अवेळी

Submitted by जया एम on 30 July, 2010 - 14:13

तुझे स्वप्न डोळ्यात उगवे अवेळी
रात्री कळ्यांना जशी जाग यावी
तुझे नाव ओठात उमले अवेळी
स्वगते फुलांची जशी आठवावी

अशा स्तब्ध झाल्या दिशा मूढ दाही
तुझी स्पंदने जेथ थांबून गेली
तुझे श्वास रुतले मनाच्या तळाशी
उगा मूक आक्रन्दने लाख केली

मौनात अश्वत्थ वाकून तेथे
धरेला म्हणे मूळ माझे कुठे गे
तिच्या स्निग्ध पदरात लपवून माथा
पुन्हा जोडू पाही जुने काही धागे

दूरात देवापुढे आर्त जळते
समई जशी की व्यथा काजळी
अशी वात विझवून टाकेल वारा
जिच्या अन्तरन्गी कथा वादळी

झोपेतुनी रे जरा जाग यावी
तुझा हात हातीच लागू नये
सावत्र दैवा पुन्हा सांगते की
इतुकेही निष्ठुर वागू नये

गुलमोहर: 

वा!

मौनात अश्वत्थ वाकून तेथे
धरेला म्हणे मूळ माझे कुठे गे
तिच्या स्निग्ध पदरात लपवून माथा
पुन्हा जोडू पाही जुने काही धागे

दूरात देवापुढे आर्त जळते
समई जशी की व्यथा काजळी
अशी वात विझवून टाकेल वारा
जिच्या अन्तरन्गी कथा वादळी

>> हे दोन्ही खास !

आवडली