “पांडुरंग महात्म्य” विठ्ठल या देवतेचे वैष्णविकरण करण्याचा प्रयास आहे. ते म्हणतात कि वैष्णवानी बुद्ध स्विकारला परंतु बुद्धाच्या विचाराना छेद दिला व त्यात हिंदुत्व पेरलं.

-------------------------------------
पुढिल भागात येणारे लेख
१) आय्यापा मंदिर
२) पुरिचे जगन्नाथ मंदिर
३) द्राक्षाराम
४) श्रीशैलम
५) तिरुपती बालाजी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आमचे राजे ते, जे आमचा विचार करतात. >> मधुकर.. बाकिचे तुमचे विचार काहिही का असेनात पण 'आमचे राजे ते, जे आमचा विचार करतात' यात तुम्ही चुकताय. राजा/सरकार एखाद्या(च) समाजाचा विचार न करता राज्याच्या/देशाच्या हिताचा विचार करणारा असावा/असावे.

शिवाजी महाराजांच्या काळात दलिताना पाटिलकी मिळण्यापर्यंत प्रजाहिताचा विचार करणारा राजा होऊन गेला. >> त्यांना पाटिलकी देताना ते दलित आहेत हे(च) बघितलं गेलं की ते लायक (पण) आहेत हे बघितलं गेलं?

बाकी तुमचं चालू द्या. तुमच्या या लेखामुळं आणि त्यावरील चर्चेमुळं इतिहासाबद्दल बरीच माहिती मिळत आहे.

.

इंग्रजांनी तुमचा विचार केला? कधी?
आणि मग असं होतं तर भारत स्वतंत्र झाला तेव्हा तुम्हाला इंग्लंडमधे न्यायला हवं होतं त्यांनी. इथेच का ठेवलं हो तुम्हाला?
तुमचा नेता (ज्याच्या विचारांनी चालणारा एक दलित नेता शोधून मिळत नाही) स्वतंत्र भारताचा संविधानकर्ता झाला ते कसं काय? इंग्रज गेल्यावर त्यांच्यामागे जायला नाही सांगितलं तुमच्या नेत्याने ना की तुमचा नेता स्वतः तिकडे गेला.
याचा अर्थ इंग्रज ही देशावरची आपत्ती हे स्वतः बाबासाहेब पण ओळखून होते. आणि तुम्ही इंग्रजांच्या झालेल्या विजयाबद्दल आजही आनंदोत्सव व्यक्त करत रहाता.... वा!
मग काल काय शोकदिन पाळलात की काय?

इंग्रजांनी तुमचा विचार केला? कधी?>> अगदी, गोलमेज परिषद वाच, स्वतंत्र मतदार संघा बद्दल वाच. (नंतर त्या गांधी नी पुणे करारात ते हिरावुन नेलं ती गोष्ट वेगळी). दलिताना शिक्षणाची दारं कुणामुळे उघडी झालीत(हे तुला माहित असुन असं कसं काय विचारतेस)

आणि मग असं होतं तर भारत स्वतंत्र झाला तेव्हा तुम्हाला इंग्लंडमधे न्यायला हवं होतं त्यांनी. इथेच का ठेवलं हो तुम्हाला?>> नीरजा, हा आमचा देश आहे, दलितांची भूमी आहे. खरं तर तुम्ही लोकं ईथे उपरे आहात.

तुमचा नेता (ज्याच्या विचारांनी चालणारा एक दलित नेता शोधून मिळत नाही) स्वतंत्र भारताचा संविधानकर्ता झाला ते कसं काय? इंग्रज गेल्यावर त्यांच्यामागे जायला नाही सांगितलं तुमच्या नेत्याने ना की तुमचा नेता स्वतः तिकडे गेला.>> का म्हणुन आम्ही जावं, म्हणजे तुम्हाला ईथे मोकाट फिरता यावं म्हणून का ? ते सोडा आता, हि आमची माती आहे.

