दिवाळी अंक २०१० स्वयंसेवक घोषणा

मायबोली दिवाळी अंक २०१० साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दोन-अडीच महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्‍या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
दिवाळी अंकासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत लागते, खालील पैकी कुठल्या विभागात आपल्याला काम करायला आवडेल ते कळवा.
१. दिवाळी अंक संपादन
२. दिवाळी अंक रेखाटन
३. दिवाळी अंक सजावट
४. दिवाळी अंक साचा (template)
५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)
६. दृक श्राव्य विभाग (Audio/Video editing)
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. ज्या सदस्यांना मंडळात सहभागी करणे शक्य होणार नाही त्यांची नावे संपादकांकडे असतील आणि जसे सहाय्य लागेल तसे त्यांच्याशी संपर्क साधला जाईल.
या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे, त्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

*****

दिवाळी अंक २०१० संपादक मंडळ खालील प्रमाणे असेल.
मुख्य संपादक - ललिता-प्रीति
संपादक मंडळ - शर्मिला फडके, जाईजुई, हिम्सकूल, रैना, स्वरुप, मधुरिमा, पराग, anudon, श्रद्धा.

संपादक मंडळ ठरवतांना खालील गोष्टी विचारात घेतल्या गेल्या
१. कुठलाही सदस्य एकाच उपक्रमात ३ पेक्षा जास्त वर्षे काम करू शकत नाही.
२. नुकतेच मायबोलीकर झालेल्या सदस्यांचा मंडळासाठी यावर्षी विचार केला नाही.

ज्या सदस्यांनी दिवाळी अंक रेखाटन, दिवाळी अंक सजावट, दिवाळी अंक साचा (template), मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे) यासाठी नावे दिलेली आहेत त्यांची नावे संपादक मंडळाकडे नोंदवली आहेत, गरज लागेल त्याप्रमाणे त्यांच्याशी संपर्क करण्यात येईल.

नुकतेच मायबोलीकर झालेल्या सभासदांनी किंवा इतर जुन्या मायबोलीकरांनीही आधी मायबोलीच्या इतर उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा, मग त्यांना संपादक मंडळात घेता येईल. पुढच्या वर्षी मंडळात भाग घेण्यास उत्सुक असलेल्या सदस्यांनी हे जरूर लक्षात ठेवावे.

संपादक मंडळाचे अभिनंदन व अंकासाठी शुभेच्छा!!

Submit to kanokani.com

रुनी, मला इथेही काम करायला आवडेल. अर्थात हाही पहिलाच अनुभव असेल. मला 'शुद्धिकरण सहाय्य' या विभागात काम करायला आवडेल.

मला संपादन विभागात काम करायला आवडेल.

रुनी रेखाटना साठी मद्त करायला आवडेल

मी नै होणार सहभागी ईथे कारण मला दिवाळी अंकासाठी लिखाण पाठवायचे आहे स्मित

मलाही दिवाळी अंक संपादनासाठी काम करायला आवडेल. माझ्या घरी कॉम्प्युटर नाहीये पण मला मोबाईलवरून इंटरनेट वापरता येते.

मलाही दिवाळी अंक रेखाटन व सजावटीसाठी काम करायला आवडेल. स्मित

मला दिवाळी अंक संपादन आणि रेखाटनासाठी काम करायला आवडेल.

मला दिवाळी अंक संपादन व शुद्धिकरण सहाय्यासाठी काम करायला आवडेल. माझ्याकडे ब्रॉडबँड कनेक्शन व भरपूर वेळ आहे.

दिवाळी अंक संपादनात मदत करायला आवडेल. धन्यवाद. स्मित

मला दिवाळी अंक संपादन/सजावटीसाठी काम करायला आवडेल स्मित

ते 'शुद्धिकरण' असं हवं स्मित

दिवाळी अंक संपादन, शुद्धिकरण साहाय्य विभागात (व इतरही विभागांत गरज असेल त्याप्रमाणे!) काम करायला आवडेल. धन्यवाद. स्मित

दिवाळी अंक सजावट (डिझाइनिंग) विभागात काम करायला आवडेल.

मला २,३,४ आणि ६ ह्या विभागात काम करायला आवडेल...

१, ५, ६ मधे काम करायला आवडेल.. तसेच बाकीही कुठलीही मदत लागली तर सांगा..

मला या विभागात काम करायला आवडेल - दिवाळी अंक साचा (template)

मलाही काम करायला आवडेल-सजावटीचे,अथवा साच्याचे

बादवे, रुनी, दिवाळी अंक साचा (template) यात नक्की काय येणारेय?? page layouting की अजून ईतर काही....

दिवाळी अंकासाठी मु. शो. मध्ये मदत करु शकते. इतर कुठलीही मदत करायला देखील आवडेल.

मला दिवाळी अंक संपादन व शुद्धिकरण सहाय्यासाठी / काम करायला आवडेल.

दीपक.

मल शुध्धिकरण सहाय्य अथवा कोणतॅ ही काम चालेल..माझ्या कडॅ नेट्,वेळ दोन्ही आहे..

दिवाळी अंक संपादनात काम करायला आवडेल.

दिवाळी अंक संपादनात मदत करायला आवडेल. धन्यवाद.

मलाही दिवाळी अंक संपादनात मदत करायला आवडेल. माझ्याकडे अनुभवही आहे. धन्यवाद.

मला लिखनही पथवायचे आहे अनि सम्पादनतहि मदत करायला आवदेल .मी पुर्वी कधी सम्पादन केलेल नहिये .सन्धी मिल्याल्यास उपक्रुत होईन.

मला दिवाळी अंक संपादन व शुद्धिकरण सहाय्यासाठी / काम करायला आवडेल.

एक सुचना- यावेळी दिवाळी अंक किती जण वाचतात, कुठला लेख त्यांनी वाचला याची आकडेवारी दिसेल असे काही करता येईल का? मला असे वाटते की खूप जण दिवाळी अंक वाचत नाहीत. त्यापेक्षा रोज दिसणारे लेख इ.इ. हमखास वाचले जाते. संपादक वर्ग इतके परिश्रम घेतात अंकासाठी पण वाचकवर्ग हवा तेवढा लाभत नाही असे दिसून येत आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा!

मला दिवाळी अंक संपादन व शुद्धिकरण सहाय्यासाठी / सजावट (डिझाइनिंग) काम करायला आवदेल. मी शासनाच्या मासिक सजावट (डिझाइनिंग) विभागात काम करते. शुद्धिकरण कामाचा पन अनुभव आहे.

मला दिवाळी अंक संपादन आणि शुद्धिकरण साठी काम करायला आवडेल

मला संपादन व शुद्धिकरण सहाय्यासाठी काम करायला आवडेल...