याचा अर्थ इंग्रज ही देशावरची आपत्ती हे स्वतः बाबासाहेब पण ओळखून होते. आणि तुम्ही इंग्रजांच्या झालेल्या विजयाबद्दल आजही आनंदोत्सव व्यक्त करत रहाता.... वा!>> (कोरेगावची लढाई) बाजिरावा विरुद्धच्या लढाईच्या विजयाचा उत्सव केला जावा हे आम्हाला बाबासाहेबानीच सांगितलं आहे.

मग काल काय शोकदिन पाळलात की काय?>> १५ ऑगष्ट हा आमच्या साठी स्वातंत्र्यदिन आहे ना. बाबांच्या घटनेनी चालणा-या देशाची सुरुवात करणारा तो दिवस आम्हाला प्रियच आहे.

जऊदया,
वाद घालण्यात काही अर्थ नाही.
आज उदयामधे तिरुपती बालाजी वर लेख देतोय.
नंतर रावण एक बोधिसत्व
हे सगळं वाचल्यावर तुमच्या प्रतिक्रिया अशाच असणार.
(माझं काम आहे लिहणं, प्रतिक्रियांवरुन भांडण नाही. असं मी एवढ्यात ठरवलं)
हेमाशेपो.
बाय बाय.

Arguing with people like Madhukar and Lakshman is like wrestling with a pig in the mud.
After a while you realise you are getting dirty, but the pig is actually enjoying it.>> तुमचे वाद काहीही असतील पण एका बरोबरीच्या मनुष्याला पिग म्हणून संबोधणे ह्यात हा वाद पूर्ण अधोरेखित होत आहे. समोरच्याचा तुम्हाला न पट्णारा द्रुष्टीकोण असेल पण त्यासाठी असे अपमानास्पद उल्लेख करणे यातच सगळे आले की. त्याच्या चुका दाखवून द्या पण इतका वैयक्तिक अपमान करण्याची गरजच नाही. हे तर मी ही सहन करणार नाही.

तुम्ही म्हणजे कोण नक्की?
कैक हजारो वर्षांपूर्वी आर्य आले ही थिअरी युरोपियन लोकांची. त्या थिअरीला चुकीचं ठरवणार्‍याही अनेक थिअरीज आहेतच.
नंतर मुसलमान आले हा इतिहास पण ते उपरे नाहीत.
उपरे ते फक्त हिंदू आणि ब्राह्मण?

मी कुणालाही कुठेही जायला सांगितलेलं नाहीये. तूच इंग्रजांच्या विजयाचे ढोल वाजवतोयस की. मी नाही वाजवत.

.

नीरजा, हा आमचा देश आहे, दलितांची भूमी आहे. खरं तर तुम्ही लोकं ईथे उपरे आहात. >>>>> अरे देवा, तुम्ही द्वेषाने आंधळे झालाय.. कधीतरी २००० वर्षांपुर्वीच्या आर्य-द्रविड/ आर्य-नाग या युद्धांवरुन तुम्ही आज हे ताशेरे ओढताय.. कमाल आहे!

मग तुला काय प्रतिक्रिया हव्यात? इथल्या प्रत्येक हिंदूने तुझे लेख वाचून ज्यातल्या बर्‍याच गोष्टी सिद्ध करता येत नाहीयेत असे लेख वाचून आत्महत्या करावी? ब्राह्मणाने तुझ्याकडे तलवार घेऊन यावे आणि माझा शिरच्छेद कर असे सांगावे? काय म्हणणं काय आहे?

तू ज्यांची तळी उचलतोस ते संभाजी ब्रिगेड तर याच वरच्या अजेंड्यावर काम करतात.

.

नीरजा, हा आमचा देश आहे, दलितांची भूमी आहे. खरं तर तुम्ही लोकं ईथे उपरे आहात.
>> तुम्ही म्हणजे कोण?
कहर आहे हा! अहो, आज माझ्या मुलांचा जन्म जर अमेरिकेत झाला तरी ते अमेरिकेचे नागरिक ठरतात.
नीरजा म्हणाली तसे मुसलमान - मग ते कन्व्हर्ट झालेले असोत/ वा बाहेरून आलेल्यांना झालेले असोत - ते तुम्हाला उपरे वाटत नाहीत - मग उपरे कोण?
ज्या लोकांना तुम्ही उपरं म्हणताय, ते बाहेरून आले ह्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे?
केदारचा आजचा लेख वाचलात? (वाचलात तरी समजून घ्यायची इच्छा असेल - तरच कळेल म्हणा!)
जर त्या काळातल्या माणसांचे अवशेष असं काही दाखवत नसतील तर तुम्ही कशाच्या आधारावर 'बाहेरून आले' असं म्हणता?

एखादा माणूस किती विषारी विचार करू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण आहात तुम्ही!!

अ‍ॅडमिन, ह्या लेखकानं मायबोलीवर मांडलेल्या विचारांची नोंद घ्याल का?

मला स्वतःला इग्रजांनी सती प्रथा बंद केल्यामुळे,स्त्री शि़क्षणाला पाठींबा दिल्यामुळे, अत्याधुनिक वैद्यकशास्त्र भारतात आणल्यामुळे,coep ,IIS सारखी उत्तम दर्जाची महाविद्यालये त्यांनी भारतात सुरु केल्यामुळे इंग्रज राजवटीबद्दल प्रचंड आदर वाटतो. क्रुतज्ञताही वाटते. मधुकरला त्याच्या समाजाला इग्रजांनी मिळवुन दिलेल्य प्रतिषष्ठेपाई जर इग्रजाम्चे कौतुक वाटत असेल त्यात चुक काय?

आपण सगळेच भारतीय आहोत. एकमेकांच्या दृष्टीने तितकेच सन्माननीय आहोत. हा अधिकार प्रत्येकाला भारतीय राज्यघटनेने दिलाय.

अडचण राजकिय पक्षांची होते. मतांच्या मोळ्या बांधण्यासाठी ते या विचारधारा जोपासतात. त्या इतक्या प्रभावी असतात की आपण भांडत बसतो. मी सुध्दा त्याला अपवाद नाही. काही काळ मी सुध्दा भांडलो आहे.

याच उत्कृष्ट उदाहरण मायवतीबहेन यांच सोशल इंजिनियरींग आहे. जो पर्यंत त्यांना उत्तर प्रदेशमध्ये प्रभाव निर्माण करता येत नव्हता तो पर्यत त्यांनी
तिलक तराजु और तलवार इनको मारो जुते चार अश्या घोषणा दिल्या.

आज सोशल इंजिनियरींगमध्ये या घोषणा बाद होऊन वेगळा अजेंडा झाला आहे.

उद्या आणखी काही होईल. पुर्वी इंग्रजांनी हा भेद केला. आता राजकिय पक्ष करत आहे. भारतातला कोणताच पक्ष याला अपवाद नाही.

प्रत्येकाला निरक्षीर विवेक परमेश्वराने दिला आहे. आपण त्याचाच वापर करु.

कोणावरही व्यक्तीगत टिका न करण्याचे बंधन मात्र पाळुया हि नम्र विनंती.

आपण सर्व मायबोलीवर घटकाभर आनंदासाठी येतो. हे जाणुन आपण लिहुया. मी सुध्दा ही काळ वहावत गेलो या करिता क्षमायाचना करतो.

जर मधुकर दलित चळवळीचे कार्य करत असेल तर तो त्याच्या चष्म्यातून आणि अभ्यासातून सुचलेले विचार मांडेल. ते कुणाला योग्य वाटतील किंवा अयोग्य वाटतील. ते मांडण्याचा त्याला अधिकार आहे. फक्त काही जणांना किंवा बहुतांश जणाना ते पटत नाहीत म्हणुन वयक्तिक्/जातीय धिंगाणा स्वतःच घालुन शेवटी
अ‍ॅडमिन, ह्या लेखकानं मायबोलीवर मांडलेल्या विचारांची नोंद घ्याल का?
हा बेगडी साळसूद प्रकार करणे ही काही लोकांची सवय दिसते आहे. अर्थात त्यावरून त्यांची मानसिकताही स्पष्ट होतेच/झालीच आहे. पण त्याना त्याविषयी आपलं काही चुकतं आहे असं वाटतच नसेल तर गापुवागी... करून काय उपयोग?

ही तुमची भुमी नाही वगैरे जे तो म्हणतो किंवा ईतर बर्‍याच गोष्टी मलाही पटत नाहीत. पण, कुणालातरी पटत नाही म्हणून एखाद्याचे अगदीच अक्षेपार्ह नसणारे विचार इथून डिलीट केले जावेत अशी विनंती करणे ही अंत्यंत घाणेरडी गोष्ट आहे.

.

नानबा,
गापुवागी... करून काय उपयोग?
हे माझ्या वरील प्रतिसादातील संक्षीप्त रूप
गाढवापुढं वाचली गीता... रामाची आय कोण तर सिता
हे पुर्ण वाक्य

मी आपल्याला उपमा दिली आणि तुम्ही लगेच लोळायला सुरूवात केलीत. काय तत्पर आहात हो गूण दाखवायला?

मधुकर यांनी माझ्या वि.पु.त हे बघा काय लिहीलंय

मधुकर
16 August, 2010 - 20:50

जोश्या,
उगीच माझ्यावर गरळ ओकत हिंडतोस म्हणुन सांगायला आलो.

" भाजलेल्या कोंबड्याला आगीची भीती नसते"

आणि

तु जोशी आहेस म्ह्टल्यावर तुनी असच वागलं पाहिजे.

तेंव्हा तु या पुढेही माझ्यावर खुशाल आग ओकत वावर.

" मै क्या, मै तो भाजलेला कोंबंडा" स्मित

मंदार,
मातोश्री वगैरे योग्य वाटत नाही. विचार कर.
हिंदू धर्माला सरळ सरळ विरोध करणारे त्याने काही म्हटले असेल तर कॉपी पेस्ट कर इथे.

.

तू वर जे दिले आहेस ते तुला नवे आहे का?

साहित्य परिषदेच्या बार्शीच्या संमेलनाला निमंत्रीत कवी म्हणून गेलेलो. बाहेरून कुत्र्यापसून ते आई-बहिण सगळ्यांवरून शिव्या येत होत्या. तिथले मसापचे अध्यक्ष शामसुंदर मुळे शांत होते. हसत होते. ते सरळ बाहेर गेले त्यांच्या नेत्यांशी बोलले नेते नंतर व्यासपिठावर कविता एकत डुलत बसलेले. तू कसे घेतोस यावर अवलंबून आहे.

ह बा,

तुम्ही तुमचे मायबोलीवरील वाचन थोडेसे वाढवायला हवे. या माणसाने हिंदु/ब्राम्हणांविरुद्द अकलेचे जे तारे तोडले आहेत ते तुम्ही वाचलेले दिसत नाही. उगाच इथे येउन मानभावीपणाने त्याची बाजु घेताय का?
जर एखाद्या बौद्ध/मागासवर्गीयाने हिंदु/ब्राम्हणांविरुद्ध लिहिले तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पात्र.. आणि कोणी हिंदुनी त्यावर मत मांडले तर ते गरळ ओकणे?..

नितिन,
तुम्ही वारंवार माफी का मागत आहात मला कळले नाही. हा इसम इथे काहितरी विद्वत्तेच्या आविर्भावात जहरी लिहितो तो अजिबात माफीचा विचार करत नाही आणि तुम्ही त्याचे पटले नाही त्याला विरोध केलात त्याबद्दल माफी?

मायबोली अ‍ॅडमिन हे या माणसाला अजिबात काही बोलणार नाहीत ह्याची सर्वानी नोंद घ्यावी. जातीय सलोखा राखण्याची जबाबदारी फक्त हिंदु धर्मीयांची आहे. कोणीही यावे आणि त्यांच्याविषयी काहीही बोलावे. त्यांनी मात्र आपला संयम सोडु नये.

तो तुमचा राजा होता, तुम्ही खुशाल त्यांचं गुणगाण करावं.>>>>>

तुम्ही माझी पोस्ट नीट वाचलेली नाहीये मधुकर. <<<मला दुसर्‍या बाजीरावांवर असलेला राग कळू शकतो, कारण असेही तो त्याचा विलासीपणा आणि स्त्रीलंपटवृत्तीसाठीच प्रसिद्ध होता. (अर्थात हे मत ऐकीव आणि वाचलेल्या गोष्टींवरून बनवले आहे, सद्ध्याची झांसी की रानी ही मालिका काही वेगळेच सांगतेय. खरे खोटे तो बाजीराव आणि देवच जाणे) माझा आक्षेप त्याबद्दल नाहीये,...>>>>

<<<शिक्षणाची सोय करुन दिली. मग सांगा. जवळचे कोण ?
शनिवारवाडयातले कि ब्रिटीश.
मुळात शनिवारवाड्यानी दलितांकडे केंव्हा लक्षच दिलं नाही, किंबहुना त्यांच्यावर सतत अत्त्याचारच केला गेला. मग हे वाडयातले राजे आपले राजे कसे काय? ते राजे होते बामणांचे.
आमचे राजे ते, जे आमचा विचार करतात.>>>>>

त्या शिक्षणाचा किती जणांनी आणि किती फ़ायदा करुन घेतला मधुकर? आणि मान्य शनीवार वाड्याने तुम्हाल दुर लोटले, पण याचा अर्थ असा आहे का की महाराष्ट्रात दुसरे सरदारच उरले नव्हते? थेट शत्रुला जावून मिळाले दलित बांधव. आणि जर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही भुमी तुमची आहे, तर तुमच्या सर्व समाजापैकी फ़क्त ५०० दलित बांधवांना शत्रुला (पक्षि ब्रिटीशांना) जावून मिळावे असे वाटले. मग बाकिच्यांचे काय? त्यांना तुमची भुमिका पटली नव्हती किं त्यांच्यावर तुम्ही म्हणता तसे आणि तितके अत्याचार होत नव्हते.

बादवे तुमच्या माहितीसाठी म्हणुन अजुन एक गोष्ट सांगतो.... थोरले बाजीराव पेशवे यांचा अंगरक्षक भिकाजी म्हणून एक दलितच होता. आणि या भिकाजीवर थोरल्या बाजीरावांचा इतका विश्वास होता की आपल्या सख्ख्या बहिणीच्या सासरी निरोप द्यायलादेखील बाजीराव भिकाजीलाच निवडत असे.

त्यांनी मात्र आपला संयम सोडु नये.>>>

खूप छान वाक्य लिहीलस मित्रा. त्याच्या विचारांना पाठिंबा देणारे कुणीच नसताना इथे असे भेदाभेद निर्माण करणारे लिहीण्याचे धाडस त्याला कुठून मिळेल? तुझ्या विरोधातूनच. संयम बाळगच.

बाकी महान बुध्दीवंतांच्या विरोधात काही लिहीलेले नसतानाही त्याना तसे वाटले असल्यास त्यानी तसे खुशाल वाटून घ्यावे....

भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

<(माझं काम आहे लिहणं, प्रतिक्रियांवरुन भांडण नाही. असं मी एवढ्यात ठरवलं)
हेमाशेपो.
>

अहो मधुकर, मी तुम्हाला पुनः एकदा नम्र विनंति करतो. तुम्ही असे करू नका.
तुमच्या लिखाणातून जगात इतर कुणालाहि माहित नसलेल्या गोष्टी आम्हाला कळतात. कुठल्या गोष्टीचा काय निष्कर्ष काढायचा याबद्दल जगात इतर कुणालाहि माहित नसलेली एक वेगळीच दिशा आम्हाला दिसते.

खरे तर आता तुम्ही भारत सोडून अमेरिकेत या. भारतातले लोक हुषार, विचार करणारे आहेत, त्यामुळे तुमची मते त्यांना पटत नाहीत.

इथे अमेरिकेत तुमच्या गुणांना भरपूर वाव मिळेल. एव्हढा विरोध पण होणार नाही. अहो दुसर्‍या बुशला दोन दोनदा निवडून देणारे, नि अजूनहि सारा पेलिनला राष्ट्राध्यक्ष बनवण्याचा घाट घालणारे लोक हे! तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. तुम्ही जगाला दाखवून द्या, की सद्दाम हुसेनच्या सौम्य व शांताताप्रिय निधर्मी राज्यात ब्राह्मणांची कट कारस्थाने चालू होती, म्हणून बुशने इराकवर हल्ला केला.
Light 1

१ ) मा.बो. वर कोणी ही मुस्लीम आय डी. का नाही ?
माझ्या या प्रश्नाचे उत्तर एक ही मा.बो. का दीले नाही ?
२ ) एक वेगळा प्रयत्न म्हणुन मी म्ह्टलेल्या साहीत्य संमेलनात जायला काय हारकत आहे .

३ ) मी स्वतः हा पुण्यात झालेल्या अ. भा. ब्राम्हण संमेलनात सह्भागी झालो होतो , तीथे जाणवलेली वा आवडलेली सगळ्यात चांगली गोष्ट म्हण्जे, अतिशय निटनेटकेपणा , कसला ही गोंधळ नाही , स्वच्छता , लाखो लोक असतांना ही एक स्वयम सिस्त , ह्या गोष्टी ईतर कोणत्या ही संमेलनात अभावाने च पाहायला मिळतात .

४ ) मी स्वत: हा कोणत्या ही संस्थेशी वा संघटनेशी संबधीत नाही .

५ ) मी कधीही , ईतिहासावर , पुस्तकार , लेखकावर , भाष्य करत नाही मला माझ्या कामानिमित्त समाजातील प्रत्येक घटकाबरोबर सह्भागी होण्याचे भाग्य लाभले ,जे पाहीले , ज्याचे निरीक्षण केले , जे अनुभव घेतले तेच लिह्तो वा बोलतो .

६ ) खर म्हण्जे तुम्हा लोकांना मी एवढचे सांगतो की आपला हेका सोडा , नाविन्या ची आसधरा .
आजुबाजुला काय घडते , समाज कसा बदलतो आहे , त्यांचा विचार काय आहेत , तो तसा विचार का करतो हे पहा , उगीच ईतिहासचे दाखले देउ नका . मला माझ्या बद्दल आभिवान वाटतो कि मी समाजातील सर्व घटकात मिसळुन प्रत्येकाचे विचार ,भावना, चर्चा , करायला मिळते .

७ ) मी स्वतः हा ला कोण्त्याही धर्माचा वा जातीचा मानत नाही .

८ ) खेद एवढाच वाटतो की नविन काही लिहले आणी ते थोडेसे वेगळे वाटले की सुरु........?
आरे मा.बो.करांना ताटर भुमिका सोडा आणी बुध्दीचा हेका सोडा , थोडसे आजुबाजुला ही डोकवा .

९ ) आपल्या या अशा वागण्या मुळे एक समाज आपल्या पासुन फटकुन वागतो ,आपल्या पासुन पुर्ण पणे तुटत चालला आहे .त्यांच्या मनात आपल्या बद्दल एक वेगळेपणाची भावना निर्माण झाली आहे तुमच्या अशा ईतिहास हेक्या मुळे , आत्मपरिक्षण करा व वर्तमानात या .

लक्ष्मण, तुला कळतंय का तू काय लिहिलंयस ते?
काही मुद्दे पटले नाहीत इथल्यांना तर तू नाही नाही ते आरोप करत सुटलायस?

Pages